Friday 31 March 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील विकास कामांसाठी 50 कोटींचा निधी मंजूर. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पायाभुत सुविधांचे पुनर्बांधणीसाठी झाली भरीव तरतुद.

 


दौलतनगर 29 : पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात असलेल्या अनेक गावांतील पोहोच रस्ते,अंतर्गत रस्ते यांची अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत दुरावस्था झाली होती. अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या विकास कामांचे पुनर्बांधणीसाठी तातडीने भरीव निधीची गरज असल्याने राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई  यांनी  राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे शिफारस करत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात असलेल्या गावांतील पायाभूत सुविधांचे पुनर्बांधणीसाठी भरीव निधीची मागणी केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 241 गावांतील विविध विकास कामांना 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, माहे जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या डोंगरी व दुर्गम भागातील पायाभूत सुविधांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांतील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने  पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांतील पायाभूत सुविधांचे पुनर्बांधणीसाठी भरीव निधी मंजूर होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री  ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील 241 पायाभूत सुविधांचे विकास कामांना 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या पायाभूत सुविधांचे कामांमध्ये  जळकेवाडी कुशी गावठाण अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,भोकरवाडी सावरघर अंतर्गत जोतिबा मंदिर रस्ता सुधारणा 10 लाख,बामणेवाडी भांबे जांभे पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख,गोरेवाडी मुरुड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,आंबळे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,वरची केळेवाडी  कडवे  अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, बेंदवाडी,माळवस्ती व सवारवाडी कडवे पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,काळकुटवाडी आंबळे  अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,मस्करवाडी (काळगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,धामणी सोसायटी ते चर्मकारवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,निगडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,कुठरे अंतर्गत बबनराव पाटील यांचे घराकडील रस्ता सुधारणा 25 लाख,तारळे अंतर्गत रस्ता सुधारणा 25 लाख,घाटेवाडी मालोशी  सालाईदेवी  रस्ता सुधारणा 25 लाख,वाझोली  जि.प.शाळा ते मोरेवस्ती नं.2 रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,गुढेकरवाडी खळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चव्हाणवाडी चिखलेवाडी कुंभारगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,मानेगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,शिद्रुकवाडी काढणे ते घोरपडेवस्ती खडीकरण डांबरीकरण 20 लाख,खळे मातंगवस्ती ते डुबलवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,करपेवाडी ते साईबाबा मंदिर मानेगाव रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,काढणे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,तुपेवाडी काढणे घारेवस्ती रस्ता  सुधारणा 15 लाख,रासाटी कुंभारवस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 15 लाख,बोपोली अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,किसरुळे शिवंदेश्वर बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,दवंडेवस्ती बोपोली अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,केळोली (वरची) अंतर्गत  रस्ता सुधारणा 15 लाख,चव्हाणवाडी नाणेगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,चाफळ श्रीराम मंदिर ते ग्रामपंचायत रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,नाणेगाव बुद्रुक पुनर्वसन माजगाव गावठाण अंतर्गत रस्ता सुधारणा 25 लाख,माजगाव एस.टी.स्टँड ते ग्रामपंचायत रस्ता सुधारणा 20 लाख,धायटी कांबळेवस्ती  रस्ता सुधारणा 15 लाख,उधवणे पाटील आवाड ते शिर्के आवाड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,कारळे नवाळवाडी ते पाटीलआवाड रस्ता 400 मी.सुधारणा 20 लाख,पाणेरी मूस्लिमवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,पेठशिवापूर मागची वस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,वरंडेवाडी (आंबेघर तर्फ मरळी) रस्ता सुधारणा  20 लाख,आटोली भाकरमळी ते वाघजाई मंदिर रस्ता सुधारणा 40 लाख,वाडीकोतावडे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,कदमवाडी नाटोशी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,नाटोशी येथे निकमवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,कोकीसरे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,कळकेवाडी कुसरुंड अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,तळीये जानाई मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,नावडी रस्ता क्र.1 गोसावी वाडा ते जामदारवाडा पाण्याची टाकी रस्ता सुधारणा 20 लाख,सोनाईचीवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,नवसरी वरची जि.प.शाळाकडील अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,नाडे काटेवाडी  नवारस्ता  रस्ता सुधारणा 20 लाख,पिंपळगाव करवरवाडी अंतर्गत रस्ता डोंगरोबा मंदिर ते साईबाबा मंदिर पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता सुधारणा 15 लाख,पिंपळगाव कवरवाडी येथे चंद्रकांत कवर यांचे घरापासून स्मशानभूमी डोंगरोबा मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,नेरळे जानाई मंदिर ते नदिपर्यंतचा रस्ता सुधारणा 25 लाख,शिंदेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,गव्हाणवाडी निनाईवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चोपदारवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,आसवलेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,मरड माकणे शाळेपर्यंत रस्ता सुधारणा 20 लाख,बर्गेवाडी धनगरवाडा खिवशी अंतर्गत 300 मीटर रस्ता सुधारणा 15 लाख,धुईलवाडी गावडेवाडी मारुती सपकाळ यांचे घर ते नानुमळी घर यांचे घरापर्यंतचा रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,टोळेवाडी बाळू निकम यांचे घर ते भैरवनाथ मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,दिवशी खुर्द वाघघळ ते बसवा धारेश्वर दिवशी मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,पिंपळोशी फाटा ते बौध्दवस्ती कवडेवाडी रस्ता 400 मी. खडीकरण डांबरीकरण 20 लाख,गुढे अंतर्गत रस्ता सुधारणा 30 लाख,उत्तर तांबवे अंतर्गत रस्ता सुधारणा 30 लाख,भोळेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,केसे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,तांबवे मातंगवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,आबईचीवाडी बेघरवस्ती ते पाण्याची टाकी रस्ता सुधारणा 20 लाख,पाडळी केसे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,जांभेकरवाडी(मरळोशी) धनगरवाडा पोहोच रस्ता सुधारणा 30 लाख,जन्नेवाडी घोट श्री जानाई मंदिर ते स्मशानभूमी व रस्ता सुधारणा 20 लाख,पाडेकरवाडी मालोशी मुख्य रस्ता ते वाघजाई देवी मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,भुडकेवाडी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,नुने स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा 15 लाख,बागलेवाडी सावरघर मुख्य रस्ता ते मळीवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,आवर्डे ते धनगरवाडी रस्ता सुधारणा 15 लाख,भुडकेवाडी खालची रस्ता सुधारणा 15 लाख,जगदाळवाडी कडवे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,महाडीकवाडी नुने पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,काळगाव मुस्लीमवस्ती दफनभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,खळे ते कवडेवाडी रस्ता सुधारणा 20 लाख,बोपोली अंबाखेळती मंदिर रस्ता 01 किमी सुधारणा 20 लाख,शेळकेवस्ती ते बाजे मारुल तर्फ पाटण खडीकरण डांबरीकरण 20 लाख,नाव ते मळे कोळणे रस्ता सुधारणा 40 लाख,खराडवाडी  भोसलाई मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,ऊरुल ते माजगाव रस्ता ग्रा.मा. 135  पोहोच मार्गासह सुधारणा 75 लाख,सडानिनाई पोहोच रस्ता ग्रामा 43 सुधारणा 25 लाख,सडावाघापूर माऊली मंदिर रस्ता सुधारणा 40 लाख,चेणगेवाडी सळवे रस्ता सुधारणा 20 लाख,मान्याचीवाडी सळवे रस्ता सुधारणा 20 लाख,वर्पेवाडी सळवे ते उधवणे रस्ता सुधारणा 25 लाख,वर्पेवाडी (सळवे) ते जन्नाईमंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,रुवले स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,उधवणे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,भातडेवाडी जिंती पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख,धनावडेवाडी निगडे पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,मंद्रुळकोळे कदमआवाड पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,मराठवाडी स्मशानभूमी पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख,नहिंबे-चिरंबे स्मशानभूमी रस्ता सुधारणा20 लाख,पानस्करवाडी मल्हारपेठ पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,यमाईचीवाडी मुळगाव पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,बोंद्रेवाडी दिवशी बु रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,गारवडे मागासवर्गीयवस्ती ते भिंगारदेवे वस्ती पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख,पापर्डे बुद्रुक स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,सातारा फाटा ते वन दारे रस्ता सुधारणा 15 लाख,मरड ते जानाई मंदिर रस्ता सुधारणा 30 लाख,बोंद्री वनवासवाडी ते मधलीशाळा रस्ता सुधारणा 30 लाख,लेंढोरी भराडीदेवी मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,हेळवाक शंकरराव महाजन यांचे घर ते कोंडीबा शेलार यांचे घरापर्यंतचा रस्ता सुधारणा 25 लाख,शेंडेवाडी पवारवस्ती ते स्मशानभूमी रस्ता 1 कि.मी.सुधारणा 25 लाख,डोंगळेवाडी माणगाव मोरगिरी मुख्य रस्त्यापासून स्मशानभूमीकडे जाणारा 1 कि.मी.रस्ता खडीकरण, डांबरीकरण 25 लाख,गोवारे गवळीनगर रस्ता सुधारणा 25 लाख,काटकरवाडी मंद्रुळकोळे रस्ता सुधारणा व आर.सी.सी.गटर 25 लाख,पाटण टोळेवाडी घेरादातेगड विठ्ठलवाडी सावंतवाडी नाणेल रस्ता सुधारणा करणे. (भाग विठ्ठलवाडी सावंतवाडी नाणेल) 48 लाख,काठी गावठाण ते जाधववस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,देशमुखवाडी गोकूळ तर्फ हेळवाक पोहोच रस्ता सुधारणा 30 लाख,हुंबरळी महादेववाडी रस्ता सुधारणा 15 लाख,मिरगाव कामरगाव रस्ता सुधारणा 20 लाख,बांबवडे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,बनपेठवाडी येराड कोयना नदी  घाट रस्ता सुधारणा 25 लाख,निवडे स्मशानभूमी रस्ता सुधारणा35 लाख,खालची खबालवाडी ते वरची खबालवाडी रस्ता सुधारणा 45 लाख,चेणगेवस्ती गारवडे ते पाऊदका रस्ता सुधारणा 35 लाख,मारुलहवेली बाजारपेठ ते कोरिवळे रस्ता सुधारणा 20 लाख,मंगेवाडी मरळी अंतर्गत व स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा 30 लाख,आबदारवाडी जुगाईनगर ते जि.प.शाळा रस्ता नळकांडी पुलासह रस्ता सुधारणा 20 लाख,मळ्याचीवाडी काळगांव पोहच रस्ता उर्वरीत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,काळगाव बौध्दवस्ती,पाटीलवस्ती येथे ओढयालगत संरक्षक भिंत 20 लाख,निवी चोरगेवस्ती रस्ता खडीकरण 50 लाख,काजारवाडी शिंद्रुकवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,माटेकरवाडी ते चिखलेवाडी जंगली महाराज मठ रस्ता सुधारणा 40 लाख,कामरगाव बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,मारुल तर्फ पाटण सावंतवाडी ते मारुल बाजे चौगुलेवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,आंबवडे खुर्द काळेश्वर मंदिर ते रुवले फाटा रस्ता सुधारणा 25 लाख,बनपूरी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,म्हाळुंगेवस्ती सातर अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,साबळेवाडी ते शेजवळवाडी रस्ता सुधारणा 15 लाख,माईंगडेवाडी जिंती ते दिसले आवाड रस्ता सुधारणा 20 लाख,पाणेरी मुख्य रस्ता ते गावठाण रस्ता सुधारणा 20 लाख,हौदाचीवाडी जिंती रस्ता सुधारणा 15 लाख,कडवे खुर्द संरक्षक भिंत 10 लाख,केळेवाडी खालची कडवे खुर्द येथे मंदिर ते शाळा संरक्षक भिंत बांधकाम 15 लाख,गायमुखवाडी बांबवडे अंतर्गत रस्ता  सुधारणा 7 लाख,जुगाईवाडी घोट रस्ता सुधारणा 20 लाख,दुटाळवाडी नुने अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,बेंदवाडी कडवे बु ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 10 लाख,भैरेवाडी ढोरोशी येथे संरक्षक भिंत 10 लाख,मरळोशी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,राहुडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,जंगलवाडी तारळे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 25 लाख,कुशी पुनर्वसन आवर्डे रस्ता सुधारणा 20 लाख,भोकरवाडी सावरघर गावडेवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,आडदेव खुर्द बेंदे पासून आंब्रुळे माणगाव रस्ता सुधारणा 20 लाख,काढोली धावडवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,झाकडे बौध्दवस्ती ते विठ्ठलाई मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,कोरिवळे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,सोनवडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,वरची मेंढोशी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,आंबवणे शेळकेवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,काठी  आवसरी जोडरस्ता ते सिताराम विष्णू कदम यांचे घरापर्यंतचा रस्ता सुधारणा 20 लाख,रामेल शेळकेवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,कुंभारगाव येथे संरक्षक भिंत 30 लाख,येराड फळबाबी ओढयाशेजारी संरक्षक भिंत 20 लाख,वनकुसावडे ते पळासरी साकव पूलाला संरक्षक भिंतीसह सुधारणा 20 लाख,जरेआवाड वाटोळे किसन राजाराम पवार यांचे घर ते पाणवठा रस्ता सुधारणा 20 लाख,मसुगडेवाडी पाडळोशी येथे सभामंडपाशेजारी संरक्षक भिंतीसह परिसर सुधारणा 15 लाख,आबदारवाडी ग्रामपंचायत जागेला संरक्षक भिंत 20 लाख,दिवशी खुर्द मळयाचावाडा पांगुळवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 30 लाख,वस्ती साकुर्डी स्मशान भूमी रस्त्यावर संरक्षक भिंत 15 लाख,केसे जुने गावठाण मागासवर्गीय वस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,पाडळी नविन गावठाण  जोडरस्ता सुधारणा 25 लाख,मस्करवाडी नं.2 येथे ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,माथणेवाडी नाडे रस्त्यावरील साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,बोंद्री मधलीशाळा ते भराडी रस्त्यावरील ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,काढोली सावंतवस्ती पोहच रस्ता साकवसह सुधारणा 40 लाख,विठ्ठलवाडी ते गुणुगलेवाडी रस्त्यावर दोन ठिकाणी स्लॅब ड्रेन 40 लाख,आटोली भाकरमळी ते वाघजाई मंदिर रस्त्यावर स्लॅब ड्रेन 25 लाख,शिवाजीनगर ऊरुल येथे ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,गलमेवाडी येथे ओढयावर साकव 35 लाख,डेळेवाडी मथुरादास मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,आबईचीवाडी येथील ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,भोसगाव मुख्य रस्त्यावर साकव सह सुधारणा 40 लाख,डिगेवाडी ते काळेवाडी साकव सह रस्ता सुधारणा 40 लाख,साजूर येथे भगवान चव्हाण यांचे घराकडे जाणारा रस्त्यावर साकव 35 लाख,रुवले मोरेवाडी ते सुतारवाडी नेहरु टेकडी ते नवीवाडी फाटा रस्ता सुधारणा 25 लाख,जमदाडवाडी जिल्हा परिषद शाळेसमोर गट नं.207 श्री.सुभाष जयसिंग जमदाडे यांचे घर ते विष्णू मोरे यांचे घर रस्ता सुधारणा 15 लाख,मारुल तर्फ पाटण अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,दिवशी खुर्द मळयाचावाडा रस्ता सुधारणा 20 लाख,मान्याचीवाडी मालदन येथे स्मशानभूमीकरीता संरक्षक भिंत 30 लाख,माथणेवाडी भैरवनाथ मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,मान्याचीवाडी सळवे रस्ता खडीकरण डांबरीकरण 35 लाख,चाफळ भांबेवाडी ते देसाईवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,पांढरवाडी तारळे विहिरीला संरक्षक भिंत 25 लाख,कदमवाडी नाटोशी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,रासाटी साईनगर रस्ता सुधारणा 15 लाख,म्हावशी जांभळेवस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 15 लाख,मरळी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,घोट मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,निगडे ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,गोवारे ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,काढोली ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,ऊरुल ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,जानुगडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,मालदन ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,माजगाव ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,येराड ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,गमेवाडी,ता.कराड ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,साखरी सभामंडप दुरुस्ती व बांधकाम 15 लाख,कोळेकरवाडी श्री भराडीदेवी मंदिर रस्ता सुधारणा 15 लाख,सडाबोडकी रस्ता खडीकरण,डांबरीकरण 25 लाख,सडानिनाई सडावाघापूर सभामंडप दुरुस्ती व बांधकाम 12 लाख,सडाकळकी सडावाघापूर अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,घोट स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,पानस्करवाडी मल्हारपेठ स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,दिंडूकलेवाडी मल्हारपेठ अंतर्गत रस्ता सुधारणा 5 लाख,आंब्रुळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,डावरी पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख,मानेगाव इंजादेवी रस्ता सुधारणा 10 लाख,खालचे आडदेव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, नारळवाडी ते वेताळबा मंद्रुळहवेली रस्ता सुधारणा 20 लाख,शिरळ हणमंत नाना सुर्यवंशी यांचे घर ते माळवस्ती रस्ता सुधारणा 14 लाख,हारुगडेवाडी नाडोली स्मशानभूमी पोहोच रस्ता सुधारणा 10 लाख,वेताळवाडी स्मशानभूमी पाणवठा रस्ता सुधारणा 25 लाख,सोनवडे तालिम इमारत दुरुस्तीसह बांधकाम 15 लाख,भोसगाव आंब्रुळकरवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,नाणेगाव बु. सुर्याचीवाडी स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,जाळगेवाडी स्मशानभूमी रस्ता साकवसह सुधारणा 30 लाख,डेरवण कोळेकरवाडी ते वनवासवाडी रस्ता सुधारणा 15 लाख,वाघजाईवाडी मधलीवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,सडादुसाळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,वेखंडवाडी साकवसह रस्ता सुधारणा 30 लाख,पाडळोशी वार्ड नं.1 नवेघर आर.सी.सी.पाय-या गटर सह रस्ता सुधारणा 10 लाख, काळगाव नाभिकवस्ती रस्ता सुधारणा 12 लाख,धामणी मुस्लिमवस्ती रस्ता सुधारणा 12 लाख,आवसरी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,घाणबी बौध्दवस्ती ते ग्रामपंचायत कार्यालय रस्ता सुधारणा 15 लाख,वाटोळे मैदान ते गाव रस्त्यावर साकव पूल 30 लाख,धडामवाडी केरळ खिवशी राजवाडा म्हारंवड ते भारसाखळे रस्ता सुधारणा 20 लाख,कुसरुंड मराठी शाळा ते पवारवाडा रस्ता सुधारणा 15 लाख,रामिष्टेवाडी पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,गाढखोप अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,बेलदरे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख या तब्बल 241 पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 05 कोटींचा निधी मंजूर. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटन स्थळांचा होणार विकास.

 


दौलतनगर 29 : पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील दौलतनगर येथील श्री गणेश मंदिर, बोपोली येथील अंबाखेळती मंदिर, येराड येथील येडोबा मंदिर,विहे येथील जोतिबा मंदिर,जळव येथील जोतिबा मंदिर ,सडा दाढोली येथील कुबडी तीर्थ परिसर,नाडोली येथील धुळोबा मंदिर,रासाटी येथील नवलाई मंदिर तसेच साजूर ता.कराड येथील महादेव मंदिर या तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांचा विकास पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील शिफारस केलेल्या  पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                   प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटन व तिर्थक्षेत्र  स्थळांच्या ठिकाणी आवश्यक अशा मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत संबंधित गावातील ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे विनंती केलेली होती. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रसिध्द असलेल्या या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविल्यास या पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची  गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील दौलतनगर येथील श्री गणेश मंदिर, बोपोली येथील अंबाखेळती मंदिर, येराड येथील येडोबा मंदिर,विहे येथील जोतिबा मंदिर,जळव येथील जोतिबा मंदिर ,सडा दाढोली येथील कुबडी तीर्थ परिसर,नाडोली येथील धुळोबा मंदिर,रासाटी येथील नवलाई मंदिर तसेच साजूर ता.कराड येथील महादेव मंदिर या पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीचा पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील या पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला आहे.मंजूर झालेल्या पर्यटन विकासाच्या कामांमध्ये दौलतनगर येथील क वर्ग  पर्यटन स्थळ गणेश मंदीर परिसरात वाहनतळ, पर्यटक कक्ष, मंदिर परिसर सुशोभिकरण 02 कोटी, बोपोली येथील आंबाखेळती मंदीर पोहच रस्ता सुधारणा करणे व परिसर सुशोभिकरण 50 लक्ष, येराड येथील क वर्ग पर्यटन स्थळ येडोबा मंदीर परिसरात सुशोभिकरण करणे व कोयना नदीतीरावरील घाटास दगडी पाय-या 75 लक्ष, विहे येथील क र्वग पर्यटन स्थळ जोतिबा मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख, जळव येथील क वर्ग पर्यटन स्थळ जोतिबा मंदीर परिसर सुभोभिकरण करणे व रस्ता सुधारणा 30 लाख,सडा दाढोली येथील क र्वग पर्यटन स्थळ कुवडी तिर्थ परिसर सुशोभिकरण 25 लाख, नाडोली येथील क र्वग पर्यटन स्थळ धुळोबा मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख, रासाटी येथील  नवलाई मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख, साजूर ता.कराड येथील क र्वग पर्यटन स्थळ महादेव मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख अशा एकूण 05कोटी रुपयांचा कामांचा समावेश असून पाटण विधानसभा मतदारसंघातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तर प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांना तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात लवकरच जिल्हास्तरीय अधिकारी यांची बैठक आयोजित करुन या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करुन ही कामे लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात संबंधित शासकीय अधिकारी यांना सूचना करण्यात येणार असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

Thursday 23 March 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 71 गावांतील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.23:- पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली  निवडूण आलेले सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे सत्कार समारंभप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून गावा-गावांमध्ये विकासाची कामे राबविण्यासाठी राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही. अशी ग्वाही या प्रसंगी दिली होती. राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्याकरीता मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांसाठी 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दींस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांतील रस्त्यांची प्रतिवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत नुकसान होत असते. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधीची गरज होती. दरम्यान नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडूण आलेल्या नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत संदस्य यांचा सत्कार सोहळा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये दौलतनगर ता.पाटण येथे पार पडला.या कार्यक्रमप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे हे ऑनलाईन उपस्थित राहून गावांचे विकास कामांना राज्य शासनाकडून निधीची कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी सांगीतले होते.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 71 विविध गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रत्येक गावनिहाय 25 लाख या प्रमाणे एकूण 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय  राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला आहे.मंजूर झालेल्या कामांमध्ये पाडळोशी, वेखंडवाडी, कळंबे, झाकडे, मालदन, पाणेरी, घोटील, मोरगिरी, कडववाडी(नाणेगाव बु.), गिरेवाडी, हुंबरवाडी, गलमेवाडी, वर्पेवाडी (सळवे), कडवे खुर्द, रासाटी, नाव, ढाणकल, गोवोर, काढोली, काठी, शिरळ, कुसवडे, भारसाखळे, निवकणे, निवडे पुनर्वसन, राहुडे, जळव, घोट, मरळोशी, भुडकेवाडी, कोंजवडे, आवर्डे, तोंडोशी, कडवे बुद्रुक, नुने, डेरवण, जाळगेवाडी, माजगाव, सडावाघापूर, माथणेवाडी,  जाधववाडी चाफळ, डिगेवाडी आडूळ, बनपेठवाडी येराड, येराड, शेडगेवाडी विहे, आबदारवाडी, ऊरुल,वेताळवाडी,  नाडे, आडूळपेठ, आडूळ गावठाण, गारवडे, लेंढोरी, नाटोशी,  साबळेवाडी, मराठवाडी, बनपूरी, भोसगाव, मत्रेवाडी, आंबवडे खुर्द,  धजगावं, महिंद, ताईगडेवाडी, शेंडेवाडी, चाळकेवाडी, भिलारवाडी, मान्याचीवाडी, मालदन, सुतारवाडी मालदन तसेच सुपने मंडलातील गमेवाडी,आरेवाडी व उत्तर तांबवे या गावांचा समावेश आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील एकाच वेळी तब्बल 71 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांना प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे सुमारे 17 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री ना.संदिपानजी भुमरे यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आभार मानले असून मंजूर झालेल्या या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लागण्यासंदर्भात मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

 

Thursday 16 March 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 20 कि.मी. लांबीच्या 03 रस्त्यांच्या कामांना 18.14 कोटींचा निधी मंजूर.

 


दौलतनगर दि.16:-पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे पोहोच रस्ते हे दळण वळणाच्यादृष्टीने नादुरुस्त झाले असल्याने या नादुरुस्त रस्त्यांच्या कामांना  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्य मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्ग निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 03 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 आशियाई विकास बँक अर्थ सहाय्य योजने अंतर्गत एकूण 20 कि.मी. लांबींच्या 03 रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 14 लाख 52 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

            प्रसिध्दीपत्रकां पुढे म्हंटले आहे की, पाटण हा डोंगरी व दुर्गम तालुका असून सततच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील प्रमुख रस्तयांची  अतिवृष्टीमध्ये मोठया प्रमाणात दुरावस्था होत असल्याने या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती. दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील गावांना पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे कामासाठी आवश्यक तो निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. तसेच या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार या अगोदर पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) अंतर्गत एकूण 14.656 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 10 कोटी 49 लाख 43 हजार तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 राज्य निधी अंतर्गत  पाटण विधानसभा मतदारसंघातील 03 गावांच्या एकूण 5.800 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 06 कोटी 17 लाख 89 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 आशियाई विकास बँक अर्थ सहाय्य योजने अंतर्गत एकूण 20 कि.मी. लांबींच्या 03 रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 14 लाख 52 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 आशियाई विकास बँक अर्थ सहाय्य योजने अंतर्गत मंजूर रस्त्यांच्या कामांमध्ये टि.आर.15 केर फाटा ते भारसाखळे रस्ता 5.690 कि.मी.करीता 5 कोटी 36 लाख59 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 35.68 लाख असा एकूण 5 कोटी 72 लाख 27 हजार, टि.आर.11 गोकूळ फाटा ते हुंबरणे पांढरेपाणी  रस्ता 09 कि.मी. 6 कोटी 72 लाख 74 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 45.31 लाख असा एकूण 7 कोटी 18 लाख 05 हजार  व सुपने मंडलातील उत्तर तांबवे ते आरेवाडी गमेवाडी पाठरवाडी  रस्ता 5.500 कि.मी. 4 कोटी 90 लाख35 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 33.85 लाख असा एकूण 5 कोटी 24 लाख 20 हजार या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राज्य निधीतून मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे ही पावसाळयापूर्वी सुरु होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन मंजूर  कामे तातडीने  सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

 

Tuesday 14 March 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 03 रस्त्यांच्या कामांना 6.17 कोटींचा निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.14:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे पोहोच रस्ते हे दळण वळणाच्यादृष्टीने नादुरुस्त झाले असल्याने या नादुरुस्त रस्त्यांच्या कामांना  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्य मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्ग निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 03 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 राज्य निधी अंतर्गत एकूण 5.800 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 06 कोटी 17 लाख 89 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

            प्रसिध्दीपत्रकां पुढे म्हंटले आहे की, पाटण हा डोंगरी व दुर्गम तालुका असून सततच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील प्रमुख रस्तयांची  अतिवृष्टीमध्ये मोठया प्रमाणात दुरावस्था होत असल्याने या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती. दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील गावांना पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे कामासाठी आवश्यक तो निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. तसेच या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) अंतर्गत एकूण 14.656 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 10 कोटी 49 लाख 43 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने या अगोदरच पारित केला होता. तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 राज्य निधी अंतर्गत  पाटण विधानसभा मतदारसंघातील 03 गावांच्या एकूण 5.800 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 06 कोटी 17 लाख 89 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राज्य निधी अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये टि.आर.06 चाळकेवाडी रस्ता 1.650 कि.मी.करीता 146.72 लाख तर देखभाल दुरुस्तीकरीता 9.13 लाख असा एकूण 155.85 लाख, टि.आर.10 रुवले उधवणे रस्ता 1.550 कि.मी.करीता 128.24 लाख तर देखभाल दुरुस्तीकरीता 8.62 लाख असा एकूण 136.86 लाख व टि.आर.05 बाचोली रस्ता 2.600 कि.मी.करीता 307.97 लाख तर देखभाल दुरुस्तीकरीता 17.21 लाख असा एकूण 325.18 लाख या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राज्य निधीतून मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे ही पावसाळयापूर्वी सुरु होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन मंजूर  कामे तातडीने  सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Friday 10 March 2023

पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी अर्थसंकल्पातून 75कोटींचा निधी मंजूर.

 


         

दौलतनगर दि.10:- पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग,प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची  अतिवष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. दळण वळणाच्यादष्टीने महत्तवाच्या असलेल्या या रस्त्यांचे पुनर्बांधणीकरीता राज्याचे अर्थसंकल्पातून भरीव निधी मंजूर होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री  ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारशी करत पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे व पुलांच्या कामासाठी अर्थसंकल्पातून 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दपत्रकांत दिली आहे.

         प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग,प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांची  अतिवष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. दळण वळणाच्यादष्टीने महत्तवाच्या असलेल्या या रस्त्यांचे पुनर्बांधणीकरीता राज्याचे अर्थसंकल्पातून भरीव निधी मंजूर होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री  ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारशी करत पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे व पुलांचे कामासाठी अर्थसंकल्पातून 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पाटण येथे सुरु असलेल्या प्रशासकीय इमारतीचे कामासाठी 8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग या रस्त्यांचे व पुलांचे मंजूर कामांमध्ये नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-58 किमी 0/00 ते 5/00 भाग नवारस्ता ते मरळी रस्ता सुधारणा 08 कोटी, चरेगांव चाफळ दाढोली महाबळवाडी येरफळे त्रिपुडी चोपडी बेलवडे आंब्रुळे कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा 53 कि.मी. 20/500 ते 21/500  (भाग -येरफळे ते त्रिपुडी  ) त्रिपुडी पुलाचे पोहोचमार्ग व त्यावरील बॉक्स सेलचे बांधकाम 04 कोटी, निसरे मारुल गुढे काळगांव रस्ता प्रजिता - 54 कि.मी. 0/00 ते 35/350 (भाग- कि.मी. 8/500 ते 15/00 टेळेवाडी  ते शिद्रुकवाडी फाटा )  ची सुधारणा 04 कोटी, गमेवाडी कडववाडी पाडळोशी मसुगडेवाडी रस्ता रस्ता सुधारणा करणे ता.पाटण, जि.सातारा भाग पाडळोशी ते मसुगडेवाडी 8/000 ते 10/000 ची सुधारणा 02 कोटी, भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 22/500 (भाग कि.मी.17/00 ते 22/500 -(तामीणे ते पाणेरी )ची  रुंदीकरणासह सुधारणा 05 कोटी, काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्ता प्रजिमा 128 किमी 7/00 ते 10/00 भाग मुरुड ते मालोशी रस्ता सुधारणा 01 कोटी, इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 कि.मी.12/00 ते 16/00 जवळ(भाग- निवी ते सलतेवाडी ) सुधारणा 03 कोटी, डिचोली  नवजा  हेळवाक  मोरगिरी  साजूर  तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रामा 148 किमी 2/00 ते 09/00 भाग नवजा डिचोली ते  कामरगावं रस्त्याची सुधारणा 06 कोटी, डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन  रस्ता रा.मा.148 कि.मी.64/450 येथे साजूर,ता.कराड गावाजवळ पुलाचे बांधकामासहीत कि.मी.62/500 ते 65/00 भाग साजूर ते उत्तर तांबवे मध्ये रस्त्याची सुधारणा 04 कोटी, नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजुर तांबवे वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रा.मा. 148 कि.मी. 61/200 येथे  काढोली गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम 05 कोटी, नागठाणे तारळे पाटण रस्ता प्रजिमा 37 वर तारळे,ता.पाटण गावाजवळ तारळी नदीवर मोठा पूल 08 कोटी असा 50 कोटी या कामांना रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तर डोंगरी व दुर्गम भागातील दळण वळणाच्या दष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गावपोहोच रस्ते असलेल्या ग्रामीण मार्गाचे दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये सोनवडे  ते खांडेकरवाडी रस्ता सुधारणा ग्रामा 239 25 लाख,झाकडे रस्ता ग्रामा 187 सुधारणा 35 लाख,खुडुपलेवाडी ते गावडेवाडी  रस्ता ग्रामा 64 सुधारणा 100 लाख,जाधववाडी जोडरस्ता (चाफळ)ग्रामा 127 सुधारणा 25 लाख,नाव ते गोवारे पोहोच रस्ता ग्रामा 193 सुधारणा 70 लाख,शितपवाडी  ग्रामा 293 रस्ता सुधारणा 30 लाख,मत्रेवाडी  ग्रामा 314 रस्ता भाग पवारवाडी ते निवी रस्ता सुधारणा 150 लाख,जंगलवाडी चाफळ जोडरस्ता ग्रामा 126 सुधारणा 40 लाख,डेरवण कोळेकरवाडी रस्ता ग्रामा 130 सुधारणा 40 लाख,शिरळ काजारवाडी जोडरस्ता ग्रामा 172 रस्ता सुधारणा 15 लाख,सोनाईचीवाडी रस्ता ग्रामा 138 रस्ता सुधारणा 30 लाख,प्रजिमा 29 ते कारवट गुणुगलेवाडी रस्ता ग्रामा 91 सुधारणा 70 लाख,बिबी मकाईचीवाडी रस्ता ग्रामा 103 रस्ता सुधारणा 30 लाख,पाटण टोळेवाडी घेरादातेगड विठ्ठलवाडी सावंतवाडी नाणेल रस्ता ग्रामा 114 भाग टोळेवाडी पोहोच रस्ता सुधारणा 60 लाख,खोणोली कोचरेवाडी रस्ता ग्रामा 121 सुधारणा 35 लाख,वाघजाईवाडी नाणेगाव जाळगेवाडी चव्हाणवाडी रस्ता ग्रामा 123 भाग चव्हाणवाडी ते वरची जाळगेवाडी रस्ता सुधारणा 70 लाख,येराड जोडरस्ता रोमनवाडी ढेरुगडेवाडी ग्रामा 175 भाग हुंबरपेढा ते ढेरुगडेवाडी सुधारणा 70 लाख,मान्याचीवाडी ते गुंजाळी रस्ता ग्रामा 184 सुधारणा 20 लाख,कुसरुंड ते शिंदेवाडी पाटीलवस्ती रस्ता ग्रामा 229 सुधारणा 30 लाख,रामा 148 ते हुंबरवाडी  रस्ता ग्रामा 237 सुधारणा 30 लाख,रामा 136 ते सुभाषनगर रस्ता ग्रामा 250  सुधारणा 30 लाख,कोरिवळे टेळेवाडी रस्ता ग्रामा 272 टेळेवाडी गावातील लांबीत सुधारणा 30 लाख,पाडळोशी नारळवाडी  तावरेवाडी ग्रामा 119 सुधारणा 35 लाख,पानवळवाडी मालदन रस्ता ग्रामा 297 सुधारणा 40 लाख,वेताळवाडी खिलारवाडी रस्ता ग्रामा 137 सुधारणा 30 लाख,प्रजिमा 54 ते मोरेवाडी रस्ता ग्रामा 333 भाग मान्याचीवाडी ते चव्हाणवाडी रस्ता सुधारणा 30 लाख,माटेकरवाडी वरेकरवाडी कुंभारगाव रस्ता ग्रामा 342 सुधारणा 50 लाख,मोगरवाडी कोंजवडे रस्ता ग्रामा 372  सुधारणा 20 लाख,सडावाघापूर ता.पाटण बोर्गेवाडी मेंढोशी श्री माऊली मंदिर ते सडावाघापूर रस्ता ग्रामा 80 सुधारणा 40 लाख,भालेकरवाडी धडामवाडी वाल्मिकी ग्रामा 245 सुधारणा 100 लाख,सवारवाडी बेंदवाडी ते कडवे बु ग्रामा 7 भाग माळवस्ती सवारवाडी बेंदवाडी रस्ता सुधारणा 40 लाख,नुने जाधववाडी रस्ता ग्रामा 29 सुधारणा 20 लाख,दुसाळे चव्हाणवाडी रस्ता ग्रामा 44 सुधारणा 25 लाख,वजरोशी करमाळे रस्ता ग्रामा 51 सुधारणा 40 लाख,मणदुरे स्वागतवाडी दिवशी खुर्द रस्ता ग्रामा 61 सुधारणा 15 लाख,प्रजिमा 29 काठी टेक ते आवसरी भाग आवसरी ते काठी रस्ता ग्रामा 55 सुधारणा 50 लाख,प्रजिमा 57 ते म्हारवंड भारसाखळे रस्ता ग्रामा 58 सुधारणा 50 लाख,जाईचीवाडी  मराठवाडी रस्ता ग्रामा 70 सुधारणा 80 लाख,धडामवाडी केरळ ते खिवशी राजवाडा रस्ता ग्रामा 74 सुधारणा 25 लाख,कुसवडे फाटा ते काठीटेक पळासरी रस्ता ग्रामा 54 सुधारणा 40 लाख,गोठणे जोडरस्ता ग्रामा 206 सुधारणा 70 लाख,डिगेवाडी काळेवाडी रस्ता ग्रामा 251 सुधारणा 60 लाख,प्रजिमा 37 ते पाबळवाडी ग्रामा 42 रस्ता सुधारणा 40 लाख,चिंचेवाडी वजरोशी रस्ता ग्रामा 45 सुधारणा 30 लाख,दुसाळे ते सडा दुसाळे रस्ता ग्रामा 43 भाग सडादुसाळे पोहोच रस्ता 40 लाख,दिवशी जुंगठी ग्रामा 72 भाग जुंगठी ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 50 लाख,देवघर तामकणे रस्ता ग्रामा 87 सुधारणा 40 लाख,कोंढावळे हरीजनवस्ती रस्ता ग्रामा 160 सुधारणा 15 लाख,देवघर गोवारे रस्ता ग्रामा 193 सुधारणा 25 लाख,शिंदेवाडी धजगाव धडामवाडी रस्ता ग्रामा 380 सुधारणा 15 लाख,मारगवस्ती मणदुरे रस्ता ग्रामा 386 सुधारणा 15 लाख,चोपडी जोडरस्ता ग्रामा 240 सुधारणा 30 लाख,जिंती जितकरवाडी रस्ता ग्रामा 304 सुधारणा करणे भाग भातडेवाडी ते जितकरवाडी सुधारणा 20 लाख,पांढरेपाणी रस्ता ग्रामा 207 सुधारणा 25 लाख,गमेवाडी ते डेळेवाडी पोहोच रस्ता ग्रामा 148 खडी.,डांबरीकरण 70 लाख,तांबवे डेळेवाडी रस्ता सुधारणा 30 लाख,पश्चिम सुपने जोमलिंग रस्ता ग्रामा 142 सुधारणा 30 लाख,आरेवाडी ते दक्षिण तांबवे रस्ता ग्रामा 145 सुधारणा 50 लाख,वस्ती साकुर्डी जोडरस्ता  सुधारणा 30 लाख,पाडळी केसे रस्ता ग्रामा 147 सुधारणा 20 लाख,तांबवे मोळेवाडी आरेवाडी गमेवाडी पाठरवाडी रस्ता ग्रामा 147 भाग साजूर गमेवाडी ते डेळेवाडी सुधारणा 30 लाख या कामांचा समावेश आहे. राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण  यांनी अर्थसंकल्पामध्ये रस्ते व पुलांच्या कामांसाठी भरघोस असा निधी मंजूर केल्याबद्यल ना.शंभूराज देसाई यांनी  आभार मानले.तर मंजूर कामे तातडीने सुरु करण्यासंदर्भात संबंधित अधिकारी यांची अधिवेशन संपताच ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेऊन या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करुन कामे सुरु करण्यासंदर्भात सूचना करण्यात येणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.

Wednesday 8 March 2023

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा दि.10 मार्च रोजी 113 वा जयंती सोहळा कार्यक्रम. महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुंबई येथे करणार अभिवादन.

 


दौलतनगर दि.08:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 113 वा जयंती सोहळा कार्यक्रम शुक्रवार दि.10 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता  ना.शंभूराज देसाई यांचे शासकीय निवासस्थान "पावनगड" (बी-04), येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ना. शंभूराजजी देसाई व इतर मान्यवर हे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. तसेच दौलतनगर (मरळी), ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आयोजीत करण्यात आलेल्या जयंती सोहळा कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी त्या काळात घेतलेल्या बहुआयामी निर्णयामुळे महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत मोठा हातभार लागला आहे. असे हे पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी शुक्रवार दि.10 मार्च, 2023 रोजी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब जयंती सोहळा कार्यक्रम आयोजित केला असून सध्या मुंबई येथे राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने ना.शंभूराजजी देसाई हे मुंबई येथे आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ना. देसाई यांचे  शासकीय  निवासस्थान "पावनगड" (बी-04), येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ना. शंभूराजजी देसाई व इतर मान्यवर हे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. दरम्यान स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 113 वा जयंती सोहळा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा)  यांच्या  प्रमुख उपस्थितीत  दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र दौलतलोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी शुक्रवार दि.10 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता  आयोजीत करण्यात आला आहे.                 स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब जयंती सोहळ्याचे कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब प्रेमी तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद,हितचिंतक यांनी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांना अभिवादन करण्याकरीता मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी पत्रकात केले आहे.