दौलतनगर दि. १7:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६5 वा पुण्यतिथी सोहळा व या पुण्यतिथी सोहळया
निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम व पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला सरपंच,उपसरपंच
व सदस्या तसेच सोसायटीच्या महिला चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका यांचा विविध
संस्थाच्या महिला पदाधिकारी मेळावा असा संयुक्त कार्यक्रम सोमवार दि.२० मे, २०२4 रोजी सकाळी १०.3० वा. “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे
राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
मा.श्री.यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यांचे
प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण
मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन
शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या
शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो.राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.यंदाचे हे चौदा वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील दोनशे अकरा हुन अधिक विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील विद्यार्थीनींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय साहित्याचे वितरणही करण्यात येते. सध्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनींना वार्षिक ५५०० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. दरम्यान कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६5 वा पुण्यतिथी सोहळयाचे निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले असून या महिला पदाधिकारी मेळाव्याला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील महिला पदाधिकारी,शिवसेना महिला पदाधिकारी,पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच,उपसरपंच व सदस्या तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे महिला चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका या महिला पदाधिकारी यांना निमंत्रित केले आहे. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) पुण्यतिथी सोहळा, गरीब व गरजू विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम व महिला पदाधिकारी मेळावा हा संयुक्त कार्यक्रम सोमवार दि.२० मे, २०२4 रोजी सकाळी १०.3० वा. “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला सरपंच,उपसरपंच,सदस्या तसेच सोसायटीच्या चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालिका यांनी मोठया संख्यने उपस्थित रहावे,असे आवाहन शेवटी प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment