Tuesday 23 April 2024

दौलतनगर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात साजरा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना 41 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला भक्तीमय वातावरण

 


  दौलतनगर दि.२३:-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यंदाच्या वर्षी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा परिसरात महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुर्णाकृती पुतळयावर व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते.

              दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 41 व्या पुण्यतिथीनिमित्त गत चौदा वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे पंधरावे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये 758 वाचक सहभागी झाले होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने,कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई,श्रीमती विजयादेवी देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, सौ.डॉ.वैष्णवीराजे देसाई,कु. ईश्वरी देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी ह...जयवंतराव शेलार महाराज, ...अनिल पाटील महाराज पापर्डेकर,...जगन्नाथ ठोंबरे महाराज ह.भ.प.दगडू माळी,नाना देसाई पापर्डेकर,भरत पाटील,सुरेश शिंदे,अमित लोहार,सुभाष देसाई यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.

              तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते यांचे पुण्यतिथी दिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर,डोक्यावर कलश,तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी ढोल वाद्यांसमवेत श्री विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकापासून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पुतळयासमोर प्रथमत: ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच २१ तोफांची सलामी देण्यात आली. तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते यांचा 41 वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला प्रती पंढरपुर अवतरले होते. गत चौदा वर्षापासून ह...पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत. यंदाचा सोहळयातही त्यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा बजावली तर हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह...जयवंतराव शेलार महाराज,...अनिल पाटील महाराज,...जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी कर्मचारी अधिकारी व कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

चौकट- रिंगण सोहळा ठरला भाविकांसाठी आकर्षण.

            लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदाच्या वर्षी लोकनेते साहेब यांचे पुण्यतिथी  सोहळयानिमित्त रिंगण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या रिंगण सोहळयामध्ये ना.शंभूराज देसाई यांचे सह सौ.स्मितादेवी देसाई, मा.यशराज देसाई, मा.रविराज देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई,सौ.डॉ.वैष्णवीराजे देसाई, कु.ईश्वरी देसाई,चि.जयराज देसाई, चि.आदित्यराज देसाई यांचे उपस्थितीमुळे हा रिंगण सोहळा उपस्थित सर्व भक्त,भाविकांसाठी आकर्षण ठरले.तसेच हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित भाविक भक्त भारावून गेले.

Saturday 20 April 2024

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 41 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर,ता.पाटण येथे भक्तीमय वातावरणात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास प्रारंभ.

 

 

दौलतनगर दि.20:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये  पंधराव्या वर्षी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ शनिवार दि. २० एप्रिल,२०24 रोजी भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय वातावरणात ह...जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन केले.तसेच मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.यशराज देसाई(दादा),चि.जयराज देसाई(दादा) यांचे शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

              सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे पंधरावे वर्ष असून प्रति वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 41 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०24 पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.

              दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये 690 वाचक सहभागी झाले आहेत.पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार, प्रवनचनकारांना एक चांगले तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान यंदाचे  पारायण सोहळयास वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रति वर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ह...पुंडलिक महाराज कापसे,आळंदीकर हे उपस्थित असून रविवार दि. २१ एप्रिल, २०२4 रोजी ह.भ.प. उदय महाराज आटकेकर यांचे प्रवचन तर ह.भ.प. पांडूरंग महाराज साळूंखे,पलूस यांचे किर्तन आणि सोमवार दि.२२ एप्रिल, २०२4 रोजी ह.भ.प आनंद महाराज कुंभार बुधगाव सांगली यांचे प्रवचन तर ह.भ.प. श्रीराम महाराज अभंग इंदापूर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त मंगळवार दि. २३ एप्रिल २०२4 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा. श्रीमती विजयादेवी देसाई(मॉसाहेब),मा.नामदार श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी करुन लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केल्यानंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. रामदास महाराज आरेवाडीकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता होणार आहे.

 

Friday 5 April 2024

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त २० एप्रिलपासून दौलतनगरला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.

 



दौलतनगर दि.05:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळा वरील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये पंधराव्या वर्षी भव्य अशा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे आयोजन शनिवार दि.२० एप्रिल ते मंगळवार दि. २३ एप्रिल,२०२4 पर्यंत दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह तसेच पाटण तालुका वारकरी संघाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो. यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल,२०२4 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 41 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०२4 पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये करण्यात आले आहे. शनिवार दि.२० एप्रिल रोजी पारायण सोहळयाचा शुभारंभ व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन पाटण तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते व राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा मा. ना. श्री.शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रजल्वन करुन करण्यात येणार आहे.या पारायण सोहळयात शनिवार दि. २० एप्रिल २०२4 रोजी ह.भ.प.  कैवल्य महाराज सातारकर यांचे प्रवचन, ह.भ.प. बापूसाहेब महाराज उखळीकर पंढरपूर यांचे किर्तन,रविवार दि. २१ एप्रिल, २०२4 रोजी ह.भ.प. उदय महाराज आटकेकर यांचे प्रवचन तर ह.भ.प. पांडूरंग महाराज साळूंखे,पलूस यांचे किर्तन आणि सोमवार दि.२२ एप्रिल, २०२4 रोजी ह.भ.प आनंद महाराज कुंभार बुधगाव सांगली यांचे प्रवचन तर ह.भ.प. श्रीराम महाराज अभंग इंदापूर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त मंगळवार दि. २३ एप्रिल २०२4 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा. श्रीमती विजयादेवी देसाई(मॉसाहेब),मा.नामदार श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. रामदास महाराज आरेवाडीकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा मा. ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचे हे पंधरावे वर्ष असून या पारायण सोहळयाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील किर्तनकार,प्रवचनकारांना तालुकास्तरीय व्यासपीठ निर्माण झाले आहे.या पारायण सोहळयामध्ये सहभागी होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी वाचकांनी आपल्या नावाची नोंद ही कारखान्याचे मुख्य कार्यालय,शेती ऑफीस विभागीय कार्यालय,गट ऑफीस तसेच शिवदौलत सह.बँक शाखा मल्हारेपठ, ढेबेवाडी, तारळे, दौलतनगर, पाटण व मलकापूर या शाखांचे ठिकाणी करावी.तसेच  लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 41 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे.