Monday, 10 March 2025

लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे विचारांचा वारसा जोपासत वाटचाल सुरु- मा.रविराज देसाई(दादा) लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 115 वा जयंती सोहळा दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न.



 दौलतनगर दि.10 महाराष्ट्राचे पोलादी पुरुष स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये केलेले कार्य अवघा महाराष्ट्र जाणून आहेस्व.लोकनेते साहेब यांनी राज्याचे विविध खात्याचे मंत्री म्हणून केलेले कार्य अजरामर आहेदुरदृष्टी लाभलेले नेते स्व.लोकनेतेसाहेबांच्या रुपाने आपल्या मतदारसंघाला नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र राज्याला लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्य असून डोंगरी आणि दुर्गम भागात वसलेल्या आपल्या पाटण तालुक्याला देशाच्या नकाशावर नेण्याचे कार्य त्यांनी केले आहेआपल्या मतदार संघात लोकनेते साहेब यांच्या कार्याला शोभेल असे काम महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई करीत असून लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे विचारांचा वारसा जोपासत आपल्या उद्योगसमुहाची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांनी केले.

                दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाच्या महाराष्ट्र दौलत” सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा 115 वा जयंती सोहळयाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होतायाप्रसंगी ते बोलत होतेयावेळी कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा), मा.चेअरमन अशोकराव पाटीलडॉ.दिलीपराव चव्हाणव्हा.चेअरमन पांडूरंग नलवडेशिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, माजी चेअरमन ॲड. मिलींद पाटील,डीपीजाधव,जालंदर पाटील,विजय पवार,संतोष गिरी, प्रदिप पाटील,प्रकाशराव पाटील, पंजाबराव देसाई,विलास गोंडांबे,बाळासाहेब पाटील,बबनराव शिंदे,सोमनाथ खामकर,सुरेश पानस्कर,आर.बी.पवार,बशीर खोंदू,प्रशांत पाटील,कार्यकारी संचालक सुहास देसाई यांच्या सह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व लोकनेते साहेब प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांनी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळयास व समाधीस पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

               याप्रसंगी बोलताना मा.रविराज देसाई(दादा) म्हणाले,स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी पाटण तालुक्याचा कायापालट केला. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य हिमालयाएवढे आहे.आपण नशिबवान आहोत की, आपण लोकनेते साहेबांच्या जन्मभूमीमध्ये आहोत. राज्याच्या महत्वाच्या खात्यांचे करारी मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य संपुर्ण महाराष्ट्र राज्याला परिचीत आहेत्यांच्या विचारांचा वारसा जोपासत महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे काम करीत आहेत, हि बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या नावाने सुरु असलेल्या विविध संस्था नावारुपास आणण्याचे कार्यही आपण करत आहेलोकनेते साहेबस्व.आबासाहेब यांच्या नावाने सुरु असणाऱ्या संस्था चांगल्या चालविणे आपले सर्वांचे कर्तव्य असून या दोन महाननेत्यांची जयंतीपुण्यतिथी कार्यक्रम साजरे करीत असताना खऱ्या अर्थाने हीच श्रध्दांजली ठरणार आहेअशा भावना व्यक्त करुन ते म्हणाले, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई या ठिकाणी सुरु असल्याने  ना.शंभूराज देसाईसाहेब हे आज या ठिकाणी उपस्थित नाहीत.  लोकनेतेसाहेबांनी  शासनामध्ये ज्या ज्या खात्याची जबाबदारी  सांभाळली त्या त्या खात्यामध्ये वेगळा ठसा उमटवण्याचे काम केले आहे. अनेक सहकारी संस्था त्यांनी पाटण तालुक्यामध्ये उभ्या केल्या, त्या संस्था पुढे चालविताना आपण लोकनेते साहेब यांनी घालून दिलेला आदर्श व विचार जोपासत वाटचाल सुरु असल्याचे सांगत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघाच्यावतीने  व लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग समूहाचे वतीने विनम्र अभिवादन केले  उपस्थितांचे स्वागत पांडूरंग नलवडे यांनी केले तरआभार बबनराव शिंदे यांनी मानले.

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जयंतीदिनी  मुंबई येथील निवासस्थानी विनम्र अभिवादन

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई  यांचे मुंबई येथील निवासस्थानी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा 115 वा जयंती सोहळयाचानिमीत्त अर्थसंकलपीय अधिवेशन सुरु असताना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, भरतशेठ गोगावले, गुलाबराव पाटील, संजय राठोड, प्रताप सरनाईक, प्रकाश अबिटकर, मंगलप्रभात लोढा, आमदार सुहास बाबर, अमशा पाडवी, राहूल आवाडे, अमल महाडिक,या मान्यवर मंत्री व आमदार महोदय, ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे, पाटण तालुका मुंबई रहिवाशी मित्र मंडळातील पदाधिकारी यांनी पुष्पहार पुष्ष अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.


No comments:

Post a Comment