Monday 28 August 2023

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती अंतर्गत पाटण तालुक्यातील 31 विकास कामांना 05 कोटी 47 लक्ष निधी मंजूरी. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून 31 गावांतील विविध विकास कामे लागणार मार्गी.

 


दौलतनगर दि.28:-पाटण विधानसभा मतदारसंघातील भूकंप प्रवण क्षेत्रातील विविध गावांतील सभामंडप,पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते,शाळा खोल्या बांधणे इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०22-23  या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून निधी मंजूर होण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे अध्यक्ष ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केलेली होती.त्यानुसार पाटण तालुक्यातील 31 गावांतील विविध विकास कामांना 05 कोटी 47 लक्ष 58 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने  प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील 31 गावांतील सभामंडप,पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते,शाळा खोल्या बांधणे इत्यादी विकासकामांकरीता सन २०22-23  या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मंजूर होणेकरीता दि.16 मार्च २०२3 रोजीचे पत्रानुसार राज्याचे मुख्यमंत्री तथा कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे अध्यक्ष ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केलेली होतीत्यानुसार सन २०22-23 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे अध्यक्ष असणाऱ्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण 31 गावांतील विविध विकास कामांना 05 कोटी 47 लक्ष 58 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार मंजूर झालेल्या विकासकामामध्ये काळगाव अंतर्गत कुमाळ  येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 14.99 लक्ष,घोटील अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,दुधडेवाडी काळगाव  पोहोच रस्ता सुधारणा 14.99 लक्ष,शिबेवाडी वरची गुढे  अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष,मारुल तर्फ पाटण जोतिर्लिंग मंदिर ते गमेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लक्ष,रासाटी नवलाई मंदिर रस्ता सुधारणा 15 लक्ष,मसुगडेवाडी केळेाली अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लक्ष,जाळगेवाडी येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष,माजगाव धुमाळवस्ती व भोसलेवस्ती रस्ता सुधारणा 20 लक्ष,मंद्रुळकोळे जौंजाळवाडी रस्ता सुधारणा 19.92 लक्ष,मत्रेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 14.99 लक्ष,अनुतेवाडी जिंती भैरवनाथ मंदिर पोहोच रस्ता सुधारणा 14.95 लक्ष,माईंगडेवाडी जिंती ते डिसले आवाड पोहोच रस्ता सुधारणा 19.99 लक्ष,रुवले ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्ता सुधारणा 24.91 लक्ष,साबळेवाडी  अंतर्गत सिध्दीविनयक मंदिर ते गोसावी वस्ती रस्ता खडी. डांबरीकरण 14.98 लक्ष,ना.बाळासाहेब देसाई हायस्कूल कुसरुंड वर्ग खोल्यांचे बांधकाम 19.96 लक्ष,आंब्रुळे येथे विठ्ठलाई मंदिरास सभामंडप 12 लाख,दौलतनगर ता.पाटण परिसरामध्ये संरक्षक भिंत व बंदिस्त आर.सी.सी.गटरसह रस्ता सुधारणा 39.98 लक्ष,दुधडेवाडी मरळी पोहोच रस्ता सुधारणा 15 लक्ष,कै.सौ.वत्सलादेवी देसाई हायस्कूल मरळी येथे शाळा खोल्या दुरुस्ती 19.96 लक्ष,गणेवाडी ठोमसे ता.पाटण अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लक्ष,ठोमसे समाज मंदिर 12 लक्ष,जमदाडवाडी श्री दत्त मंदिरासमोरील ग्रामपंचायतीच्या मोकळया जागेमध्ये सामाजिक सभागृह 11.99 लक्ष,बोडकेवाडी येथे सभामंडप 12 लक्ष,पापर्डे  मराठी शाळा ते  शिवाजी शेजवळ यांचे घर रस्ता सुधारणा 14.97 लक्ष,मल्हारपेठ शिवाजी चौक परिसर सुशोभिकरणासह सुधारणा 15 लक्ष,म्हावशी जांभळेवस्ती येथे आर.सी.सी.गटर बांधकाम 15 लक्ष,मेंढोशी(खालची) जोडरस्ता श्री.मच्छिंद्र जाधव यांचे घर ते चंद्रकांत जाधव यांचे घरापर्यंतचा रस्ता सुधारणा 15 लक्ष,बोंद्री वनवासवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लक्ष या कामांचा समावेश असून या मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांची अंदाजपत्रक,निविदा कार्यवाही करण्याच्या सूचना ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याने ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून या 31 गावांतील विविध विकास कामे मार्गी लागणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

Saturday 26 August 2023

जलजिवन मिशन योजनेअंतर्गत 12 योजनांना 12 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नामुळे 12 गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार.

 

दौलतनगर दि.26:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेल्या गावातील नळ पाणी पुरवठा योजना हया कालबाहय तसेच जिर्ण झाल्याने या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत होती.विशेषत: या गावांमध्ये उन्हाळयात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे या गावांतील ग्रामस्थांनी नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होण्यासाठी मागणी केली होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या या गावांचा जलजिवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश करत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे शिफारशीही केल्या होत्या. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री यांचेकडे केलेल्या सातत्याचे पाठपुराव्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील 12 गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत 12 कोटी 25 लक्ष 53 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                 प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत सध्या गावा-गावांमध्ये नविन नळ पाणी पुरवठा योजनांची कामे मंजूर करण्यात येत असून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पालकंत्री ना.शंभूराज देसाई यांचे  प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मोठया प्रमाणांत नळ पाणी पुरवठा मंजूर करुन त्यांस निधी मंजूर करण्यात आला असून या योजनांची कामे सध्या गावो-गावी प्रगती  पथावर आहेत.दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघातील बेलदरे, म्होप्रे, गिरेवाडी, आडदेव,साबळेवाडी,वाडीकोतावडे,खळे,नवसरवाडी,नाडोली,माजगाव,वेताळवाडी व त्रिपुडी या गावांमध्ये नवीन नळ पाणी पुरवठा योजना होण्यासाठी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे विनंती केली होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या गावांचा तातडीने जलजिवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश करत या गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना निधी मंजूर होण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील 12 गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना राज्य शासनाचे जलजिवन मिशन योजनेअंतर्गत 12 कोटी 25 लक्ष 53 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांमध्ये बेलदरे 45.15 लाख, म्होप्रे 177.41 लाख, गिरेवाडी 82.04 लाख, आडदेव बु व आडदेव खुर्द 188.65 लाख, साबळेवाडी 86.37 लाख,वाडीकोतावडे 53.83 लाख,खळे 98.77 लाख,नवसरवाडी 89.91 लाख ,नाडोली 80.48 लाख,माजगाव 115.14 लाख,वेताळवाडी 120.75 लाख व त्रिपुडी  87.13 लाख या योजनांचा समावेश असून मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या निविदा प्रक्रिया कार्यवाही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सुरु केली आहे.निविदा निश्चित झाल्यानंतर जलजिवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी यांना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.



 


पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा भूकंपग्रस्त दाखल्यांमुळे शासकीय सेवेत रुजू झालेल्या तरुणांनी मानले आभार .

दौलतनगर दि.26:- राज्य शासनाने राज्यातील भूकंपग्रस्तांना न्याय मिळवून दिल्यानंतर भूकंग्रस्तांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीतील वारसदारांना भूकंपग्रस्त दाखल्यांचा लाभ मिळावा  यासाठीही पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे केलेली मागणी विशेष बाब म्हणून मान्य करत तसा शासन निर्णय पारित केल्याने आज भूकंपग्रस्त दाखल्यांचा तिसऱ्या चौथ्या पिढीतील युवकांना त्याचा लाभ होऊन अनेक तरुण तरुणी हया शासकीय सेवेत रुजू झाल्या आहेत.राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडून भूकंपग्रस्त दाखल्यांबाबत चांगला निर्णय करुन घेतल्याने भूकंग्रसत दाखल्यांमुळे शासकीय सेवेत रुजू झालेल्या तरुण तरुणींनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा आज दौलतनगर ता.पाटण येथे सत्कार करत त्यांचे आभार मानले.

           पाटण तालुक्यात दि. 11 डिसेंबर,1967 ला प्रलंयकारी झालेल्या भूकंपात बाधित झालेल्या भूकंपग्रस्तांना सन 1995 पासून राज्य शासनाने बंद केलेले भूकंपग्रस्तांचे दाखले पुर्ववत सुरु करणेबाबत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे सातत्याचे पाठपुराव्याने  राज्य शासनाने दि.18 डिसेंबर,2015 रोजीचे शासन निर्णयानुसार सदर भूकंपाचे दाखले पुर्ववत सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय घेत या‍ निर्णयाच्या माध्यमातून पाटण तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील भूकंपग्रस्त व्यक्तींचा समावेश या‍ निर्णयामध्ये करुन घेतला.

दरम्यान शासन निर्णय हा जुना शासन निर्णय असल्यामुळे भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्तांचे दाखले काढणेस अनेक अडचणी निर्माण होत होत्या. भूकंपग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाची व्याख्या ठरवून देण्यात आली असल्याने भूकंपग्रस्त कुटुंबप्रमुखावर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही एका वारसदारांस आणि खरोखरच ज्या व्यक्तीस या दाखल्यांची आवश्यकता आहे अशा व्यक्तीस सदरचा भूकंपग्रस्तांच्या कुटुंबातील इतर सर्व  व्यक्तीच्या सहमतीने हा दाखला मिळावा अशी मागणी मोठया प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ हा लाभार्थी असणाऱ्या भूकंपग्रस्तांच्या वारसदार व्यक्तीस मिळावा याकरीता सदर शासन निर्णयामध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या भूकंपग्रस्त कुटुंबाच्या व्याख्येमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी लेखी पत्राव्दारे विनंती केली होती.त्यानुसार मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी विशेष बाब म्हणून ना.शंभूराज देसाई यांची विनंती मान्य केली.कोयना भूकंपग्रस्तांच्या पुढील पिढयांना भूकंपग्रस्त दाखले मिळावेत यासाठी ना.शंभूराज देसाई प्रयत्न करत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी याप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे अनेक वर्षापासूनचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला, त्यानुसार कोयना भूकंपग्रसतांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीतील वारसांना म्हणजे भूकंपग्रस्ताच्या पुढील पिढीतील नातू, नातूची पत्नी व नात, पणतू, पणतूची पत्नी व पणती, खापर पणतू, खापर पणतूची पत्नी व खापर पणती यांच्या पर्यंत भूकंपग्रस्तांचे दाखले वितरित करण्यास सुरुवात झाली. हे दाखले मिळालेले पाटण तालुक्यातील अनेक युवक युवती यंदा चालू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या शासकीय भरतीसह पोलीस भरतीत यशस्वी झाले आहेत. याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले की,महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोयना भूकंपग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका सदैव घेतली. भूकंपग्रस्तांचे संसार पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी त्यांनी कोयनानगर येथे स्वत: वास्तव्य करुन तेथील पुनर्वसनाच्या कामांची माहिती घेत होते.तसेच शासकीय अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना करत होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा हा  वारसा जपण्यासाठी त्यांचे वारसदार म्हणून नेहमीच कटीबध्द आहोत,असा विश्वास मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केला. भूकंपग्रस्तांच्या व्याख्येतील बदलामुळे कोयना भूकंपग्रस्तांच्या पुढील पिढयांतील वारसांना दाखले मिळू लागले आहेत. त्यामुळे शासकीय नेाकऱ्यांतील आरक्षणाचा लाभ त्यांना आता घेता येईल. यंदाच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या शासकीय भरतीसह पेालीस भरतीत पाटण तालुक्यातील युवक युवतीं मोठया संख्येने यशस्वी झाल्याचे पाहून आंनद झाला असून या दाखल्यांबाबत आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा करीत असल्याचे शेवटी त्यांनी सांगीतले.


Sunday 20 August 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नावाला साजेसे काम व्हावे-पालकमंत्री ना.शंभूराज देसाई. मरळी येथे लोकनेते बाळासाहेब देसाई भवन ग्रामपंचायत कार्यालय व शेतकरी कृषी प्रशिक्षण केंद्राचे इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न.

 


दौ

दौलतनगर दि.20:- लोकनेते बाळासाहेब देसाई यांची जन्मभूमी असलेल्या मरळी या गावामध्ये आज लोकनेते बाळासाहेब देसाई भवन ग्रामपंचायत कार्यालय व शेतकरी अद्यावत कृषी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा आज लोकार्पण सोहळा होत आहे.पाटण विधानसभा मतदारसंघासह आपल्या मरळी गावाचे नाव राज्यामध्ये नावारुपाला आणण्याचे काम लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केले असून मरळी गावचा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा राजकीय वारसदार म्हणून सांगताना नेहमीच अभिमान वाटतो.राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मतदार संघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांतील विविध विकास कामांना निधी मंजूर करण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच माझा प्रयत्न राहिला असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नावाला साजेसे काम पदाधिकारी व अधिकारी यांच्या हातून मरळी या ठिकाणी नव्याने उभे राहिलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई भवन ग्रामपंचायत कार्यालय व शेतकरी अद्यावत कृषी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमधून व्हावे असे प्रतिपादन पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

            ते मरळी ,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई भवन ग्रामपंचायत कार्यालय व शेतकरी कृषी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी बोलत होते.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू,विजय शिंदे,विष्णू पवार,चंद्रकांत देसाई,सरपंच राजेंद्र माळी,उपसरपंच विनोद कदम,भरत साळूंखे,लक्ष्मण पवार,दिलीप कदम,प्रविण पाटील,साईनाथ सुतार,सुनील पाटील,सुनील साळूंखे,संग्राम पाटील,आनंदराव पाटील,संतोष पाटसुते,विजय लोकरे,शिवाजी साळूंखे,गजानन पाटील,अरुण पवार,प्रशांत मोहिते,प्रमोद मोहिते,अक्षय मोहिते,आण्णा कदम,दत्तात्रय कदम,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सावंत,जिल्हा परिषदेचे संदिप पाटील,कृषी विभागाचे माळवे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

                याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाठी आपले योगदान दिले. आता आपण राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मरळी परिसरात विविध विकास कामांना मंजूरी देऊन या परिसराचा कायापालट करण्याचे काम सुरु केले आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मरळी हे गाव असून या गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्य  शासनाच्या विविध योजनांमधून निधी मंजूर करण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला असून या योजनांमधून गावामध्ये साकारत असलेल्या विविध शासकीय इमारतींमुळे गावाच्या वैभवात भर पडत आहे.आपण लोकनेते बाळासाहेब देसाई भवन ग्रामपंचायत कार्यालय व शेतकरी कृषी प्रशिक्षण केंद्राची इमारतीसह तालिम,पशुवैद्यकीय दवाखाना यांसारख्या इमारती येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत.शेतकऱ्यांना आवश्यक असलेलया कृषी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर होण्यास मदत होणार असून याचा शेतकऱ्यांनीही लाभ घेणे गरजेचे आहे.केवळ इमारती उभ्या करुन उपयोग नाही तर या इमारतीमधून पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी स्थानिक जनतेच्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. लोकांना चांगली सेवा देऊन इमारतीसह आस पासचा परिसर ही स्वच्छ राखण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, नविन इमारतीमधून गावाच्या सर्वांगीण विकासाचे कामे मार्गी लागण्यासाठी  सतत प्रयत्नशील रहावे.विकास कामांसाठी लागण्याऱ्या निधीसाठी माझ्याकडे पाठपुरावा करावा,गावातील विकास कामांसाठी निधी कधीच कमी पडणार नसल्याचे सांगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मरळी हे गाव असल्याने त्यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांचे नावाला साजेसे काम आपण सर्वांनी या पुढील काळात करुया असेही ते शेवटी म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालंदर पाटील,आभार संतोष गिरी तर सूत्रसंचलन चंद्रकांत कांबळे यांनी केले,

चौकट: मरळी गावाची एकजूट यापुढेही अशीच ठेवावी,-ना.शंभूराज देसाई.

      मरळी हे गाव पहिल्यापासून सत्ता असो अथवा नसो एकसंघपणे कायम देसाई परिवाराच्या पाठीशी  ठामपणे उभे राहिले.पडत्या काळातही आपल्या गावाची एकजूट राहिली असल्याने आता आपण सत्तेच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे मार्गी लावत आहोत. राज्य शासनाच्या वेगवेगळया योजनांमधून भरघोस निधी मंजूर करण्यासाठी सदैव सहकार्य राहिल.आज विकास कामांच्या प्रवाहामध्ये डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावे सामिल होत आहेत.आपल्या मरळी गावाचा सर्वांगणी विकासाठी या पुढील काळातही आपल्या मरळी गावाने अशीच एकजूट कायम ठेवावी आणि मरळी गावाची एकजूट ही निश्चितच इतर गावांना आदर्श ठरेल असेही त्यांनी यावेळी  स्पष्ट केले.