Monday 14 December 2020

मल्हारपेठ पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीची 19.23 कोटींची निविदा प्रसिध्द गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी करुन दाखविले.

 



दौलतनगर दि.15 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-पाटण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मल्हारपेठ ता.पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीला राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दि.07 ऑक्टोंबर, 2020 रोजी मंजुरी मिळवत याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीची प्रक्रिया सुरु केली केवळ दोन महिन्यातच ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकाराने नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीची 19.23 कोटींची निविदाही महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,मुंबई यांनी दि.08 डिसेंबर,2020 रोजी प्रसिध्द केली असून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी बोलले ते करुन दाखविले आहे.

          पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे  अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. ना.शंभूराज देसाईंनी गृहराज्यमंत्री झाल्या झाल्या अनेक वर्षाच्या या मागणीला मुहुर्तस्वरुप देत त्यांनी व्यक्तीश: पुढाकार घेत महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाकडून मान्यता घेतली यासंदर्भात राज्य शासनाचे गृहविभागाने मंजूरी दिल्याचा शासन निर्णयही दि. 07 ऑक्टोंबर, 2020 रोजी पारित केला. नवीन पोलीस स्टेशनची मान्यता मिळालेनंतर ना.शंभूराज देसाईंनी यास गती देत याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीची प्रक्रिया सुरु केली आणि केवळ दोन महिन्यातच पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारत बांधकामांची निविदाही महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,मुंबई यांचेवतीने प्रसिध्द करण्यात आली आहे.

                मल्हारपेठ नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थान इमारतीच्या बांधकामांमध्ये खालील बाबींचा समावेश असून 19.23 कोटीं रुपयांच्या निविदेमध्ये जी पल्स वन अशाप्रकारे पोलीस स्टेशनची 10 हजार चौ.फुटाची इमारत उभारण्यात येणार आहे तसेच पोलीस कर्मचारी यांच्याकरीता 28 हजार चौ.फुट 500 चौ.फुटप्रमाणे 56 निवासस्थाने तसेच पोलीस अधिकारी यांच्याकरीता 5 हजार चौ.फुटाचे 04 निवासस्थाने असे एकूण 43 हजार चौ.फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर याठिकाणी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचाही या निविदेमध्ये समावेश करण्यात आला आहे.संरक्षक भिंत (वॉल कंमपाँड), बागबगीचा, लॅन्डस्केंपिंग इत्यादी बाबी करण्यात येणार आहेत. मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,मुंबई यांचे या बांधकामावर नियंत्रण राहणार आहे.

           गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नामुळे पाटण तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन व निवासस्थानाची देखणी इमारत उभी राहणार असून या इमारतीमुळे मल्हारपेठ व विशेष करुन पाटण तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे. सदरचे नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी व आता नवीन पोलीस स्टेशन व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान इमारत उभारण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा सातत्याचा पाठपुरावा असल्याने हे सर्व शक्य झाले आहे.याचा या विभागातील नागरिकांना अभिमान असून या प्रकल्पाबाबत या विभागातील नागरिकांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

चौकट:- राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे शुभहस्ते होणार या प्रकल्पाचे

         भूमिपुजन.

             येत्या महिन्याभरात मल्हारपेठ नवीन पोलीस स्टेशन व पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचे निवासस्थानाच्या बांधकामाची सर्व निविदा प्रक्रिया पुर्ण करुन घेण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट कमी होताच राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे शुभहस्ते या प्रकल्पाचे भूमिपुजन करण्याचा मानस गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.

Saturday 5 December 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील गांवागांवात पोहचली गोरगरीबांना मदत.

 


दौलतनगर दि.05 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर यंदाच्या वर्षी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांचा दि.17 नोव्हेंबरचा वाढदिवस साजरा केला नाही.मात्र त्यांचे वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामार्फत पाटण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.प्रामुख्याने ना.शंभूराज देसाईंचे 54 व्या वाढदिवसा निमित्त मतदारसंघातील ग्रामीण भागातील अत्यंत गरीब कुटुंबातील सदस्यांना पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर 5400 ब्लॅकेंट तर 5400 महिलांना साडया व 5400 शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनींना शालेय साहित्य,बिस्कीट व पाच राजिगऱ्यांचे लाडूचे पॅकेट तसेच कोरोनापासून बचावाकरीता 5400 मास्क अशा प्रकारच्या मदतीचे वाटप करुन पाटण मतदारसंघातील गांवागावांत ही मदत पोहचविण्याचे उल्लेखनीय कार्य करण्यात आले आहे.

        राज्याचे विद्यमान गृहराज्यमंत्री व पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय जनमाणसातील आमदार ना.शंभूराज देसाईंचा दि.17 नोव्हेंबरचा वाढदिवस हा पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेकरीता उत्साहाचा,प्रेरणेचा आणि जल्लोषाचा दिवस म्हणून पाटण मतदारसंघात प्रतिवर्षी साजरा होतो.मात्र यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.ना.शंभूराज देसाईंनी हा निर्णय घेतला असला तरी आपल्या वाढदिवसाच्या आनंदात त्यांनी पाटण मतदारसंघातील अत्यंत गरीब कुटुंबातील सदस्यांना,महिलांना व लहान मुलांना सहभागी करुन घेतले.मतदारसंघातील सर्व विभागातील ग्रामीण भागातील जनतेला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत आवश्यक असणाऱ्या मदतीचे वाटप पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर करण्यात आले असून पाटण मतदारसंघातील जनतेने ना.शंभूराज देसाईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरुन आशिर्वाद दिले आहेत. ना.शंभूराज देसाईंचा यंदाच्या वर्षी 54 वा वाढदिवस होता. त्यांचे 54 व्या वाढदिवसानिमित्त 5400  ब्लॅकेंट, 5400 साडया, 5400  शालेय साहित्य,बिस्कीट व पाच राजिगऱ्यांचे लाडूचे पॅकेट व 5400 मास्क वाटप करण्याचा अनोखा उपक्रम त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राबविला असून या उपक्रमाचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.

           त्याचबरोबर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात आलेल्या शिवसेना सदस्य नोंदणींच्या उपक्रमामध्ये पाटण मतदार संघात ना.शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली चांगला सहभाग घेवून शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांना 01 लाख शिवसेना सदस्य नोंदणीची अनोखी भेट देण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले होते त्यानुसार ना.शंभूराज देसाईंच्या वाढदिवसादिवशी सुमारे 71 हजार सदस्य नोंदणी करण्यात आली. सातारा जिल्हयाकरीता 03 लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उदिष्ट देण्यात आले होते त्यातील 71 हजार शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. उर्वरीत 29 हजार शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.

 

 

Friday 4 December 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईच्या पुढाकाराने 90 कोरोनाबाधितांना जीवनदान. दौलतनगर कोवीड केअर सेंटरमधून सुमारे 90 जण झाले कोरोनामुक्त.

  


दौलतनगर दि.04 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- कोविड-19 संसर्गामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील रुग्णांची हेळसांड थांबविण्याकरीता मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून उभारलेल्या दौलतनगर,ता.पाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये गत दोन महिन्यात आतापर्यंत कोरोना बाधित 98 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यातील सुमारे 90 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकारामुळे या 90 कोरोना बाधितांना जीवनदान मिळाले असल्याने 90 कोरोनामुक्त झालेल्यांच्या कुटुंबियांनी पाटण मतदारसंघासाठी खऱ्या अर्थाने कोरोना योध्दा ठरलेल्या ना.शंभूराज देसाईंचे आभार व्यक्त केले आहेत.

             सातारा जिल्ह्यामध्ये दोन महिन्यापुर्वी ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढत असताना कराड,सातारा याठिकाणी ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवू लागली होती.ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असताना अशा गंभीर परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे नगर विकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून पाटण मतदारसंघातील कोरोना रुग्णांकरीता कोवीड केअर सेंटर उभे करण्याचा धोरणात्मक निर्णय गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी घेतला.

             स्वत: याकरीता त्यांनी पुढाकार घेत केवळ पाच ते सहा दिवसात या कोवीड सेंटरची उभारणी करीत रुग्णांच्या सेवेसाठी हे कोवीड सेंटर तातडीने सुरु करण्याचे काम त्यांनी केले.या कोविड सेंटरमध्ये 50 ऑक्सिजन बेड,25  नॉनऑक्सिजन बेड अशी एकूण 75 बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. आवश्यक सर्व औषधसाठा तसेच इतर साधन सामुग्रीसह या कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक 18 वैद्यकीय अधिकारी,17 कर्मचारी  उपलब्ध करण्यात आले आहेत.गत दोन महिन्यात आतापर्यंत याठिकाणी पाटण मतदारसंघातून 98 कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते.त्यातील सुमारे 90 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या या सेंटरमध्ये केवळ 07 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकारामुळे उभारलेले हे कोवीड केअर सेंटर पाटण मतदारसंघातील कोरोनाबाधितांना खऱ्या अर्थाने वरदान ठरले आहे.

             या कोविड सेंटरच्या एकूण कामकाजावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे बारकाईने लक्ष असून कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी,वाफारा घेणेसाठी वाफाऱ्याची भांडी, आवश्यक असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे.तसेच वेळच्यावेळी चहा,नाष्टा, जेवण व औषधोपचार या बाबींकडेही लक्ष दिले जात आहे.सेंटरमधील रुग्णांकरीता निवासाची चांगली सोय करत वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकाकरीता स्वतंत्र्यपणे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या सेवेमध्ये कशाचीही कमतरता भासू नये,यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी 24 तास उपलब्ध आहेत.

           दरम्यान रुग्णांची ने-आण करण्यासाठी कोविड सेंटरला आवश्यक असणारी अद्यावत रुग्णवाहिका शिवसेना पक्षाचे गटनेते व राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे सहकार्याने डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून उपलब्ध करण्यात आली आहे.कोरोना महामारीच्या अडचणीच्या काळात योध्दा म्हणून पाठीशी उभे राहिलेल्या ना.शंभूराज देसाईंचे त्यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल पाटण मतदारसंघातील जनतेकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.