दौलतनगर
दि.02:- पाटण
विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे पोहोच असलेले
ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग हे अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाल्याने या
रस्त्यांचे दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता होती.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी
पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांचे पुनर्बांधणीसाठी
जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत निधी मंजूर होण्यासाठी निधीची आवश्यकता असलेल्या
ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग या रस्त्यांच्या कामांचा समावेश सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे जिल्हा वार्षिक आराखडयात समावेश समावेश
करत या रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी शिफारशी केल्या
होत्या.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केल्याप्रमाणे पाटण विधानसभा
मतदारसंघांतील 12 ग्रामीण रस्त्यांचे कामांसाठी 03 कोटी 35 लक्ष तर इतर जिल्हा मार्गासाठी 02 कोटी असा 05 कोटी 35 लक्ष
रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत
देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत
पुढे म्हंटले आहे की,पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा
मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील दळण वळणाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल्या
ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यांचे पुनर्बांधणीसाठी निधीची गरज लक्षात घेऊन
पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग या रस्त्यांची कामे
ही सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयात समावेश करत या कामांचे दुरुस्तीसाठी
आवश्यक असलेला निधी मंजूर होण्यासाठी संबंधित विभागाला सूचित केले होते.पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी सुचित केलेप्रमाणे पाटण विधानसभा मतदारसंघातील नादुरुस्त
झालेल्या व निधीची आवश्यकता असलेल्या ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग या
रस्त्यांच्या कामांचा समावेश जिल्हा वार्षिक आराखडयात करत प्राधान्याने पाटण
विधानसभा मतदारसंघातील 12 ग्रामीण रस्त्यांचे कामांसाठी 03 कोटी 35 लक्ष तर इतर
जिल्हा मार्गासाठी 02 कोटी असा 05 कोटी 35 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती अंतर्गत मालोशी पाडेकरवाडी रस्ता ग्रामा
3 रस्ता सुधारणा 30 लक्ष,
डेरवण हरीजनवस्ती भैरेवाडी रस्ता ग्रामा 129 सुधारणा 30 लक्ष, केळोली बाटेवाडी
पाठवडे ग्रामा 115 रस्ता सुधारणा 30 लक्ष, दुसाळे चव्हाणवाडी रस्ता ग्रामा
44 सुधारणा 30 लक्ष, जाधववाडी जोडरस्ता (चाफळ)ग्रामा 127 सुधारणा 30 लक्ष, सोनाईचीवाडी रस्ता ग्रामा
138 रस्ता सुधारणा 30 लक्ष,
शिरळ काजारवाडी जोडरस्ता ग्रामा 172 रस्ता सुधारणा 30 लक्ष, मत्रेवाडी
ग्रामा 314 रस्ता सुधारणा 30 लक्ष, शितपवाडी ग्रामा 293 रस्ता सुधारणा 30 लक्ष, जंगलवाडी
चाफळ जोडरस्ता ग्रामा 126 सुधारणा 20 लक्ष, मोगरवाडी कोंजवडे रस्ता ग्रामा
27 सुधारणा 15 लक्ष व तांबवे भोळेवाडी आरेवाडी गमेवाडी पाठरवाडी रस्ता ग्रामा 147 खडीकरण
डांबरीकरण करणे भाग सटावाई ते बोरिंग गमेवाडी 30 लक्ष या 12 ग्रामीण मार्गांचे दुरुस्तीसाठी
03 कोटी 35 लक्ष तर 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती अंतर्गत काठीटेक चाफोली दिवशी खुर्द
चिटेघर केर रस्ता इजिमा 133 सुधारणा 02 कोटी या प्रमाणे पाटण विधानसभा मतदारसंघातील
ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती अंतर्गत 13 कामांना 05 कोटी 35 लक्ष रुपयांचा
निधी मंजूर झाला आहे.पालमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मंजूर झालेल्या रस्त्यांच्या
कामांचा निविदा प्रक्रिया तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना केल्या असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पावसाळा
संपताच या कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सूचनाही ना.शंभूराज देसाई यांनी अधिका-यांना
केल्या असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment