Tuesday 5 September 2023

जिल्हा वार्षिक आराखडयात जनसुविधा योजनेमधून ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमींकरीता 02 कोटी 63 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून 16 नविन ग्रामपंचायत कार्यालयांची होणार उभारणी. तर 18 गावांत स्मशानभूमींची कामे लागणार मार्गी.

 


दौलतनगर दि.04:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम गावात सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायत इमारती हया नादुरुस्त झाल्याने या इमारतींमध्ये दैनंदिन कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत  असल्याने तसेच काही गावात स्मशानभूमी शेड नसल्याने या गावातील ग्रामस्थांना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे नविन ग्रामपंचायत कार्यालय इमारती व स्मशानभूमींची कामे मंजूर होण्यासाठी विनंती केली होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत या गावातील ग्रामपंचायत कार्यालय इमारती व स्मशानभूमींची कामे मंजूर होण्यासाठी शिफारशी केल्यानुसार सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 16 गावातील नविन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी  01 कोटी 92 लक्ष तर 18 गावातील स्मशानभूमींचे कामांसाठी 71 लक्ष असा 02 कोटी 63 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील अनेग गावच्या ग्रामपंचायत कार्यालय इमारती नादुरुस्त आहेत.तसेच काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती नसल्याने दैनंदिन कामकाज करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.दरम्यान अतिवृष्टीमुळे या इमारतींचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने या ग्रामपंचायत इमारती धोकादायक परिस्थितीत आहेत.तर पाटण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने या गावांमध्ये अंत्यविधी करताना स्थानिक ग्रामस्थांना विशेषत: पावसाळयात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील या गावांतील ग्रामस्थांनी नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारती व स्मशानभूमींची कामे नव्याने मंजूर करण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे विनंती केलेली होती.त्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई  यांनी संबंधित गावाच्या ग्रामपंचायत कार्यालय इमारती व स्मशानभूमींची नवीन कामे सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर होण्यासाठी शिफारस केली होती.त्यानुसार सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 16 गावातील नविन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी  01 कोटी 92 लक्ष तर 18 गावातील स्मशानभूमींचे कामांसाठी 71 लक्ष असा 02 कोटी 63 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतींचे कामासाठी प्रत्येकी 12 लाख निधी मंजूर झाला असून मंजूर झालेल्या नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे कामांमध्ये पाणेरी, काठी, घाणबी, हावळेवाडी, मस्करवाडी,जाधववाडी (चाफळ), गलमेवाडी, शेडगेवाडी(विहे)आंबळे,लेंढोरी,आंबवडे खुर्द,मालोशी,शिद्रुकवाडी (खळे),मालदन,आबईचीवाडी व पाडळी (केसे) या कामांचा समावेश आहे.तर स्मशानभूमींचे कामांमध्ये आटोली स्मशानभूमी रस्ता सुधारणा 04 लाख, आडदेव बुद्रुक येथे स्मशानभूमी शेड 03 लाख, गिरेवाडी ता.पाटण येथे स्मशानभूमी शेड 04 लाख, कातकरीवस्ती तारळे येथे स्मशानभूमी 04 लाख, दुसाळे स्मशानभूमी 04 लाख, उधवणे ता.पाटण स्मशानभूमी सुशोभिकरण 04 लाख, कडवे बुद्रुक स्मशानभूमी शेड 04 लाख, काहिर स्मशानभूमी सुधारणा 04 लाख, खळे येथे मातंगवस्ती येथे स्मशानभूमी 04 लाख, गाढखोप स्मशानभूमी 04 लाख, घाणबी येथे स्मशानभूमी 04 लाख, गोजेगाव पुनर्वसन बोंद्री येथील स्मशानभूमी 04 लाख, चव्हाणवाडी धामणी येथे स्मशानभूमी सुधारणा 04 लाख, चिंचेवाडी वजरोशी येथे स्मशानभूमी 04 लाख, चेवलेवाडी येथे स्मशानभूमी 04 लाख, जगदाळवाडी कडवे बु येथे स्मशानभूमी रस्ता 04 लाख, जाधववाडी चाफळ येथे स्मशानभूमी 04 लाख, जौरातवाडी भारसाखळे येथे स्मशानभूमी 04 लाख या कामांचा समावेश आहे.नव्याने मंजूर झालेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारतींमुळे ग्रामपंचायतीमधील दैनंदिन कामकाज चांगले होण्यास मदत होणार आहे.तर स्मशानभूमींची कामे मंजूर झाल्याने या गावांतील ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याने जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गावातील ग्रामस्थांनी पालकतंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आले आहे.

चौकट:-क वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजना व मोठया ग्रामपंचातींना नागरी सुविधा पुरविणे अंतर्गत 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2023-24 चे जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील क वर्गतिर्थ क्षेत्र असलेल्या दौलतनगर(मरळी) व येराड येथील प्रसिध्द तिर्थक्षेत्राचे ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व विद्युतीकरण करण्याच्या कामांसाठी 30 लक्ष रुपयांचा निधी तर मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविणे अंतर्गत तारळे अंतर्गत रस्ता सुधारणा करण्यासाठी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.



No comments:

Post a Comment