Tuesday, 10 March 2026

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 116 व्या जयंती निमित्ताने ना.शंभूराज देसाई यांचेकडून मतदारसंघामध्ये दहा हजार अन्न धान्याचे किटचे वाटप. पाटण विधानसभा मतदारसंघातील गोर गरीब कुटुंबांना दिला मदतीचा आधार.

 




दौलतनगर दि.10:- लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 116 व्या जयंतीच्या निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील गोर-गरीब कुटुंबांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून तब्बल दहा हजार अन्नधान्याचे किटचे वितरण पाटण विधानसभा मतदार संघातील तारळे, चाफळ, म्हावशी, शिरळ, कोयना, नाटोशी, मारुलहवेली, ढेबेवाडी,कुंभारगाव व सुपने तांबवे भागामधील गावो-गावी  करण्यात येऊन या विभागातील गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. ना.शंभूराज देसाई यांनी केलेली मदत मोलाची  ठरली असून मदत मिळालेल्या कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

           लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा जयंती कार्यक्रम प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन दौलतनगर ता.पाटण येथे साजरा करण्यात येतो. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे यंदाचे 116 व्या जयंती कार्यक्रमाचे निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मतदारसंघातील गोर गरीब कुटुंबियांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल दहा हजार अन्न धान्याचे किटचे वितरण हे गावा गावातील गरीब कुटुंबियांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मार्फत केले. या अन्नधान्य किटमध्ये तांदूळ, साखर,डाळ,तेल,मिठ,मिरची पावडर,हळद,चहा पावडर,गरम मसाला,आटा, बिस्किट,कोलगेट इ. वस्तूंचे चांगल्या दर्जाचे साहित्याचा समावेश असून ना.शंभूराज देसाई  यांचेवतीने तारळे, चाफळ, म्हावशी, शिरळ, नाटोशी, मारुलहवेली, ढेबेवाडी, काळगाव, कुंभारगाव व सुपने तांबवे या भागामध्ये डोंगर पठारावरील गावांमध्ये  त्या त्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुमारे दहा हजार गोर गरीब कुटुंबियांना त्यांचे घरामध्ये जाऊन हे अन्न धान्याचे किटचे जागेवर जाऊन वितरण केले. ना.शंभूराज देसाई हे संकट काळी नेहमी आपल्या मतदारसंघातील ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.  अतिवृष्टीमध्ये स्वत: पुराच्या पाण्यामध्ये उतरुन त्यांनी पूरग्रस्त जनतेची विचारपूस करुन त्यांना धीर देण्याचे काम केले. तसेच अतिवृष्टीमध्ये दरड कोसळल्याने मोठया प्रमाणांत नुकसान झालेल्या डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये दळण वळण पूर्ण असतानाही त्यांनी चिखलातून पूराच्या पाण्यातून चालत जाऊन या गावांतील नागरीकांना धीर दिला होता.मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या घटनांमुळे जर काही नुकसान झाले तर प्रथम मदत म्हणून नेहमी ना.शंभूराज देसाई हे मदतील धावून येतात.कोविड सारख्या काळामध्ये ना.शंभूराज देसाई यांनी हातावरचे पोट असलेल्या मोल मजूरी करणाऱ्या कुटुंबियांना,पानटपरी,वडाप चालक यांना त्याकाळात असेच अन्नधान्याचे किटचे वितरण करुन मोठया प्रमाणांत मदत केली होती. तसेच अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन ना.शंभूराज देसाई यांनी तब्बल पाच हजार अन्न धान्याचे किटचे वितरण हे आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत नुकतेच करण्यात आले. त्यामुळे गोर गरीब कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला. ना.देसाई हे जरी कॅबिनेट मंत्री असले तरी त्यांचे संपूर्ण लक्ष हे आपल्या मतदारसंघावर केंद्रीत असते,आजही त्यांची नाळ ही सर्व सामान्य जनतेशी जोडली गेली आहे.सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या सुख: दुखाबरोबर सार्वजनिक कार्यक्रमाव्दारे विविध गावांमध्ये आपली उपस्थिती लावून त्यांचा आजही मोठा जनसंपर्क असल्याचे पहायला मिळते.आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून ते आठवडयातून दोन दिवस ते मरळी या ठिकाणी जनता दरबार घेऊन सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध असतात.तर गावामध्ये जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नुकतेच त्यांनी पालकमंत्री कार्यालय आपले दारी या नाविण्यपूर्ण अभियान सुरु केले असून या लाही मोठा प्रतिसाद नागरीकांकडून मिळत आहे.सामान्य जनतेसाठी सतत कार्यरत असलेल्या ना.शंभूराज देसाई यांनी यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जयंतीचे औचित्य साधून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य कुटुंबियांना धान्याची किटचे वितरण करुन मोठे सहकार्य केल्याने या किटचा लाभ मिळालेल्या कुटुंबियांनी ना.शंभूराज देसाई यांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.

  

चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिबिंब.

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी सन 1967 साली पाटण तालुक्यामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांना जिवनावश्यक वस्तूंसह निवाऱ्याच्या व्यवस्थेसाठी पत्र्याचे शेड उभारली होती.तसेच पडझड झालेल्या भागांमध्ये पत्र्यांचे वाटप केले होते.लोकनेते साहेबांचे ते ऋण आजही पाटण तालुक्यातील जुनी जाणती मंडळी मोठया मनाने सांगतात.तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुध्दा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रमाणे गरीब व गरजू कुटुंबांना अडचणीच्या काळात सढळ हाताने मदत करत असल्याने ना.शंभूराज देसाई हे त्यांच्या या कार्यातून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिबिंब असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून रस्त्यांच्या कामांसाठी भरघोस निधी.

 


दौलतनगर दि.10:- पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांचे कामासाठी 25 कोटी रुपयांचा निधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असल्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले असून मंजूर निधीमधून पाटण विधानसभा मतदार संघातील दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल्या रस्त्यांचे मजबूतीकरण होणार आहे.

               प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेले राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यावरुन मोठया प्रमाणांत वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावरुन वाहन धारकांना दळण वळणाची चांगली सोय होण्यासाठी या रस्त्यांचे मजबुतीचे कामांसाठी  निधीची आवश्यकता  असल्याने ना.शंभूराज देसाई यांचेकडे निधी मंजूर होण्यासाठी या विभागातील नागरीकांना सातत्याने मागणी होती. त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे सुचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्ताव निधी मंजूरीकरीता सादर करण्यात आला होता.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रा.मा. 148 कि.मी. 13/500 ते  15/00 ची सुधारणा करणे (भाग- कोयनानगर ते गणेश मंदिर हेळवाक) 1 कोटी,नागठाणे तारळे सडावाघापूर पाटण रस्ता प्रजिमा 37 कि.मी.34/00 ते 39/200 (भाग- गुजरवाडी ते पाटण) रस्ता रुंदीकरणासह सुधारणा 1.50 कोटी,मल्हारपेठ मंद्रुळहवेली पानस्करवाडी जमदाडवाडी नवसरवाडी प्रजिमा-133 ची रूंदीकरणासह सुधारणा करणे (भाग-  नवसरवाडी ते मल्हारपेठ) 01 कोटी,लोरेवाडी कोंजवडे भुडकेवाडी कडवे खुर्द केळेवाडी रस्ता प्र.जि.मा.135 कि.मी. 0/00 ते 2/500 ( भाग कोंजवडे फाटा ते कडवे बु. ) मध्ये रुंदीकरणासह सुधारणा 01 कोटी,मोरगिरी किल्लेमोरगिरी गुंजाळी बनपेठवाडी येराड ढेरूगडेवाडी विठ्ठलवाडी कारवट सावंतवाडी बाजे नाणेल रासाटी रस्ता प्रजिमा-171 कि.मी. 4/800 ते 6/300 (भाग- बनपेठवाडी ते येराड) मध्ये रूंदीकरणासह सुधारणा 01 कोटी,मोरगिरी किल्लेमोरगिरी गुंजाळी बनपेठवाडी येराड ढेरूगडेवाडी विठ्ठलवाडी कारवट सावंतवाडी बाजे नाणेल रासाटी रस्ता प्रजिमा-171 (भाग- कारवट फाटा ते कारवट) मध्ये रूंदीकरणासह सुधारणा 01 कोटी,मोरगिरी किल्लेमोरगिरी गुंजाळी बनपेठवाडी येराड ढेरूगडेवाडी विठ्ठलवाडी कारवट सावंतवाडी बाजे नाणेल रासाटी रस्ता प्रजिमा-171 कि.मी. 25/300 ते 27/500 (भाग- बाजे फाटा ते गाढखोप) मध्ये रस्ता सुधारणा 1.50 कोटी,वाघजाईवाडी नाणेगांव जाळगेवाडी चव्हाणवाडी दुसाळे प्रजिमा-37 ते पाबळवाडी फडतरवाडी खडकवाडी जंगलवाडी तारळे रस्ता प्रजिमा-174 कि.मी. 7/800 ते 12/200 (भाग- नाणेगांव फाटा ते जाळगेवाडी) मध्ये रस्ता सुधारणा 01 कोटी,नागठाणे तारळे सडावाघापूर पाटण रस्ता प्रजिमा कि. मी. 7/740 ते 10/700 भाग  सासपडे ते कोंजवडे फाटा  रस्ता  सुधारणा 01.50 कोटी,निसरे मारुल गुढे काळगांव रस्ता प्रजिता - 54 कि.मी. 0/00 ते 35/350 (भाग- कि.मी.  0/00 ते 8/500 निसरे ते टेळेवाडी )ची सुधारणा 03 कोटी,नाडे सांगवड मंद्रूळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा ५८ ची  रुंदीकरण व  सुधारणा करणे. किमी. १४/७५० ते 20/०० (भाग - दिवशी घाट ते साबळेवाडी) 02 कोटी,इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी  रस्ता प्रजिमा 121 (भाग- कि.मी.5/000 ते 12/00  ) सुधारणा 02 कोटी,निसरे मारुल गुढे काळगांव रस्ता प्रजिता - 54 कि.मी. 0/00 ते 35/350 (भाग- कि.मी. 25/00 ते 30/00 मोरेवाडी फाटा ते रामिष्टेवाडी फाटा )  ची सुधारणा 02.50 कोटी,ढेबेवाडी भोसगांव उमरकांचन जिंती मोडकवाडी सातर रस्ता प्रजिमा-126 कि.मी. 0/000 ते 13/600  (भाग- कि.मी.5/300 ते 9/300  मराठवाडी धरण ते जिंती ) ची सुधारणा 02 कोटी,ढेबेवाडी भोसगांव उमरकांचन जिंती मोडकवाडी सातर रस्ता प्रजिमा-126 कि.मी. 0/000 ते 13/600  (भाग- कि.मी.9/300 ते 13/600   जिंती ते सातर)  ची सुधारणा 01 कोटी,प्रजिमा 54 ते पवारवाडी मेंढ निवी डाकेवाडी मस्करवाडी लोटलेवाडी काळगाव भरेवाडी  प्रजिमा-162  कि.मी.0/00 ते 20/000 (भाग- कि.मी. 13/000 ते 16/000 मस्करवाडी ते काळगाव )  ची रुंदीकरण सह सुधारणा 01 कोटी, भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 22/500 (भाग कि.मी.12/500 ते 17/00-(कारळे ते तामिणे ) ची  रुंदीकरणासह सुधारणा 01 कोटी  या रस्त्यांचा कामांचा समावेश असून या मंजूर कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.