दौलतनगर दि.22 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- राज्यात
गेल्या काही दिवसात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता
येत नाही. त्यामुळे दि. 22 फेब्रुवारी पासून राज्यात सामाजिक,धार्मिक कार्यक्रम,मिरवणूक,मोर्चे,यात्रांवर
शासनाने बंदी घालण्यात आली असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री
ना. शंभूराज देसाई यांचे दि.01 मार्च, 2021 पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम,बैठका
रद्द केल्या असून त्यांचेकडील गृहविभागाच्या अत्यंत तातडीच्या व महत्त्वाच्या बैठका
गरजेनुसार ते घेणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री
ना. शंभूराज देसाई यांचे जनसंपर्क कक्षातून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री
ना. उध्दवजी ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना दिला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी
सामाजिक,धार्मिक
कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.त्यामुळे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज
देसाई यांनी त्यांचे दि.01 मार्च, 2021 पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम,बैठका रद्द
केल्या आहेत. दरम्यान या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये याकरीता गृहविभागामार्फत
नियम व बंधने घालण्याकरीता सर्व नियमांचे पालन करुन गृह विभागाच्या महत्त्वाच्या व
अत्यंत तातडीच्या बैठका गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे गरजेप्रमाणे घेणार आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी ‘होय मीच जबाबदार’ ही मोहिम राबवून मास्क घालणे,सामाजिक अंतर
राखणे, सॅनिटायझरने हातू धुणे हे त्रिसुत्री कार्यक्रम राबवून यातून लॉकडाऊन टाळणे
चे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्याचे पालन राज्यातील
जनतेने काटेकोरपणे करावे व शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोना टाळावा अशी विनंतीही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केली असल्याची
माहिती ना. शंभूराज देसाई यांचे जनसंपर्क कक्षातून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment