Friday 30 September 2022

सत्यजितसिंह कोण ? तर तालुक्यातील निष्क्रिय नेतृत्व म्हणून जनतेने दोन वेळा नाकारलेल्यांना राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार आहे का?मंत्री ना.शंभूराज देसाई यांचा प्रतिसवाल.

 


दौलतनगर दि.30: स्वकर्तृत्व असल्याने राज्यात मला चांगलेच ओळखले जाते पण दुसऱ्याच्या ओळखीची काळजी करणाऱ्यांनी आपली ओळख नेमकी कुठे आहे हे अगोदर तपासून घ्या.आमच्यात हिम्मत असल्यानेच मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेच्या पाठबळावर तुम्हाला विधानसभा निवडणूकीमध्ये सलग दोन वेळा मोठया फरकाने आस्मान दाखवले आहे, याचे भान सत्यतिसिंह यांनी ठेवावे. गेल्या दोन विधानसभा निवडणूकीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने ज्या निष्क्रिय नेतृत्वाला मोठया फरकाने घरी बसविले आहे, असा प्रतिसवाल करत ज्या गद्दारीची भाषा आपल्या तोंडून आता येत आहे मग ज्यावेळी आपले नेते यांनी काँग्रेसमधून बंडाळी करत बाहेर पडून वेगळया पक्षाची स्थापना केली,त्यावेळी पहिल्यांदा तुमच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आपले पिताश्रीं यांनी नेमके काय केले होते याचेही उत्तर तुम्ही अगोदर जनतेला द्यावे, तसेच उठाव आणि बंडळी यातला फरकच ज्यांना कळत नसेल अशा बालिश निष्क्रीय तसेच जनतेने दोन वेळा नाकारलेल्या नेतृत्वाला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारी आहे का,असा प्रतिसवाल राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिले आहे.

                प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, काहीच काम शिल्लक नसलेल्या मंडळी हया केवळ प्रसिध्दीसाठी मोठया आवेषात बेताल वक्तव्य करत असून त्यांचे कार्यकर्ते टिकून रहावे म्हणून त्यांची करमणूक करण्याचा हा प्रकार असल्याने मतदारसंघातील सर्व सामान्य जनता याकडे गांभीर्याने नक्कीच बघणार नाही. कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये या निष्क्रिय नेतृत्वाने तालुक्यातील जनतेला माझे प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांची खोटी पत्रके काढून निव्वळ करमणूकीचा खेळ केला. त्यामुळे आपण केलल्या करमणूकीमुळे आपल्या सोबत किती जनता आहे हे येणाऱ्या काळातच कळेल. केवळ मोठया नेत्यांची नावे घ्यायची आणि त्यांचे नावे पत्रक काढून लोकांची दिशाभूल करायची हा प्रकार तालुक्यासाठी नविन नाही.अशा प्रकारे केलेला प्रयत्न तालुक्यातील सुज्ञ जनतेने त्यावेळी हाणून पाडला आहे हे ही चांगलेच ज्ञात आहे. निवडणूक आली की वाडयाच्या बाहेर पडायच आणि जनतेमध्ये दिशाभूल करणे हा तुमचा एककल्ली कार्यक्रम आता तालुक्यातील जनतेला चांगलाच माहिती झाला आहे,मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच तालुक्यातील डोंगरी  व दुर्गम भागातील गावे व वाडया वस्त्यांच्या प्रलंबित विकास करण्याचा नेहमीच प्रयत्नशील असून गावां-गावांमध्ये विकासाची कामे सध्या सुरु आहेत. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये मतदारसंघातील आम जनतेने नेहमीच विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ दिले आहे. निष्क्रीय असणाऱ्या नेतृत्वाला बाजूला करत सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादानेच आपला दोनदा मोठया फरकाने पराभव केला आहे. दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या व ग्रामपंचायतीच्या फंडातून पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजनासाठी जाण्याची आजपर्यत वेळ आली नसून मतदारसंघामध्ये मंजूर असलेल्या विकास कामांची भूमिपूजने ही विभागा-विभागातील गावा-गावातील माझे सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत.त्यामुळे मतदारसंघामध्ये विकासाची कामे सुरु आहेत की नाही हे झोपेच्या सोंगत असलेल्या व काविळ झालेल्यांना दिसणारच नाहीत. परंतु सर्व सामान्य जनता मताच्या रुपाने नक्कीच याचे उत्तर येणाऱ्या काळात देईल.समोरा-समोर येण्याचे आव्हान देताना आपण ज्या आवेशात बोलत आहात किमान आपण आपली राजकीय उंची तपासून अशा प्रकारची व्यक्तव्य करावीत. आणि समोरा समोर येण्याचे आपण जे आव्हान करत आहात ते आम्ही यापूर्वीच आपल्याला केले आहे.आपणच ठिकाण तारीख व वेळ सांगा जरुर समोरा समोर येऊन दूध का दूध  व पाणी का पाणी केले जाईल.ज्या धनशक्तीचा उल्लेख केला ती कोणाकडे आहे व तालुक्यात निवडणुका आल्या की त्याचा वापर तुमच्याकडून कसा होतो हे तालुक्यातील जनतेला माहित आहे.त्यामुळे धनशक्ती  कोणाकडे आहे व जनतशक्ती कोणाकडे आहे वेगळे सांगण्याची गरजच नाही. गेली दोन अडीच वर्ष जे अज्ञात वासात होते ते आता निवडणुका डोळयासमोर ठेऊन कार्यक्रम कोणता आहे आणि आपण काय बोलतो योचही भान विसरलेल्या मंडळींना जनताच धडा शिकवेल असा टोला शेवटी त्यांनी प्रसिध्दीपत्रकांत लगावला आहे.

Monday 26 September 2022

मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.26: पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तसेच काही गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना हया जीर्ण व कालबाह्य झाल्या आहेत.त्यामुळे या गावांमध्ये विशेषत: उन्हाळयात कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन तीव्र पाणी पाणी टंचाई जाणवत असल्याने पाटण तालुक्यातील विविध नळ पाणी पुरवठा योजनांचा राज्य शासनाच्या जलजिवन मिशन योजनेअंतर्गत समावेश होणेकरीता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील सुचविण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचा जलजिवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश करण्यात येऊन यामधील आत्तापर्यंत 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सातारा जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

          पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील विविध नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना राज्य शासनाचे जलजिवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश होण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे शिफारशी करत या योजनांना मंजूरी मिळण्याकरीता राज्य शासनाकडे सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण तालुक्यातील तब्बल 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी राज्य शासनाकडून आत्तापर्यंत मंजूर करण्यात आला आहे.या नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये नुने 115 लक्ष,पाळशी 14.94 लक्ष,कामरगाव 24.25 लक्ष,मानाईनगर 18.76 लक्ष,डोणीचावाडा वांझोळे 33 लक्ष,भारसाखळे 12.33 लक्ष,विठ्ठलवाडी शिरळ 9.90 लक्ष,जळव 24.96 लक्ष,सदुवर्पेवाडी 14.96 लक्ष,निगडे 24.05 लक्ष,चाळकेवाडी 18.64 लक्ष,पाडळोशी ,तावरेवाडी,मसुगडेवाडी 43.10 लक्ष,पांढरेपाणी आटोली 99.28 लक्ष,गव्हाणवाडी  67.39 लक्ष,रुवले 55.78 लक्ष,ऊरुल 51.40 लक्ष,गलमेवाडी 83.37 लक्ष,चाफळ 163.26 लक्ष,काहिर 50.31 लक्ष,चव्हाणवाडी धामणी 14.97 लक्ष,लोटलेवाडी काळगाव 22.01 लक्ष,शिद्रुकवाडी काढणे 27.46 लक्ष,करपेवाडी काळगाव 48.46 लक्ष,मसुगडेवाडी दाढोली 29.86 लक्ष,मरळोशी 30.18 लक्ष,आंबवडे खुर्द 80.11 लक्ष,कडवे खुर्द रेडेवाडी 80.04 लक्ष,वाटोळे 14.30 लक्ष,मरळी 24.97 लक्ष,आंबळे 24.95 लक्ष,आवर्डे 21.56 लक्ष,कळकेवाडी 15.92 लक्ष,काटेवाडी तारळे 24.49 लक्ष,कुठरे 24.67 लक्ष,घोटील वरचे 24.68 लक्ष,जमदाडवाडी 21.09 लक्ष,तामकडे 24.07 लक्ष,तामकणे 24.90 लक्ष,नवजा कामरगाव 22.27 लक्ष,भुडकेवाडी 24.95 लक्ष,मिरगाव कामरगाव 24.96 लक्ष,वर्पेवाडी सळवे 18.86 लक्ष,वाघणे तळोशी 24.77 लक्ष,शेडगेवाडी  24.10 लक्ष,निवडे पुनर्वसन 23.65 लक्ष,गोषटवाडी 40.82 लक्ष,मुरुड 42.41 लक्ष,सांगवड 40.43 लक्ष,आंबेघर तर्फ मरळी 27.17 लक्ष,जानुगडेवाडी 27.92 लक्ष,उधवणे 36.62 लक्ष,राहुडे 21.57 लक्ष,कोळेकरवाडी डेरवण 75.05 लक्ष,गवळीनगर (कोकीसरे) 20.58 लक्ष,बाचोली 39.96 लक्ष,बनपूरी 197.52 लक्ष,बोडकेवाडी 35.23 लक्ष,केमसे ढाणकल 5.90 लक्ष,चिटेघर 13.11 लक्ष,चौगुलेवाडी सांगवड  13.32 लक्ष,जरेवाडी 4.99 लक्ष,जाईचीवाडी बोंद्री 4.48 लक्ष,दिक्षी धावडे 11.19 लक्ष,मळा काढोली 14.47 लक्ष,मालदन 14.87 लक्ष,शेंडेवाडी 9.10 लक्ष,हावळेवाडी 7.56 लक्ष,आबदारवाडी 8.62 लक्ष,करपेवाडी तळमावले 8.74 लक्ष,सळवे 14.97 लक्ष,गोठणे 12.03 लक्ष,गोवारे 7.74 लक्ष,चोपदारवाडी 7.99 लक्ष,ढोकावळे नाव 8.21 लक्ष,पिंपळोशी 14.97 लक्ष,बनपेठवाडी 10.93 लक्ष,बोर्गेवाडी सळवे 13.01 लक्ष,सोनवडे 14.37 लक्ष,हुंबरवाडी 3.09 लक्ष,मुरुड गोरेवाडी  14.38 लक्ष,दुसाळे 13.56 लक्ष,पाबळवाडी 7.47 लक्ष,एकावडेवाडी सळवे 14.98 लक्ष,मराठवाडी दिवशी खुर्द 8 लक्ष,विठ्ठलवाडी सणबूर 14.89 लक्ष,दिवशी खुर्द 7.37 लक्ष,सिध्देश्वरनगर चोपदारवाडी 5.92 लक्ष,हुंबरणे 12.58 लक्ष,खिवशी 14.97 लक्ष,टेळेवाडी 14.92 लक्ष,नाव 4.24 लक्ष,मराठवाडी 9.60 लक्ष,घाणबी 13.97 लक्ष,तामिणे 12.74 लक्ष,साईकडे 197 लक्ष या योजनांचा समावेश आहे.तसेच धावडे,टोळेवाडी,वजरोशी,नहिंबे चिरंबे,फडतरवाडी घोट, ताईगडेवाडी, पाचगणी, काळोली,आवसरी काठी,कातवडी,मारुल तर्फ पाटण,मरड,किल्ले मोरगिरी,झाकडे बौध्दवस्ती,गोकूळ तर्फ पाटण,सडावाघापूर,जाळगेवाडी,कोकीसरे,मोरेवाडी कुठरे,माथणेवाडी महिंद व महिंद स्टॉप,रामेल,गणेवाडी ठोमसे,दिवशी बु.,गारवडे,जंगलवाडी जाधववाडी, बेंदवाडी, माळवाडी, सवारवाडी,धामणी, काळगाव,लोहारवाडी काळगाव,मस्करवाडी,सतिचीवाडी,धनगरवाडा कसणी,सलतेवाडी,डाकेवाडी वाझोली,ठोमसे या गावांतील योजनांचे अंदाज पत्रक तयार करण्यात येऊन तांत्रिक मान्यतेकरीता सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच प्रशासकीय मान्यता झालेल्या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करुन या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी अशा सूचना मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे शेवटी पत्रकांत नमूद केले आहे.


Saturday 17 September 2022

सहकारी साखर कारखानदारीचे प्रश्नासंदर्भात राज्य शासन केंद्राकडे आग्रही मागणी करणार -मंत्री शंभूराज देसाईं लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.


दौलतनगर दि.17 शेतकऱ्यांच्या उसाला एफ. आर.पी. प्रमाणे  योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते. मात्र त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी  साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेला ही योग्य भाव मिळाला पाहिजे.राज्य शासन सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.सध्या देशात ८५ लाख  टन साखर शिल्लक आहे मात्र केंद्रसरकारकडे सहकारातील अद्याप ही काही प्रलंबित प्रश्न असून हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी राज्य शासन केंद्राकडे आग्रही मागणी असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.दरम्यान राज्यातील भाजप -सेना युतीचे हे सरकार राज्यातील सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठाम पणे असल्याचे ही मंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

                  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली “महाराष्ट्र दौलतलोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये पार पडली. यावेळी लोकनेते बाळसाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, आदित्यराज देसाई, अशोकराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे,शशिकांत कदम,सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील,भागोजी शेळके,बळीराम साळुंखे,शंकरराव पाटील,विजय सरगडे,सुनील पानस्कर,सर्जेराव जाधव,संचालिका श्रीमती जयश्री कवर,सौ.दिपाली पाटील,बबनराव शिंदे,मधुकर पाटील,विजयराव जंबुरे,अभिजित पाटील,सुरेश पानस्कर,ॲङमिलिंद पाटील,चंद्रकांत पाटील, प्रकाशराव जाधव, मधुकर पाटील यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

              यावेळी बोलताना मंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने सहकारी साखर क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत यशस्वीपणे टिकण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील इतर मोठ्या कारखान्याच्या तुलनेत देसाई कारखाना लहान असताना ही इतर कारखान्याबरोबर एफ.आर.पी. प्रमाणे देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना दर दिला आहे,याचा आपणाला अभिमान आहे.कोणताही कारखाना कधीही मुद्दाम एफ आर पी चे हप्ते करीत नाही मात्र केंद्र सरकारचे साखर धोरणा संदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. साखर निर्याती संदर्भातील केंद्राने अडचणी दूर केल्यास राज्यातील साखर कारखानदारी अडचणीतुन बाहेर येण्यास मदत होईल.त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच यासंदर्भात केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करणार असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.  मंत्री ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्यातील भाजप सेना युती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असून राज्यातील सहकारी साखर कारखानदारी यशवीपणे टिकविण्यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करीत असून सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर ही सरकारचे लक्ष असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दूरदृष्टी तुन निर्माण झालेल्या आणि स्व. शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारावर चालणाऱ्या या कारखान्याला राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे,अशी ग्वाही देवुन मंत्री ना.देसाई म्हणाले  प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही आपल्या कारखान्याची चांगली वाटचाल सुरु आहे. 1250 मे. टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफ.आर.पी.देतो हे एकमेव उदाहरण आहे. 1250 मे. टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले, लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करुन एफ.आर.पी.देण्याचा प्रयत्न केला.सभासदांनी व ऊस उत्पादकांनी आपलेपणांन कारखान्याकडे पाहणं गरजेचे आहे.

यशराज देसाई यांनी, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. सध्या हे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्याचे असून पहिल्या टप्प्याचे काम ऐंशी टक्के झाले असून उर्वरित वीस टक्के काम पूर्ण करणार आहे. तसेच, दुसर्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. कारखान्या च्या या विस्तारीकरणामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. ही वाढ झाल्यास सभासद शेतकर्यांच्या सर्व ऊसाचे गाळप वेळेत होण्या स मदत होणार आहे. यंत्रणेच्या तुटवड्याबाबत बोलताना ते म्हणाले, यंत्रणेचा तुटवडा हा केवळ देसाई कारखान्यालाचं नव्हे तर राज्यातील सर्व कारखान्यांना मध्ये आहे. मात्र यावरती तोडगा काढण्यासाठी देसाई कारखान्याचा हायवेट्ररच्या दृष्टीने विचार सुरु असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने देशातील साखरेच्या निर्यातीवरती बंदी घातल्याने अनेक कारखानदारांना साखरेचा कोटा शिल्लक असताना ही निर्यात बंदी मुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी एफ आर पी शंभर टक्के देण्यात आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र देसाई कारखाना येत्या दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना एफ आर पी ची शंभर टक्के रक्कम देण्यासाठी कटीबद्ध असणार आहे असं सांगितले.

           दरम्यान या सभेत विषयपत्रिकेवरील आणि ऐनवेळेच्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली यामध्ये,मंत्री शंभूराज देसाई यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून आणि यशराज देसाई यांची लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.दरम्यान कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

चौकट: सहन करण्याची क्षमता संपल्यानेच   राज्यातील   महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो

महाराष्ट्राला नवी दिशा देताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्याचे नंदनवन केले आणी खऱ्या अर्थाने तालुका उभारला मात्र पाटणकरांनी लोकनेत्यांना धोका दिला. ज्यांना बोटाला धरून राजकारणात आणले त्यांच्याशी दगाबाजी केली गेली.संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करून बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकनेत्यांच्या विरोधात कट कारस्थाने, दगाबाजी केल्याने लोकनेते शेवटच्या निवडणूकित सहा हजार मतांनी निवडून आले. मुख्यमंत्र्यांच्या नंतरचे दोन नंबरचे पद लोकनेत्यांचे होते. ज्यांनी दगाबाजी केली त्यांच्या मांडींला मांडी लावून आम्ही कदापी बसणार नाही.मात्र अडीच वर्षे तोंड धरून बुक्क्यांचा मार सहन करीत आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो.  मात्र त्यानंतर सहन करण्याची क्षमता संपल्यानेच   राज्यातील   महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो.अशी जोरदार टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.


Friday 9 September 2022

चेअरमन मा.यशराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 245 गणेश मंडळांना दिल्या भेटी.

 


  दौलतनगर दि.09 :- गत दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर सध्या मोठया उत्साहात सुरु असलेल्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई,पुणेसह इतर शहरी भागातून अनेक चाकरमणी गणेशोत्सव काळात पाटण तालुक्यातील खेडो-पाडयामध्ये दाखल झाला असून त्यांचेसह स्थानिक युवकही सहभागी होऊन हा उत्सव आनंदात साजरा करत आहेत.या उत्सवामध्ये विविध गावांमध्ये असलेल्या श्री गणेश मंडळांना भेटी देण्याची युवकांची व कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात तीन दिवस गणपती मंडळांचा  भेटीचा  दौरा करत या विभागातील तब्बल 76 गावांतील 245 गणेश मंडळा भेटी देत झंझावती दौरा करुन भेटी  दिल्या.

