Sunday 28 August 2022

घाटमाथा ते कराड राष्ट्रीय महामार्गाच्या उर्वरित रस्त्याच्या कामाला लवकर सुरुवात करा. मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या राष्ट्रीय महार्गाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना.

 


          दौलतनगर दि.28 :- पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजुर करण्यात आले होते. सध्या कराड पासून पाटण पर्यंत मल्हारपेठ,नाडे व म्हावशी येथील काही भाग वगळता काम पूर्ण झाले आहे. पाटण ते संगमनगर धक्का व हेळवाक ते घाटमाथा या भागातील रस्त्याचे काम अपूर्ण आहे.अपूर्ण कामे सुरु करण्यासंदर्भात गत दिड वर्षापासून केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांचेकडे पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण ते संगमनगर धक्का या भागातील काँक्रीट रस्त्याकरीता केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी 92 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर या कामाची निविदा प्रक्रिया झाली आहे. त्याचबरोबर हेळवाक ते कराड राष्ट्रीय महामार्गाचे मल्हारपेठ,नाडे,आडूळ,म्हावशी व केरा पूल येथील अपूर्ण काम व हेळवाक ते घाटमाथा या लांबीतील अपूर्ण रस्त्याची कामे संबंधित एजन्सीकडून लवकरात लवकर सुरु करावित, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या.

             गुहाघर चिपळूण जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गातील भाग कराड ते घाटमाथा या भागातील अपूर्ण रस्त्याच्या कामासंदर्भात मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यतेखाली राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांचे समवेत आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी किर्ती नलवडे,उपविभागीय अधिकारी सुनील गाढे,तहसिलदार रमेश पाटील,कोयना प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता डोईफोडे,राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे,उपअभियंता किशोर शेजवळ,एल अँड टी कंपनीचे रविंद्र भोईटे,उदय जाधव कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रा उदय जाधव,प्रणिल घारगे शाखा अभियंता अनिकेत देसाई आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा संपूर्ण आढावा घेतला.

                   गुहाघर चिपळूण जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गातील राष्ट्रीय महामार्गाचे कामासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ना.शंभूराज देसाई यांनी पुढे म्हंटले आहे की, केंद्रीय दळणवळण मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करुन मंजुर करुन आणलेल्या पाटण मतदारसंघातील कराड ते घाटमाथा या राष्ट्रीय महामार्गाचे काम पाटण मतदारसंघातील सर्वात मोठे काम आहे. कराड ते पाटणच्या भागात मल्हारपेठ,नाडे,आडूळ,म्हावशी व केरा पूल या गावातील 1.4 कि.मी. च्या लांबीतील रस्ता हा अपुर्ण  असून एल अँड टी कंपनीकडून लवकरात लवकर पूर्ण करावा. तसेच पाटण ते संगमनगर धक्का यातील 13 कि.मी.च्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे कामाला केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी 92 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामासाठी निविदा निश्चित झालेल्या  देशमुख अँड कंपनी कडून रस्त्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी लवकरच सुरुवात करावी व संगमनगर धक्का ते घाटमाथा या लांबीत डांबरीकरणाचे कामासाठी मंजूर 16 कोटीच्या निविदेतील अपुर्ण हेळवाक ते घाटमाथा या 3 किमी च्या  रस्त्याचे काम उदय जाधव कन्स्ट्रक्शन कंपनीने  तातडीने सुरु करण्याच्या सुचना देऊन या तीन एजन्सीकडून सप्टेंबर महिन्यामध्ये कामाला गती देण्यात यावी.तसेच ही अपूर्ण असलेली कामे लवकर कशा पध्दतीने पूर्ण करता येतील याचे उद्दीष्ट ठेवून कराड ते घाटमाथा या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे,असेही शेवटी त्यांनी सांगीतले.

 

Saturday 27 August 2022

शहीद जवान कै.गजानन मोरे यांचे २3 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून अभिवादन.

 


दौलतनगर दि. २७:- सन १९९९ ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे आज दि.२७ ऑगस्ट रोजीचे २3 वे पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रतिवर्षाप्रमाणे शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गाढे, तहसिलदार रमेश पाटील,सहाय्यक गट विकास अधिकारी विभुते, उंब्रजचे सपोनी अजय गोरड यांची प्रमुख उपस्थिती होती.

                  प्रारंभी मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद जवान कै.गजाजन मोरे यांचे भूडकेवाडी ता.पाटण येथील शहीद स्मारकातील अर्धाकृती पुतळयाला पुष्पचक्र अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण केले. अभिवादनानंतर मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद स्मारक पुढील ध्वजारोहण करण्यात आला.यावेळी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस बँन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर करुन अभिवादन केले. भुडकेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनीनी ध्वजगीत सादर केले.मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शहिद कै.गजानन मोरे यांची आई श्रीमती चतुराबाई मोरे यांचा सत्कार केला. कार्यक्रमास याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,सोमनाथ खामकर,गजानन जाधव,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख,अभिजित पाटील,माणिक पवार,विजय पवार(फौजी) यांच्यासह विविध गावचे सरपंच,सदस्य कै.गजानन मोरे यांच्या मातोश्री श्रीमती चतुराबाई मोरे आणि त्यांचे कुटुंबिय यांची  प्रमुख उपस्थिती होती.              

                           सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा असून देशाच्या संरक्षणासाठी सातारा जिल्हयातील अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहूती दिली देऊन आपले बलीदान दिले आहे. देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींचे सातत्याने स्मरण करणे, त्यांच्या कार्यापुढे नत मस्तक होणे, त्यांच्या पवित्र स्मृतिला अभिवादन करणे हे आपले सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. सन १९९९ ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे हे त्यातीलच एक.तारळे विभागातील भुडकेवाडी सारख्या ग्रामीण भागातील गावामध्ये सामान्य कुटुंबातील कै.गजानन मोरे हे देश सेवेसाठी सैन्य दलात भरती झाले होते.कारगिल युध्दामध्ये ते शहिद झाले. शहिद जवान कै.गजानन मोरे यांनी आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्हयाचे, महाराष्ट्राचे  नाव देशामध्ये अजरामर केले आहे. कै. गजानन मोरे हे देश सेवेसाठी शहिद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवाने त्यावेळी जो प्रसंग ओढावला त्यातून हे कुटुंब सावरत आहे. त्या मोरे कुटुंबियांना साथ देणे, त्यांच्या अडी-अडचणीच्या काळात पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. देशाच्या रक्षणासाठी आपले बलिदान देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांचे स्मरण ठेवणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. शहीद गजानन मोरे यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत, अशा शब्दांत ना. शंभूराज देसाई यांनी शहीद गजानन मोरे यांना अभिवादन केले. तसेच सातारा येथे उदरनिर्वाहासाठी जागा मिळावी, ही वीरमाता चतुराबाई मोरे यांची मागणी पूर्ण व्हावी, यादृष्टीने संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यास विशेष बाब म्हणून तातडीने परवानगी मिळावी, यासाठी पाठपुरावा करत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युतीचे सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देत या भागातील विकासकामांसाठी आधीही प्रयत्नशील होतो आणि यापुढेही राहणार असल्याचा विश्वास ना. शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त करत गावा-गावातील युवा वर्गाने शहिद गजानन मोरे यांचा आदर्श घेऊन देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करावी असे आवाहन यावेळी केले. पाटण मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून मी प्रतिवर्षी कुठेही असलो तरी आजच्या दिवशी शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे स्मृतीदिनी भूडकेवाडी येथे आवर्जुन उपस्थित असतो. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून शहिद जवान कै.गजानन मोरे यांच्या स्मृतिला उजाळा देत त्यांनी राज्य शासनाच्या व पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन केले.

कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे नामदार शंभूराज देसाईंचे हस्ते ओटी भरण व जलपुजन. कोयना प्रकल्पातील विकास कामांचा घेतला अधिकाऱ्यांकडून आढावा.

 


दौलतनगर दि.28:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये 100 टीएमसीहून अधिक पाणीपातळी ओलंडल्यानंतर शनिवार दि.27,ऑगस्ट,2022 रोजी कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे विधीवत पुजा करुन ओटीभरण व जलपुजन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते आज सकाळी करण्यात आले. कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग व्यवस्थापनाकडून पुर्णत: कमी करण्यात आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात यंदाही दमदार पाऊस झाल्याने कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

           यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी सरपंच शैलेंद्र शेलार,उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड,नथूराम सावंत,अशोक पाटील,पांडूरग नलवडे,अभिजित पाटील,भरत साळूंखे,कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पोतदार,उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसिलदार रमेश पाटील, कोयनानगरचे सपोनी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

                 याप्रसंगी मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपल्या कोयनामाईकडे  संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर या भागाचा तसेच शेजारच्या कर्नाटक आंधप्रदेश या दोन राज्यांतील पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कोयना धरणामुळे मोठया प्रमाणांत सुटतो. सातारा जिल्हयाला विशेषत: वरदान असणारं हे कोयनेचे धरण स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कल्पनेने त्यांच्या प्रेरणेने याठिकाणी पुर्ण झाले. सुमारे 2000 मेगावॅट विजेची निर्मिती याच जलाशयातल्या पाण्यावरती करण्यात येते.आज जलपूजनच्या निमित्ताने मी कोयना माईची आराधना केलेली आहे आणि कोयनामाईकडे गारऱ्हाने मांडलं आहे की असचं या संपूर्ण महाराष्ट्रावरती पिण्याच्या, शेतीच्या व औद्योगिकीकरणाच्या पाण्यासाठी लागणारी जी तहान आहे ती कोयनामाईनं अशाचप्रकारे पुर्ण करावी.कोयना धरणामुळे जी हरीत क्रांती झालेली आहे.त्याची अशीच भरभराटी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

         पाटण मतदारसंघातील तमाम जनतेने मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यामुळे राज्यातील सर्वात मोठया आपले कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची संधी मला मिळत आहे.मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत असून ही संधी मला मिळवून देणाऱ्या पाटण तालुक्यातील तमाम जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो.कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पोतदार आणि त्यांचे सर्व सहकारी व व्यवस्थापन कोयना धरणाच्या संदर्भात २४ तास कार्यरत आहेत. तसेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठच्या गांवामध्ये दक्षता घेण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसिलदार रमेश पाटील हे अधिकारी व त्यांच्या देखरेखी खाली सर्वच तालुका प्रशासन कार्यरत होते,असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. जलपूजन कार्यक्रमानंतर कोयनानगर येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या वार्षिक योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या कामांबाबत मा. ना. शंभूराज देसाई यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी कोयनानगर येथील अस्तित्वात असणाऱ्या नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण, धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभीकरण व नुतनीकरण, धरण व्यवस्थापनाच्या जीर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नुतनीकरण, कोयनानगर येथे पर्यटकांना बसण्याकरिता ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे, धरणातील जलाशयामध्ये बोटिंगची व्यवस्था करणे, पर्यटकांसाठी निसर्ग परिचय केंद्र उभारणे व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. तसेच कोयना धरण विद्युत प्रकल्पासाठी कर्मचारी वर्ग वाढविण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेतला जाईल आणि प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे पाठपुरावा करू, असे ना. शंभूराज देसाई यांनी बैठकीत स्पष्ट केले.

 

Wednesday 17 August 2022

ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 49 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

 

दौलतनगर दि.17:- गतवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग व पूलांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे या मार्गांवरुन दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या नुकसान झालेल्या विविध‍ विकास कामांचे पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या माहे ऑगस्ट महिन्यातील पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी विनंती केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांच्या सह पुलांच्या कामांसाठी 49 कोटी 70 लक्ष  रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गतवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे डोंगरी व दुर्गम भागात दळण-वळण मोठी गैरसोय निर्माण झाली होती.गतवर्षापासून नुकसान झालेल्या रस्ते व पूलांचे पुनर्बांधणीसाठी ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांमधून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील होते.शिवसेना-भाजपा युतीचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे पाटण तालुक्यातील नुकसान झालेल्या रस्ते व पुलांच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी मंजूर होण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार मुंबई या ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 49कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामांमध्ये पाटण मणदुरे जळव तारळे पाल रस्ता रामा 398 किमी 13/00 ते 18/00 भाग मणदुरे ते जळवखिंड रस्ता सुधारणा 4 कोटी,बनपुरी अंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन  रस्ता प्रजिमा 125 कि.मी.0/00 ते 13/00 (भाग कि.मी.10/00 ते 13/00 कोळेकरवाडी ते उमरकांचन) चे रूंदीकरण व सुधारणा 4 कोटी,भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 12/500 (भाग कि.मी.10/500 ते 12/500 - नवीवाडी ते कारळे) चे बांधकाम 02 कोटी 70 लक्ष,त्रिपुडी मुळगांव कवरवाडी नेरळे गुंजाळी लेंढोरी मणेरी चिरंबे काढोली चाफेर रिसवड ढोकावळे रस्ता प्रजिमा-123 कि.मी. 4/500 येथे कवरवाडी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम 01 कोटी 50 लक्ष,बनपुरी अंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन  रस्ता प्रजिमा 125 कि.मी.3/100 वांग नदीवर भालेकरवाडी(बनपूरी) येथे मोठया पुलाचे बांधकाम 4 कोटी,रा.मा.136 ते सुपने किरपे आणे आंबवडे काढणे ते प्रजिमा-55, प्रजिमा-66 कि.मी.0/00 ते 14/800 (भाग कि.मी.13/00 ते 14/800 -पांढरेचीवाडी ते काढणे फाटा) चे बांधकाम 02 कोटी 50 लक्ष,भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 12/500 भाग कि.मी.7/00 ते 10/00 मध्ये दोन पुलांचे बांधकाम 3 कोटी,सातारा गजवडी चाळकेवाडी चाफोली पाटण रस्ता प्रजिमा 29 किमी 26/500 ते 30/00 भाग चाळकेवाडी ते मरड रस्ता सुधारणा 20 कोटी,नागठाणे तारळे पाटण रस्ता प्रजिमा 37 किमी 14/00 ते 22/00 भाग पांढरवाडी वजरोशी ते बांधवाट रस्त्याची सुधारणा 5 कोटी,नागठाणे तारळे पाटण रस्ता प्रजिमा 37 किमी 23/00 ते 24/00 भाग बांधवाट ते विरेवाडी फाटा रस्त्याची सुधारणा 1 कोटी 50 लक्ष,गमेवाडी कडववाडी पाडळोशी मसुगडेवाडी रस्ता प्रजिमा 130 कि.मी.7/300 वर धायटी, ता.पाटण गावाजवळील ओढयावर पुलाचे बांधकाम 1 कोटी 50 लाख या 11 कामांचा समावेश आहे.राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या विकास कामांची लवकरच निविदा कार्यवाही करण्यात येऊन दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

Tuesday 16 August 2022

पाटण विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना 25 कोटींचा निधी मंजूर. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे नामदार शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर विकास कामांसाठी भरघोस निधी.

 

 दौलतनगर दि.16:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर होण्याकरीता शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी लेखी पत्राव्दारे विनंती केलेली होती.मुख्यमंत्र्यांनी तातडीने याकामांना निधी मंजूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या.त्यानुसार पाटण विधानभा मतदारसंघातील तब्बल 137 गावातील विविध विकास कामांना राज्य शासनाचे 2515 योजनेअंतर्गत  25 कोटी रुपयांचा‍ निधी मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने निधी मंजूर केल्याबाबत शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

                       प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांतर्गत, गावपोहोच रस्त्त्यांची अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत दुरावस्था झाली होती.दुरावस्था झालेल्या विकास कामांचे पुनर्बांधणीकरीता निधीची आवश्यकता असल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे आवश्यक निधी मंजूर होण्यासाठी विनंती केलेली होती.त्यानुसार राज्य शासनाच्या 2515 योजनेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 137 विविध विकास कामांना 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या विकास कामांमध्ये किसरुळे (दवंडेवस्ती) अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण  10 लाख,अंबवडे खुर्द अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,आंब्रुळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,आडदेव वरचे रस्ता संरक्षक भिंत 15 लाख,आडूळ पेठ येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, आबदारवाडी(जुगाईनगर)रस्ता सुधारणा 15 लाख,सावरघर पालखी मार्ग रस्ता सुधारणा 20 लाख,एकावडेवाडी(सळवे) रस्ता सुधारणा 20 लाख,करपेवाडी (काळगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,कातवडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,कारवट ते विठ्ठलवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,काळगांव (देसाईवस्ती) अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,काहिर लक्ष्मी वार्ड व विठ्ठलाई वार्ड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,कुंभारगाव चावडी ते हुंबरपाळी रस्ता सुधारणा 15 लाख,कोंजवडे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,कोकीसरे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,कोचरेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,कोळेकरवाडी (डेरवण) गावपोहोच  रस्ता सुधारणा 40 लाख,क्रांतीनगर(नाडे),ता.पाटण अंतर्गत संरक्षक भिंत व रस्ता सुधारणा 15 लाख,गारवडे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,चाफळ अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,चेवलेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,चोपदारवाडी अंतर्गत पाचवड रस्ता सुधारणा 20 लाख,जंगलवाडी (जाधववाडी चाफळ) पोहोच रस्ता ग्रामा 128 सुधारणा 40 लाख,जाळगेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,किल्ले मोरगिरी मागासवर्गीय वस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,जोतिबाचीवाडी जोतिबा मंदिर ते येराड रस्ता सुधारणा 20 लाख,डिगेवाडी ते काळेवाडी (आडूळ) रस्ता सुधारणा 20 लाख,डोंगरुबाचीवाडी ते यमाईचीवाडी (मुळगाव) रस्ता खडी. डांबरीकरण 15 लाख,डोंगळेवाडी (खालची) अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,ढेबेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,ढेरुगडेवाडी (येराड) उर्वरित रस्ता सुधारणा 20 लाख,तामिणे रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,तारळे अंतर्गत रस्ता सुधारणा 25 लाख,तोंडोशी रामघळ पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 20 लाख,दिंडूकलेवाडी (मल्हारपेठ) पोहोच रस्ता सुधारणा 10 लाख,दिंडेवाडी (गुढे ) पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख,दिवशी खुर्द धारेश्वर मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,दौलतनगर(मरळी) नवीन वसाहत अंतर्गत रस्ता सुधारणा 40 लाख,धडामवाडी (धजगाव) ते शिंदेवाडी पोहोच रस्ता  सुधारणा 20 लाख,धामणी येथे डांगेआळी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,धुईलवाडी (गावडेवाडी) स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,धुमकवाडी (मुरुड) स्मशानभूमी रस्ता सुधारणा 10 लाख,मरळी येथे निनाई मंदिर रस्त्यावर संरक्षक भिंतीसह सुधारणा 25 लाख,नाडे निनाई मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,पवारवाडी (कुठरे) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,पाचुपतेवाडी ग्रा.पं. स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,जाधववाडी (मेंढ) स्मशानभूमी रस्ता सुधारणा व सरक्षक भिंत 15  लाख,पाडळी बालाजीनगर पोहोच रस्ता खडीकरण, डांबरीकरण  15 लाख,पाळशी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,पिटेवाडी (मणदुरे) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, भांबुचीवाडी (भोसगाव) रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,भालेकरवाडी(डावरी) रस्ता सुधारणा  10 लाख,मणदुरे बौध्दवस्ती पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख,मरळी येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा  20 लाख,मरळोशी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,मराठवाडी ते जौरातवाडी पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 20 लाख,मस्करवाडी नं. 2 (काळगाव) रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,महिंद अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,मालोशी ते घाटेवाडी,ता.पाटण रस्ता खडीकरण,डांबरीकरण 25 लाख,मुरुड देवाचा माळ अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 10 लाख,किल्ले मोरगिरी अंतर्गत लाडवस्ती मिसाळवाडी  रस्ता सुधारणा 25 लाख,रासाटी जुने गावठाण अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,रुवले पाटीलआवाड ते नेहरुटेकडी रस्ता  सुधारणा 25 लाख,लुगडेवाडी ते येरफळे रस्ता खडीकरण,डांबरीकरण 20 लाख,लेंढोरी धनगरवस्ती रस्ता खडीकरण,डांबरीकरण 10 लाख,लोरेवाडी (मुरुड) अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,वाटोळे संभाजीनगर फाटा ते पाबळ विहिर पर्यंतचा रस्ता सुधारणा 20 लाख,विहे येथे दौलत वार्ड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,वेताळवाडी येथे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,सणबूर अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,सांगवड ते सुर्यवंशीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,सुतारवाडी (मालदन) अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,सुपुगडेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,सुर्वेवाडी (कुठरे) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,सोनाईचीवाडी रस्ता सुधारणा 15 लाख,बनपेठवाडी देवमार्ग रस्ता सुधारणा 20 लाख,आंब्रग आखाडा ते देशमुख वस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,आंबळे येथील पद्मावती मंदिर पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख,कडवे बुद्रुक येथे पवनाईदेवी मंदीर रस्ता सुधारणा 15 लाख,कसणी (धनगरवाडा)रस्ता सुधारणा 20 लाख,कुठरे व माळवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,कुशी ते वेखंडवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,गोकूळ तर्फ हेळवाक भैरवनाथ मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,घाणबी नरसोबाची वाडी ते गवळीनगर रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,चव्हाणवाडी(धामणी) अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,चव्हाणवाडी(नाटोशी) येथील रस्ता सुधारणा 15 लाख,चव्हाणवाडी(नाणेगाव) ग्रा.पं. कार्यालय ते जि.प.शाळा रस्ता सुधारणा 15 लाख,जानुगडेवाडी (मदनेवस्ती) रस्ता सुधारणा 15 लाख,टकलेवाडी शिर्केवस्ती(नाटोशी) रस्ता सुधारणा 15 लाख,ढोपरेवाडी(आंब्रुळे) रस्ता सुधारणा 15 लाख,घोटील पुन.(ताईगडेवाडी) अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,निवी मुख्य रस्ता ते नाईकबा मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,निवी साबळेवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,पापर्डे मराठी शाळा ते जोतिबा मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण 20 लाख,पायटयाचावाडा(गोषटवाडी) रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,धूमकवाडी (मुरुड) रस्ता सुधारणा 10 लाख,बामणेवाडी भांबे बामणेवाडी ते जांभे रस्ता सुधारणा 20 लाख,बेलवडे खुर्द पेठ वार्ड लोकरे आळी ते पोलीस दूरक्षेत्र माने आवाड ते पाटील विहीर अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, बोर्गेवाडी(सुर्यवंशीवाडी) येथील पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,मंद्रुळहवेली अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,मरड (भिकाडी) पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,मसुगडेवाडी,बाबरवाडी(दाढोली) रस्ता खडीकरण,डांबरीकरण 10 लाख,मस्करवाडी (कसणी) अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,माजगाव माळवस्ती रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख, माथणेवाडी(चाफळ) अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,मानाईनगर  रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,मिरगाव चाफेर,ता.पाटण अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,मुरुड अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,माजगाव मोरेवस्ती पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,रुवले गावठाण,ता.पाटण रस्ता सुधारणा 15 लाख,वरचे घोटील,ता.पाटण रस्ता सुधारणा 15 लाख,विहे वसाहत बेघरवस्ती व नंदीवाले समाज अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,सडावाघापूर येथे तारळे पाटण रस्ता ते सडा निनाई रस्ता सुधारणा 40 लाख,सळवे जोतिर्लिंग मंदिरशेजारी रस्त्यास संरक्षक भिंत व रस्ता सुधारणा 20 लाख,सातारा रोड ते मरड दारे,ता.पाटण पोहोच रस्ता सुधारणा 30 लाख,सुंदरनगर(डांगीष्टेवाडी) अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 25  लाख,सुर्वेवाडी (कुठरे) येथे रस्ता सुधारणा व संरक्षक भिंत 20 लाख,मराठवाडी वरची (मेंढ) अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,जोगेटेक फाटा ते जोगेटेक धनगरवाडा गावपोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,मरड ते मिसाळवाडी रस्त्यावर साकव पूलासह रस्ता सुधारणा 30 लाख,वाजेगाव पुनर्वसन ते बाजे मारुल रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,तारळे भैरवनाथ मंदिर ते नवलाई मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,सडावाघापूर ते माऊली रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,महिंद येथे साळूंखेवस्ती व शिंदेवस्ती येथे संरक्षक  भिंत 35 लाख,दाढोली अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, चाहूरवाडी(नाणेगाव खुर्द),ता.पाटण अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, खोणोली अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, केळोली केदारनाथ  मंदिरा शेजारील रस्त्यावर संरक्षक भिंत 20 लाख, तोरस्करआळी, कडववाडी (नाणेगाव बु) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, तळमावले (ताईगडेवाडी)ता. पाटण अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,शिवपुरी (ढोरोशी) रस्ता सुधारणा 20 लाख, वसंतगड  जनार्दन महाराज समाधी रस्ता खडीकरण,डांबरीकरण 25 लाख,तांबवे अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण 20 लाख, पाठरवाडी(गमेवाडी)  पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख, दक्षिण तांबवे अंतर्गत रस्ता  सुधारणा 15 लाख, सुपने अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 20 लाख या विकास कामांचा समावेश आहे.मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल नामदार शंभूराज देसाई यांनी त्यांचे आभार मानले असून मंजूर कामांचा निविदा प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना नामदार शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असून पाऊस कमी  झाल्यानंतर या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची  माहिती नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.