Wednesday 24 February 2021

पाटण येथील मराठा आरक्षणाच्या राज्यव्यापी साखळी आंदोलनाला गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी दिली भेट. राज्यमंत्री म्हणून राज्य शासनाची भूमिका केली स्पष्ट.

           दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- मराठा समाजाला आरक्षण मिळणे करीता पाटण तहसिल कार्यालयाच्या बाहेर पाटण तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी साखळी ठिय्या आंदोलन गेल्या 15 दिवसापासून सुरु आहे.आज या साखळी ठिय्या आंदोलनाला मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे  गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी भेट दिली.आंदोलनात सहभागी झालेले मराठा समाजाचे पुरुष व महिला यांच्याशी त्यांनी चर्चा करीत मराठा समाजाला आरक्षण मिळणेकरीता राज्य शासनाची काय भूमिका आहे, राज्य शासनाचे काय प्रयत्न सुरु आहेत हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

           आज शासकीय मिटींगाच्या निमित्ताने राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे पाटण येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आले असता गत 15 दिवसापासून पाटण तहसिल कार्यालयाच्या बाहेर आपले पाटण तालुक्यातील  मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळणेकरीता बेमुदत राज्यव्यापी साखळी ठिय्या आंदोलन सुरु असल्याचे त्यांना समजताच शासकीय मिटींगा उरकून ते थेट या आंदोलनस्थळी पोहचले. प्रांरभी आंदोलन स्थळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयास त्यांनी अभिवादन केले व या साखळी ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. व राज्य शासनाची मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका आहे याकरीता राज्य शासनाचे काय प्रयत्न सुरु आहेत हे त्यांनी सांगितले.

               यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देणेसंदर्भात मंत्रीमंडळ समितीने नुकतीच बैठक घेतली त्यापुर्वी राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण, नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जावून सर्वोच्च न्यायालयातील सर्व ज्येष्ठ वकीलांबरोबर यासंदर्भात सविस्तर चर्चा देखील केली.शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आपणांस सांगेन मराठा आरक्षणा संदर्भात राज्य शासनाने जो निर्णय घेतला आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकला पाहिजे त्या निर्णयाला कोर्टाने मान्यता दिली पाहिजे याकरीता जे जे करावे लागेल ते सर्व करण्याची राज्य शासनाची तयारी आहे व त्यादृष्टीने शासनाचे प्रयत्न देखील सुरु आहेत.मराठा समाजाला आरक्षण देणेकरीताच्या विषयामध्ये राज्य शासन यात कुठेही कमी पडणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे हे स्वत: याचा सातत्याने आढावा घेत आहेत. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून देणेकरीता मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखाली शासन कसोशीने आपले प्रयत्न करीत असून मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाचे जे म्हणणे आहे ते सुप्रीम कोर्टाने मान्य करावे, स्विकारावे याकरीताही शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. दोन वर्षापुर्वी मराठा आरक्षण मिळावे याकरीता राज्यामध्ये सर्वपक्षीय आंदोलने झालेली आपण सर्वांनी पाहिली.आता माझेकडे राज्याचे गृह खाते आहे या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये करण्यात आलेले सर्व गुन्हे आपल्या शासनाने माघारी घेतले आहेत. राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात मी एवढेच सांगेन मराठा समाजाला आरक्षण मिळणेसंदर्भात राज्य शासनाकडून सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु आहेत अशी शासनाची भूमिका त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केली.

Sunday 21 February 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंचे 01 मार्च पर्यंतचे सर्व नियोजित बैठका,कार्यक्रम रद्द.

           दौलतनगर दि.22 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- राज्यात गेल्या काही दिवसात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दि. 22 फेब्रुवारी पासून राज्यात सामाजिक,धार्मिक कार्यक्रम,मिरवणूक,मोर्चे,यात्रांवर शासनाने बंदी घालण्यात आली असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे दि.01 मार्च, 2021 पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम,बैठका रद्द केल्या असून त्यांचेकडील गृहविभागाच्या अत्यंत तातडीच्या व महत्त्वाच्या बैठका गरजेनुसार ते घेणार असल्याची माहिती  गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे जनसंपर्क कक्षातून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

             राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक,धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.त्यामुळे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी त्यांचे दि.01 मार्च, 2021 पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम,बैठका रद्द केल्या आहेत. दरम्यान या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याकरीता गृहविभागामार्फत नियम व बंधने घालण्याकरीता सर्व नियमांचे पालन करुन गृह विभागाच्या महत्त्वाच्या व अत्यंत तातडीच्या बैठका गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे गरजेप्रमाणे घेणार आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी ‘होय मीच जबाबदार’ ही मोहिम राबवून मास्क घालणे,सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरने हातू धुणे हे त्रिसुत्री कार्यक्रम राबवून यातून लॉकडाऊन टाळणे चे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्याचे पालन राज्यातील जनतेने काटेकोरपणे करावे व शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोना टाळावा अशी विनंतीही  गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केली असल्याची माहिती ना. शंभूराज देसाई यांचे जनसंपर्क कक्षातून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती करा,मास्क नसेल तर कडक कारवाई करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत सुचना.

           दौलतनगर दि.22 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-राज्यामध्ये परत एकदा मोठया प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे.याचा प्रसार आपले ग्रामीण भागात होवू नये,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता नागरिकांनी घराबाहेर पडल्यानंतर मास्क वापरणे गरजेचे असल्याने कोरोना संसर्गा बाबत दक्षता घेणेकरीता तालुका प्रशासनाने मुख्यत: पोलीस विभागाने नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती करावी आणि नागरिकांनी मास्क नाही वापरले तर त्यांचेवर कडक कारवाई करावी तसेच तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये याकरीता तालुका प्रशासनाने त्यांच्या अखत्यारितील सर्व यंत्रणा सतर्क ठेवाव्यात व कोरोना चाचण्यामध्ये वाढ करावी अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना केल्या.

            मागील काही दिवसांपासून राज्यासह सातारा जिल्हयामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी दोन दिवसापुर्वी जिल्हास्तरीय सर्व शासकीय यंत्रणेची आढावा बैठक घेवून आवश्यक त्या सुचना केल्या आज त्यांचे अध्यक्षतेखाली दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी  पाटण विधानसभा मतदारसंघातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरील प्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या बैठकीस तहसिलदार योगेश टोमपे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.चंद्रकांत यादव, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सपोनि अजय गोरड,ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील,कोयनेचे सपोनि सी.एस.माळी आदींची उपस्थिती  होती.

                   या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना रुग्णांच्या संदर्भात आढावा घेतला.सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय सर्व संबधित अधिकारी यांची दोनच दिवसापुर्वी मी बैठक घेवून आवश्यक त्या सुचना केल्या आहेत.सध्या वातारणामध्येही अचानक बदल झाल्याने सर्दी,खोकला व ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असून अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी निष्काळजीपणे न वागता त्यांनी तात्काळ आवश्यक त्या तपासणी  करण्याच्या  सुचना  कराव्यात.कोरोनाचा प्रसार परत होवू नये याकरीता प्रत्येक नागरिकांने मास्क वापरणे सक्तीचे करा.त्याचबरोबर कोरोना चाचण्याही वाढवा जेणेकरुन कोरोना   बाधितांचे प्रमाण आपले लक्षात येईल आणि त्याप्रमाणे उपाययोजना ही आपणांस करता येतील.कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये या करीता तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी गावांगावामध्ये शासकीय यंत्रणेमार्फत जनजागृती करण्याचे काम सुरु करावे.आरोग्य सेवक,ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील यांच्यामार्फत गावांगावात जावून दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात याव्यात.

                 सध्या लग्नकार्य मोठया प्रमाणात होत आहेत परवानगी घेवून ही कार्य सुरु असली तरी तसेच मोठमोठे बाजार त्याचबरोबर मोठमोठया बाजारपेठांमध्ये गर्दी होवून अशा ठिकाणी कोठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये याचीही काळजी यंत्रणेकडून घेण्यात यावी.गर्दीवर नियंत्रण ठेवत कोरेानावर मात करण्याचे आवाहन शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावे.अश्याही सुचना त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या.

चौकट:- कोरोना अजुन संपला नाही याची जनजागृती करा.:- ना.शंभूराज देसाई

             मध्यतंरीच्या काळात कोरोना रुग्ण सापडायचे कमी झाल्याने आता कोरोना संपला अशी मानसिकता सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाली होती व आजही आहे परंतू कोरोना रुग्णांच्या संख्येत आता वाढ होवू लागली आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनची वेळ परत येवू नये याकरीता आताच काळजी घ्यावी कोरोना अजुन संपला नाही याची जनजागृती करा अशा सुचनाही त्यांनी यावेळी ना.शंभूराज देसाईंनी केल्या.

Tuesday 16 February 2021

राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे शुभहस्ते दि.19 फेब्रुवारी रोजी पाटण विधानसभा मतदारसंघात मंजुर 155 विविध विकासकामांचा ऑनलाईन ई-भूमिपुजन शुभारंभ. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा पश्चिम महाराष्ट्रातील नाविन्यपुर्ण उपक्रम.

दौलतनगर दि.17 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचे कुशल नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा जिल्हयातील पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाचे विविध लेखाशिर्षाखाली सन 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 32 कोटी 37 लक्ष रुपयांच्या मंजुर एकूण 155 विविध विकासकांमाचा ऑनलाईन ई-भूमिपुजन शुभारंभ मुख्यमंत्री ना.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचे शुभहस्ते शुक्रवार दि.19 फेब्रुवारी,2021 रोजी दुपारी 03.30 वा आयोजीत करण्यात आला आहे.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा पश्चिम महाराष्ट्रातील नाविन्यपुर्ण उपक्रम असून या उपक्रमामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

              पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सन 2020-21 या आर्थिक वर्षात राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे कुशल नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचे पाटण या डोंगरी व दुर्गम विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,2515 योजना ग्रामीण विकास,रस्ते विकास महामंडळ या विविध लेखाशिर्षातून ग्रामीण भागातील गावपेाहोच रस्ते, गावातील वाडयावस्त्यांमधील अंतर्गत रस्ते,गावे वाडया जोडणारे मोठे रस्ते तसेच सातारा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाविण्यपुर्ण योजना (विशेष घटक) योजनेतंर्गत मागासवर्गीय वस्त्यांमध्ये या वस्त्यांमधील विद्यार्थी- विद्यार्थींनीना अभ्यासाकरीता अद्यावत अभ्यासिका बांधणे अशा प्रकारची एकूण 32 कोटी 37 लक्ष रुपयांची एकूण 155 विविध विकासकांमे मंजुर करुन आणली आहेत. या 155 विविध विकासकामांचा ऑनलाईन ई-भूमिपुजन शुभारंभ हा मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे शुभहस्ते घेण्याचा मानस गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री यांचेकडे व्यक्त केला मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी तात्काळ यास मान्यता देवून या ऑनलाईन ई-भूमिपुजन समारंभास मान्यता दिली आहे.

              गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे विशेष प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या या विविध विकासकामांमुळे पाटणसारख्या ग्रामीण व डोंगरी भागातील अनेक गांवे व डोंगरपठारावर वसलेल्या वाडयावस्त्यांना या विविध विकासकामांचा चांगला लाभ होणार आहे. मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वामुळे जनहितार्थ कामे पाटण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंजुर झाली असल्यामुळे पाटण मतदार संघातील जनतेमध्ये अत्यानंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.दरम्यान यापुर्वी दुर्गम,डोंगरी असणाऱ्या 261,पाटण विधानसभा मतदारसंघात एकाच वर्षात एवढया मोठया संख्येने कधीही विविध प्रकारची विकासकांमे मंजुर झाली नव्हती परंतू महाविकास आघाडी सरकारने पाटणसारख्या दुर्गम भागाला विविध विकासकामे मंजुर करुन देवून न्याय मिळवून दिला आहे.या 155 विविध विकासकामांचा ऑनलाईन ई-भूमिपूजन समारंभ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय ना.उध्दवजी ठाकरे यांचे शुभहस्ते दि.19 फेब्रुवारी,2021 रोजी दुपारी 03.30 वा मुंबई येथून संपन्न होत आहे.याचा पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेला मतदारसंघातील शिवसैनिक तसेच पदाधिकारी यांना अत्यानंद होत आहे.

Wednesday 10 February 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यात 107 पैकी 68 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाची सत्ता. गृहराज्यमंत्री ना.देसाईंनी केले सरपंच,उपसरपंचाचे अभिनंदन.

दौलतनगर दि.10 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- पाटण विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूकामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने चांगलीच बाजी मारली आहे. पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीच्या सलग तीन दिवस सुरु असलेल्या सरपंच,उपसरपंच निवडीची प्रक्रिया आज पुर्ण झाली.पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीपैकी 68 ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाची सत्ता आली असून 68 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पक्षाचे 68 सरपंच व 67 उपसरपंच विराजमान झाले आहेत. सरपंच, उपसरपंचपदी निवड झालेल्यांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विशेष अभिनंदन केले आहे.

          संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये पाटण तालुक्यातील 107 तर पाटण मतदारसंघातील सुपने तांबवे पंचायत समिती गणामध्ये 12 ग्रामपंचायतींचा समावेश होता.निवडणूका पार पडलेल्या 119 ग्रामपंचायतीपैकी एकूण 75 ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने चांगलीच बाजी मारत पाटण विधानसभा मतदारसंघात एकहाती सत्ता मिळविली आहे.पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया दि.08,09 व 10 अशी सलग तीन दिवस सुरु होती ही प्रक्रिया आज पुर्ण झाली.ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच निवडीच्या प्रक्रियेमध्ये 107 ग्रामपंचायतीपैकी 68 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाच्या सरपंच,उपसरपंचाचा झेंडा 68 ग्रामपंचायती मधील सदस्यांनी फडकविला आहे.पाटण तालुक्यात एकूण 746 तर सुपने तांबवे पंचायत समिती गणामध्ये 106 असे एकूण 852 उमदेवारांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली यामध्ये 536 उमदेवार हे शिवसेना पक्षाचे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे नेतृत्व मानणारे भरघोस मतांनी निवडून आले.यामध्ये पाटण तालुक्यातील 474 तर सुपने तांबवे गणातील 62 ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.

              पाटण मतदारसंघाचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे राज्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करीत आहेत त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकांकडे संपुर्ण सातारा जिल्हयाचे लक्ष लागले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे व शिवसेना पक्षाचे पारडे जड झाले आहे. शिवसेना पक्षाचे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे वर्चस्व तसेच सरपंच व उपसरंपच निवडीमध्ये सत्ता मिळविलेल्या ग्रामपंचायतीमध्ये बोंद्री, दिवशी खुर्द, घाणबी,वाटोळे, कातवडी, खिवशी,पिपंळोशी,दुसाळे,मालोशी, बांबवडे,आंबळे,मणदुरे,बोडकेवाडी,मंद्रुळहवेली,ठोमसे,आडदेव,त्रिपुडी,नाडोली,कोदळ पुर्नवसन,चोपडी,मुळगांव, कवरवाडी,आंब्रुळे,हावळेवाडी,जरेवाडी,सांगवड,कोरीवळे,शिंदेवाडी,सोनवडे,चोपदारवाडी,वाडीकोतावडे,गोकुळ तर्फ पाटण,आटोली,पाचगणी,आंबेघर तर्फ मरळी,धावडे,पेठशिवापुर,कोकीसरे,तामिणे,सळवे,बाचोली, कोळेकरवाडी, सातर, जानुगडेवाडी,उमरकांचन,धामणी,वाझोली,मस्करवाडी,चव्हाणवाडी धामणी, मोरेवाडी कुठरे, पाचपुतेवाडी, कसणी, निगडे,पवारवाडी, काळगांव, सुपुगडेवाडी, शिद्रुकवाडी,मानेवाडी, काढणे, गुढे, खळे, या 61 ग्रामपंचायतीवर थेट सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी झाल्या आहेत तर काहीर, टेळेवाडी, वजरोशी, कामरगांव या 04 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच तसेच आरक्षणामुळे सरपंचपद  रिक्त असल्याने चव्हाणवाडी नानेगांव, खोनोली व पाळशी या 03 ठिकाणी तसेच मुरुड,पाठवडे व दिवशी बु या तीन ग्रामपंचायती मध्ये शिवसेना पक्षाचे तीन शिवसेनेचे उपसरपंच अशाप्रकारे 68 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाची सत्ता स्थापन झाली असून एकूण 68 सरपंच व 67 उपसरपंच हे शिवसेना पक्षाचे विराजमान झाले आहेत. सरपंच,उपसरपंचपदी निवड झालेल्यां सर्वांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विशेष अभिनंदन केले आहे.

चौकट:- सुपने तांबवे गणातही ना.देसाईंचे वर्चस्व, 07 ठिकाणी बाजी. 

              कराड तालुक्यातील सरपंच,उपसरपंचाच्या निवडीसंदर्भात स्थगिती असल्याने सुपने तांबवे गणातील 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंचाच्या निवडी अद्याप झाल्या नाहीत.यामध्ये 12 पैकी 07 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाने गृहराज्यमंत्री ना.देसाईंच्या मार्गदर्शनाखाली सत्ता मिळविली आहे. यामध्ये तांबवे, म्होर्पे, वस्ती साकुर्डी, गमेवाडी, आबईचीवाडी, पाडळी केसे व बेलदरे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.