Tuesday 6 February 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 72 गावांतील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना 7 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.06:- राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 72 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्याकरीता मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 72 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांसाठी 7 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला असल्याची माहिती  पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

          प्रसिध्दींस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण या डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांतील रस्त्यांची प्रतिवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणांत नुकसान होत असते. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांची दळण वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधीची गरज होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 72 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांना निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 72 विविध गावांतील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रत्येक गावनिहाय 10 लाख या प्रमाणे एकूण 7 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय  राज्य शासनाचे नियोजन विभाग (रोहयो) यांनी पारित केला आहे. मंजूर झालेल्या कामांमध्ये मरळी, येराडवाडी, गमेवाडी, गुंजाळी, नवसरवाडी, डावरी,चौगुलेवाडी सांगवड,गव्हाणवाडी,निवी,कळकेवाडी,जमदाडवाडी,किल्ले मोरगिरी,जिंती,कुसरुंड,बेलवडे खुर्द, मंद्रुळकोळे, शितपवाडी, मल्हारपेठ, गावडेवाडी, सळवे, पापर्डे, तामिणे, माजगाव, दुसाळे, नाडोली, आडदेव, टेळेवाडी, सांगवड, आटोली, पाचगणी,विहे,चाफळ,सातर,वाझोली,पाचुपतेवाडी,नाणेगाव खुर्द, घाणबी, मणदुरे, मुळगाव, बोडकेवाडी, मंद्रुळहवेली,‍शिंदेवाडी,धावडे,वाडीकोतावडे,लुगडेवाडी,येरफळे,निगडे,पवारवाडी,मस्करवाडी,मोरेवाडी कुठरे,काढणे,दिवशी खुर्द, कातवडी,वाटोळे,काहिर,आंबळे,मालोशी,चोपडी,त्रिपुडी,गोकूळ तर्फ पाटण,उमरकांचन,बोंद्री,बांधवाट,सावरघर पुनर्वसन, गायमुखवाडी बांबवडे,उधवणे,वस्ती साकुर्डी,साजूर,साकुर्डी व भोळेवाडी  या गावांचा समावेश आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील एकाच वेळी तब्बल 72 गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामांना प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे सुमारे 7 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व रोजगार हमी मंत्री ना.संदिपानजी भुमरे यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आभार मानले असून मंजूर झालेल्या या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लागण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकारी यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.



 


No comments:

Post a Comment