दौलतनगर दि.26:- राज्य शासनाने राज्यातील
भूकंपग्रस्तांना न्याय मिळवून दिल्यानंतर भूकंग्रस्तांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीतील
वारसदारांना भूकंपग्रस्त दाखल्यांचा लाभ मिळावा
यासाठीही पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी
शिंदे यांचेकडे केलेली मागणी विशेष बाब म्हणून मान्य करत तसा शासन निर्णय पारित केल्याने
आज भूकंपग्रस्त दाखल्यांचा तिसऱ्या चौथ्या पिढीतील युवकांना त्याचा लाभ होऊन अनेक तरुण
तरुणी हया शासकीय सेवेत रुजू झाल्या आहेत.राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडून
भूकंपग्रस्त दाखल्यांबाबत चांगला निर्णय करुन घेतल्याने भूकंग्रसत दाखल्यांमुळे शासकीय
सेवेत रुजू झालेल्या तरुण तरुणींनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा आज दौलतनगर ता.पाटण
येथे सत्कार करत त्यांचे आभार मानले.
पाटण तालुक्यात दि. 11 डिसेंबर,1967 ला प्रलंयकारी झालेल्या भूकंपात बाधित झालेल्या
भूकंपग्रस्तांना सन 1995 पासून राज्य शासनाने बंद केलेले भूकंपग्रस्तांचे दाखले पुर्ववत
सुरु करणेबाबत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे सातत्याचे पाठपुराव्याने राज्य शासनाने दि.18 डिसेंबर,2015 रोजीचे शासन निर्णयानुसार
सदर भूकंपाचे दाखले पुर्ववत सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय घेत या निर्णयाच्या माध्यमातून
पाटण तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील भूकंपग्रस्त व्यक्तींचा समावेश या निर्णयामध्ये
करुन घेतला.
दरम्यान
शासन निर्णय हा जुना शासन निर्णय असल्यामुळे भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्तांचे दाखले
काढणेस अनेक अडचणी निर्माण होत होत्या. भूकंपग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाची व्याख्या
ठरवून देण्यात आली असल्याने भूकंपग्रस्त कुटुंबप्रमुखावर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही
एका वारसदारांस आणि खरोखरच ज्या व्यक्तीस या दाखल्यांची आवश्यकता आहे अशा व्यक्तीस
सदरचा भूकंपग्रस्तांच्या कुटुंबातील इतर सर्व व्यक्तीच्या सहमतीने हा दाखला मिळावा अशी मागणी मोठया
प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ हा लाभार्थी असणाऱ्या भूकंपग्रस्तांच्या
वारसदार व्यक्तीस मिळावा याकरीता सदर शासन निर्णयामध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या भूकंपग्रस्त
कुटुंबाच्या व्याख्येमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे
यांचेकडे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी लेखी पत्राव्दारे विनंती केली होती.त्यानुसार
मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी विशेष बाब म्हणून ना.शंभूराज देसाई यांची विनंती
मान्य केली.कोयना भूकंपग्रस्तांच्या पुढील पिढयांना भूकंपग्रस्त दाखले मिळावेत यासाठी
ना.शंभूराज देसाई प्रयत्न करत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ना.एकनाथजी
शिंदे यांनी याप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे अनेक वर्षापासूनचा हा प्रलंबित
प्रश्न मार्गी लागला, त्यानुसार कोयना भूकंपग्रसतांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीतील वारसांना
म्हणजे भूकंपग्रस्ताच्या पुढील पिढीतील नातू, नातूची पत्नी व नात, पणतू, पणतूची पत्नी
व पणती, खापर पणतू, खापर पणतूची पत्नी व खापर पणती यांच्या पर्यंत भूकंपग्रस्तांचे
दाखले वितरित करण्यास सुरुवात झाली. हे दाखले मिळालेले पाटण तालुक्यातील अनेक युवक
युवती यंदा चालू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या शासकीय भरतीसह पोलीस
भरतीत यशस्वी झाले आहेत. याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले की,महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोयना भूकंपग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे
उभे राहण्याची भूमिका सदैव घेतली. भूकंपग्रस्तांचे संसार पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी
त्यांनी कोयनानगर येथे स्वत: वास्तव्य करुन तेथील पुनर्वसनाच्या कामांची माहिती घेत
होते.तसेच शासकीय अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना करत होते. लोकनेते बाळासाहेब देसाई
यांचा हा वारसा जपण्यासाठी त्यांचे वारसदार
म्हणून नेहमीच कटीबध्द आहोत,असा विश्वास मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त
केला. भूकंपग्रस्तांच्या व्याख्येतील बदलामुळे कोयना भूकंपग्रस्तांच्या पुढील पिढयांतील
वारसांना दाखले मिळू लागले आहेत. त्यामुळे शासकीय नेाकऱ्यांतील आरक्षणाचा लाभ त्यांना
आता घेता येईल. यंदाच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या शासकीय भरतीसह पेालीस
भरतीत पाटण तालुक्यातील युवक युवतीं मोठया संख्येने यशस्वी झाल्याचे पाहून आंनद झाला
असून या दाखल्यांबाबत आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा करीत असल्याचे शेवटी त्यांनी सांगीतले.
No comments:
Post a Comment