           सध्या सर्वत्र मोठया धामधुमित गणेशोत्सव साजरा होत असून यामध्ये युवकांचा मोठा उत्साह असतो.पाटण तालुक्यातील  खेडो-पाडयातील विविध गावांत मुंबई व पुणे या शहरांसह इतर ठिकाणी नोकरी व व्यवसायासाठी रहिवाशी असलेले अनेक तरुण युवक कार्यकर्ते,चाकरमणी हे  गणेश उत्सवाच्या काळामध्ये आप-आपल्या गावी येत असतात.मोठया उत्साहात साजरा होत असलेल्या या गणेशोत्सवामध्ये गावां-गावांमध्ये असलेल्या गणेश मंडळांना भेटी देण्याचा मोठा आग्रह असतो. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई हे प्रतिवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघातील गणेश मंडळांना भेटी देत असतात.परंतु राज्याचे मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदाची त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली असल्याने त्यांना मंत्रालयीन कामकाजासाठी सध्या मुंबई येथेच जास्त काळ थांबावे लागत असून मतदार संघामध्ये  अभ्यांगतांचे भेटीसाठी दोन दिवस आवर्जुन येत असतात.परंतु गणेशोत्सवाचे काळामध्ये गणेश मंडळांना द्याव्या लागणाऱ्या  भेटीची  मागणी  लक्षात घेऊन युवा नेते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन मा.यशराज देसाई यांनी ही जबाबदारी घेत सध्या सुरु असलेल्या गणेशोत्वाच्या काळात त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात केवळ तीन दिवसांमध्ये तब्बल 76 गावांतील 245 गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. भेटी दिलेल्या गावातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात स्वागत केले.तर महिलांनी औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. दुपारी  सुरु केलेले हे गणपती  मंडळाचे भेटीचे दौरे भर पावसातही रात्री उशीरापर्यंत सुरु असतानाही प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेप्रमाणेच चेअरमन मा.यशराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात झंझावती दौरा करत गणेश मंडळांना भेटी दिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांसह सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी व ग्रामस्थ हे मोठया उत्साहात या दौऱ्यासाठी उपस्थित राहून त्यांचे स्वागत करताना दिसले.

चौकट : मा.यशराज देसाई (दादा) यांचे गणपती दौऱ्यांत वडीलधारी मंडळींचीही अशीही आपुलकी.

पाटण विधानसभा मतदारसंघातील गणेश मंडळांचे भेटीमध्ये ठिक-ठिकाणी युवक व कार्यकर्ते,महिला यांचेकडून स्वागत होत असताना काही ठिकाणी वयोवृध्द मंडळीही आवर्जुन उपस्थित होती. गणेश मंडळांना भेटी देण्याबरोबर मा.यशराज देसाई यांनी विविध गावांतील वडीलधारी कार्यकर्ते यांचे घरी जाऊन त्यांनी आपुलकीने आस्थावाईकपणे तब्ब्येतीची विचारपूर केली. कडवे या ठिकाणी वयोवृध्द आजींनी तर चेअरमन मा.यशराज देसाई यांना प्रसाद म्हणून पेढा भरवला तर एका आजींनी पेरु दिला.तसेच माझा हा फोटो नेटवर टाका अशी इच्छा त्यांचेकडे व्यक्त केली. तसेच वयोवृध्द मंडळींनीकडून लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) व नामदार शंभूराज देसाई यांचे कार्याची आठवण करत तुमच्याकडूनही पाटण विधानसभा मतदारसंघात सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात चांगले काम होईल असे शुभआशिर्वाद देत दौऱ्यांत वडीलधारी मंडळींनी देसाई कुटुंबियांशी अशीही आपुलकी व्यक्त केली.