दौलतनगर 29 :
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील दौलतनगर येथील श्री
गणेश मंदिर, बोपोली येथील अंबाखेळती मंदिर, येराड येथील येडोबा मंदिर,विहे येथील जोतिबा
मंदिर,जळव येथील जोतिबा मंदिर ,सडा दाढोली येथील कुबडी तीर्थ परिसर,नाडोली येथील धुळोबा
मंदिर,रासाटी येथील नवलाई मंदिर तसेच साजूर ता.कराड येथील महादेव मंदिर या तिर्थक्षेत्र
पर्यटन स्थळांचा विकास पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी
शिंदे व पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण
विधानसभा मतदार संघातील शिफारस केलेल्या पर्यटन
विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर
झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला असल्याची माहिती
राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत
दिली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत
पुढे म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटन व तिर्थक्षेत्र स्थळांच्या ठिकाणी आवश्यक अशा मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत
संबंधित गावातील ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे
निवेदनाव्दारे विनंती केलेली होती. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रसिध्द असलेल्या या
पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविल्यास या पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या
पर्यटकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याने
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील दौलतनगर येथील श्री
गणेश मंदिर, बोपोली येथील अंबाखेळती मंदिर, येराड येथील येडोबा मंदिर,विहे येथील जोतिबा
मंदिर,जळव येथील जोतिबा मंदिर ,सडा दाढोली येथील कुबडी तीर्थ परिसर,नाडोली येथील धुळोबा
मंदिर,रासाटी येथील नवलाई मंदिर तसेच साजूर ता.कराड येथील महादेव मंदिर या पर्यटन स्थळांचा
विकास होण्यासाठीचा पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी
शिंदे व पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण
विधानसभा मतदार संघातील या पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत
05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने
पारित केला आहे.मंजूर झालेल्या पर्यटन विकासाच्या कामांमध्ये दौलतनगर येथील क वर्ग पर्यटन स्थळ गणेश मंदीर परिसरात वाहनतळ, पर्यटक
कक्ष, मंदिर परिसर सुशोभिकरण 02 कोटी, बोपोली येथील आंबाखेळती मंदीर पोहच रस्ता सुधारणा
करणे व परिसर सुशोभिकरण 50 लक्ष, येराड येथील क वर्ग पर्यटन स्थळ येडोबा मंदीर परिसरात
सुशोभिकरण करणे व कोयना नदीतीरावरील घाटास दगडी पाय-या 75 लक्ष, विहे येथील क र्वग
पर्यटन स्थळ जोतिबा मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख, जळव येथील क वर्ग पर्यटन स्थळ जोतिबा
मंदीर परिसर सुभोभिकरण करणे व रस्ता सुधारणा 30 लाख,सडा दाढोली येथील क र्वग पर्यटन
स्थळ कुवडी तिर्थ परिसर सुशोभिकरण 25 लाख, नाडोली येथील क र्वग पर्यटन स्थळ धुळोबा
मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख, रासाटी येथील
नवलाई मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख, साजूर ता.कराड येथील क र्वग पर्यटन स्थळ
महादेव मंदीर परिसर सुशोभिकरण 30 लाख अशा एकूण 05कोटी रुपयांचा कामांचा समावेश असून
पाटण विधानसभा मतदारसंघातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री
ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल
त्यांचे आभार मानले तर प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विकास
कामांना तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात लवकरच जिल्हास्तरीय अधिकारी यांची बैठक आयोजित
करुन या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करुन ही कामे लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात
संबंधित शासकीय अधिकारी यांना सूचना करण्यात येणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment