Wednesday, 10 January 2024

अमृत 2.0 योजने अंतर्गत पाटण नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला तातडीने मान्यता. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून पाटण नगरपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी.

 

दौलतनगर दि.10: पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला अमृत 2.0 कार्यक्रमांतर्गत मंजूरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री  ना. शंभूराज देसाई यांनी केल्या होत्या.त्यानुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाने पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा सुधारित अंदाजपत्रके आराखडयासह असणारा प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी प्रस्तावित केला होता. त्यानुसार अमृत 2.0 या योजनेअंतर्गत पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित 19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली होती.दरम्यान राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा ना.शंभूराज देसाई यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. गोविंद राज यांना सदर योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुचना केली होती. आज मंत्रालय स्तरावर राज्यातील नवीन प्रकल्प व मंजूर प्रकल्पाच्या निविदा प्रस्तावाबाबत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची प्रधान सचिव(नवि2) यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पाटण नगर पंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला अमृत 2.0 योजने अंतर्गत 19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या रक्कमेला राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या सुचनेनुसार पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाटण शहारांतर्गत नव्याने कार्यान्वित करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे सर्व्हेक्षण करुन रक्कम रुपये 21 कोटी 44 लाख 57 हजार रुपयांचा सुधारित आराखडा तयार करुन संबंधित विभागाकडे दाखलही करण्यात आला. दाखल प्रस्तावावर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  संबंधित विभागाचे मुख्य अभियंता यांना तांत्रिक मान्यता देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार राज्य उच्चाधिकार सुकाणू समितीने शिफारस केल्यानुसार पाटण नगरपंचायतीचे नविन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 19 कोटी 70 लक्ष रुपये तत्वत: मंजूर केले असून या  नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाची विभागीय आणि मंडळ स्तरावर तपासणीही करण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कराड विभाग आणि मंडळ कार्यालय पुणे यांनी तांत्रिक मंजूरीसाठी सादर आणि शिफारस केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने पाटण नगरपंचायतीने सादर केलेल्या पाटण येथील नवीन नळ पाणी पुरवठा येाजनेच्या अंदाजपत्रकाच्या  19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेला  सुधारित तांत्रिक मान्यता मिळाली होती. दरम्यान मंत्रालय स्तरावर आज राज्यातील नवीन प्रकल्प व मंजूर प्रकल्पाच्या निविदा प्रस्तावाबाबत राज्यस्तरीय तांत्रिक समितीची प्रधान सचिव (नवि 2) यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पाटण नगर पंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला अमृत 2.0 योजने अंतर्गत 19 कोटी 69 लक्ष 52 हजार इतक्या रक्कमेला राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली असल्याची माहिती शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment