Wednesday 28 June 2023

शिवसेना भाजपा महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते दौलतनगर येथे शुक्रवार दि.30 जून 2023 रोजी ई भूमिपूजन कार्यक्रम व वर्षपूर्ती मेळाव्याचे आयोजन.

 

 


दौलतनगर दि.28: महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वालील शिवसेना भाजपा महायुती सरकारला दि.30 जून रोजी एक वर्ष पुर्ण होत असल्याने महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून शिवसेना भाजपा महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून  वर्षपूर्ती मेळावा  व पाटण विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेल्या 128 गावांकरीता उपयोग होणा-या 122 कोटी 59 लक्ष रुपयांच्या 86 विकास कामांचा ई भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते व राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमख उपस्थितीमध्ये शुक्रवार दि. 30 जून 2023 रोजी सकाळी 11.00 वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आयोजित केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.   

प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वालील शिवसेना भाजपा महायुती सरकारला दि.30 जून रोजी एक वर्ष पुर्ण होत असून महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून शिवसेना भाजपा महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून वर्षपूर्ती मेळावा  व पाटण विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेल्या 128 गावांकरीता उपयोग होणा-या 122 कोटी 59 लक्ष रुपयांच्या 86 विकास कामांचा ई भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते शुक्रवार दि. 30 जून 2023 रोजी सकाळी 11.00 वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आयोजित केला आहे.तसेच या ई भूमिपूजन कार्यक्रमामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या पाटण येथील 30 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तेथे 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालयाचे बांधकाम  , सातारा गजवडी चाळकेवाडी रस्ता प्रजिमा-29 कि.मी. 26/500 ते 30/00 (भाग- चाळकेवाडी ते मरड फाटा) ची सुधारणा, नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा- 58 वर कि.मी.  1/120 मध्ये कोयना नदीवर सांगवड गांवाजवळ मोठया पुलाचे बांधकाम, आंबेघर गोकुळ रस्ता ग्रामा 219 कि.मी. 0/200  गोकुळ तर्फ पाटण गावाजवळ मोरणा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम 760 लक्ष, प्रजिमा- 53 ते चोपडी बेलवडे खु. सुळेवाडी सोनवडे हुंबरवाडी नाटोशी धावडे रसता प्रजिमा- 124 कि.मी. 0/00 ते19/00  कि.मी. 3/00 येथे बेलवडे खुर्द गावाजवळ मोरणा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम, नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-58 वर कि.मी. 19/880 मध्ये वांग नदीवर मंद्रुळकोळे येथे मोठया पुलाचे बांधकाम, पाटण तालुकयातील डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी साजूर तांबवे विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता रामा 148 कि.मी. 0/00 ते 9/00 (भाग डिचोली ते कामरगांव)  ची सुधारणा, बनपुरी अंबवडे कोळेकरवाडी अमरकांचन रस्ता प्रजिमा- 125 कि.मी. 3/100 वांग नदीवर  भालेकरवाडी  (बनपुरी) येथे मोठया पुलाचे बांधकाम, भोसगांव अंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पाणेरी रस्ता प्रजिमा -122 कि.मी. 0/00 ते 21/500 भाग कि.मी. 7/00 ते 10/00 मध्ये दोन पुलांचे बांधकाम, बनपुरी अंबवडे कोळेकरवाडी अमरकांचन रस्ता प्रजिमा- 125 कि.मी. 0/00 ते 13/00 भाग कि.मी. 5/00 ते 10/00 नाईकबा ते कोळेकरवाडी ) ची सुघारणा, भोसगांव अंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पाणेरी रस्ता प्रजिमा -122 कि.मी. 0/00 ते 12/500 भाग कि.मी. 10/500 ते 12/500 नवीवाडी ते कारळेचे बांधकाम, पाटण तालुक्यातील  रा. मा. 136 ते सुपने किरपे आणे आंबवडे काढणे ते  प्रजिमा - 55,  प्रजिमा - 66 कि.मी. 0/00 ते 14/800  (भाग कि.मी.  13/00 ते 14/800 पांढरेचीवाडी ते काढणे फाटा )  ची सुधारणा, पांढरेपाणी ते हुंबरणे रस्ता ग्रामा 339 सुधारणा, नाविण्यपूर्ण योजनेतून मंजूर कसबे मरळी येथे कुस्ती संकुल, आंबेघर तर्फ मरळी ता.पाटण अंतर्गत रस्ता सुधारणा, दिक्षी ता.पाटण अंतर्गत रस्ता सुधारणा, पाचगणी  धनगरवस्ती व बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा, मान्याचीवाडी (कुंभारगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा, बागलवस्ती (कुंभारगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा, चोरगेवाडी (काळगाव) रस्ता खडीकरण डांबरीकरण  , धनगरवाडा (काळगाव)  रस्ता खडीकरण डांबरीकरण, गुरेघर अंतर्गत रस्ता सुधारणा, कात्रेवस्ती (चौगुलेवाडी काळगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा, मत्रेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा, चाफेर मुरावस्ती रस्ता सुधारणा, लेंढोरी  ता. पाटण धनगरवसती रस्ता खडीकरण व डांबरीकरण, सुपुगडेवाडी  ता. पाटण अंतर्गता रस्ता सुधारणा, आंब्रग   ता. पाटण  आखाडा ते देशमुख वस्ती रस्ता सुधारणा, मिरगाव चाफेर ता. पाटण अंतर्गत रस्ता सुधारणा, रामा 136 साकुर्डी बेलदरे ते तळबीड राम.मा.4 ते तासवडे शहापूर ते रामा 124 रस्ता प्रजिमा 61 किमी 0/00 ते 5/00 किमी 0/500 ते 2/500 ची दुरुस्ती, त्रिपुडी ते रामा 136 मुळगांव मोरगिरी धावडे गोकुळ गुरेघर पाचगणी रस्ता इजिमा 136 सुधारणा, काठीटेक चाफोली दिवशी खु चिटेघर केर रस्ता इजिमा 113 सुधारणा, मरळी येथे ग्रामपंचायत इमारतीचे वाढीव काम, दौलतनगर ता पाटण येथील गणेश मंदिर परिसर वाहन तळ सुधारणाव व पेव्हर ब्लॉक, कोंजवडे येथे अंतर्गत रस्ता सुधारणा, गोवारे येथे रस्ता सुधारणा, झाकडे येथे अंतर्गत रस्ता सुधारणा, घोटील येथे ग्रामपंचायतीच्या मोकळया जागेत पत्र्याचे सभागृह, कळेवाडी (कडवे खु) येथे ग्रामपंचायत मोकळया जागेत सभामंडप, सळवे 122 येथे अंगणवाडी इमारत, बोपोली 38 येथे अंगणवाडी इमारत, नुने येथे अंगणवाडी इमारत, वाटोळे येथे ग्रामपंचायत कार्यालय, गोरेवाडी (मुरूड) येथे जि प प्राथमिक नवीन शाळा खोली, मुरूड येथे जि प प्राथमिक नवीन  2 शाळा खोली, दुसाळे येथे ग्रामपंचायत कार्यालय, नाव येथे ग्रामपंचायत कार्यालय, येराड ता पाटण येडोबा देवघाट सुधारणा, ठोमसे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत हनुमान मंदिरासमोर सभामंडप, कोळेकरवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सभामंडप, मिरासवाडी (शिरळ) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सामाजिक सभागृह, विठ्ठलवाडी (शिरळ) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत विठ्ठलाईदेवी मंदिरासमोर सभामंडप, कामरगाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सभामंडप, मराठवाडी (दिवशी खुर्द)येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत श्री गणेश मंदिरासमोर सामाजिक सभागृह, मराठवाडी 188 येथे नविन अंगणवाडी इमारत, वजरोशी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत श्री हनुमान मंदिरासमोर ग्रामपंचायतीच्या मोकळया जागेमध्ये सभामंडप, कोकीसरे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सामाजिक सभागृह, कोकिसरे येथे जि प प्राथमिक नवीन शाळा खोली, धनगरवाडा (मरड) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सामाजिक सभागृह, अंगणवाडी इमारत कोदळ, वाघणे, कवडेवाडी, शिंवदेश्वर दाबाचामाळ, हेळवाक बौध्दवस्ती, तावरेवाडी पाडळोशी, तारळे, बनपुरी नाईकबानगर, रुवले पाटीलवाडी, गुढे शिबेवाडी वरची,शाळा खोली इमारती निवडे, शितपवाडी, दास्तान, सातेवाडी (नाटोशी), मणेरी, जाईचीवाडी, बाहे, गावडेवाडी, उरुल, पाचगणी, लेंडोरी, येराडवाडी व जलजिवन मिशन योजनेतून मंजूर देशमुखवाडी, हुंबरळी व पाणेरी या नळ पाणी पुरवठा योजना अशा पाटण विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेल्या 128 गावांतील 122 कोटी 59 लक्ष रुपयांच्या 86 विकास कामांचा ई भूमिपूजन समारंभ संपन्न होणार असून ई भूमिपूजन कार्यक्रमास पाटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Monday 26 June 2023

उरुल लघुपाटबंधारे तलावाचे काम तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री ना.शंभुराज देसाई ऊरुल लघु पाटबंधारे तलावे कामासंदर्भात दौलतनगर ता.पाटण येथे बैठक संपन्न.

 

दौलतनगर दि.26:उरुल लघुपाटबंधारे तलावामध्ये ठोमसे गावचा रस्ता,नळपाणीपुरवठा विहीर,अतिरीक्त गटांचे भुसंपादन झालेल्यांच्या रक्कमा अदा करुन सातबारा मध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवून घेऊन एक वर्षाच्या आत प्रलबिंत कामे पूर्ण करण्याच्या सक्त सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेतलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी दिल्या.

           दौलतनगर ता.पाटण येथे ऊरुल ता.पाटण लघु पाटबंधारे तलावाचे कामासंदर्भात आयोजित बैठकीस तहसिलदार रमेश पाटील,जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत थोरात,शाखा अभियंता निलेश टकले,तालुका कृषी अधिकारी पुंडलिक माळवे,यांच्यासह संचालक शशिकांत निकम,संचालक शिवाजी देसाई,उपसरपंच अरुण पवार,मा.उपसरपंच शंकर माने,मा.सदस्य विजय पाटील,मा.सदस्य बजरंग माने,मा.सरपंच दादासो देसाई,महेश माने,अशोक सुर्वे,यशवंत देसाई,रमेश मोरे,यांच्यासह ऊरुल,ठोमसे व बोडकेवाडी गावांतील पदाधिकारी व खातेदार शेतकरी उपस्थित होते.

            उरुल (ता.पाटण) येथील उरुल लघुपाटबंधारे तलावाची २६ जुन २००७ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. उरुल,ठोमसे,बोडकेवाडीचे २४३ हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असुन तलावाची लांबी ६०७ मीटर, तर उंची २०.६० मीटर,त्यामध्ये एकुण पाणीसाठा ७०.२४ दशलक्ष घनफूट होणार आहे.या प्रकल्पास २००७ नंतर १५ जुलै २०१७ रोजी ऊरुल लघु पाटबंधारे तलावाचे कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.परंतु उरुल,ठोमसे,बोडकेवाडी या तीनही गावातील खातेदारांना भूसंपादनाची रक्कम न दिल्यामुळे काम बंद होते.या गावातील खातेदारांनी त्यांच्या भूसंपादनाची रक्कम लवकर मिळावी याकरीता तालुक्याचे तत्कालीन आमदार शंभूराज देसाई यांचेकडे पाठपुरावा  केला.आमदार शंभूराज देसाईंनी येथील खातेदारांना बरोबर घेवून थेट राज्याचे तत्कालीन जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेसोबत त्यांच्या दालनात पावसाळी अधिवेशनामध्ये दि.०८.०८.२०१७ रोजी बैठक घेतली व या बैठकीत उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गावातील खातेदारांच्या भूसंपादनाचा विषय मांडला.यामध्ये उरुलचे एकूण १७.९५ हेक्टर आर क्षेत्र असून ठोमसे ४.५१ हेक्टर आर व बोडकेवाडी १२.२२ हेक्टर आर क्षेत्र आहे.यासंदर्भात अंतिम निवाडा दि.३०.११.२०१५ रोजी झाला आहे. उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाकरीता अनुक्रमे २ कोटी ९२ लाख १० हजार ६६२ रुपये, ९४ लाख ७५ हजार ६४६ रुपये व ६३ लाख ९८ हजार ९९३ रुपये असे एकूण ४ कोटी ५० लाख ८५ हजार ३०१ रुपये भूसंपादनाची रक्कम होत आहे.ती तत्काळ देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी तत्कालीन जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे केल्यानंतर मंत्री ना.राम शिंदे यांनी यास तत्काळ मान्यता देवून जलसंधारण विभागाच्या मंत्रालयीन अधिकारी यांना लवकरात लवकर उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामातील उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या भूसंपादनाची रक्कम तत्काळ मंजुर करुन वाटप करावी असे आदेश दिले होते.

        त्यानुसार उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या भूसंपादनाची रक्कम ही संपादन मंडळाने दि.१२.०९.२०१८ रोजी भूसंपादन विभाग १६ जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा यांचेकडे वर्ग करुन त्याचे भुसंपादन विभागाकडुन नियोजन करुन वाटप करण्यात आले आणि तदनंतर उर्वरित कामास गती आली.बरेच वर्षे रखडलेली भूसंपादनाची रक्कम मंजुर करुन घेतलेबद्दल उरुल,ठोमसे व बोडकेवाडी येथील संपादित क्षेत्रातील बाधित खातेदारांनी तत्कालीन आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर स्वागत करुन आभार व्यक्त केले होते.

               उरुल लघू पाटबंधारे तलावामध्ये बुडीत क्षेत्रात जाणारा ठोमसे गावाचा रस्त्याचे नियोजनाकरीता तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी अधिकारी व ग्रामस्थांसमवेत स्थळ पाहणी केली होती.त्याच रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.त्याचबरोबर ठोमसे आणि बोडकेवाडी नळपाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी ही बुडीत क्षेत्रात जात असल्यामुळे त्याची स्वतंत्र नियोजन करण्यात यावे अतिरिक्त गटांचे भुसंपादन केलेल्या खातेदारांना तातडीने रक्कम मिळावी आणि उर्वरित शेतकरी यांचे सातबारा मध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्याची आग्रही मागणी पदाधिकारी यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांचेकडे केली होती.त्यानुसार पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी संबधित अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक घेतली यानुसार मुळ संपादन केलेली २७ हेक्टर ०२आर क्षेत्राची ०४ कोटी ४८ लक्ष रक्कम खातेदारांना वाटप करण्यात आली आहे.तदनंतरच्या प्रथम वाढीव(अतिरिक्त)एकुण ३६ गटांचे ३७ हेक्टर २३ आर क्षेत्रापैकी ०५ हेक्टर ४८ आर क्षेत्राचा निधी जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.उर्वरीत द्वितीय(अतिरिक्त)वाढीव गटाचे ०१ हेक्टर २३ आर क्षेत्राचे प्रस्ताव महसूल विभागाकडे दर निश्चितीसाठी सादर करण्यात आले आहेत.खातेदारांना आतापर्यंत १३ लक्ष रूपयांचे भुभाडे वाटप करण्यात आले आहे.अशी माहिती बैठकीत पालकमंत्री शंभुराज देसाई यांना उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

          तसेच ऊरुल लघु पाटबंधारे तलावाचे कामांतर्गत उरुल,ठोमसे बुडीत रस्ता पूर्ण करणे,रोधीचर खुदाई व भराई पुर्ण करणे,सांडवा खुदाई व बांधकाम ३० टक्के अपूर्ण आहे ते पूर्ण करणे,ठोमसे व बोडकेवाडी नळपाणी पुरवठा योजना घळभरणी पूर्ण करणे,सातबाराच्या तांत्रिक अडचणी पुर्ण करणे,प्रकल्पाच्या कालव्याची कामे तातडीने पूर्ण करणे अशी सर्व प्रलबिंत कामे एक वर्षाच्या आत तातडीने पुर्ण करण्याच्या सक्त सुचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Tuesday 20 June 2023

शिवतीर्थाबाबतचे राजकारण थांबवा! शिवभक्त लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने पोवई नाक्यावर होणाऱ्या आयलँडबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांची कीव करावीशी वाटते. - पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी मांडली भूमिका

सातारा : पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावाने प्रस्तावित आयलँड सुशोभीकरणाबाबत निराधार वाद निर्माण करत गैरसमज पसरवले जात असताना पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवभक्त असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने होणाऱ्या आयलँडबाबत शिवतीर्थाची किनार लावून सामान्य जनतेच्या मनात जाणीवपूर्वक काही अपप्रवृत्तीच्या मंडळींकडून गैरसमज निर्माण केले जात आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देसाई परिवाराला अपार श्रद्धा व आदर असून आयलँडबाबत सामान्य जनतेच्या मनात गैरसमज पसरवणाऱ्यांची कीव करावीशी वाटते, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी व्यक्त केली. तसेच सातारा जिल्हा आणि राज्याला नवी दिशा देणाऱ्या शिवभक्त लोकनेत्यांच्या बाबतीत सुरू असलेले राजकारण थांबले पाहिजे, असे प्रतिपादन मा. ना शंभूराज देसाई साहेबांनी केले. 


पोवई नाक्यावर शिवभक्त लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौकाचे नामकरण केले जाणार असल्याच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या काहींनी समाजमाध्यमांतून प्रसारित केल्या होत्या. त्यानंतर प्रस्तावित आयलँडबाबत शिवतीर्थ केंद्रस्थानी ठेवून काही मंडळींनी जाणीवपूर्वक विरोधाचे राजकारण सुरू केले. याबाबत मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास जनतेला माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींतील बारा बलुतेदारांना सोबत घेऊनच स्वराज्य कार्य केले. शिवरायांनी आपल्या मावळ्यांपासून स्वतःला कधीच वेगळे केले नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे आणि तो कायम राहील. त्यामुळे सामान्य व सुज्ञ जनता आयलँडबाबत पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांना भिक घालणार नाही, असा विश्वास असल्याचे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा शहरातील शिवतीर्थ हे सातारकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असून याबाबत आम्हा सर्वांना आदराची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ स्मारकात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौक तयार करण्याचे कोणतेही काम प्रस्तावित नाही. तर पोवई नाका परिसरात शिवतीर्थ स्मारक सोडून इतर ठिकाणी आयलँड तयार करण्यासाठीचा प्रस्ताव असून शिवतीर्थाला लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करण्याचा कोणताही विचार अथवा प्रस्ताव नाही. शिवतीर्थ परिसर वगळता पोवई नाक्याचा इतर परिसर विस्तृत आहे. त्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारकरूपी आयलँड विकसित करण्यात येणार असल्याचे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी स्पष्ट केले आहे.


यासंदर्भात मा. ना. शंभूराज देसाई साहेब पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि कार्याचा लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावर मोठा प्रभाव होता. लोकनेते बाळासाहेब देसाई हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते. त्यांनी ते प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून दिले होते. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शिवभक्त असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांनीच उभा केला आहे. एवढेच नाही, तर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि शिवाजी पार्क येथील शिवरायांचे पुतळे, कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ यांची उभारणीदेखील लोकनेते बाळासाहेब देसाई यांनीच केली आहे. असे असताना त्यांच्याच बाबतीत दिशाभूल करत केले जात असलेले राजकारण थांबले पाहिजे, असे प्रतिपादन मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केले. तसेच आयलँडबाबत राजघराण्याची काही शंका असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल. देसाई परिवाराला आणि लोकनेते बाळासाहेब देसाई प्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नेहमीच श्रद्धा व आदर आहे आणि कायम राहणार आहे, अशी भावना व्यक्त करत जनतेला सोबत घेऊन पोवई नाका येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलँड उभारणारच, अशी निर्धारपूर्वक भूमिका मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी मांडली.


लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून रुपये 150/- प्र.मे.टन प्रमाणे ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.


दौलतनगर दि.19: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 च्या गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेल्या ऊसाच्या एफ.आर.पी.पोटी रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.325.48 लाख संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आजरोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

        पत्रकात पुढे म्हंटले आहे की, आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये 2,16,982.920 मे.टन ऊस गाळप करुन सरासरी 12.07 टक्के साखर उताऱ्याने 2,61,790 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कारखान्याची सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये अंदाजित निव्वळ देय एफ.आर.फी.रु.2800/- प्र.मे.टन होत असून हंगाम 2022-23 मधील एफ.आर.पी.पोटी रु.2500/- प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु. 5424.57 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. तसेच उर्वरित रकमेपोटी रक्कम रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे रु.325.48 लाख आज संबंधित ऊस पुरवठादारांचया बँक खाती आजरोजी वर्ग केली असून संबंधित ऊस पुरवठादारांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित शाखेशी संपर्क साधावा असे सांगत ते पुढे म्हणाले की,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन सन 2023-24 च्या गळीत हंगामाची तयारी सध्या सुरु असून आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याचे कामकाज प्रगतीपथावर आहे.तसेच उर्वरित शिल्लक एफ.आर.पी.पोटी देय रक्कम लवकरच अदा करण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार आहे. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास नोंद सन 2023-24 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे. 

Friday 16 June 2023

‘दौलत’ या लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा चरित्रग्रंथ शिवदौलत सहकारी बँकेच्या सातारा जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 


 दौलतनगर दि.16:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कार्यावर  ‘दौलत’ दौलत श्रीपतराव देसाई या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच  राजभवन मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल रमेशजी बैस यांचे शुभहस्ते आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर,पर्यटन मंत्री ना.मंग्रलप्रभात लोढा,राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांचेसह विविध मान्यवरांचे उपस्थितीमध्ये पार पडला. ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे यांनी लिहिलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवन कार्याची माहिती देणारा ‘दौलत’ हा चरित्रग्रंथ प्रकाशित होऊन सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध करुन देण्याच्या हेतून दौलत हा चरित्र ग्रंथ नाममात्र शुल्काचे दरामध्ये शिवदौलत सहकारी बँक लि.मल्हारपेठ या बँकेच्या तारळे, मल्हारपेठ, पाटण, दौलतनगर, ढेबेवाडी,कराड व सातारा या शाखांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून लोकनेते बाळासाहेब देसाई प्रेमींनी हा चरित्रग्रंथ वाचनासाठी घेण्यासाठी शिवदौलत सहकारी बँकेच्या संबंधित शांखांशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

Thursday 8 June 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा आदर्श पाठ्यपुस्तकांतून पुढील पिढीपर्यंत पोहोचवा! - राज्यपाल मा. रमेशजी बैस लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

           

मुंबई (8 जून 2023) : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात संसदीय आणि लोकशाही मूल्यांची रुजवण केली. शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, पायाभूत विकास आदी क्षेत्रांत लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असून त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श पाठ्यपुस्तकांतून पुढील पिढीपर्यंत पोहोचवला जायला हवा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल मा. रमेशजी बैस यांनी केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन बुधवारी, ७ जून रोजी राजभवन, मुंबई येथे राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

            लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्याचा धांडोळा घेणाऱ्या 'दौलत' या चरित्रग्रंथाचे लेखन-संपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले असून बुधवारी मुंबईतील राजभवन येथे या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यपाल रमेशजी बैस यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाबद्दल महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांचे अभिनंदन केले. तसेच या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा समृद्ध वारसा शब्दबद्ध झाला असून पुढील ५० वर्षे हा ग्रंथ लोकनेत्यांच्या अलौकिक कार्याचा आदर्श जनमानसापर्यंत पोहोचवत राहील, अशी भावना राज्यपाल रमेशजी बैस यांनी यावेळी व्यक्त केली.

            यावेळी राज्यपाल रमेशजी बैस यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, पर्यटन मंत्री मा. मंगलप्रभातजी लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत 'दौलत' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी हा चरित्रग्रंथ प्रत्यक्षात आणण्यामागील भूमिका मांडली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत यावेळी मा. ना. शंभूराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांचा आढावा घेतला. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे धोरण, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया व शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाची स्थापना असे अनेक निर्णय लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी घेतले. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत त्यांनी जनसेवेचा समृद्ध वारसा निर्माण केला. त्यांच्या या जीवनकार्याची माहिती देणारा 'दौलत' हा चरित्रग्रंथ आज प्रकाशित होऊन सर्वांना वाचण्यासाठी उपलब्ध झाला, याचा आनंद आणि समाधान असल्याची भावना यावेळी मा. ना. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

            याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर यांनीदेखील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवनकार्य यापुढेही काम करताना प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन केले. तसेच 'दौलत' या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून त्यांचा प्रेरणादायी वारसा लोकांपुढे आणल्याबद्दल राहुलजी नार्वेकर यांनी मा. ना. शंभूराज देसाई यांचे अभिनंदन केले. यावेळी चरित्रग्रंथाचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आपली भूमिका मांडली. कोयना धरणाची निर्मिती असो वा कोयना भूकंपानंतरचे पुनर्वसन कार्य असो, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी झोकून देऊन काम करताना पाहिल्याचा अनुभव मधुकर भावे यांनी यावेळी कथन केला.

            यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराजदादा देसाई आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराजदादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकाशन सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष मा. नरहरीजी झिरवाळ, ग्रामविकास मंत्री मा. गिरीशजी महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबरावजी पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री मा. दादाजी भुसे, आमदार मा. रणजितसिंह मोहिते-पाटील, मा. विश्वजित कदम, मा. निरंजनजी डावखरे, मा. प्रकाशजी सुर्वे, मा. गीताताई जैन, मा. बालाजी कल्याणकर, मा. लताताई सोनावणे, मा. ज्ञानराज चौगुले, माजी आमदार मा. विजय शिवतारे, मा. शरदभाऊ सोनावणे, मा. संजय डी. वाय. पाटील यांच्यासह देसाई परिवारातील सर्व सदस्य, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.