Monday, 17 February 2025

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवतिर्थ नाडे येथे शिवस्मारक समितीच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत होणार शिवजयंती सोहळा.



दौलतनगर दि.17:- पाटण विधानसभा मतदारसंघामधील पहिले शिवतिर्थ असलेल्या मौजे नाडे-नवारस्ता या ठिकाणी  अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळयानिमित्त पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 09.00 वाजता शिवतिर्थ नाडे नवारस्ता येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  असून या जयंती सोहळयाचे निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना पोलीस दल व पोलीस बँडच्यावतीने मानवंदना देण्यात येणार आहे.तसेच श्री छावा युवा मंच अतित जि.सातारा यांचेवतीने शिवकालीन युध्दकला दांडपट्टा व स्वसंरक्षण यांची प्रात्यक्षिके होणार असून भारतीय हिंदूरत्न पुरस्कार विजेते शाहिर शुभम विभुते सांगली यांचा  पोवाडयाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती  पाटण तालुका शिवस्मारक समितीच्यावतीने उपाध्यक्ष विजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया . शिवाजी पार्क,शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात पुढाकार घेतला होता. छत्रपती शिवरायांचे तेजस्वी व्यक्तित्व, त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा हीच यामागील प्रांजळ भावना आहे. आजही त्या दोन्ही ठिकाणी असणारे पुतळे नव्या पिढीबरोबरच देशी-परदेशी पर्यटकांना महाराजांच्या विचार कार्याची आठवण करून देत असतात. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी दिलेला जनसेवेचा हा वारसा जपताना छत्रपती  शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारुढ पुतळा पाटण तालुक्यातील नवारस्ता येथे उभारण्याचा संकल्प लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला होता. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली पाटण तालुका शिवस्मारक समिती गठीत करण्यात आली. या समितीव्दारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाडे नवारस्ता येथील पुतळयाचे काम अल्पावधीमध्ये पुर्णत्वाकडे गेल्यानंतर या अश्वारुढ पुतळयाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे हस्ते पार पडला. दरम्यान बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी पहिला शिवजयंती सोहळा या ठिकाणी साजरा होत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळयानिमित्त पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 09.00 वाजता शिवतिर्थ नाडे नवारस्ता येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  आहे. या जयंती सोहळयाचे शिवतिर्थ नाडे नवारस्ता परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात येणार असून जयंती सोहळयाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना पोलीस दल व पोलीस बँडच्यावतीने मानवंदना देण्यात येणार आहे. श्री छावा युवा मंच अतित जि.सातारा यांचेवतीने शिवकालीन युध्दकला दांडपट्टा व स्वसंरक्षण यांची प्रात्यक्षिके होणार आहेत तसेच भारतीय हिंदूरत्न पुरस्कार विजेते शाहिर शुभम विभुते यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवन कार्यावरील शिव पोवाडयाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून शिवतिर्थावर पाटण तालुका शिवस्मारक समितीच्यावतीने शिवजयंती निमित्त शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पाटण तालुका शिवस्मारक समितीच्यावतीने शिवतिर्थ नाडे येथील शिवजयंती सोहळयानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त शिवप्रेमी युवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी  मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेवटी समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

.

No comments:

Post a Comment