दौलतनगर दि.22 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-राज्यामध्ये परत एकदा मोठया प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांच्या
संख्येत वाढ होवू लागली आहे.याचा प्रसार आपले ग्रामीण भागात होवू नये,कोरोनाचा प्रादुर्भाव
रोखण्याकरीता नागरिकांनी घराबाहेर पडल्यानंतर मास्क वापरणे गरजेचे असल्याने कोरोना
संसर्गा बाबत दक्षता घेणेकरीता तालुका प्रशासनाने मुख्यत: पोलीस विभागाने नागरिकांना
मास्क वापरण्याची सक्ती करावी आणि नागरिकांनी मास्क नाही वापरले तर त्यांचेवर कडक कारवाई
करावी तसेच तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये याकरीता तालुका प्रशासनाने
त्यांच्या अखत्यारितील सर्व यंत्रणा सतर्क ठेवाव्यात व कोरोना चाचण्यामध्ये वाढ करावी
अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तालुकास्तरीय
अधिकाऱ्यांना केल्या.
मागील काही दिवसांपासून राज्यासह
सातारा जिल्हयामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने गृहराज्यमंत्री
ना. शंभूराज देसाईंनी दोन दिवसापुर्वी जिल्हास्तरीय सर्व शासकीय यंत्रणेची आढावा बैठक
घेवून आवश्यक त्या सुचना केल्या आज त्यांचे अध्यक्षतेखाली दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी पाटण विधानसभा मतदारसंघातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची
आढावा बैठक झाली.याप्रसंगी त्यांनी वरील प्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना केल्या.या बैठकीस
तहसिलदार योगेश टोमपे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तालुका वैद्यकीय अधिकारी
डॉ.आर.बी.पाटील,ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.चंद्रकांत यादव, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे,उंब्रजचे सपोनि अजय गोरड,ढेबेवाडीचे
सपोनि संतोष पवार, मल्हारपेठचे सपोनि अजित पाटील,कोयनेचे सपोनि सी.एस.माळी आदींची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना रुग्णांच्या संदर्भात आढावा
घेतला.सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. यासंदर्भात
जिल्हास्तरीय सर्व संबधित अधिकारी यांची दोनच दिवसापुर्वी मी बैठक घेवून आवश्यक त्या
सुचना केल्या आहेत.सध्या वातारणामध्येही अचानक बदल झाल्याने सर्दी,खोकला व ताप अशी
लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असून अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी निष्काळजीपणे
न वागता त्यांनी तात्काळ आवश्यक त्या तपासणी
करण्याच्या सुचना कराव्यात.कोरोनाचा प्रसार परत होवू नये याकरीता प्रत्येक
नागरिकांने मास्क वापरणे सक्तीचे करा.त्याचबरोबर कोरोना चाचण्याही वाढवा जेणेकरुन कोरोना बाधितांचे
प्रमाण आपले लक्षात येईल आणि त्याप्रमाणे उपाययोजना ही आपणांस करता येतील.कोरोनाचा
संसर्ग पुन्हा वाढू नये या करीता तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी गावांगावामध्ये
शासकीय यंत्रणेमार्फत जनजागृती करण्याचे काम सुरु करावे.आरोग्य सेवक,ग्रामसेवक, तलाठी,
मंडलाधिकारी, पोलीस पाटील यांच्यामार्फत गावांगावात जावून दक्षता घेण्याच्या सुचना
करण्यात याव्यात.
सध्या लग्नकार्य मोठया प्रमाणात
होत आहेत परवानगी घेवून ही कार्य सुरु असली तरी तसेच मोठमोठे बाजार त्याचबरोबर मोठमोठया
बाजारपेठांमध्ये गर्दी होवून अशा ठिकाणी कोठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये याचीही काळजी
यंत्रणेकडून घेण्यात यावी.गर्दीवर नियंत्रण ठेवत कोरेानावर मात करण्याचे आवाहन शासकीय
यंत्रणेमार्फत करण्यात यावे.अश्याही सुचना त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या.
चौकट:- कोरोना
अजुन संपला नाही याची जनजागृती करा.:- ना.शंभूराज देसाई
मध्यतंरीच्या काळात कोरोना रुग्ण सापडायचे कमी झाल्याने आता कोरोना संपला अशी
मानसिकता सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाली होती व आजही आहे परंतू कोरोना रुग्णांच्या
संख्येत आता वाढ होवू लागली आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनची
वेळ परत येवू नये याकरीता आताच काळजी घ्यावी कोरोना अजुन संपला नाही याची जनजागृती
करा अशा सुचनाही त्यांनी यावेळी ना.शंभूराज देसाईंनी केल्या.
No comments:
Post a Comment