सहयाद्री
व्याघ्र प्रकल्पाचे शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे सहयाद्री व्याघ्र प्रकल्प अशा नामविस्तारासाठी शिफारस करण्याचा बैठकीत निर्णय- गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईं यांची माहिती
दौलतनगर दि.07 :- केंद्र व राज्य शासनाकडून पश्चिम घाटामध्ये
सहयाद्री व्याघ्र प्रकल्प असून केंद्र व राज्य शासनाच्या
माध्यमातून साकारत असलेल्या या सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचे शिवसेना प्रमुख
स्व.बाळासाहेब ठाकरे सहयाद्री व्याघ्र प्रकल्प असा नामविस्तार करण्यासाठी राज्य
शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान
नियामक मंडळाचे बैठकीमध्ये झाला असल्याची
माहिती गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्यातील सहयाद्री व्याघ्र राखीव
संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची सन 2020-21 ची सभा व्हिडीओ कॉन्फरंस
व्दारे पार पडली. या बैठकीत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून गृह
राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई,नागपूर येथून नियामक मंडळाचे अध्यक्ष वनमंत्री
ना.संजय राठोड, आमदार आशिष जैसवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) सुरेश गैरोला,
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकुडकर,मुंबई येथून प्रधानसचिव वने
मनुकुमार श्रीवास्तव,अप्पर प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, वनसंरक्षक तथा
वनक्षेत्रपाल सत्यजित गुजर,उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा,उपसंचालक महादेव
मोहिते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे,सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजिव)
सुरेश साळूंखे व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की,
सहयाद्री व्याघ्र प्रकल्प हा केंद्र व राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून
या प्रकल्पाच्या माध्यमातून वनविभागामध्ये वाघाचे संवर्धन करण्याचा महत्तवाचा हेतु
असल्याने राज्य शासनाकडून यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करुन प्रतिवर्षी विविध योजना
राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या या महत्त्वकांक्षी असलेल्या सहयाद्री
व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सहयाद्री व्याघ्र
प्रकल्प असे नामविस्तार करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय आजच्या
सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात
आला.यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी या शिफारसीला मान्यता देऊन तसा प्रस्ताव
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार संजय राठोड यांचेमार्फत कॅबिनेटमध्ये
मंजूरीकरीता सादर करण्याचे एकमताने ठरले. सहयाद्री
व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सहयाद्री व्याघ्र
प्रकल्प असे नामकरण करण्याकरीता गेल्या दोन वर्षापासून शासनाकडे सातत्याने
पाठपुरावा सुरु होता. सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील जास्तीत जास्त विकास कामे
करण्यात यावीत असे निर्देश असून सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये विविध विकास कामे
करताना संबंधित लोकप्रतिनिधींना विचारात घेऊनच हि विकास कामे करण्यात यावीत अशी
मागणी केली.तसेच सहयाद्री व्याघ्र राखीव संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या सन
2020-21 च्या आराखडयात पाटण मतदारसंघातील पर्यटन आराखडयाचा समावेश करुन जास्तीत
जास्त निधीची तरतूद करावी.तसेच सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली प्राण्याची
पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पाणी साठे व जलस्त्रोतांचे संवर्धन करणे तसेच
सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाला राज्यातून येणाऱ्या पर्यटनासाठी येणाऱ्या
पर्यटकांकरीता जागो-जागी वॉकिंग ट्रॅकची निर्मिती व पर्यटनाचे पॉईंट विकसित करुन
पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याच्या सुचना मंत्री
देसाई यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री देसाई यांनी सुचविलेल्या पर्यटन आराखड्याचा समावेश प्राधान्याने
करा-वनमंत्री ना संजय राठोड
गृहराज्य मंत्री नामदार शंभूराज
देसाई यांनी सुचविलेल्या सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटन वाढीकरीता आवश्यक
असलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील पर्यटन आराखडयाचा सहयाद्री व्याघ्र नियामक
मंडळाच्या सन 2020-21 च्या आराखडयात प्राधान्याने समावेश करावा अशा सुचना वनमंत्री
नामदार संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना केल्या असल्याने सहयाद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये
पर्यटन विकासाला चालना मिळणार असून यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत
होणार आहे.
No comments:
Post a Comment