दौलतनगर दि.10: पाटण या तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये
आवश्यक असणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनच्या कामाला शासनाच्या नगरविकास
विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता गतवर्षापासून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री. एकनाथजी शिंदे यांचेकडे निधी मंजूर करण्याकरीता सातत्याने
पाठपुरावा केला होता. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार
पाटण नगरपंचायतीचे नळ पाणी पुरवठा योजनेला अमृत 2.0 योजने अंतर्गत 19 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी वितरित केला असल्याचा शासन
निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पारीत केला
असल्याची माहिती
ना.शंभूराज
देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे
की,गतवर्षी
पाटण नगरपंचायतीच्या नगर विकास विभागाकडील मंजूर विविध विकास कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमात
पाटणवासियांनी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होणेबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचेकडे
विनंती केली होती. पाटणवासियांच्या मागणीनुसार पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा
योजनेच्या कामाला अमृत 2.0 कार्यक्रमांतर्गत मंजूरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने
सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. शंभूराज
देसाई यांनी पाटण नगरपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाचे अधिकारी यांना केल्या होत्या,दरम्यान गत महिन्यात
पाटण नगरपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा सुधारित अंदाजपत्रके आराखडयासह असणारा
प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी प्रस्तावित केला होता. प्रस्तावित नळ पाणी पुरवठा योजनेच्या
सुधारित 19 कोटी 70 लक्ष रुपायांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला राज्य उत्पादन
शुल्कमंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा ना.शंभूराज देसाई यांनी नगर विकास विभागाचे
प्रधान सचिव श्री. गोविंद राज यांना सदर योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्याबाबत
सुचना केली होती. या सुचनेनुसार दि 23 फेब्रुवारी रोजी अमृत 2.0 योजने अंतर्गत 19 कोटी
70 लक्ष रुपयांचा निधी
वितरित केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पारीत केला
आहे. या शासन निर्णयामुळे पाटण नगरपंचायतीच्या क्षेत्रात कायमची पाणी टंचाई दुर
होणार असल्याने पाटणवासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या
कामाला भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल पाटणवाशियांनी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले. मंजूर कामांची निविदा प्रक्रीया होऊन
तातडीने नळ पाणी पुरवठा योजनेचे कामसुरु होणार असल्याचे ही शेवठी पत्रकात म्हटले आहे.
चौकट ना.शंभूराज देसाई
दिलेल्या शब्द पुर्ण करणारे नेतृत्व
गतवर्षीच्या पाटणमधील विकासकामांच्या भूमीपुजन कार्यक्रमात पाटणवासियांनी
नळ पाणी पुरवठा योजनेला निधी उपलब्ध करुन देणेबाबतची मागणी केली होती. या
मागणीनुसार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. एकनाथजी शिंदे यांचेकडे निधी मंजूर
करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला होता. या
पाठपुराव्यामुळे एक वर्षाच्या आत एवढा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल पाटण या
तालुक्याच्या ठिकाणी येणा-या नागरीकांसह पाटणवासियांनी आनंद व्यकत करत
नगरपंचायतीच्या सत्तेचा विचार न करता पाटणकरांना दिलेला शब्द पुर्ण
करणारे नेतृत्व अशी चर्चा पाटणमध्ये सुरु आहे.
No comments:
Post a Comment