Friday 9 September 2022

चेअरमन मा.यशराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 245 गणेश मंडळांना दिल्या भेटी.

 


  दौलतनगर दि.09 :- गत दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर सध्या मोठया उत्साहात सुरु असलेल्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई,पुणेसह इतर शहरी भागातून अनेक चाकरमणी गणेशोत्सव काळात पाटण तालुक्यातील खेडो-पाडयामध्ये दाखल झाला असून त्यांचेसह स्थानिक युवकही सहभागी होऊन हा उत्सव आनंदात साजरा करत आहेत.या उत्सवामध्ये विविध गावांमध्ये असलेल्या श्री गणेश मंडळांना भेटी देण्याची युवकांची व कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात तीन दिवस गणपती मंडळांचा  भेटीचा  दौरा करत या विभागातील तब्बल 76 गावांतील 245 गणेश मंडळा भेटी देत झंझावती दौरा करुन भेटी  दिल्या.

           सध्या सर्वत्र मोठया धामधुमित गणेशोत्सव साजरा होत असून यामध्ये युवकांचा मोठा उत्साह असतो.पाटण तालुक्यातील  खेडो-पाडयातील विविध गावांत मुंबई व पुणे या शहरांसह इतर ठिकाणी नोकरी व व्यवसायासाठी रहिवाशी असलेले अनेक तरुण युवक कार्यकर्ते,चाकरमणी हे  गणेश उत्सवाच्या काळामध्ये आप-आपल्या गावी येत असतात.मोठया उत्साहात साजरा होत असलेल्या या गणेशोत्सवामध्ये गावां-गावांमध्ये असलेल्या गणेश मंडळांना भेटी देण्याचा मोठा आग्रह असतो. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई हे प्रतिवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघातील गणेश मंडळांना भेटी देत असतात.परंतु राज्याचे मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदाची त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली असल्याने त्यांना मंत्रालयीन कामकाजासाठी सध्या मुंबई येथेच जास्त काळ थांबावे लागत असून मतदार संघामध्ये  अभ्यांगतांचे भेटीसाठी दोन दिवस आवर्जुन येत असतात.परंतु गणेशोत्सवाचे काळामध्ये गणेश मंडळांना द्याव्या लागणाऱ्या  भेटीची  मागणी  लक्षात घेऊन युवा नेते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन मा.यशराज देसाई यांनी ही जबाबदारी घेत सध्या सुरु असलेल्या गणेशोत्वाच्या काळात त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात केवळ तीन दिवसांमध्ये तब्बल 76 गावांतील 245 गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. भेटी दिलेल्या गावातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात स्वागत केले.तर महिलांनी औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. दुपारी  सुरु केलेले हे गणपती  मंडळाचे भेटीचे दौरे भर पावसातही रात्री उशीरापर्यंत सुरु असतानाही प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेप्रमाणेच चेअरमन मा.यशराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात झंझावती दौरा करत गणेश मंडळांना भेटी दिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांसह सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी व ग्रामस्थ हे मोठया उत्साहात या दौऱ्यासाठी उपस्थित राहून त्यांचे स्वागत करताना दिसले.

चौकट : मा.यशराज देसाई (दादा) यांचे गणपती दौऱ्यांत वडीलधारी मंडळींचीही अशीही आपुलकी.

पाटण विधानसभा मतदारसंघातील गणेश मंडळांचे भेटीमध्ये ठिक-ठिकाणी युवक व कार्यकर्ते,महिला यांचेकडून स्वागत होत असताना काही ठिकाणी वयोवृध्द मंडळीही आवर्जुन उपस्थित होती. गणेश मंडळांना भेटी देण्याबरोबर मा.यशराज देसाई यांनी विविध गावांतील वडीलधारी कार्यकर्ते यांचे घरी जाऊन त्यांनी आपुलकीने आस्थावाईकपणे तब्ब्येतीची विचारपूर केली. कडवे या ठिकाणी वयोवृध्द आजींनी तर चेअरमन मा.यशराज देसाई यांना प्रसाद म्हणून पेढा भरवला तर एका आजींनी पेरु दिला.तसेच माझा हा फोटो नेटवर टाका अशी इच्छा त्यांचेकडे व्यक्त केली. तसेच वयोवृध्द मंडळींनीकडून लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) व नामदार शंभूराज देसाई यांचे कार्याची आठवण करत तुमच्याकडूनही पाटण विधानसभा मतदारसंघात सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात चांगले काम होईल असे शुभआशिर्वाद देत दौऱ्यांत वडीलधारी मंडळींनी देसाई कुटुंबियांशी अशीही आपुलकी व्यक्त केली.


No comments:

Post a Comment