दौलतनगर दि.10:- लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 116 व्या जयंतीच्या निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील गोर-गरीब कुटुंबांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून तब्बल दहा हजार अन्नधान्याच्या किटचे वितरण पाटण विधानसभा मतदार संघातील गावो-गावी करण्यात येऊन या विभागातील गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.
दरम्यान ना.शंभूराज देसाई यांनी केलेली मदत मोलाची ठरली असून मदत मिळालेल्या कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा जयंती कार्यक्रम प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन दौलतनगर ता.पाटण येथे साजरा करण्यात येतो. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे यंदाचे 116 व्या जयंती कार्यक्रमाचे निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मतदारसंघातील गोर गरीब कुटुंबियांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल दहा हजार अन्न धान्याचे किटचे वितरण हे गावा गावातील गरीब कुटुंबियांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मार्फत केले. या अन्नधान्य किटमध्ये तांदूळ, साखर,डाळ,तेल,मिठ,मिरची पावडर,हळद,चहा पावडर,गरम मसाला,आटा, बिस्किट,कोलगेट इ. वस्तूंचे चांगल्या दर्जाचे साहित्याचा समावेश असून ना.शंभूराज देसाई यांचेवतीने तारळे, चाफळ, म्हावशी, शिरळ, नाटोशी, मारुलहवेली, ढेबेवाडी, काळगाव, कुंभारगाव व सुपने तांबवे या भागामध्ये डोंगर पठारावरील गावांमध्ये त्या त्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुमारे दहा हजार गोर गरीब कुटुंबियांना त्यांचे घरामध्ये जाऊन हे अन्न धान्याचे किटचे जागेवर जाऊन वितरण केले.
दरम्यान मंत्री देसाई हे संकट काळी नेहमी आपल्या मतदारसंघातील ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. अतिवृष्टीमध्ये स्वत: पुराच्या पाण्यामध्ये उतरुन त्यांनी पूरग्रस्त जनतेची विचारपूस करुन त्यांना धीर देण्याचे काम केले. तसेच अतिवृष्टीमध्ये दरड कोसळल्याने मोठया प्रमाणांत नुकसान झालेल्या डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये दळण वळण पूर्ण असतानाही त्यांनी चिखलातून पूराच्या पाण्यातून चालत जाऊन या गावांतील नागरीकांना धीर दिला होता.
मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या घटनांमुळे जर काही नुकसान झाले तर प्रथम मदत म्हणून नेहमी ना.शंभूराज देसाई हे मदतील धावून येतात.कोविड सारख्या काळामध्ये ना.शंभूराज देसाई यांनी हातावरचे पोट असलेल्या मोल मजूरी करणाऱ्या कुटुंबियांना,पानटपरी,वडाप चालक यांना त्याकाळात असेच अन्नधान्याचे किटचे वितरण करुन मोठया प्रमाणांत मदत केली होती. तसेच अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन मंत्री देसाई यांनी तब्बल पाच हजार अन्न धान्याचे किटचे वितरण हे आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत नुकतेच करण्यात आले. त्यामुळे गोर गरीब कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.
ना.देसाई हे जरी कॅबिनेट मंत्री असले तरी त्यांचे संपूर्ण लक्ष हे आपल्या मतदारसंघावर केंद्रीत असते,आजही त्यांची नाळ ही सर्व सामान्य जनतेशी जोडली गेली आहे.सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या सुख: दुखाबरोबर सार्वजनिक कार्यक्रमाव्दारे विविध गावांमध्ये आपली उपस्थिती लावून त्यांचा आजही मोठा जनसंपर्क असल्याचे पहायला मिळते.सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पालकमंत्री कार्यालय आपले दारी या नाविण्यपूर्ण अभियान सुरु केले असून या लाही मोठा प्रतिसाद नागरीकांकडून मिळत आहे.
नुकतेच त्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जयंतीचे औचित्य साधून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य कुटुंबियांना धान्याची किटचे वितरण करुन मोठे सहकार्य केल्याने या किटचा लाभ मिळालेल्या कुटुंबियांनी ना.शंभूराज देसाई यांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.
चौकट: लोकनेत्यांचे प्रतिबिंब....!
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी सन 1967 साली पाटण तालुक्यामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंसह निवाऱ्याच्या व्यवस्थेसाठी पत्र्याचे शेड उभारली होती.तसेच पडझड झालेल्या भागांमध्ये पत्र्यांचे वाटप केले होते.लोकनेते साहेबांचे ते ऋण आजही पाटण तालुक्यातील जुनी जाणती मंडळी मोठया मनाने सांगतात.तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुध्दा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रमाणे गरीब व गरजू कुटुंबांना अडचणीच्या काळात सढळ हाताने मदत करत असल्याने ना.शंभूराज देसाई हे त्यांच्या या कार्यातून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिबिंब असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.


No comments:
Post a Comment