दौलतनगर
दि.10 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय)
:- पाटण विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या 119 ग्रामपंचायतीच्या
निवडणूकामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने चांगलीच बाजी मारली आहे. पाटण तालुक्यातील
107 ग्रामपंचायतीच्या सलग तीन दिवस सुरु असलेल्या सरपंच,उपसरपंच निवडीची प्रक्रिया
आज पुर्ण झाली.पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीपैकी 68 ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाची सत्ता आली असून 68 ग्रामपंचायतीमध्ये
शिवसेना पक्षाचे 68 सरपंच व 67 उपसरपंच विराजमान झाले आहेत. सरपंच, उपसरपंचपदी निवड
झालेल्यांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विशेष अभिनंदन केले आहे.
संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण 119 ग्रामपंचायतीच्या
निवडणूका पार पडल्या. यामध्ये पाटण तालुक्यातील 107 तर पाटण मतदारसंघातील सुपने तांबवे
पंचायत समिती गणामध्ये 12 ग्रामपंचायतींचा समावेश होता.निवडणूका पार पडलेल्या 119 ग्रामपंचायतीपैकी
एकूण 75 ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना
पक्षाने चांगलीच बाजी मारत पाटण विधानसभा मतदारसंघात एकहाती सत्ता मिळविली आहे.पाटण
तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया दि.08,09 व 10
अशी सलग तीन दिवस सुरु होती ही प्रक्रिया आज पुर्ण झाली.ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच
निवडीच्या प्रक्रियेमध्ये 107 ग्रामपंचायतीपैकी 68 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाच्या
सरपंच,उपसरपंचाचा झेंडा 68 ग्रामपंचायती मधील सदस्यांनी फडकविला आहे.पाटण तालुक्यात
एकूण 746 तर सुपने तांबवे पंचायत समिती गणामध्ये 106 असे एकूण 852 उमदेवारांनी ग्रामपंचायतीची
निवडणूक लढविली यामध्ये 536 उमदेवार हे शिवसेना पक्षाचे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंचे नेतृत्व मानणारे भरघोस मतांनी निवडून आले.यामध्ये पाटण तालुक्यातील 474 तर
सुपने तांबवे गणातील 62 ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.
पाटण
मतदारसंघाचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे राज्यमंत्री म्हणून
राज्याचे नेतृत्व करीत आहेत त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या
निवडणूकांकडे संपुर्ण सातारा जिल्हयाचे लक्ष लागले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे व शिवसेना पक्षाचे पारडे जड झाले आहे. शिवसेना
पक्षाचे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे वर्चस्व तसेच सरपंच व उपसरंपच निवडीमध्ये
सत्ता मिळविलेल्या ग्रामपंचायतीमध्ये बोंद्री, दिवशी खुर्द, घाणबी,वाटोळे, कातवडी,
खिवशी,पिपंळोशी,दुसाळे,मालोशी, बांबवडे,आंबळे,मणदुरे,बोडकेवाडी,मंद्रुळहवेली,ठोमसे,आडदेव,त्रिपुडी,नाडोली,कोदळ
पुर्नवसन,चोपडी,मुळगांव, कवरवाडी,आंब्रुळे,हावळेवाडी,जरेवाडी,सांगवड,कोरीवळे,शिंदेवाडी,सोनवडे,चोपदारवाडी,वाडीकोतावडे,गोकुळ
तर्फ पाटण,आटोली,पाचगणी,आंबेघर तर्फ मरळी,धावडे,पेठशिवापुर,कोकीसरे,तामिणे,सळवे,बाचोली,
कोळेकरवाडी, सातर, जानुगडेवाडी,उमरकांचन,धामणी,वाझोली,मस्करवाडी,चव्हाणवाडी धामणी,
मोरेवाडी कुठरे, पाचपुतेवाडी, कसणी, निगडे,पवारवाडी, काळगांव, सुपुगडेवाडी, शिद्रुकवाडी,मानेवाडी,
काढणे, गुढे, खळे, या 61 ग्रामपंचायतीवर थेट सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी झाल्या
आहेत तर काहीर, टेळेवाडी, वजरोशी, कामरगांव या 04 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच तसेच
आरक्षणामुळे सरपंचपद रिक्त असल्याने चव्हाणवाडी
नानेगांव, खोनोली व पाळशी या 03 ठिकाणी तसेच मुरुड,पाठवडे व दिवशी बु या तीन ग्रामपंचायती
मध्ये शिवसेना पक्षाचे तीन शिवसेनेचे उपसरपंच अशाप्रकारे 68 ग्रामपंचायतीवर शिवसेना
पक्षाची सत्ता स्थापन झाली असून एकूण 68 सरपंच व 67 उपसरपंच हे शिवसेना पक्षाचे विराजमान
झाले आहेत. सरपंच,उपसरपंचपदी निवड झालेल्यां सर्वांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी
विशेष अभिनंदन केले आहे.
चौकट:- सुपने तांबवे
गणातही ना.देसाईंचे वर्चस्व, 07 ठिकाणी बाजी.
कराड
तालुक्यातील सरपंच,उपसरपंचाच्या निवडीसंदर्भात स्थगिती असल्याने सुपने तांबवे गणातील
12 ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंचाच्या निवडी अद्याप झाल्या नाहीत.यामध्ये 12 पैकी
07 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाने गृहराज्यमंत्री ना.देसाईंच्या मार्गदर्शनाखाली सत्ता
मिळविली आहे. यामध्ये तांबवे, म्होर्पे, वस्ती साकुर्डी, गमेवाडी, आबईचीवाडी, पाडळी
केसे व बेलदरे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment