Tuesday 27 February 2024

कोयना (शिव सागर), ता. जावळी, जि. सातारा येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात झाला सामंजस्य करार

 

मुंबई, दि.२७:  सातारा जिल्ह्यातील  जावळी तालुक्यातील मुनावळे  येथे शिव सागर जलाशय मध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.या

प्रकल्पाच्या माध्यमातून  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ५ हजार पेक्षा अधिक स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल  आणि  १०० कोटीपेक्षा अधिक  पर्यटनातून आर्थिक उलाढाल होईल.


विधानभवन येथे झालेल्या सामंजस्य करारावेळी  उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा शंभूराज देसाई, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी -शर्मा, जलसंपदा विभागाचे उपसचिव अतुल कपोले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.


           नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर

शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. कोयना (शिव सागर), ता. जावळी हा परिसर येथील सह्याद्री डोंगराच्या रांगा,गर्द झाडी, निळेशार पाणी ,समृध्द जैवविविधतेचे आगार असलेला ,नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर आहे.  नव्याने होणाऱ्या जलपर्यटन केंद्राच्या  माध्यमातून स्थानिकांना रोजगार  मिळावा या भागाचा सर्वांगीण विकास  हे जल पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा च्या माध्यमातून या  प्रकल्पासाठी  ४५ कोटी ३८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.


    महाराष्ट्राला लांब आणि मोहक ७२० किमीचा सागरी किनारा तसेच निसर्गान संपन्न छोटे मोठे जलाशय म्हणजे धरणे, प्रदूषण मुक्त लांब नद्या यांचे वैभव लाभलेले आहेत. या ठिकाणी जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे.

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूबा डायव्हिंग प्रकल्पामुळे सिंधुदुर्गात पर्यटक मोठ्या प्रमाणत आकर्षित झाले. नाशिक बोट क्लबचे प्रचलन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ करीत आहे.ही बोट क्लब पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालेले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे आणि गुजरात मधून नाशिकला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला. हा अनुभव बघता शासनाने महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

 

   या प्रकल्पामुळे महाबळेश्वर, पाचगणी, वाईला येणारा पर्यटक कोयना जलाशयाच्या अवतीभोवती असलेल्या ग्रामीण भागात वळेल, तसेच पर्यटकांचा साताऱ्यात राहण्याचा काळ आणि खर्च करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वाढीस लागून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात शाश्वत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील.


               देशातील पहिले नाविन्यपूर्ण 

           गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग

या प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी विविध पायाभूत सुविधा आणि जल पर्यटन प्रकार असतील. भव्य पॅव्हेलियन, कॉन्फरन्स हॉल, जलतरण तलाव, भारतातील पहिले नाविन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग, जल सफर मध्ये पर्यटन प्रकल्पात मोठी क्रुझ बोट ज्यामध्ये १०० च्या वर पर्यटक बसून, नाश्ता आणि जेवण याबरोबर कोयना जलाशयाच्या अवतीभोवतीच्या सह्याद्री पर्वत रांगा, हरित जंगले, वन्य जीव याचा आनंद घेऊ शकतात, भारतातील पहिली अत्याधुनिक आणि अलिशान हाउस बोट, सौर उर्जा/बॅटरीवर चालणारी बोट, अत्याधुनिक प्रवासी बोटी, हवेत उडणारी बोट, अत्यंत वेगवान जेट बोट, पॅरासेलिंग बोट, गोड्या पाण्यात पहिल्यांदा सेलिंग यॉट (शिडाची नौका) आणि त्याशिवाय आकर्षक वॉटर स्पोर्ट् स असतील. अशाप्रकारच्या जल पर्यटनाची आकर्षणे तसेच पायाभूत सुविधा असलेला हा भारतातील पहिला जल पर्यटन प्रकल्प असेल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पुढील १० दिवसामध्ये प्राथमिक जल पर्यटन सुरु करण्यात येईल. दुसऱ्या टप्यात (८ महिन्यात) नवीन बोटी आणि इतर जल पर्यटन आकर्षणे यांचा अंतर्भाव करण्यात येईल. तिसरा आणि अंतिम टप्यात (२० महिन्यात) संपूर्ण नवीन भव्य वास्तू, क्रुझ बोट, हाउस बोट यांचा अंतर्भाव करून प्रकल्प पूर्ण केला जाईल.


      

प्रकल्पात पायाभूत सुविधा आणि विविध जल पर्यटन प्रकार


 प्रकल्पातील पायाभूत सुविधा मध्ये नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र,पर्यटकांसाठी भव्य आसन व्यवस्था,विविध प्रकारच्या खाद्य प्रकारांचे उच्च दर्जाचे उपहारगृह,पर्यटकांसाठी विविध सुविधा व प्रशासकीय कार्यालय,जलतरण तलाव,स्कूबा प्रशिक्षण तलाव,कॉन्फरस हॉल,व्यवस्थापक आणि कर्मचार्यांसाठी निवासाची सोय,बोटींसाठी आणि पर्यटकांसाठी उतरंडी, तरंगती जेट्टी (मरीना),वाहनतळ,आकर्षक बगीचा असतील.


यामध्ये असणार विविध जल पर्यटन प्रकार जेट स्की,जेटो व्हेटर (पाण्यात उडणे),बम्पर राईड,कयाकिंग,बनाना राईड,सेलिंग,नाविन्यपूर्ण कृत्रिम तलावात गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग,हवेत उडणारी बोट,फ्लाईंग फिश,अतिवेगवान जेट बोट राईड,सौर/विद्युत बोट, पर्यटकांसाठी आरामदायी प्रवाशी बोट,व्हर्ल पूल राईड,

पॅरासेलिंग,अलिशान लेक क्रूझिंग प्रवासी बोट,अलिशान वेगवान बोट,मरीना,भारतातील पहिली अत्याधुनिक, अलिशान हाउस बोट असे विविध नाविन्यपूर्ण जल पर्यटन प्रकार असतील.

Saturday 24 February 2024

पाटण नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला 19 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी मंजूर . पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून पाटणकरांना दिलेला शब्द केला पुर्ण.

 

दौलतनगर दि.10: पाटण या तालुक्याच्या ठिकाणी  नगरपंचायतीच्या  क्षेत्रामध्ये  आवश्यक असणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनच्या कामाला शासनाच्या नगरविकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता गतवर्षापासून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. एकनाथजी शिंदे यांचेकडे निधी मंजूर करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार पाटण नगरपंचायतीचे नळ पाणी पुरवठा योजनेला  अमृत 2.0 योजने अंतर्गत 19 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी वितरित केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पारीत केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,गतवर्षी पाटण नगरपंचायतीच्या नगर विकास विभागाकडील मंजूर विविध विकास कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमात पाटणवासियांनी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होणेबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचेकडे विनंती केली होती. पाटणवासियांच्या मागणीनुसार पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला अमृत 2.0 कार्यक्रमांतर्गत मंजूरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री  ना. शंभूराज देसाई यांनी पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाचे  अधिकारी यांना केल्या होत्या,दरम्यान गत महिन्यात पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा सुधारित अंदाजपत्रके आराखडयासह असणारा प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी प्रस्तावित केला होता. प्रस्तावित नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित 19 कोटी 70 लक्ष रुपायांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा ना.शंभूराज देसाई यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव श्री. गोविंद राज यांना सदर योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुचना केली होती. या सुचनेनुसार दि 23 फेब्रुवारी रोजी अमृत 2.0 योजने अंतर्गत 19 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी वितरित केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पारीत केला आहे. या शासन निर्णयामुळे पाटण नगरपंचायतीच्या क्षेत्रात कायमची पाणी टंचाई दुर होणार असल्याने पाटणवासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल पाटणवाशियांनी  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले. मंजूर कामांची निविदा प्रक्रीया होऊन तातडीने नळ पाणी पुरवठा योजनेचे कामसुरु होणार असल्याचे ही  शेवठी पत्रकात म्हटले आहे.

चौकट ना.शंभूराज देसाई दिलेल्या शब्द पुर्ण करणारे नेतृत्व

          गतवर्षीच्या पाटणमधील विकासकामांच्या भूमीपुजन कार्यक्रमात पाटणवासियांनी नळ पाणी पुरवठा योजनेला निधी उपलब्ध करुन देणेबाबतची मागणी केली होती. या मागणीनुसार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. एकनाथजी शिंदे यांचेकडे निधी मंजूर करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे एक वर्षाच्या आत एवढा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल पाटण या तालुक्याच्या ठिकाणी येणा-या नागरीकांसह पाटणवासियांनी आनंद व्यकत करत नगरपंचायतीच्या सत्तेचा विचार न करता पाटणकरांना दिलेला शब्द  पुर्ण करणारे नेतृत्व अशी चर्चा पाटणमध्ये सुरु आहे.

Saturday 10 February 2024

तारळी व मोरणा (गुरेघर) प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी! - पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचे निर्देश

 

मुंबई : सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेची कामे येत्या १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी प्रशासनाला दिले. गुरुवारी मंत्रालयातील दालनात तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेच्या, तसेच मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पातील डावा व उजवा कालवा येथील बंदिस्त नलिका प्रणालीच्या कामांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आढावा बैठक घेतली. या दोन्ही प्रकल्पांतील प्रलंबित कामांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.  

           तारळी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ५० मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांचा आढावा मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी बैठकीत घेतला. पहिल्या टप्प्यातील तारळे, बांबवडे, कोंजवडे, धुमकवाडी व आवर्डे या उपसा सिंचन योजनांपैकी अपूर्ण योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच दुसऱ्या टप्प्यात १०० मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांची कामेही पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उपसा सिंचन योजनांमधील कामांचे गळतीशिवाय प्रात्याक्षिक घेण्यात यावे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून १०० टक्के प्रात्याक्षिक घ्यावे. तसेच ही कामे महिनाभरात पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

              या बैठकीत मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पांतर्गत बंदिस्त नलिका प्रणालीच्या कामांसंदर्भात मा. ना. शंभूराज  देसाई साहेबांनी आढावा घेतला. मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पामध्ये सन २०१० पासून १०० टक्के पाणीसाठा करण्यात येत आहे. सदर प्रकल्पांतर्गत डावा कालवा १ ते १० किलोमीटरबाबत आणि उजवा कालवा १ ते २७ किलोमीटरबाबत बंदिस्त नलिका प्रणालीचा प्रस्ताव तयार करावा आणि या कामांची निविदा काढून कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी सूचना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी दिली. तसेच सिंचननिर्मितीसाठी नाटोशी उपसा सिंचन योजनेचेही काम त्वरीत हाती घेण्यात यावे, असे निर्देश देत या योजनांसाठी सन २०२४-२५ करिता निधीची तरतूद करण्यात येईल, असेही मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. मोरणा प्रकल्पांतर्गत कालव्याची कामे झालेली आहेत. २०१३ साली यासाठी खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करण्यात आले, त्यांना भूभाडे देय नाही. मात्र, मागील १० वर्षांत कालवे होऊनही ज्यांची जमीन घेण्यात आली नाही त्यांना भूभाडे दिले जाणार आहे. मुख्य अभियंता यांनी यास त्वरित मान्यता देऊन महिनाभरात संबंधित शेतकऱ्यांना भूभाडे अदा करावे आणि त्यांची जमीन पूर्ववत करून द्यावी, असे निर्देश मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी या बैठकीत दिले. 

            या बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जलसंपदा विभागाचे उपसचिव प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता राहुल घनवट, कार्यकारी अभियंता वरुण मोटे, यांत्रिकी विभागाचे श्री. भोसले, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता श्री. धुमाळ, अधिक्षक अभियंता जयंत शिंदे सहभागी झाले होते.

Tuesday 6 February 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 72 गावांतील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना 7 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.06:- राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 72 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्याकरीता मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 72 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांसाठी 7 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दींस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांतील रस्त्यांची प्रतिवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत नुकसान होत असते. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधीची गरज होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 72 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 72 विविध गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रत्येक गावनिहाय 10 लाख या प्रमाणे एकूण 7 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय  राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये मरळी, येराडवाडी, गमेवाडी, गुंजाळी, नवसरवाडी, डावरी,चौगुलेवाडी सांगवड,गव्हाणवाडी,निवी,कळकेवाडी,जमदाडवाडी,किल्ले मोरगिरी,जिंती,कुसरुंड,बेलवडे खुर्द, मंद्रुळकोळे, शितपवाडी, मल्हारपेठ, गावडेवाडी, सळवे, पापर्डे, तामिणे, माजगाव, दुसाळे, नाडोली, आडदेव, टेळेवाडी, सांगवड, आटोली, पाचगणी,विहे,चाफळ,सातर,वाझोली,पाचुपतेवाडी,नाणेगाव खुर्द, घाणबी, मणदुरे, मुळगाव, बोडकेवाडी, मंद्रुळहवेली,‍शिंदेवाडी,धावडे,वाडीकोतावडे,लुगडेवाडी,येरफळे,निगडे,पवारवाडी,मस्करवाडी,मोरेवाडी कुठरे,काढणे,दिवशी खुर्द, कातवडी,वाटोळे,काहिर,आंबळे,मालोशी,चोपडी,त्रिपुडी,गोकूळ तर्फ पाटण,उमरकांचन,बोंद्री,बांधवाट,सावरघर पुनर्वसन, गायमुखवाडी बांबवडे,उधवणे,वस्ती साकुर्डी,साजूर,साकुर्डी व भोळेवाडी  या गावांचा समावेश आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील एकाच वेळी तब्बल 72 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांना प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे सुमारे 7 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री ना.संदिपानजी भुमरे यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आभार मानले असून मंजूर झालेल्या या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लागण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकारी यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.



 


Saturday 3 February 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण मतदारसंघासाठी 6 कोटी 72 लक्ष 43 हजार रुपयांचा निधी मंजूर. लघु पाटबंधारे,जलयुक्त शिवार योजना, स्थानिक व डोंगरी विकास निधी,जि.प.स्वनिधी व दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत कामे लागणार मार्गी.

 



दौलतनगर दि.01:  पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून लघु पाट बंधारे विभागाचे वाशिम पॅटर्न,जलयुक्त शिवार योजना,आमदारांचा स्थानिक विकास निधी,डोंगरी विकास निधी,जि.प.स्वनिधी व दलित वस्ती सुधार योजना या विविध योजनांतर्गत 36 कामांसाठी 06 कोटी 72 लक्ष 43 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शेती विषयक पाण्याची समस्या दूर होऊन शेतकऱ्यांचे शेतातील पिकाला पाणी मिळण्याचे उद्देशाने लघु पाट बंधारे विभागांतर्गत वाशिम पॅटर्न ही संकल्पना राबविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार सन 2023-24 चे जिल्हा वार्षिक आराखडयांतून लघु पाट बंधारे विभागांतर्गत वाशिम पॅटर्न राबविण्याच्या कामांकरीता 79.41 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये पाडळोशी पाझर तलाव दुरुस्ती 17.27 लक्ष, खबालवाडी वरची ग्रामतलाव दुरुस्ती 17.67 लक्ष, उधवणे ग्राम तलाव दुरुस्ती 15.85 लक्ष,गलमेवाडी पाझर तलाव दुरुस्ती 17.43 लक्ष व डोंगळेवाडी माणगाव ग्रामतलाव दुरुस्ती 11.19 लक्ष या कामांचा तर लघु पाटबंधारे विभागाचे सामान्य कामांमध्ये जिंती वळण बंधारा पाट व पाईप लाईन 7.33 लक्ष, वरची केळोली वळण बंधारा दुरुस्ती व पाट 21.72 लक्ष व गमेवाडी पाझर तलाव दुरुस्ती 9.91 लक्ष या कामांचा समावेश आहे.तसेच राज्य शासनाने नव्याने जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे जाहिर केल्या नुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील जलयुक्त शिवार योजने अंतर्गत विविध कामे करण्यासाठी भोळेवाडी,आबईचीवाडी,साजूर,अंबवडे खुर्द,कातवडी,मणदुरे व मरड या गावांची निवड करण्यात आली असून आबईचीवाडी मंदिराशेजारी येथे साठवण बंधारा 18.79 लक्ष, भोळेवाडी येथे ग्राम तलाव दुरुस्ती 15.66 लक्ष, भोळेवाडी येथे आंब्याचे शेत येथे साठवण बंधारा 11.07 लक्ष, भोळेवाडी येथे मोडे शिवार येथे साठवण बंधारा 10.11 लक्ष, साजूर येथे  साठवण बंधारा 19.45 लक्ष, भोळेवाडी येथे करमाळ शिवार येथे साठवण बंधारा करणे 13.35 लक्ष, भोळेवाडी येथे मूडदुंग शिवार येथे साठवण बंधारा 13.75 लक्ष, अंबवडे खुर्द येथे ग्राम तलाव दुरुस्ती 11.32 लक्ष, कातवडी पूर्व येथे वळण बंधारा 15.64 लक्ष, मणदुरे येथे वळण बंधारा 14.72 लक्ष, मरड येथे साठवण हौद व शेतीसाठी पाण्याचे पाट 15.56 लक्ष या कामांचा समावेश आहे.दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत मागासवर्गीय वस्तींमधील विकास कामे मार्गी लावण्यासाठी 01 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या मध्ये चोपडी येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता सुधारणा 10 लक्ष, आंब्रुळे मानेवस्ती व चांभारवस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे व बंदिस्त गटर 10 लक्ष, घोटील बौध्दवस्तीत रस्ता सुधारणा 10 लक्ष, विहे आंबेडकरनगर जूने विहे रसता काँक्रीटीकरण 10 लक्ष, जानुगडेवाडी थोरातवस्ती येथे सांडपाणी व्यवस्थापन 10 लक्ष, बेलवडे खुर्द बौध्दवस्तीत रस्ता सुधारणा 10 लक्ष, टोळेवाडी बौध्दवस्तीत रस्ता सुधारणा 10 लक्ष, आवर्डे संघर्षनगर स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण 10 लक्ष, केर बौध्दवस्तीत रस्ता सुधारणा 10 लक्ष, कोकीसरे बौध्दवस्तीत सांडपाणी व्यवस्थापन 10 लक्ष या कामांचा समावेश असून आमदारांचा स्थानिक विकास निधी सन 2023-24 मधून मल्हारपेठ  कराड चिपळूण रस्ता ते वनहद्दीतून  लिंगायत समाज स्मशानभूमी  रस्ता सुधारणा  15 लक्ष, पाडळोशी वार्ड नं.3 बंदीस्त गटरसह अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, सणबूर येथे सुतारवस्ती येथील अंगणवाडी शेजारील ओढयाला संरक्षक भिंत 20 लक्ष, नाटोशी गावठाण अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, नाणेगाव खुर्द अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लक्ष, पिंपळोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा  10 लक्ष, खालची मेंढोशी मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लक्ष,महाडीकवाडी नुने येथे सभामंडप 13 लाख,लोरेवाडी नुने येथे सभामंडप 13 लाख,सोनवडे जाधवस्ती सभामंडप 13 लाख,दिवशी बुद्रुक मातंगवस्तीमध्ये सभामंडप 13 लाख,डोंगरी विकास निधीतून जानाईचीवाडा येराड पोहोच रस्ता खडी.डांबरीकरण 30 लाख, आंबेघर रासाटी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख, निसरे विहिर ते कार रोड रस्ता खडी.डांबरीकरण 20 लाख, वाटोळे झरे आळी अंतर्गत काँक्रीटीकरण 10.64 लाख, कुसरुंड गांधीनगर वस्ती ते हायस्कूल रस्ता काँक्रीटीकरण 10 लाख, जिल्हा परिषद स्वनिधीतून कडवे बु येथे स्टेज 5 लाख, नारळवाडी पाडळोशी सभामंडप दुरुस्ती 04 लाख, आचरेवाडी नं.2 रस्ता सुधारणा  15 लाख, येराड,ता.पाटण येथे स्टेज 5 लाख, शिवनगर लेंढोरी सभामंडप दुरुस्ती 4 लाख, जमदाडवाडी सभामंडप दुरुस्ती 4 लाख, चाफळ येथे फोल्डींग स्टेज 5 लाख या कामांचा समावेश आहे.

चौकट: रामेल येथे लघु पाट बंधाऱे तलाव्याच्या कामासाठी 11 कोटी 45 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी रामेल या डोंगरी व दुर्गम भागामधील शेतीसाठी व जनावरांचे पाण्याची गैरसोय कायमची दूर होण्याकरीता येथील डोंगर पठारावर लघु पाट बंधाऱ्याचे काम मंजूर होण्यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार रामेल येथे 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या  लघु पाटबंधारे तलाव योजनेला 11 कोटी 44 लक्ष 85 हजार रक्कमेची प्रशासकीय मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने पारित केला असून या लघु पाटबंधारे तलावाची पाणी साठवण क्षमता 487.44 स.घ.मी. असून नियोजित सिंचन क्षमता 120 हेक्टर इतकी आहे.रामेल येथील लघु पाटबंधारे तलाव्याच्या कामामुळे या विभागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असल्याने या विभागातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले.

Thursday 1 February 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 05 कोटींचा निधी मंजूर. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध धार्मिक व पर्यटन स्थळांचा होणार विकास.

 


दौलतनगर 01 : पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील दौलतनगर येथील श्री गणेश मंदिर, मरळी येथील श्री निनाईदेवी मंदिर,येराडवाडी येथील रुद्रेश्वर मंदिर,गुरेघर येथील वाघजाई मंदिर,डावरी येथील सिध्देश्वर मंदिर, वेताळवाडी येथील वरद विनायक मंदिर,सांगवड येथील श्री सिध्देश्वर मंदिर,आटोली येथील खडकची वाघजाई मंदिर, मंद्रुळहवेली येथील निनाई मंदिर, पाणेरी येथील वाल्मिकी मंदिर, चोपदारवाडी येथील सिध्देश्वर मंदिर, वसंतगड येथील जनार्दन स्वामी महाराज मठ व वस्ती साकुर्डी ता.कराड येथील भवानी माता मंदिर या धार्मिक व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांचा विकास पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील शिफारस केलेल्या  पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                   प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटन व तिर्थक्षेत्र  स्थळांच्या ठिकाणी आवश्यक अशा मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत संबंधित गावातील ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे विनंती केलेली होती. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रसिध्द असलेल्या या धार्मिक व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविल्यास या पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची  गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील दौलतनगर येथील श्री गणेश मंदिर, मरळी येथील श्री निनाईदेवी मंदिर,येराडवाडी येथील रुद्रेश्वर मंदिर,गुरेघर येथील वाघजाई मंदिर,डावरी येथील सिध्देश्वर मंदिर, वेताळवाडी येथील वरद विनायक मंदिर,सांगवड येथील श्री सिध्देश्वर मंदिर,आटोली येथील खडकची वाघजाई मंदिर, मंद्रुळहवेली येथील निनाई मंदिर, पाणेरी येथील वाल्मिकी मंदिर, चोपदारवाडी येथील सिध्देश्वर मंदिर, वसंतगड येथील जनार्दन स्वामी महाराज मठ व वस्ती साकुर्डी ता.कराड येथील भवानी माता मंदिर या पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीचा पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील या पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला आहे.मंजूर झालेल्या पर्यटन विकासाच्या कामांमध्ये दौलतनगर ता.पाटण श्री गणेश मंदिर परिसरामध्ये रस्ते सुधारणा 2 कोटी 50 लक्ष, मरळी निनाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 30 लक्ष, येराडवाडी श्री रुद्रेश्वर देवालय मंदिर क वर्ग पर्यटन स्थळ परिसर विकसित करणे व पोहोच रस्ता 20 लक्ष, गुरेघर वाघजाई मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष, डावरी सिध्देश्वर मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष, वेताळवाडी वरद विनायक मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष, सांगवड श्री सिध्देश्वर मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष, आटोली खडकची वाघजाई मंदिर पोहोच रस्ता सुधारणा 20 लक्ष, मंद्रुळहवेली निनाई मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष, पाणेरी वाल्मिकी मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष, चोपदारवाडी सिध्देश्वर मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष, वसंतगड ता.कराड जनार्दन स्वामी महाराज मठ रस्ता सुधारणा 20 लक्ष, वस्ती साकुर्डी ता.कराड भवानीमाता मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष अशा एकूण 05कोटी रुपयांचा कामांचा समावेश असून पाटण विधानसभा मतदारसंघातील धार्मिक व पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तर प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांना तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात लवकरच जिल्हास्तरीय अधिकारी यांची बैठक आयोजित करुन या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करुन ही कामे लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात संबंधित शासकीय अधिकारी यांना सूचना करण्यात येणार असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.