Monday, 29 January 2024

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत यशराज देसाई यांचा शाही विवाह सोहळा संपन्न शाही विवाह सोहळा जिल्ह्यासाठी ठरला अविस्मरणीय..!

 


दौलतनगर दि
.15: सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई  यांचा ऐतिहासिक शाही विवाह सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना.अजित पवार तसेच केंद्रीय मंत्री ना नारायण राणे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राज्य मंत्री मंडळातील मंत्री,खासदार आमदार यांच्यासह राज्यातील, जिल्ह्यातील तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील लाखो जनसमुदायांच्या उपस्थित संपन्न झाला.दरम्यान हा शाही विवाह सोहळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरला.पाटण मतदारसंघात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पणतू,श्रीमती विजयादेवी व स्व. शिवाजीराव देसाई यांचे नातू व सौ. स्मिता देवी आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. शंभूराज शिवाजीराव देसाई यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चि. यशराज  यांचा शुभविवाह,श्रीमंत सरकार शिवाजीराव निंबाळकर यांची नात व श्री इंद्रजीत सरकार निंबाळकर यांची ज्येष्ठ कन्या चिरंजीवी सौ. का. डॉ. वैष्णवीराजे यांचे बरोबर रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी मध्ये पाटण तालुक्यातील  मरळी, दौलत नगर, ता. पाटण येथे गोरज मुहूर्तावर संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

              या विवाहाच्या निमित्ताने मरळीच्या देसाई घराण्यात प्रदीर्घ कालावतीनंतर पहिलाच सनई चौघडा वाजला.या ऐतिहासिक विवाहाला उपस्थित राहून वधू वराना शुभाशीर्वाद देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार,ना. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस,केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील,ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन,क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे,रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे,उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील,जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड,सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार संजयकाका पाटील,खासदार धैर्यशिल माने, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजित कदम,आमदार दिपक चव्हाण,आमदार मकरंद पाटील,आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले,माजी आमदार मदन भोसले,आमदार अरुण लाड,आमदार विक्रम काळे,आमदार समाधान अवताडे,आमदार गिता जैन,माजी मंत्री आमदार जयवंतराव पाटील,माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील,आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप,आमदार संजय केळकर,आमदार श्रीनिवास वनगा,आमदार शांताराम मोरे,आमदार दिलीप मोहिते,आमदार किसन कचोरे,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,आमार भिमराव तापकीर,आमदार सुधिरभाऊ गाडगीळ,आमदार जयंत आजगावकर,आमदार संजयमामा शिंदे,आमदार निरंजन डावखरे,माजी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले,माजी आमदार दिपक साळूंखे, माजी आमदार बबनदादा भोसले,माजी मंत्री अर्जुन खेातकर,माजी मंत्री शिवाजीराव नाईक,आमदार राजू पाटील,आमदार जयकुमार गोरे,आमदार आशुतोष काळे,आमदार मेघनाताई बोर्डीकर,आमदार संजय गायकवाड,माजी मंत्री आमदार सतेज पाटील,आमदार बच्चु कडू,आमदार भरतशेठ गोगावले,आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले,आमदार संजीव नाईक,आमदार बालाजी कल्याणकर,आमदार अशोक बापू पवार,आमदार मानसिंगराव नाईक,आमदार काशीनाथ मेंगाळ,माजी आमदार प्रभाकर घार्गे,श्रीमती सुनेत्राताई पवार,माजी मंत्री विजय बापू शिवतारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी आमदार ए.पी.पाटील,विश्वास नांगरे पाटील.जिल्हाधिकरी जितेंद्र डुडी,पोलीस अधिक्षक समिर शेख,ज्ञानेश्वर खिलारी,समिर वानखेडे,माजी आमदार आनंदराव पाटील,माजी आमदार सदाशिवराव सपकाळ,माजी आमदार चंद्रदिप नरके,भारती विद्यापिठ कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,डी.वाय.पाटील विद्यापिठ कुलपती संजय डी.पाटील,रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील,समरजित घाडगे,रणजितसिंह देशमुख,चेअरमन नितीन पाटील,सारंगबाबा पाटील,डॉ.अतुलबाबा भोसले,विनायक भोसले,भाजपा जिल्हाध्यक्ष धैयशिल कदम,मनोज घोरपडे,शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे,इंद्रजित मोहिते,मनोहर शिंदे,अनिल देसाई,नितीन भरगुडे पाटील,अमित कदम,सुरेंद्र गुदगे,भरत जाधव,सुनिल माने,मच्छिंद्र सकटे,चंद्रकांत जाधव,ऐश्वर्याताई पाटील,अनुराधा प्रभाकर देशमुख,शारदाताई जाधव,प्राणा फौंडेशनच्या अध्यक्षा प्राचीताई पाटील,हिंदूराव पाटील,मानसिंगराव जगदाळे,संजय मांडवे,साहेबराव पवार,दिपक पवार,संजय देसाई,अशोकराव गायकवाड,आय.जी.जालिंदर सुपेकर,सुनिल फुलारी,अशेाक मोराळे,अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैंसकर,समिर वानखेडे,क्रांती रेडेकर,आंचल दलाल,सुनिल चव्हाण उपायुक्त,बाजीराव चव्हाण युवा उद्योजक,विक्रमबाबा पाटणकर,लक्ष्मण देसाई,बाळासाहेब राजे महाडीक,सुभाष पवार,दिलीप मोटे,प्रताप जानुगडे,आनंदराव जाधव,वसंतराव जगदाळे,प्रदिप माने,राजेश पाटील,दिलीप मोहिते,फारुक पटवेकर,सुजित आंबेकर,प्रमोद सकटे,सतिश चव्हाण,हरीषपाटणे,राजू भोसले,विनोद सातव यांनी प्रत्यक्ष भेटून वधू-वरांना शुभाशिर्वाद दिले.दरम्यान या शाही विवाह सोहळयाकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री तसेच विविध राजकीय पक्षांचे खासदार,आमदार,माजी खासदार,माजी आमदार हे मोठया संख्येने उपस्थित होते.रविवारी दिवसभर या मान्यवरांची विवाहस्थळी मांदियाळी होती.

चौकट: मंत्री शंभूराज देसाई यांचे नेटके आणि उत्कृष्ट नियोजन.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचा शाही विवाह सोहळा म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच्या दृष्टीने हे नेटक्या आणि उत्कृष्ट नियोजनाचे एक आदर्श उदाहरण ठरले कारण मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी मतदारसंघातील आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन बारकाईने सर्व गोष्टींचे नियोजन केले होते.सुमारे एक ते दीड लाख जनसमुदायांचे कसलीही तक्रार न येता झालेले स्नेहभोजन त्यांचे स्वागत,,बैठकव्यवस्था, व्हीआयपी व्यवस्था ,शिवाय पार्किंग या सर्व बाबी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अत्यंत नेटके नियोजन झाल्याची चर्चा उपसिथत मान्यवरांसह संपूर्ण जिल्ह्यात सुरू होती.

चौकट :सुमारे ५० एकर जागेत भव्य सोहळा.

     यशराज यांचा विवाह  म्हणजे देसाई कुटुंबातील दीर्घ कालावधीनंतर होणारे पहिलेच मंगल कार्य आहे त्यामुळे या सोहळ्यासाठी देसाई कुटुंबाने गेल्या पंधरा दिवसांपासून जय्यत तयारी सुरू केली असून पूर्णपणे ओपन पद्धतीने संपन्न होणाऱ्या या सोहळ्यासाठी दौलतनगर परिसरात सुमारे पन्नास एकर जागेत भव्य शाही मंडप उभारून चारी बाजुंना पार्किंग व्यवस्था, आकर्षक आणि सुसज्ज प्रशस्त बैठक व्यवस्था,पिण्याचे पाणी,टॉयलेट,तसेच भव्य अशी भोजन व्यवस्था आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.अशा प्रकारचे आकर्षक आधुनिक शाही लग्न मंडप विद्युत रोषणाई आणि भव्य दिव्य सोहळा  प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी याची देही याची डोळा मिळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आणि मतदारसंघात या ऐतिहासिक विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment