Monday 26 June 2023

उरुल लघुपाटबंधारे तलावाचे काम तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री ना.शंभुराज देसाई ऊरुल लघु पाटबंधारे तलावे कामासंदर्भात दौलतनगर ता.पाटण येथे बैठक संपन्न.

 

दौलतनगर दि.26:उरुल लघुपाटबंधारे तलावामध्ये ठोमसे गावचा रस्ता,नळपाणीपुरवठा विहीर,अतिरीक्त गटांचे भुसंपादन झालेल्यांच्या रक्कमा अदा करुन सातबारा मध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवून घेऊन एक वर्षाच्या आत प्रलबिंत कामे पूर्ण करण्याच्या सक्त सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेतलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी दिल्या.

           दौलतनगर ता.पाटण येथे ऊरुल ता.पाटण लघु पाटबंधारे तलावाचे कामासंदर्भात आयोजित बैठकीस तहसिलदार रमेश पाटील,जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत थोरात,शाखा अभियंता निलेश टकले,तालुका कृषी अधिकारी पुंडलिक माळवे,यांच्यासह संचालक शशिकांत निकम,संचालक शिवाजी देसाई,उपसरपंच अरुण पवार,मा.उपसरपंच शंकर माने,मा.सदस्य विजय पाटील,मा.सदस्य बजरंग माने,मा.सरपंच दादासो देसाई,महेश माने,अशोक सुर्वे,यशवंत देसाई,रमेश मोरे,यांच्यासह ऊरुल,ठोमसे व बोडकेवाडी गावांतील पदाधिकारी व खातेदार शेतकरी उपस्थित होते.

            उरुल (ता.पाटण) येथील उरुल लघुपाटबंधारे तलावाची २६ जुन २००७ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. उरुल,ठोमसे,बोडकेवाडीचे २४३ हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असुन तलावाची लांबी ६०७ मीटर, तर उंची २०.६० मीटर,त्यामध्ये एकुण पाणीसाठा ७०.२४ दशलक्ष घनफूट होणार आहे.या प्रकल्पास २००७ नंतर १५ जुलै २०१७ रोजी ऊरुल लघु पाटबंधारे तलावाचे कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.परंतु उरुल,ठोमसे,बोडकेवाडी या तीनही गावातील खातेदारांना भूसंपादनाची रक्कम न दिल्यामुळे काम बंद होते.या गावातील खातेदारांनी त्यांच्या भूसंपादनाची रक्कम लवकर मिळावी याकरीता तालुक्याचे तत्कालीन आमदार शंभूराज देसाई यांचेकडे पाठपुरावा  केला.आमदार शंभूराज देसाईंनी येथील खातेदारांना बरोबर घेवून थेट राज्याचे तत्कालीन जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेसोबत त्यांच्या दालनात पावसाळी अधिवेशनामध्ये दि.०८.०८.२०१७ रोजी बैठक घेतली व या बैठकीत उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गावातील खातेदारांच्या भूसंपादनाचा विषय मांडला.यामध्ये उरुलचे एकूण १७.९५ हेक्टर आर क्षेत्र असून ठोमसे ४.५१ हेक्टर आर व बोडकेवाडी १२.२२ हेक्टर आर क्षेत्र आहे.यासंदर्भात अंतिम निवाडा दि.३०.११.२०१५ रोजी झाला आहे. उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाकरीता अनुक्रमे २ कोटी ९२ लाख १० हजार ६६२ रुपये, ९४ लाख ७५ हजार ६४६ रुपये व ६३ लाख ९८ हजार ९९३ रुपये असे एकूण ४ कोटी ५० लाख ८५ हजार ३०१ रुपये भूसंपादनाची रक्कम होत आहे.ती तत्काळ देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी तत्कालीन जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे केल्यानंतर मंत्री ना.राम शिंदे यांनी यास तत्काळ मान्यता देवून जलसंधारण विभागाच्या मंत्रालयीन अधिकारी यांना लवकरात लवकर उरुल लघू पाटबंधारे तलावाच्या कामातील उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या भूसंपादनाची रक्कम तत्काळ मंजुर करुन वाटप करावी असे आदेश दिले होते.

        त्यानुसार उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन गांवाच्या भूसंपादनाची रक्कम ही संपादन मंडळाने दि.१२.०९.२०१८ रोजी भूसंपादन विभाग १६ जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा यांचेकडे वर्ग करुन त्याचे भुसंपादन विभागाकडुन नियोजन करुन वाटप करण्यात आले आणि तदनंतर उर्वरित कामास गती आली.बरेच वर्षे रखडलेली भूसंपादनाची रक्कम मंजुर करुन घेतलेबद्दल उरुल,ठोमसे व बोडकेवाडी येथील संपादित क्षेत्रातील बाधित खातेदारांनी तत्कालीन आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर स्वागत करुन आभार व्यक्त केले होते.

               उरुल लघू पाटबंधारे तलावामध्ये बुडीत क्षेत्रात जाणारा ठोमसे गावाचा रस्त्याचे नियोजनाकरीता तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी अधिकारी व ग्रामस्थांसमवेत स्थळ पाहणी केली होती.त्याच रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.त्याचबरोबर ठोमसे आणि बोडकेवाडी नळपाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी ही बुडीत क्षेत्रात जात असल्यामुळे त्याची स्वतंत्र नियोजन करण्यात यावे अतिरिक्त गटांचे भुसंपादन केलेल्या खातेदारांना तातडीने रक्कम मिळावी आणि उर्वरित शेतकरी यांचे सातबारा मध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्याची आग्रही मागणी पदाधिकारी यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांचेकडे केली होती.त्यानुसार पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी संबधित अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक घेतली यानुसार मुळ संपादन केलेली २७ हेक्टर ०२आर क्षेत्राची ०४ कोटी ४८ लक्ष रक्कम खातेदारांना वाटप करण्यात आली आहे.तदनंतरच्या प्रथम वाढीव(अतिरिक्त)एकुण ३६ गटांचे ३७ हेक्टर २३ आर क्षेत्रापैकी ०५ हेक्टर ४८ आर क्षेत्राचा निधी जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.उर्वरीत द्वितीय(अतिरिक्त)वाढीव गटाचे ०१ हेक्टर २३ आर क्षेत्राचे प्रस्ताव महसूल विभागाकडे दर निश्चितीसाठी सादर करण्यात आले आहेत.खातेदारांना आतापर्यंत १३ लक्ष रूपयांचे भुभाडे वाटप करण्यात आले आहे.अशी माहिती बैठकीत पालकमंत्री शंभुराज देसाई यांना उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

          तसेच ऊरुल लघु पाटबंधारे तलावाचे कामांतर्गत उरुल,ठोमसे बुडीत रस्ता पूर्ण करणे,रोधीचर खुदाई व भराई पुर्ण करणे,सांडवा खुदाई व बांधकाम ३० टक्के अपूर्ण आहे ते पूर्ण करणे,ठोमसे व बोडकेवाडी नळपाणी पुरवठा योजना घळभरणी पूर्ण करणे,सातबाराच्या तांत्रिक अडचणी पुर्ण करणे,प्रकल्पाच्या कालव्याची कामे तातडीने पूर्ण करणे अशी सर्व प्रलबिंत कामे एक वर्षाच्या आत तातडीने पुर्ण करण्याच्या सक्त सुचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment