दौलतनगर दि.28 :- पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजुर करण्यात आले होते.
सध्या कराड पासून पाटण पर्यंत मल्हारपेठ,नाडे व म्हावशी येथील काही भाग वगळता काम
पूर्ण झाले आहे. पाटण ते संगमनगर धक्का व हेळवाक ते घाटमाथा या भागातील रस्त्याचे
काम अपूर्ण आहे.अपूर्ण कामे सुरु करण्यासंदर्भात गत दिड वर्षापासून केंद्रीय
मंत्री ना.नितीनजी गडकरी
यांचेकडे पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण ते संगमनगर धक्का या भागातील
काँक्रीट रस्त्याकरीता केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी 92 कोटी रुपयांचा निधी मंजूर
केल्यानंतर या कामाची निविदा प्रक्रिया झाली आहे. त्याचबरोबर हेळवाक ते कराड
राष्ट्रीय महामार्गाचे मल्हारपेठ,नाडे,आडूळ,म्हावशी व केरा पूल येथील अपूर्ण काम व
हेळवाक ते घाटमाथा या लांबीतील अपूर्ण रस्त्याची कामे संबंधित एजन्सीकडून लवकरात
लवकर सुरु करावित, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी
राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या.
गुहाघर चिपळूण जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गातील भाग
कराड ते घाटमाथा या भागातील अपूर्ण रस्त्याच्या कामासंदर्भात मंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे अध्यतेखाली राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांचे समवेत आढावा बैठक
आयोजित केली होती. यावेळी जिल्हा पुनर्वसन
अधिकारी किर्ती नलवडे,उपविभागीय अधिकारी सुनील
गाढे,तहसिलदार रमेश पाटील,कोयना प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता डोईफोडे,राष्ट्रीय
महामार्गाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे,उपअभियंता किशोर शेजवळ,एल अँड टी
कंपनीचे रविंद्र भोईटे,उदय जाधव कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रा उदय जाधव,प्रणिल घारगे
शाखा अभियंता अनिकेत देसाई आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मंत्री ना.शंभूराज
देसाई यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा संपूर्ण आढावा घेतला.
गुहाघर चिपळूण जत
विजापूर या राष्ट्रीय महामार्गातील राष्ट्रीय महामार्गाचे कामासंदर्भात आयोजित केलेल्या
बैठकीमध्ये ना.शंभूराज देसाई यांनी पुढे म्हंटले आहे की, केंद्रीय दळणवळण मंत्री
ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे
सातत्याने प्रयत्न करुन मंजुर करुन आणलेल्या पाटण मतदारसंघातील कराड ते घाटमाथा या
राष्ट्रीय महामार्गाचे काम पाटण मतदारसंघातील सर्वात मोठे काम आहे. कराड ते पाटणच्या भागात मल्हारपेठ,नाडे,आडूळ,म्हावशी
व केरा पूल या गावातील 1.4 कि.मी. च्या लांबीतील रस्ता हा अपुर्ण असून एल अँड टी कंपनीकडून लवकरात लवकर पूर्ण
करावा. तसेच पाटण ते संगमनगर धक्का यातील 13 कि.मी.च्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे
कामाला केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी 92 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला
असून या कामासाठी निविदा निश्चित झालेल्या
देशमुख अँड कंपनी कडून रस्त्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्गाचे
अधिकाऱ्यांनी लवकरच सुरुवात करावी व संगमनगर धक्का ते घाटमाथा या लांबीत
डांबरीकरणाचे कामासाठी मंजूर 16 कोटीच्या निविदेतील अपुर्ण हेळवाक ते घाटमाथा या 3
किमी च्या रस्त्याचे काम उदय जाधव
कन्स्ट्रक्शन कंपनीने तातडीने सुरु करण्याच्या
सुचना देऊन या तीन एजन्सीकडून सप्टेंबर महिन्यामध्ये कामाला गती देण्यात यावी.तसेच
ही अपूर्ण असलेली कामे लवकर कशा पध्दतीने पूर्ण करता येतील याचे उद्दीष्ट ठेवून कराड
ते घाटमाथा या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे,असेही शेवटी
त्यांनी सांगीतले.
No comments:
Post a Comment