दौलतनगर दि. १7:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६6 वा पुण्यतिथी सोहळा व या पुण्यतिथी सोहळया
निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम मंगळवार
दि.२० मे, २०२5 रोजी सकाळी १०.3० वा.“महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे
राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे
पालकमंत्री मा. ना. श्री. शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई(दादा) व मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख
उपस्थितीत होणार आहे. प्रति वर्षाप्रमाणे
कै.सौ.वत्सलादेवी देसाई
(ताईसाहेब) यांचे
पुण्यतिथीनिमित्त पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थीनींना
दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या
शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम होणारअसल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते
बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई
(ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी
कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात
येतो.
राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा
सातारा जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई
यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या
निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन
शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना
राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पाटण
विधानसभा मतदार संघातील दोनशे अठ्ठावीस पेक्षा
अधिक विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील विद्यार्थीनींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या
शिष्यवृत्ती बरोबर वहया,शालेय साहित्याचे
वितरणही करण्यात येते. सध्या
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनींना वार्षिक रू.6050/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी सोहळया
निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) पुण्यतिथी सोहळा, गरीब व गरजू
विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम मंगळवार दि.२० मे, २०२5 रोजी सकाळी १०.3० वा.“महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे
राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे
पालकमंत्री मा. ना. श्री. शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई (दादा) व मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे
प्रमुख उपस्थित होणार असून या कार्यक्रमास पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व
पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठया संख्यने उपस्थित रहावे,असे आवाहन शेवटी
प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment