दौलतनगर दि.23:- नुकत्याचा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामधून भरघोस मताधिक्याने विजयी झालेले उमेदवार मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांनी नागपूर येथे महाराष्ट्र मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांचे सोमवारी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागताच्या निमित्ताने शिवसेना- भाजपा राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विजयनगर पाडळी ते दौलतनगर या मार्गावर भव्य सवाद्यासह स्वागत रॅली काढण्यात आली तसेच स्वागत रॅलीचे मार्गावरील विविध गावांच्या ठिकाणी त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार शंभूराज देसाई हे प्रथमच पाटण विधानसभा मतदार संघामध्ये येत असताना शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांच्या जल्लोषी स्वागताची तयारी केली होती. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये येत असताना त्यांचे तारळे विभागाचेवतीने नागठाणे येथे स्वागत करण्यात आले तद्नंतर वारुंजी फाटा येथेही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर विजयनगर पाडळी येथे मंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांचे आगमन झाल्यानंतर तमाम पाटण विधानसभा मतदारसंघाचेवतीने त्यांचे स्वागत केल्यानंतर स्वागत रॅलीला सुरुवात झाली. विजयनगर पाडळी,सुपने,वसंतगड साकुर्डी (तांबवे फाटा), विहे, निसरे फाटा,मल्हारपेठ,नाडे मार्गे दौलतनगर या मार्गावर आयोजित केलेल्या स्वागत रॅलीमध्ये अनेक दुचाकीस्वार तसेच चारचाकी यांचा मोठा सहभाग होता. तसेच या मार्गावरील प्रमुख गावांच्या ठिकाणी स्वागत करण्यात आले आहे. नाडे नवारस्ता येथील पहिले शिवतिर्थ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई, स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब),कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यात येऊन मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी मरळी गावचे ग्रामदैवत श्री. निनाईदेवीचे दर्शन घेतले. तद्नंतर पर्यटनमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई हे दौलतनगर ता.पाटण येथील निवासस्थानी शिव-विजय हॉल येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम पदाधिकारी,कार्यकर्ते मतदार बंधू भगिनीं व हितचिंतक यांचेकडून शुभेच्छा स्विकारल्या.
चौकट:- ना.शंभूराज देसाई यांचे पाटण मतदारसंघामध्ये उत्साहात स्वागत.
महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री ना.शंभूराज देसाई हे प्रथमच पाटण विधानसभा मतदार संघामध्ये येत असताना ठिक-ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत होते. त्यामुळे त्यांना विजयनगर पाडळी येथे येण्यास उशीर झाला तरीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तसाच होता. सकाळपासून वाट पाहणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना. शंभूराज देसाई यांचे स्वागत मोठया उत्साहात केले.तसेच त्यांचे स्वागतासाठी आयोजित केलेल्या स्वागत रॅलीमध्ये दुचाकी व चारचाकी घेऊन हजारो कार्यकर्ते सहभागी झाल्याचे दिसत होते.दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री झालेल्या ना.शंभूराज देसाई यांचे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसत होता तर काही कार्यकर्ते हे भारावून गेले होते.
No comments:
Post a Comment