Sunday 26 May 2024

ना.शंभूराज देसाई यांनी सांगवड येथील कोयना नदीवर सुरु असलेल्या पूलाच्या कामाची केली प्रत्यक्ष पाहणी.

 


दौलतनगर दि.25:- नाडे सांगवड ढेबेवाडी  रस्त्यावर कोयना नदीवर सांगवड गावाजवळ जुन्या पुलाच्या शेजारी नवीन मोठया पुलाचे बांधकाम करण्यासाठी  राज्याचे अर्थसंकल्पातून 18 कोटी रुपयांचा निधीतून मंजूर असलेल्या नवीन पुलाच्या कामाला 1 फेब्रुवारी 2024 ला सुरुवात झाली असून पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्गा तसेच प्रमुख जिल्हा मार्ग,ग्रमीण मार्गावरील पुलांचे कामांसाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाचे विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर केला आहे. या मंजूर निधीतून सध्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये  काही मोठया पूलांची कामे पूर्णत्वास गेली आहेत तर काही पूलांची कामे ही सध्या प्रगतीत असून लवकरच या पूलांची कामे  पूर्णत्वाकडे जाणार आहेत.या पैकी  नाडे सांगवड ढेबेवाडी  रस्त्यावर कोयना नदीवर सांगवड गावाजवळ नवीन मोठया पुलाचे कामाची पाहणी आज पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कोयना नदीवरील सांगवड येथील पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी  केली.

            पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये दळण वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग तसेच ग्रामीण मार्ग या मोठया रस्त्यांवरील अनेक पूल हे सत्तच्या अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाल्याने व अतिवृष्टीच्या कालावधीत पुराच्या पाण्याखाली जात असल्याने या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होत असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशी व नागरीक यांचे दळण-वळणाचे मोठे हाल होत होते. दरम्यान सन 2021 साली पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टी मुळे दळण वळणाचे मुख्य रस्त्यांवरील अनेक पूलांचे अतोनात नुकसान झाल्याने या पूलांवरील वाहतूक बंद होऊन नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या पूलांचे पुनर्बांधणीसाठी तसेच काही ठिकाणी नव्याने पूल उभारणे आवश्यक असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाचे विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर केला असून या मंजूर निधीतून सध्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये  काही मोठया पूलांची कामे पूर्णत्वास गेली आहेत तर काही पूलांची कामे ही सध्या प्रगतीत असून लवकरच या पूलांची कामे  पूर्णत्वाकडे जाणार आहेत.या पैकी  सांगवड पूलाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा यावेळी त्यांनी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेत या सांगवड पूलाच्या कामा संदर्भात काही सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गत पाच वर्षामध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून कोयना नदीवरी त्रिपुडी येथील पूलासाठी 20 कोटी, मोरणा नदीवरील आंब्रुळे पूलासाठी 8 कोटी, गोकूळ तर्फ पाटण येथील पूलासाठी 7 कोटी 60 लक्ष, बेलवडे खुर्द पूलासाठी 6 कोटी 65 लाख, तारळी  नदीवरील तारळे पूलासाठी 8 कोटी,  आंबळे पूलासाठी 6 कोटी 50 लक्ष, वांग नदीवरील मंद्रुळकोळे पूलासाठी 6 कोटी 50 लक्ष, बाचोली पूल 5 कोटी, काढणे पुल 5कोटी, खळे पूल 5 कोटी, भालेकरवाडी बनपूरी पूल 4 कोटी ,काजळी नदीवरील काढोली पूलासाठी 5 कोटी, केरा नदीवरील देवघर पूल 2 कोटी 50 लक्ष, गावडेवाडी  ते खुडुपलेवाडी येथील  छोटापूल 2 कोटी 50 लक्ष,माईंगडेवाडी पूल 2 कोटी 50 लक्ष, काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्त्यावर पूल 2 कोटी 45 लक्ष,भोसगाव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले पाणेरी रस्त्यावर पूल 3 कोटी व ढेबेवाडी सणबूर महिंद  नाटोशी रस्त्यावरील पूल 4 कोटी अशा मोठया 18 पूलांचे कामांसाठी 117 कोटी 25 लक्ष रुपयांचा तर भारसाखळे रस्त्यावरील पूल 2 कोटी 10 लक्ष, कसणी पूल 2 कोटी , काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्त्यावर पूर 1 कोटी 90 लक्ष, काठी टेक चाफोली दिवशी खुर्द रस्त्यावर पूल 1 कोटी 80 लक्ष, धायटी येथील पूल 1 कोटी 50 लक्ष, कवरवाडी पूल 1 कोटी 50 लक्ष, चाफोली दिवशी खुर्द चिटेघर केर रस्त्यावर पूल 1 कोटी, सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्त्यावर पूल 1 कोटी,पवारवाडी कुठरे पूल 98 कोटी 26 लाख, मोरगिरी आडदेव आंब्रुळे बेलवडे खुर्द रस्ता कोळीवस्तीजवळ पूल 95 लाख, हुंबरणे ते पांढरेपाणी रस्त्यावर पूल 80 लक्ष, वाघजाईवाडी जवळ पूल 63 लाख,हुंबरळी पूल 62 .69लाख, नेरळे पूल 51.58 लाख, सणबूर रुवले तामिणे वाल्मिकी रस्त्यावर कोलदकाटा कुरु येथे पूल 40 लाख व वनकुसवडे ते पळासरी येथे पूल 35 लाख या 16 लहान पूलांचे कामासाठी 18 कोटी 05 लाख  असा 34 पूलांचे कामांसाठी 135 कोटी 30 लाख 59 हजार एवढा राज्य शासनाचे विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर केला असून  काही पुलांची कामे पुर्णत्वास गेली असून उर्वरीत पूलांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

चौकट : ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मतदरसंघात रस्त्यांबरोबर पूलांचेही जाळे.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण या डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे दळण वळणाचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी  राज्य शासनाच्या विविध लेखाशिर्षाखाली भरघोस निधी मंजूर करुन आणला असून रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी रस्त्यांचे कामांबरोबर बारमाही वाहतूकीसाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी मोठे व छोटे पूल याही कामांना प्राधान्य देऊन या पूलांचे कामांसाठीही निधी मंजूर करत प्रत्यक्ष पूलांची कामे मार्गी लावल्याने ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मतदारसंघात रस्त्यांबरोबर पूलांचेही जाळे निर्माण झाले आहे.

         

No comments:

Post a Comment