Monday, 4 August 2025

'मेघदूत' या नव्या शासकीय निवासस्थानावरून मंत्री शंभूराज देसाई यांची कामकाजास सुरुवात पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठका 'मेघदूत' निवासस्थानी संपन्न




मुंबई (सोमवार, ०४ ऑगस्ट २०२५) :पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांचा 'मेघदूत' या नव्या शासकीय निवासस्थानी रविवारी गृहप्रवेश झाला. त्यानंतर सोमवारपासून त्यांनी या नव्या निवासस्थानावरून कामकाजास धडाक्यात सुरुवात केली. सोमवारी पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या मेघदूत निवासस्थानी बैठका घेऊन मंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला. 

'मेघदूत' या मुंबईतील नव्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब वास्तव्याला गेल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने कामकाजास सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांनी पर्यटन विभागांतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या पर्यटन सुरक्षा दलाबाबत मेघदूत निवासस्थानी आढावा बैठक घेतली. यावेळी पहिल्या टप्प्यात मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते गिरगाव चौपाटी या पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थापन तसेच पर्यटन स्थळ म्हणून आवश्यक सुरक्षा खबरदारी घेण्यासाठी पर्यटन सुरक्षा दल ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. तसेच माजी सैनिक कल्याण विभागांतर्गत 'मेस्को'च्या कामकाजाबाबतही त्यांनी यावेळी बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. सामाजिक उत्तरदायित्व निधी अर्थात खासगी कंपन्यांकडून देण्यात येणारा 'सीएसआर' निधी माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यास साहाय्यक ठरू शकतो. त्यामुळे सीएसआर निधी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाहीसाठी केंद्र शासनास विभागाने प्रस्ताव पत्र पाठवावे, अशी सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. याप्रसंगी पर्यटन आणि माजी सैनिक कल्याण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री शंभूराज देसाईंनी सहकुटुंब घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट 'मेघदूत' निवासस्थान देण्यास सहकार्य केल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह देसाई कुटुंबियांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

*मुंबई (सोमवार, ०४ ऑगस्ट २०२५) :* राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे रविवारी 'मेघदूत' या मुंबईतील नव्या शासकीय निवासस्थानी वास्तव्याला गेल्यानंतर सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या वास्तव्यामुळे 'मेघदूत' निवासस्थानाशी देसाई कुटुंबाच्या असलेल्या जुन्या ऋणानुबंधांशी पुन्हा एकदा जोडून घेण्याची संधी दिल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई आणि कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले.  

रविवारी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे मुंबईतील 'मेघदूत' या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब वास्तव्याला गेले. या निवासस्थानाशी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या अनेक जुन्या आठवणी जुळलेल्या आहेत. याचे कारण मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा व महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांचे दीर्घकाळ वास्तव्य या निवासस्थानात होते. त्यामुळे देसाई कुटुंब १९६० च्या दशकात या निवासस्थानी वास्तव्याला होते. येथेच मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांचा विवाहानंतर विधिवत गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला होता. तसेच त्यांच्या पोटी मंत्री शंभूराज देसाई यांचा जन्मही याच निवासस्थानी देसाई कुटुंबिय वास्तव्याला असताना झाला होता. मंत्री शंभूराज देसाई यांच्या बालपणीची सुरुवातीचे काही वर्षे याच निवासस्थानी खेळण्या-बागडण्यात गेली. त्यामुळे या निवासस्थानाबद्दल देसाई कुटुंबियांच्या भावविश्वात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. आता हेच निवासस्थान मंत्री शंभूराज देसाई यांनाही मिळाल्यामुळे 'मेघदूत'मध्ये ५५ वर्षांनंतर देसाई कुटुंबियांचे पुनर्आगमन झाले आहे. त्यात या निवासस्थानी याआधी गेली काही वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वास्तव्याला होता. त्यांनी हे निवासस्थान सोडल्यानंतर ते मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे वर्ग करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमूल्य सहकार्य असल्याची भावना शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच याबद्दल आभाराचे पत्र देऊन मंत्री देसाई आणि कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले. याप्रसंगी त्यांचा मुख्यमंत्र्यांशी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या योगदानाबद्दल आणि जुन्या आठवणींबद्दल मनमोकळा संवाद झाला. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, अस्मितादेवी देसाई व जयराज देसाई उपस्थित होते.

Saturday, 2 August 2025

कोरिवळे विकास सेवा सोसायटीमध्ये 40 वर्षानंतर सत्तांतर घडवत शिवसेनेची सत्ता. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदशनाखाली सत्तांतर घडवत सर्व 12 उमेदवार विजयी.

 

 

दौलतनगर दि.02:- कोरिवळे विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 12 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी बहुमताने पाटणकर गटाच्या सर्व उमेदवारांचा पराभव केला. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कोरिवळे विकास सेवा सोसायटीमध्ये श्री भराडीदेवी शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व उमेदवारांनी 40 वर्षानंतर सत्तांतर घडवत विजयश्री खेचून आणून सोसायटीवरील आपले वर्चस्व सिद्ध केले.

          मारुलहवेली विभागातील राजकीयदृष्टया संवेदनशिल असलेल्या कोरिवळे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या 12 जांगसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता. गेल्या महिनाभरापासून कोरिवळे सोसायटीचे पंचवार्षिक निवडणुकीची लगबग सुरु होती.प्रचाराने ऐन पावसाळयामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. कोरिवळे सोसायटीसाठी एकूण 325 सभासद असून त्यापैकी 165 सभासद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 12 जागांसाठी मतदान कार्यक्रम जाहिर झाला. त्यामधील भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील जागा रिक्त राहिली. उर्वरित 12 जागांसाठी  शिवसेना व पाटणकर गट यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली श्री भराडीदेवी शेतकरी विकास पॅनेलमधील विजयी उमेदवार किसन यशवंत दिंडे,प्रकाश आनंदा पाटील,उत्तम पिलोबा शिंदे,दिलीप शंकर शिंदे,राम दिनकर शिंदे,वसंत तुकाराम शिंदे,सुरेश हरीबा शिंदे,रघुनाथ विष्णू शिद्रुक,इंदुताई कुंडलीक शिंदे,यमुनाताई आनंदराव शिंदे,रघुनाथ विठोबा मस्के,दादासो जगन्नाथ दादासो पुजारी हे उमेदवार मोठया फरकाने निवडून आले. विजयी उमेदवारांनी निकाल घोषित होताच गुलालांची उधळण करीत व फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला.या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी शिवाजी आण्णा शिंदे, राहूल शिंदे, निवास शिंदे, सुभाष शिंदे,जालिंदर शिंदे, पांडूरंग शिंदे,हणमंत शिंदे, वाय.ए.शिंदे,विद्याधर शिंदे,वाय.टी.शिंदे,शशिकांत शिंदे,नाथा शिंदे,दादासो पाटील,सागर शिंदे,सोमनाथ शिंदे,संदेश शिंदे,शुभम शिंदे,विशाल शिंदे,पंकज शिंदे,श्रीराम शिंदे,के.वाय.दिंडे,सुरज शिद्रुक,रामभाऊ शिद्रुक,नागेश शिद्रुक यांनी परिश्रम घेतले. विजयी उमेदवारांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),माजी चेअरमन अशोकराव पाटील, ॲङ मिलिंद पाटील, ॲङ डी.पी.जाधव, विजय पवार, संतोष गिरी,दादासो जाधव,आनंदा मोहिते  यांनी अभिनंदन केले.