दौलतनगर,ता.22: महाराष्ट्र राज्यात १२५० मेट्रिक टन गाळप क्षमता असणारे अनेक
कारखाने आहेत. मात्र या सर्व कारखान्यात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखान्याने 1250 मेट्रिक टन कार्यक्षमता असताना सुद्धा जिल्ह्यातील इतर
कारखान्याच्या बरोबर दर दिला आहे .त्यामुळे 1250 मेट्रीक टन गाळप क्षमता असणाऱ्या
कारखान्यात तुलनेत दर देणारा देसाई कारखाना हा राज्यातील अग्रेसर कारखाना असल्याचे
प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे
पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी केले.दरम्यान राज्य सरकार राज्यातील सहकारी
साखर कारखानदारीच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
साखर कारखान्याने 1250 मे.टन गाळप क्षमता असतानाही जिल्हयातील इतर कारखान्यांचे
बरोबरीत दर दिल्याने देसाई कारखान्याच्या कारभाराचे कौतुक केले.
दौलत नगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब
देसाई कारखान्याच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण
सभेत ते बोलत होते. यावेळी लोकनेते बाळसाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई,मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई, चि.आदित्यराज देसाई, चि.जयराज देसाई,डॉ.दिलीपराव चव्हाण,अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे,शशिकांत
कदम,सोमनाथ खामकर,प्रशांत पाटील,बळीराम
साळुंखे,शंकरराव पाटील,विजय सरगडे,सुनील पानस्कर,सर्जेराव जाधव,संचालिका श्रीमती
जयश्री कवर,सौ.दिपाली पाटील,बबनराव शिंदे,विजयराव जंबुरे,अभिजित पाटील,ॲङमिलिंद
पाटील,ॲङ बाबूराव नांगरे,चंद्रकांत पाटील, प्रकाशराव जाधव,आर.बी.पवार
यांचेसह संचालक
मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री ना. शंभूराज देसाई म्हणाले
की "महाराष्ट्र राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने आहेत मात्र 1250 मेट्रिक
टनाची गाळप क्षमता असणाऱ्या देसाई कारखान्याने अतिशय चांगली कामगिरी करून
जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीत शेतकऱ्यांच्या उसाला दर दिला आहे. ही
अभिमानाची बाब असून अशा कारखान्याच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे निश्चित उभे
राहील,असे स्पष्ट करून मंत्री देसाई म्हणाले राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारने
केंद्रातील मोदी सरकारला विनंती करून राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा इन्कम
टॅक्स बाबतचा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमितजी शहा यांच्या
मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली
तातडीने निर्णय घेऊन राज्यातील इन्कम टॅक्स प्रश्न तडीस नेला.त्यामुळे राज्यातील
कारखान्यांचे साडेसात हजार कोटी माफ झाले तर त्यामध्ये देसाई कारखान्याचे 55 कोटी
रुपयांचा समावेश असून या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व साखर कारखान्यांना
झाला. त्यामुळे केंद्र
सरकारने प्रसंगी कायद्यात बदल करून घेतलेला निर्णय हा राज्यातील शेतकऱ्यांच्या
हिताचा ठरला आहे. दरम्यान देसाई कारखान्याची अध्यक्ष यशराज देसाई यांनी केलेल्या
मागणीचा विचार करून राज्य सरकार राज्यातील सहकारी साखर कारखाने दिवाळीनंतर सुरू
करण्याच्या विचार करण्यासाठी कारखान्याची
बाजू मंत्री
मंडळासमोर मांडण्यासाठी प्रयत्न करणार
असल्याचे सांगितले.
कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई
म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षापासून देसाई कारखाना हा 1250 मेट्रिक टन
क्षमतेमध्ये गाळप करीत
आहे.मात्र यावर्षीपासून सर्व शेतकरी सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या
जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 1250 मेट्रिक
टनाचा हा कारखानातीन हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा करण्यात आला आहे. तसेच तसेच
देसाई कारखाना क्षेत्रातील सभासदांची एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम लवकरच
शेतकरी सभासदांच्या थेट खात्यावर जमा केली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी
दिले.राज्यात सध्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे त्यामुळे त्याचा परिणाम
उसाच्या क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी गळीत हंगाम अडचणीचा
ठरण्याची शक्यता आहे . सातारा जिल्ह्यात एकूण 15 सहकारी आणि खाजगी साखर कारखाने
आहेत त्यामध्ये 1250 मे.टन क्षमतेचा लोकनेते बाळासाहेब देसाई हा एकमेव कारखाना आहे
मात्र शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या दरात लोकनेते देसाई कारखान्याने जिल्ह्यातील इतर
कारखान्याच्या बरोबरीत दर दिला आहे ही अभिमानाची बाब आहे, असे सांगत यशराज पुढे
म्हणाले कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी कामगारांची टंचाई निर्माण होत असते
या टंचाईवर मात करण्यासाठी आगामी गळीत हंगामात हार्वेस्टरच्या मार्फत ऊस तोडणी
साठी प्रयत्न केला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी वेळेत होईल,असे सांगून
खांडसरी सारख्या कारखान्यावर राज्य शासनाचे बंधने लागू होताना दिसत नाहीत त्यामुळे
यापुढे राज्य शासनाने खांडसरी साखर कारखान्यावर साखर कायद्याप्रमाणे नियम लागू
करावीत अशी मागणी केली तसेच 17 कोटींची मदत राज्य शासनाने देसाई कारखान्याला
तातडीने जाहीर केली त्याबद्दलही राज्य शासनाचे आभार मानले.अशोकराव पाटील
यांनी प्रास्ताविक स्वागत केले.नोटीस वाचन कार्यकारी संचालक सुहास देसाई यांनी
केले.अहवाल वाचन वैभव जाधव यांनी केले. एकूण १5 विषयावर
चर्चा करुन सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या
वातावरणात पार पडली. तर बबनराव शिंदे यांनी आभार मानले.
चौकट: केंद्र आणि राज्य शासनाच्या अभिनंदनाचा
ठराव.
राज्यातील
साखर कारखान्यांच्या एफ.आर.पी./एस.एम.पी.बाबतच्या गेल्या अनेक वर्षापासूनचा
प्रलंबित असणारा आयकराचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह आणि सहकार
मंत्री ना.अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत तातडीने
सोडविला. त्यामुळे राज्याचा 7500 हजार कोटी तर
देसाई कारखान्याचा 55 कोटी आयकर माफ झाला. त्याचबरोबर राज्याचे
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, वित्त मंत्री
ना.अजितदादा पवार आणि राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केंद्र
सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय झाल्याने केंद्र व राज्य
सरकारचा अभिनंदनाचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.