दौलतनगर दि.12: पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे व पूलांचे पुनर्बांधणीचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, ना.अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती.सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या
असलेलया राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे मोठे प्रमाणांत नुकसान
झाले होते.त्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास
करताना अनेक अडचणी येत होत्या. या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांचे
तसेच बाचोली व खळे येथील पुलांचे कामासाठी निधी मंजूर होणेकरीता राज्य उत्पादन शुल्कमंत्री
तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री
ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, ना.अजितदादा पवार व सार्वजनिक
बांधकाम मंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचेकडे शिफारस केली होती. त्यानुसार नाडे सांगवड
मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-58 कि.मी. 14/00 ते 17/00 ची सुधारणा करणे (भाग-
दिवशी घाट) 02 कोटी, बनपुरी अंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन रस्ता प्रजिमा 125 कि.मी. 0/00 ते 13/00 (भाग कि.मी.7/00
ते 10/00 - जौंजाळवाडी ते अंबवडेफाटा) ची रुंदीकरणासह
सुधारणा 02 कोटी, चरेगांव चाफळ
दाढोली महाबळवाडी येरफळे त्रिपुडी चोपडी बेलवडे आंब्रुळे कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा
53 कि.मी. 40/00 ते 42/00 ची सुधारणा 03 कोटी,
मानेगांव ते कुंभारगाव गलमेवाडी रस्ता प्रजिमा 56 कि.मी. 3/00 ते 6/700 (कुंभारगांव ते गलमेवाडी) ची सुधारणा 02 कोटी, भोसगांव आंब्रुळकरवाडी नवीवाडी
रुवले कारळे पानेरी रस्ता प्रजिमा 122 कि.मी.0/00 ते 22/500 (भाग कि.मी.12/00 ते
17/00-(कारळे ते तामिणे ) ची रुंदीकरणासह सुधारणा
02 कोटी, बनपूरी आंबवडे कोळेकरवाडी उमरकांचन रस्ता प्रजिमा 131 कि.मी.6/500 ते
11/500 ची सुधारणा 02 कोटी, चरेगाव चाफळ रस्ता प्रजिमा 53 कि.मी.12/00 ते 15/300 मध्ये घाट लांबीतील
सुधारणा 02 कोटी, चरेगाव चाफळ रस्ता प्रजिमा 53 कि.मी.5/600 ते 12/00 भाग चाफळ ते दाढोली
रस्त्याची सुधारणा 2.50 कोटी, कोंजवडे भुडकेवाडी वरची केळेवाडी प्रजिमा 129 कि.मी.5/00
ते 10/00 मध्ये सुधारणा 02 कोटी, काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी प्रजिमा 134 कि.मी.04/00
ते 7/00 मध्ये रुंदीरकरणासह सुधारणा 2.50 कोटी, मल्हारपेठ मंद्रुळहवेली पानस्करवाडी
जमदाडवाडी नवसरवाडी प्रजिमा 133 कि.मी.0/00 ते 2/00 भाग मल्हारपेठ ते जमदाडवाडी रस्त्याची
सुधारणा 2 कोटी, रामा 04 ते वराडे भोळेवाडी ते रामा 136 ते साकुर्डी तांबवे सुपने जुनी
पाडळी गावठाण ते वारुंजी ते रामा 136 रस्ता प्रजिमा 79 व किमी 16/500 ते 19/00 भाग
सुपने पूल ते जुनी पाडळी ची सुधारणा 2 कोटी, मल्हारपेठ पंढरपूर रस्ता रामा 143 कि.मी.02/600 ते 6/00, 9/00 ते 1/800
भाग ऊरुल फाटा ते भोळेवाडी फाटा व कळंत्रेवाडी फाटा ते उंब्रज ची सुधारणा 02 कोटी, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता रामा
398 कि.मी.4/00 ते 5/00 व 18/00 ते 24/00 भाग बिबी ते देवघर फाटा व जळवखिंड ते मरळोशी
ची सुधारणा 02 कोटी, प्रजिमा-55 ते बाचोली
पोहोच रस्ता ग्रामा. 289 वर बाचोली येथे वांग नदीवर मोठा पुल
05 कोटी,खळे पोहोच रस्ता ग्रा.मा. 323 वर कि.मी. 0/800 येथे खळे गावाजवळ वांग नदीवर
मोठा पुल 05 कोटी या कामांना सध्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी
अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील
राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी 40 कोटी
रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment