Sunday 26 May 2024

ना.शंभूराज देसाई यांनी सांगवड येथील कोयना नदीवर सुरु असलेल्या पूलाच्या कामाची केली प्रत्यक्ष पाहणी.

 


दौलतनगर दि.25:- नाडे सांगवड ढेबेवाडी  रस्त्यावर कोयना नदीवर सांगवड गावाजवळ जुन्या पुलाच्या शेजारी नवीन मोठया पुलाचे बांधकाम करण्यासाठी  राज्याचे अर्थसंकल्पातून 18 कोटी रुपयांचा निधीतून मंजूर असलेल्या नवीन पुलाच्या कामाला 1 फेब्रुवारी 2024 ला सुरुवात झाली असून पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्गा तसेच प्रमुख जिल्हा मार्ग,ग्रमीण मार्गावरील पुलांचे कामांसाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाचे विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर केला आहे. या मंजूर निधीतून सध्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये  काही मोठया पूलांची कामे पूर्णत्वास गेली आहेत तर काही पूलांची कामे ही सध्या प्रगतीत असून लवकरच या पूलांची कामे  पूर्णत्वाकडे जाणार आहेत.या पैकी  नाडे सांगवड ढेबेवाडी  रस्त्यावर कोयना नदीवर सांगवड गावाजवळ नवीन मोठया पुलाचे कामाची पाहणी आज पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कोयना नदीवरील सांगवड येथील पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी  केली.

            पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये दळण वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग तसेच ग्रामीण मार्ग या मोठया रस्त्यांवरील अनेक पूल हे सत्तच्या अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाल्याने व अतिवृष्टीच्या कालावधीत पुराच्या पाण्याखाली जात असल्याने या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होत असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशी व नागरीक यांचे दळण-वळणाचे मोठे हाल होत होते. दरम्यान सन 2021 साली पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टी मुळे दळण वळणाचे मुख्य रस्त्यांवरील अनेक पूलांचे अतोनात नुकसान झाल्याने या पूलांवरील वाहतूक बंद होऊन नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या पूलांचे पुनर्बांधणीसाठी तसेच काही ठिकाणी नव्याने पूल उभारणे आवश्यक असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाचे विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर केला असून या मंजूर निधीतून सध्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये  काही मोठया पूलांची कामे पूर्णत्वास गेली आहेत तर काही पूलांची कामे ही सध्या प्रगतीत असून लवकरच या पूलांची कामे  पूर्णत्वाकडे जाणार आहेत.या पैकी  सांगवड पूलाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा यावेळी त्यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेत या सांगवड पूलाच्या कामा संदर्भात काही सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गत पाच वर्षामध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून कोयना नदीवरी त्रिपुडी येथील पूलासाठी 20 कोटी, मोरणा नदीवरील आंब्रुळे पूलासाठी 8 कोटी, गोकूळ तर्फ पाटण येथील पूलासाठी 7 कोटी 60 लक्ष, बेलवडे खुर्द पूलासाठी 6 कोटी 65 लाख, तारळी  नदीवरील तारळे पूलासाठी 8 कोटी,  आंबळे पूलासाठी 6 कोटी 50 लक्ष, वांग नदीवरील मंद्रुळकोळे पूलासाठी 6 कोटी 50 लक्ष, बाचोली पूल 5 कोटी, काढणे पुल 5कोटी, खळे पूल 5 कोटी, भालेकरवाडी बनपूरी पूल 4 कोटी ,काजळी नदीवरील काढोली पूलासाठी 5 कोटी, केरा नदीवरील देवघर पूल 2 कोटी 50 लक्ष, गावडेवाडी  ते खुडुपलेवाडी येथील  छोटापूल 2 कोटी 50 लक्ष,माईंगडेवाडी पूल 2 कोटी 50 लक्ष, काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्त्यावर पूल 2 कोटी 45 लक्ष,भोसगाव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले पाणेरी रस्त्यावर पूल 3 कोटी व ढेबेवाडी सणबूर महिंद  नाटोशी रस्त्यावरील पूल 4 कोटी अशा मोठया 18 पूलांचे कामांसाठी 117 कोटी 25 लक्ष रुपयांचा तर भारसाखळे रस्त्यावरील पूल 2 कोटी 10 लक्ष, कसणी पूल 2 कोटी , काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्त्यावर पूर 1 कोटी 90 लक्ष, काठी टेक चाफोली दिवशी खुर्द रस्त्यावर पूल 1 कोटी 80 लक्ष, धायटी येथील पूल 1 कोटी 50 लक्ष, कवरवाडी पूल 1 कोटी 50 लक्ष, चाफोली दिवशी खुर्द चिटेघर केर रस्त्यावर पूल 1 कोटी, सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्त्यावर पूल 1 कोटी,पवारवाडी कुठरे पूल 98 कोटी 26 लाख, मोरगिरी आडदेव आंब्रुळे बेलवडे खुर्द रस्ता कोळीवस्तीजवळ पूल 95 लाख, हुंबरणे ते पांढरेपाणी रस्त्यावर पूल 80 लक्ष, वाघजाईवाडी जवळ पूल 63 लाख,हुंबरळी पूल 62 .69लाख, नेरळे पूल 51.58 लाख, सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्त्यावर कोलदकाटा कुरु येथे पूल 40 लाख व वनकुसवडे ते पळासरी येथे पूल 35 लाख या 16 लहान पूलांचे कामासाठी 18 कोटी 05 लाख  असा 34 पूलांचे कामांसाठी 135 कोटी 30 लाख 59 हजार एवढा राज्य शासनाचे विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर केला असून  काही पुलांची कामे पुर्णत्वास गेली असून उर्वरीत पूलांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

चौकट : ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मतदरसंघात रस्त्यांबरोबर पूलांचेही जाळे.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण या डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे दळण वळणाचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी  राज्य शासनाच्या विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर करुन आणला असून रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी रस्त्यांचे कामांबरोबर बारमाही वाहतूकीसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी मोठे व छोटे पूल याही कामांना प्राधान्य देऊन या पूलांचे कामांसाठीही निधी मंजूर करत प्रत्यक्ष पूलांची कामे मार्गी लावल्याने ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मतदारसंघात रस्त्यांबरोबर पूलांचेही जाळे निर्माण झाले आहे.

         

Monday 20 May 2024

ताईसाहेबांनी देसाई कुटुंबाला दिशा देण्याची पुण्याई केली ना.शंभूराज देसाई.

 



 

दौलतनगर दि.20:-लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या मंत्रिपदाचे वैभव,सुख यांचा उपभोग दुर्दैवाने ताईसाहेबांना फार काळ घेता आला नाही. मात्र  देसाई कुटुंबावर चांगले संस्कार करून या कुटुंबाला नवी दिशा देण्याचे खऱ्या अर्थाने पुण्याईचे काम त्यांनी केले.असे भावनिक उद्गार राज्याचे उतपादन शुल्कमंत्री तथा सातारा आणि ठाण्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी  केले. ते महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांच्या ६५ व्या पुण्यतिथी कार्यक्रम आणि महिला पदाधिकारी मेळावा व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम अशा संयुक्त कार्यक्रमात करताना बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई,महाराष्ट्र राज्य दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ मछिंद्र सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जयवंतराव शेलार, दिलीपराव चव्हाण,अशोकराव पाटील, मिलिंद पाटील, विजय पवार, संजय देशमुख, बाळासाहेब पाटील, विलास गोडांबे  ,पंजाबराव देसाई, आर.बि.पवार, दिपाली पाटील, श्रीमती जयश्री पवार,सौ. वैशाली शिंदे, तसेच पाटण विधानसभा मतदार संघातील विविध संस्थाचे महिला पदाधिकारी, कार्यकर्ते,पालक शिक्षक विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  मंत्री ना.देसाई म्हणाले,महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा  पुण्यतिथी कार्यक्रम लोकनेत्यांच्या जन्म शताब्दी वर्षापासून साजरा केला जात आहे.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण करताना आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान वाटत आहे.

पाटण तालुक्याचा चौफेर विकास आणि प्रगती ही लोकनेते बाळासाहेब  देसाई यांनी त्याकाळी केलेल्या मूलभूत सुविधांच्या विकासामुळे आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास हा लोकनेत्यांनी रचलेला पाया असल्याचे सांगून कोणत्याही यशस्वी पुरुषांच्या मागे कर्तबगार स्त्रीचा हातभार असतो त्याचप्रमाणे लोकनेते कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे गेले.मात्र लोकनेत्यांच्या मंत्रिपदाचे वैभव,सुख,मानसन्मान त्यांना दुर्दैवाने फार काळ उपभोगता आले नाही. देसाई घराण्यातील मुलांवर चांगले संस्कार करून देसाई कुटुंबाला दिशा देण्याची महान पुण्याई ताईसाहेबांनी केली.दुर्दैवाने लोकनेत्यांना ही त्यांची साथ फार काळ लाभली नाही.असे स्पष्ट करून पाटण विधानसभा मतदारसंघातील  गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता होतकरू विद्यार्थिनींनी वत्सलादेवी देसाई शिष्यवृत्ती चा लाभ घेऊन आपली आपली शैक्षणिक प्रगती कायम उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करून महाराष्ट्र दौलत या लोकनेत्यांच्या शताब्दी स्मारकात मोफत असलेल्या अत्याधुनिक स्टडी सेंटर चा लाभ घ्यावा असे ही आवाहन त्यांनी केले. पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी यांनी चूल आणि मूल ही संकल्पना आता बाजूला करुन आपल्या गावाच्या व समाजाच्या प्रगतीसाठी पुरुषांच्याप्रमाणे खांद्याला खांदा देऊन काम करण्याची खरी गरज आहे. त्याबरोबर महिलांचे संघटनही वाढण्याचे काम आता या महिलांनी हाती घ्यावे जेणेकरुन शासनाच्या विविध योजना गावा-गावातील गरजू महिलांपर्यंत पोहचविण्याचे काम सुलभ होईल असे सांगत ते पुढे म्हणाले की, जिजाऊ महिला ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयं  रोजगारासाठी व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासंदर्भात लवकरच एक आराखडा तयार करण्यात येणार असून लवकरच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व महिलांचा एक भव्य महिला मेळावा घेणार असल्याचे ही त्यांनी  शेवटी स्पष्ट केले.

चौकट : पाटण विधानसभा मतदारसंघातील महिलांची संघटना मजबूत.

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज दौलतनगर ता.पाटण येथे महिला पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यासाठी  पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला सरपंच, उपसरपंच,सदस्या तसेच सोसायटीच्या चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका यांना निमंत्रित करण्यात आले होते. या महिला पदाधिकारी मेळाव्याला सर्व महिला पदाधिकारी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. दरम्यान ना. शंभूराज देसाई यांनी भाषणामध्ये याचा उल्लेख करत केवळ एका निरोपावर या एवढया मोठया प्रमाणांत महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.त्यामुळे आजही पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये महिला पदाधिकारी यांची संघटना मजबूत असल्याचे स्पष्ट केले.

    चौकट : शिष्यवृत्तीसाठी ३१लाख ३१ हजार रुपयांचे वितरण

     पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. यंदाचे हे १४ वे वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील २०९ मुलींना प्रत्येकी ५५०० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही १६ मुलींना प्रत्येकी ६०५० रुपयेप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले.आज पर्यंत शिष्यवृत्ती साठी म्हणून  ३१ लाख ३१ हजार ५००  रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली.

 कार्यक्रमात प्रा मच्छीन्द्र सकटे,श्वेता वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे यांनी  केले तर आभार बबनराव शिंदे यांनी मानले.

Friday 17 May 2024

दौलतनगर,ता. पाटण येथे दि.२० मे रोजी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६5 वा पुण्यतिथी सोहळा. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम व महिला पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन.



दौलतनगर दि.7:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६5 वा पुण्यतिथी सोहळा व या पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम व पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला सरपंच,उपसरपंच व सदस्या तसेच सोसायटीच्या महिला चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका यांचा विविध संस्थाच्या महिला पदाधिकारी मेळावा असा संयुक्त कार्यक्रम सोमवार दि.२० मे, २०२4 रोजी सकाळी १०.3० वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो.राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.यंदाचे हे चौदा वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील  दोनशे अकरा हुन अधिक विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील विद्यार्थीनींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय साहित्याचे वितरणही करण्यात येते. सध्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनींना वार्षिक ५५०० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. दरम्यान कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६5 वा पुण्यतिथी सोहळयाचे निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले असून या महिला पदाधिकारी मेळाव्याला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील महिला पदाधिकारी,शिवसेना महिला पदाधिकारी,पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच,उपसरपंच व सदस्या तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे महिला चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका या महिला पदाधिकारी यांना निमंत्रित केले आहे. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) पुण्यतिथी सोहळा, गरीब व गरजू विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम व महिला पदाधिकारी मेळावा हा संयुक्त कार्यक्रम सोमवार दि.२० मे, २०२4 रोजी सकाळी १०.3० वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला सरपंच,उपसरपंच,सदस्या तसेच सोसायटीच्या चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका यांनी मोठया संख्यने उपस्थित रहावे,असे आवाहन शेवटी प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.