Monday, 8 June 2020

कोरोना रुग्ण सापडल्याने जांभेकरवाडी ग्रामस्थांनी घाबरु नये. जांभेकरवाडी गावाची नामदार शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांसह केली पहाणी.


        
दौलतनगर दि.08 :-गत आठवडयात पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असून जांभेकरवाडीत कोरोना रुग्ण सापडल्याने गावांत सर्वत्र काळजीचे सावट निर्माण झाले आहे. परंतु प्रशासनाला बरोबर घेऊन आम्ही कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असल्याने जांभेकरवाडी ग्रामस्थांनी घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसून शासकीय यंत्रणेला ग्रामस्थांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आवाहन नामदार शंभूराज देसाई यांनी जांभेकरवाडी ग्रामस्थांना केले.
       कोरोना रुग्ण सापडलेल्या जांभेकरवाडी गावांस त्यांनी काल अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत. पाटण तालुक्यात नवसरी व जांभेकरवाडी या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले असून नवसरी गावाला भेट दिल्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी जांभेकरवाडी येथे गावातील जनतेला घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आवाहन करण्याकरीता तसेच प्रशासनाने केलेल्या उपाय योजना पाहणेकरीता शासकीय अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन तेथील सर्व परिस्थितीची पाहणी केली.
               यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, गावामध्ये कुणीही भिऊन जावू नका असे आवाहन करीत त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याकरीता आम्ही सर्वजण कार्यरत आहोत असे जांभेकरवाडी गावातील जनतेला सांगितले. तसेच गावकऱ्यांना जीवनावश्यक साहित्य मिळणेसंदर्भात प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत.याचीही माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली व दोन दिवसांत धान्य पुरवठा करण्याच्या सुचना पुरवठा विभागाला केल्या.तसेच गावामध्ये दररोज आरोग्य विभागाने गावातील ग्रामस्थांचा सर्वे करुन ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गावकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी गावांमध्ये पिण्याचे पाणी तसेच वीजपुरवठा सुरळीत राहील याची प्रशासनाने व्यवस्था करा.गावात नाकाबंदी करण्यात आलीच आहे परंतू बाहेरचे कोणी गांवात येत नाही ना? आणि गावातील कोण बाहेर जात नाही ना?  याची तपासणी गावकऱ्यांनीच करावी जेणेकरुन संकट वाढणार नाही. सापडलेला रुग्णावर उपचार सुरुच आहे परंतू त्या व्यक्तीच्या कोण संपर्कात आले असतील तर त्यांनी माहिती न लपविता प्रशासनाला सांगावी. प्रशासनाचे सहकार्य आहेच गावकऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करुन लवकरात लवकर हे गांव कोरोनामुक्त होईल याची काळजी गावकऱ्यांनीच घ्यावी असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. गावांत कसल्या प्रकारची अडचण तर नाही ना? अशा प्रकारे विचारणा करुन अडचणी असतील तर प्रशासनाला सांगा असेही ना.शंभूराज देसाईंनी गावचे सरपंच तानाजी घाडगे, उपसरपंच सत्यवान कदम, गणपत कदम व पोलिस पाटीलविजय कदम यांना सांगितले.
               यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,मंडल अधिकारी ब्रम्हे, ग्रामसेवक धाराशिवकर, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, उंब्रज पोलिस स्टेशनचे सपोनि अजय गोरड, विशाल पाटील, यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment