Saturday 27 August 2022

कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे नामदार शंभूराज देसाईंचे हस्ते ओटी भरण व जलपुजन. कोयना प्रकल्पातील विकास कामांचा घेतला अधिकाऱ्यांकडून आढावा.

 


दौलतनगर दि.28:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये 100 टीएमसीहून अधिक पाणीपातळी ओलंडल्यानंतर शनिवार दि.27,ऑगस्ट,2022 रोजी कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे विधीवत पुजा करुन ओटीभरण व जलपुजन महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते आज सकाळी करण्यात आले. कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग व्यवस्थापनाकडून पुर्णत: कमी करण्यात आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात यंदाही दमदार पाऊस झाल्याने कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

           यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी सरपंच शैलेंद्र शेलार,उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड,नथूराम सावंत,अशोक पाटील,पांडूरग नलवडे,अभिजित पाटील,भरत साळूंखे,कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पोतदार,उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसिलदार रमेश पाटील, कोयनानगरचे सपोनी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

                 याप्रसंगी मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपल्या कोयनामाईकडे  संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर या भागाचा तसेच शेजारच्या कर्नाटक आंधप्रदेश या दोन राज्यांतील पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कोयना धरणामुळे मोठया प्रमाणांत सुटतो. सातारा जिल्हयाला विशेषत: वरदान असणारं हे कोयनेचे धरण स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कल्पनेने त्यांच्या प्रेरणेने याठिकाणी पुर्ण झाले. सुमारे 2000 मेगावॅट विजेची निर्मिती याच जलाशयातल्या पाण्यावरती करण्यात येते.आज जलपूजनच्या निमित्ताने मी कोयना माईची आराधना केलेली आहे आणि कोयनामाईकडे गारऱ्हाने मांडलं आहे की असचं या संपूर्ण महाराष्ट्रावरती पिण्याच्या, शेतीच्या व औद्योगिकीकरणाच्या पाण्यासाठी लागणारी जी तहान आहे ती कोयनामाईनं अशाचप्रकारे पुर्ण करावी.कोयना धरणामुळे जी हरीत क्रांती झालेली आहे.त्याची अशीच भरभराटी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

         पाटण मतदारसंघातील तमाम जनतेने मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यामुळे राज्यातील सर्वात मोठया आपले कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची संधी मला मिळत आहे.मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत असून ही संधी मला मिळवून देणाऱ्या पाटण तालुक्यातील तमाम जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो.कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पोतदार आणि त्यांचे सर्व सहकारी व व्यवस्थापन कोयना धरणाच्या संदर्भात २४ तास कार्यरत आहेत. तसेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठच्या गांवामध्ये दक्षता घेण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसिलदार रमेश पाटील हे अधिकारी व त्यांच्या देखरेखी खाली सर्वच तालुका प्रशासन कार्यरत होते,असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. जलपूजन कार्यक्रमानंतर कोयनानगर येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या वार्षिक योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या कामांबाबत मा. ना. शंभूराज देसाई यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी कोयनानगर येथील अस्तित्वात असणाऱ्या नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण, धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभीकरण व नुतनीकरण, धरण व्यवस्थापनाच्या जीर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नुतनीकरण, कोयनानगर येथे पर्यटकांना बसण्याकरिता ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे, धरणातील जलाशयामध्ये बोटिंगची व्यवस्था करणे, पर्यटकांसाठी निसर्ग परिचय केंद्र उभारणे व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. तसेच कोयना धरण विद्युत प्रकल्पासाठी कर्मचारी वर्ग वाढविण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेतला जाईल आणि प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे पाठपुरावा करू, असे ना. शंभूराज देसाई यांनी बैठकीत स्पष्ट केले.

 

No comments:

Post a Comment