Tuesday, 20 May 2025

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनींनी चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे.-ना.शंभूराज देसाई दौलतनगर,ता. पाटण येथे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा 66 वा पुण्यतिथी सोहळा संपन्न. स्व.ताईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती वितरण.

 



दौलतनगर दि.20:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकनेते साहेबांना मोलाची साथ दिली.पडत्या काळामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा परिवार सांभाळण्याचे काम केले. आज जे वैभव दिसत आहे ते ते कै.सौ.ताईसाहेब यांचे आशिर्वादामुळेच असून त्यांचे कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी त्यांचे पुण्यतिथी दिनाचे औचित्यसाधून कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब) यांच्या नावाने पाटण तालुक्यातील गोर-गरीबा कुटुंबातील विद्यार्थीनींना पुढील शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी या संकल्पनेतून शिष्यवृत्ती देण्याचा चांगला निर्णय घेतला असून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनींनी या पुढील काळामध्ये चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील रहावे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

 ते दौलतनगर ता.पाटण येथे कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब) यांचे 66 व्या पुण्यतिथी सोहळा व या सोहळयाच्या निमित्ताने आयोजित गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम अशा संयुक्त कार्यक्‌रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),अशोकराव पाटील,विजय पवार,प्रदिप पाटील,मिलिंद पाटील, सभापती बाळासो पाटील,सुरेश पानस्कर,संजय देशमुख,सुनिल पानस्कर,मनोज मोहिते,जालंदर पाटील,सोमनाथ खामकर, सुनील पवार यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,अधिकारी  कर्मचारी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी व पालक मोठया संख्येने उपस्थिती होते. तत्पुर्वी ना.शंभूराज देसाई यांनी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

  याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हंटले की, थोर व्यक्तींचे योगदान नव्या पिढीला माहिती होण्यासाठी आपण लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब) यांचे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आपण विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असतो.या थोरव्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तींच्या कार्याची माहिती तरुण पिढीला होऊन त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवत विद्यार्थ्यांनी आपली पुढील वाटचाल केली पाहिजे. स्व.ताईसाहेब यांचे पुण्यतिथीचे औचित्य साधून आपण पाटण तालुक्यातील गोर-गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना इयत्ता 10 वी नंतरच्या पुढील पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी हातभार लागण्याच्या उद्देशाने आपण गेल्या 13 वर्षापासून कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे नावाने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 228 गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना या शिष्यवृत्तीचा लाभ झाला असून आपल्या उद्योग समुहाकडून हा छोटासा पण चांगला उपक्रम सुरु केला असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई यांना शिक्षणाची मोठी जिद्द होती. आपण शिकलो तरच काही करु शकतो, शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याने त्यांनी बोडींगला राहून वकीलीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. लोकनेते साहेब राजकारणात,समाजकारणात आल्यानंतर त्यांना कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांनी अत्यंत खडतर व गरीबीच्या परिस्थितीमध्ये मोलाची साथ दिली, त्यांचा संपूर्ण परिवार सांभाळत मुलांना चांगले संस्कार देत वाढवलं, कौटुंबिक मोठा आधार देण्याचे काम त्यांनी केले असल्याने आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतिंना नतमस्तक होणे, त्यांचे विचार पुढे नेणं खूप गरजेचे आहे.त्यांचा आदर्श घेऊन आपण पुढील वाटचाल सुरु ठेवली आहे.या थोर व्यक्तींच्या त्यागातूनच हे वैभव प्राप्त झाले आहे.अशा थोर व्यक्तींचा आदर्श डोळयासमोर ठेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनींनी या शिष्यवृत्तीचा वापर हा शैक्षणिक कामासाठी चांगला वापर करावा.आपल्या आई वडीलांचे कष्ट डोळयासमोर ठेऊन मोठया जिद्दीने इयत्ता दहावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यावे. चांगले शिक्षण घेऊन स्वता:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी  होण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असून खऱ्या अर्थाने या शिष्यवृत्तीचा उद्देश सफल होईल.तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक समुहातील विद्यालयांनी चांगली यशाची पंरपरा राखली असून या शिक्षण समुहाचा नावलौकीक वाढविण्यासाठी  यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षक यांचा मोलाचा हातभार लागत असल्याचे सांगत पाटण तालुक्यात, सातारा जिल्हयात तसेच महाराष्ट्रभर या थोर व्यक्तींना साजेस काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी शेवटी  स्पष्ट केले.

Saturday, 17 May 2025

दौलतनगर,ता. पाटण येथे दि.२० मे रोजी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६6 वा पुण्यतिथी सोहळा. स्व.ताईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम.

 


दौलतनगर दि.7:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६6 वा पुण्यतिथी सोहळा व या पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम मंगळवार दि.२० मे, २०२5 रोजी सकाळी १०.3० वा.महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री  मा. ना. श्री. शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रति वर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम होणारअसल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो. राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाटण विधानसभा मतदार संघातील  दोनशे अठ्ठावीस पेक्षा अधिक विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील विद्यार्थीनींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्ती बरोबर वहया,शालेय साहित्याचे वितरणही करण्यात येते. सध्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनींना वार्षिक रू.6050/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) पुण्यतिथी सोहळा, गरीब व गरजू विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम मंगळवार दि.२० मे, २०२5 रोजी सकाळी १०.3० वा.महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री  मा. ना. श्री. शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई (दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थित होणार असून या कार्यक्रमास पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठया संख्यने उपस्थित रहावे,असे आवाहन शेवटी प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.