Saturday 5 December 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील गांवागांवात पोहचली गोरगरीबांना मदत.

 


दौलतनगर दि.05 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर यंदाच्या वर्षी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांचा दि.17 नोव्हेंबरचा वाढदिवस साजरा केला नाही.मात्र त्यांचे वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामार्फत पाटण मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.प्रामुख्याने ना.शंभूराज देसाईंचे 54 व्या वाढदिवसा निमित्त मतदारसंघातील ग्रामीण भागातील अत्यंत गरीब कुटुंबातील सदस्यांना पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर 5400 ब्लॅकेंट तर 5400 महिलांना साडया व 5400 शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनींना शालेय साहित्य,बिस्कीट व पाच राजिगऱ्यांचे लाडूचे पॅकेट तसेच कोरोनापासून बचावाकरीता 5400 मास्क अशा प्रकारच्या मदतीचे वाटप करुन पाटण मतदारसंघातील गांवागावांत ही मदत पोहचविण्याचे उल्लेखनीय कार्य करण्यात आले आहे.

        राज्याचे विद्यमान गृहराज्यमंत्री व पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय जनमाणसातील आमदार ना.शंभूराज देसाईंचा दि.17 नोव्हेंबरचा वाढदिवस हा पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेकरीता उत्साहाचा,प्रेरणेचा आणि जल्लोषाचा दिवस म्हणून पाटण मतदारसंघात प्रतिवर्षी साजरा होतो.मात्र यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.ना.शंभूराज देसाईंनी हा निर्णय घेतला असला तरी आपल्या वाढदिवसाच्या आनंदात त्यांनी पाटण मतदारसंघातील अत्यंत गरीब कुटुंबातील सदस्यांना,महिलांना व लहान मुलांना सहभागी करुन घेतले.मतदारसंघातील सर्व विभागातील ग्रामीण भागातील जनतेला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत आवश्यक असणाऱ्या मदतीचे वाटप पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर करण्यात आले असून पाटण मतदारसंघातील जनतेने ना.शंभूराज देसाईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरुन आशिर्वाद दिले आहेत. ना.शंभूराज देसाईंचा यंदाच्या वर्षी 54 वा वाढदिवस होता. त्यांचे 54 व्या वाढदिवसानिमित्त 5400  ब्लॅकेंट, 5400 साडया, 5400  शालेय साहित्य,बिस्कीट व पाच राजिगऱ्यांचे लाडूचे पॅकेट व 5400 मास्क वाटप करण्याचा अनोखा उपक्रम त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राबविला असून या उपक्रमाचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.

           त्याचबरोबर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात आलेल्या शिवसेना सदस्य नोंदणींच्या उपक्रमामध्ये पाटण मतदार संघात ना.शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली चांगला सहभाग घेवून शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांना 01 लाख शिवसेना सदस्य नोंदणीची अनोखी भेट देण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले होते त्यानुसार ना.शंभूराज देसाईंच्या वाढदिवसादिवशी सुमारे 71 हजार सदस्य नोंदणी करण्यात आली. सातारा जिल्हयाकरीता 03 लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उदिष्ट देण्यात आले होते त्यातील 71 हजार शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. उर्वरीत 29 हजार शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.

 

 

No comments:

Post a Comment