दौलतनगर दि.16:-पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी
व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे पोहोच रस्ते हे दळण वळणाच्यादृष्टीने नादुरुस्त झाले
असल्याने या नादुरुस्त रस्त्यांच्या कामांना
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्य मंत्री ग्रामसडक योजनेअंतर्ग निधी
मंजूर होण्यासाठी राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा
मतदारसंघातील 03 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा
2 आशियाई विकास बँक अर्थ सहाय्य योजने अंतर्गत एकूण 20 कि.मी. लांबींच्या 03 रस्त्यांच्या
कामांना 18 कोटी 14 लाख 52 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय
शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकां पुढे म्हंटले आहे की, पाटण हा डोंगरी व दुर्गम तालुका असून
सततच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील प्रमुख रस्तयांची अतिवृष्टीमध्ये मोठया प्रमाणात दुरावस्था होत असल्याने
या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती. दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघातील
दुर्गम भागातील गावांना पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे कामासाठी आवश्यक तो निधी
मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. तसेच या
रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा
पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार या अगोदर पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांच्या रस्त्यांच्या
कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) अंतर्गत
एकूण 14.656 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 10 कोटी 49 लाख 43 हजार तर मुख्यमंत्री
ग्रामसडक योजना टप्पा 2 राज्य निधी अंतर्गत
पाटण विधानसभा मतदारसंघातील 03 गावांच्या एकूण 5.800 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या
कामांना 06 कोटी 17 लाख 89 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय
शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2
आशियाई विकास बँक अर्थ सहाय्य योजने अंतर्गत एकूण 20 कि.मी. लांबींच्या 03 रस्त्यांच्या
कामांना 18 कोटी 14 लाख 52 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय
शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2
आशियाई विकास बँक अर्थ सहाय्य योजने अंतर्गत मंजूर रस्त्यांच्या कामांमध्ये टि.आर.15
केर फाटा ते भारसाखळे रस्ता 5.690 कि.मी.करीता 5 कोटी 36 लाख59 हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी
35.68 लाख असा एकूण 5 कोटी 72 लाख 27 हजार, टि.आर.11 गोकूळ फाटा ते हुंबरणे पांढरेपाणी रस्ता 09 कि.मी. 6 कोटी 72 लाख 74 हजार तर देखभाल
दुरुस्तीसाठी 45.31 लाख असा एकूण 7 कोटी 18 लाख 05 हजार व सुपने मंडलातील उत्तर तांबवे ते आरेवाडी गमेवाडी
पाठरवाडी रस्ता 5.500 कि.मी. 4 कोटी 90 लाख35
हजार तर देखभाल दुरुस्तीसाठी 33.85 लाख असा एकूण 5 कोटी 24 लाख 20 हजार या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राज्य
निधीतून मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे ही पावसाळयापूर्वी सुरु होण्याच्या दृष्टीने
लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन मंजूर कामे तातडीने
सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत
देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment