दौलतनगर दि.20:- पाटण मतदारसंघातील
गोरगरीब कुटुंबातील गरजू मुलींचे शिक्षण त्यांच्या कुटुंबातील गरीबीमुळे थांबू नये
ही भावना मनी बाळगून सन २०१२ पासून पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील
गरजू मुलींच्या शिक्षणाला आपला हातभार लागावा याकरीता स्व.शिवाजीराव देसाई
चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे
नावाने सुरु केलेली शिष्यवृत्ती योजना ही एक आदर्शवत व गरीब कुटुंबातील मुलींना
प्रेरणादायी ठरत आहे. गत आठ वर्षात पाटण मतदारसंघातील एकूण १४६ गरजू मुलींना या
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला असुन आतापर्यंत आपण स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल
ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २२ लाख ३० हजार रुपये हे शिष्यवृत्ती योजनेकरीता दिले
आहेत.कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना गरजू मुलींकरीता एक आधार
म्हणून काम करीत आहे याचा मला फार आनंद वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज
देसाईंनी असल्याचे प्रतिपादन कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे ६० व्या
पुण्यस्मरण कार्यक्रमात केले.
महाराष्ट्राचे माजी
गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई
(ताईसाहेब) यांची ६० वी पुण्यतिथी कार्यक्रम व पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजीत
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत
होते.याप्रसंगी कार्यक्रमास सुप्रसिध्द चित्रकार दादासाहेब सुतार,कराड, मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शिवसेना
उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँक चेअरमन मिलींद पाटील, या प्रमुख
पदाधिकाऱ्यासंह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध
संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा परीषद,पंचायत समिती सदस्य यांची प्रमुख
उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार
शंभूराज देसाई म्हणाले,महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब
देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे खुप खुप आर्शिवाद आपल्या पाठीशी आहेत.
म्हणूनच आमदार म्हणून त्यांच्या नावाने आपण नवनवीन कल्पना राबवून पाटण
मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अगदी तळमळीने काम करीत आहेत. माझ्या
आज्जी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने पाटण मतदारसंघातील गरीब
कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाकरीता एक शिष्यवृत्ती योजना सुरु करावी आणि या
शिष्यवृत्ती योजनेचे वितरण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यस्मरण
कार्यक्रमात करावे अशी कल्पना सन २०१२ मध्ये मी मांडली प्रतिवर्षी मुलींच्या
शिक्षणाकरीता ५००० रुपये आपण दयावेत अशी भावना मनी बाळगली.याकरीता फंड कशातून उभा
करायचा असा विषय जेव्हा समोर आला तेव्हा माझे चेअरमन पदाची १० वर्षे पुर्ण
झालेनंतर दशकपुर्तीच्या कार्यक्रमातून शिल्लक राहिलेली रक्कम आपण स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ठेवली
व या रक्कमेच्या व्याजातून ही शिष्यवृत्ती सुरु करण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत
मतदारसंघातील १४६ गरजू मुंलीना आपण ही शिष्यवृत्ती दिली आहे.या योजनेमुळे मुलींना
त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे. याकरीता कोयना परीसर साखर कामगार संघटना
आणि शिवदौलत बँकेचे सर्व कामगार हे प्रत्येकी १ लाख व २५ हजार रुपयांची मदत
प्रतिवर्षी करीत आहेत. समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भूमिकेतुन गरीब
कुंटुबांतील गरजू मुलींच्या शिक्षणासाठी आपण हा धाडसी निर्णय घेतला आहे. गतवर्षीपासून
आपण या शिष्यवृत्ती योजनेत ५०० रुपयांनी वाढ करुन ५५०० रुपये प्रतिवर्षी
शिष्यवृत्ती देत आहोत.आज गरीब कुटुंबातील मुलींना केवळ त्यांच्या पदवीपर्यंतच्या
शिक्षणासाठी प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्याकरीता म्हणून नव्हे तर सर्वसामान्य
महिला किती सक्षम असू शकते याचे दर्शन ग्रामीण भागातील मुलींना घडविण्याकरीताचा
आपला हा प्रयत्न आहे. मला कौतुक एका गोष्टीचे नेहमी वाटते, दोन वर्षापुर्वी असेच
मतदारसंघातील एका मुलींस आपण शिष्यवृत्ती योजना सुरु केली होती तीन वर्षे त्या
मुलींने त्याचा लाभ घेतला कालांतराने तिच्या घरची परिस्थिती सुधारल्यानंतर तिने
आमच्या संस्थेच्या प्राचार्यांना येवून सांगितले सर, माझा भाऊ आता नोकरीला लागला
आहे त्यामुळे माझे घरची परिस्थिती आता चांगली आहे मला सुरु असलेली शिष्यवृत्ती आपण
दुसऱ्या कोणत्याही गरजू मुलींस सुरु करावी असेही चांगले संस्कार या शिष्यवृत्ती
योजनेतून आपण देवू शकलो हे कौतुकास्पद आहे. असे सांगून ते म्हणाले, शासनाच्या
वतीने आपण आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारक पुर्ण केले आहे या
स्मारकामध्ये गरीब कुटुंबातील मुलामुलींना ई-लर्निंगचे शिक्षण मिळावे याकरीता सर्व
सोयीनीयुक्त अभ्यासिकाही आपण सुरु केली आहे.ग्रामीण भागातील मुलांमुलींना खरोखरच
चांगला उपयोग होणार असून शिष्यवृत्तीधारक मुलींनीही या अभ्यासिकेचा वापर करुन
घ्यावा. असे आवाहन त्यांनी करुन कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांना ६० व्या
पुण्यतिथीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन
केले.
प्रारंभी आदरणीय लोकनेते
बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे कार्य जवळून पाहिलेले सुप्रसिध्द
चित्रकार दादासाहेब सुतार,कराड, यांचा मानाची शाल,श्रीफळ व लोकनायक ग्रंथ देवून आमदार
शंभूराज देसाई यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दादासाहेब सुतार,कराड यांनी
आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पाटण मतदारसंघातील यंदाच्या
वर्षीच्या २२ मुलींना कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वाटप
करण्यात आले.उपस्थितांचे आभार माजी जि.प.सदस्य जालंदर पाटील यांनी मानले.
चौकट:-
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुतळयास प्रथमत: अभिवादन.
मरळी हायस्कुलच्या प्रांगणात
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुतळयास त्यांचे ६० व्या पुण्यतिथी
सोहळयाच्या निमित्ताने आमदार शंभूराज देसाई, रविराज देसाई यांनी प्रथमत: पुष्पचक्र
अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी मरळी गावांतील विविध संस्थांचे पदाधिकारी
व कै.सौ.वत्सलादेवी देसाई हायस्कूल,मरळीचे सर्व शिक्षक वर्ग यांनीही अभिवादन केले.
No comments:
Post a Comment