महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण
तालुक्यातील जनतेचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या
पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, पाटण तालुक्याचे उत्कृष्ट
संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह व पाटण तालुका वारकरी संघ
यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे भव्य
प्रांगणात मागील नऊ वर्षाप्रमाणे यंदा दहाव्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई
नगरीमध्ये भव्य प्रमाणांत श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ
शनिवार दि.२० एप्रिल,२०१९ रोजी हजारो भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय
वातावरणात ह.भ.प.जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव
शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन तसेच उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज
देसाई व त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे शुभहस्ते श्री
ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आला.
दौलतनगर ता.पाटण येथे
सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून भव्य
प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून गत
नऊ वर्षात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील
तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई
यांची प्रतिवर्षीची पुण्यतिथी हि दि. २० ते २३ एप्रिल अशी तीन दिवसीय श्री.ग्रंथराज
ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. दौलत औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात भव्य मंडपात सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये ३७७
महिला तसेच ३६७ पुरुषांसह ७४४ वाचक सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट
संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण
सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील
किर्तनकार,प्रवनचनकारांना तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई
नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे.
गतवर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी वाचकांनी पारायण सोहळयास चांगला प्रतिसाद दिला
आहे. प्रतिवर्षावर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प.पुंडलिक महाराज कापसे,
आळंदीकर हे उपस्थित असून शनिवार दि. २० एप्रिल २०१९ रोजी हभप सचिन महाराज
कदम,आळंदी यांचे प्रवचन,हभप संजय महाराज कावळे,आळंदी यांचे किर्तन,रविवार दि. २१
एप्रिल, २०१९ रोजी हभप दादा महाराज तुळसणकर यांचे प्रवचन तर हभप महादेव महाराज
बोराडे शास्त्री यांचे किर्तन आणि सोमवार दि.२२ एप्रिल,२०१९ रोजी हभप मधुकर महाराज
दिक्षीत,मसूर यांचे प्रवचन तर हभप ॲङ जयवंत महाराज बोधले, पंढरपूर यांचे किर्तन
होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त
मंगळवार दि. २३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वा.आमदार शंभूराज देसाई व त्यांच्या
सुविद्य पत्नी सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब
देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र
अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत हभप
वेदांतचार्य श्रीकृष्णानंद शास्त्रीजी,गोकूळ शिरगाव,वृंदावनधाम करवीर कोल्हापूर
यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह, दौलतनगर
यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता
करण्यात येणार आहे.
या पारायण सोहळयाच्या शुभारंभ
प्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब
यांचे विचाराने या तालुक्यात आपण कार्य करीत आहोत. त्यांनी व स्व.आबासाहेब यांनी
घालून दिलेला आदर्श पुढे नेण्याकरीता आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. लोकनेते
बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जन्मशताब्दी निमित्त सुरु झालेला हा पारायण सोहळा
अखंडीत गेली ९ वर्षे सुरु आहे.या पारायणाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील
जनतेच्या वतीने प्रत्येक वर्षी लोकनेतेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र
अभिवादन होत आहे.प्रतिवर्षी या पारायण सोहळयास पाटण तालुक्यासह इतर तालुक्यातील
भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो हे पाहून आपल्या हातून चांगले काम पारायणाच्या
निमित्ताने होत आहे म्हणून मी स्वत:ला खुप भाग्यवान समजतो,लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण सर्वांनी
निश्चय केलेप्रमाणे लोकनेते साहेबांच्या कर्मभूमित त्यांचे कार्य नव्या
पिढीला समजावे याकरीता आपण शासनाच्या वतीने महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई
शताब्दी स्मारक उभारले आहे.या शताब्दी स्मारकाचे उदघाटन नुकतेच जानेवारी
महिन्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांचे हस्ते संपन्न झाले असून हे शताब्दी
स्मारक संगळयांना पाहणेकरीता खुले करण्यात आले आहे.वर्षातून एकदा आपण सर्व भाविक
मंडळी पारायणाच्या निमित्ताने येथे येता.वाचनातून आपल्याला लोकनेते साहेब यांचे
कार्य ज्ञात होत आहेच परंतू लोकनेते साहेबांचे प्रत्यक्ष कार्य या शताब्दी
स्मारकांच्या माध्यमातून उलघडत असून पारायणातून थोडासा वेळ काढून येथे आलेल्या व
येणाऱ्या भाविकांनी या शताब्दी स्मारकाची नक्की पहाणी करावी असे सांगून त्यांनी
पारायण सोहळयामध्ये काही त्रुटी आढळल्यास भाविकांनी नक्की सांगाव्यात त्यात सुधारणा
करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे
अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई,कारखान्याचे
चेअरमन अशोकराव पाटील,ह.भ.प. पुंडलिक महाराज कापसे आळंदीकर,ह.भ.प.अनिल महाराज
पापर्डेकर,ह.भ.प.जगन्नाथ महाराज ठोंबरे व कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व
पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य,विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व लोकनेते
प्रेमी जनतेची मोठया प्रमाणांत उपस्थिती होती. प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी
यंदाच्या दहाव्या वर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास उपस्थित असणाऱ्या
वाचकांचे शाब्दिक स्वागत केले व या पारायण सोहळयास प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल
सर्वांचे आभार ही मानले.
No comments:
Post a Comment