दौलतनगर दि.25
(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-माहे जुलै
महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या
अतिवृष्टीमुळे दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण
रस्त्यांचे,साकव पूलांचे, प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांचे मोठया प्रमाणांत
नुकसान झाले होते.त्यामुळे या मार्गांवरुन दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या
नुकसान झालेल्या विविध विकास कामांचे पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या माहे
डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होण्यासाठी गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केल्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्यांचे व साकव पूलांच्या कामांसाठी 50
कोटी तर प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांच्या भूसंपादनासह सुधारणा
करण्याच्या कामांसाठी 22 कोटी
04 लाख असा एकूण 72
कोटी 04 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला
असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने
प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे
की, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये जुलै महिन्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने
सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे डोंगरी व दुर्गम
भागात दळण-वळण मोठी गैरसोय निर्माण झाली होती.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्यांचे,साकव पूलांचे, प्रमुख
जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांचे पुनर्बांधणीचे कामांना राज्य शासनाच्या माहे
डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधी मंजूर होण्यासाठी प्रस्तावित केली होती.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केल्यानुसार पाटण विधानसभा
मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्यांचे व साकव पूलांच्या दुरुस्तीच्या
कामांसाठी 50 कोटी
तर प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांच्या भूसंपादनासह सुधारणा करण्याच्या
कामांसाठी 22 कोटी
04 लाख असा एकूण 72
कोटी 04 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला
आहे.मंजूर झालेल्या कामांमध्ये सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या ग्रामीण रस्ते व पूलांच्या दुरुस्तीसाठी 50
कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पाटण मणदुरे जळव तारळे पाल रस्ता रामा 398 किमी 1/00 ते
05/00 भाग पाटण ते साखरी रुंदीकरणासह सुधारणा 03 कोटी 20 लाख, पाटण मणदुरे जळव तारळे पाल रस्ता रामा 398 किमी
35/00 ते 38/00 भाग निवडे पुनर्वसन ते पाल रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी 30 लाख, वाखानवस्ती कराड ढेबेवाडी सणबुर महिंद नाटोशी मोरगिरी
चाफेर रस्ता प्रजिमा 55 कि.मी. 42/500 ते 44/500 (भाग कि.मी.42/500 ते 44/00 - महिंद
ते गडगडा ) भुसंपादन व सुधारणा 02 कोटी, चरेगांव चाफळ दाढोली महाबळवाडी येरफळे त्रिपुडी
चोपडी बेलवडे आंब्रुळे कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा 53 कि.मी. 20/700 ते
21/400 (भाग -कि.मी.20/700 ते 21/400 येरफळे
ते त्रिपुडी ) भुसंपादन व सुधारणा 01 कोटी, सातारा गजवडी चाळकेवाडी घाणबी केर पाटण प्रजिमा
29 किमी 49/00 ते 51/00 भाग घाणबी फाटा ते घेरादातेगड फाटा सुधारणा 90 लाख, नागठाणे तारळे पाटण रस्ता प्रजिमा 37 किमी
17/700 ते 13/00 भाग कोंजवडे फाटा ते वजरोशी रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी, इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 कि.मी.
10/200 कसणी गांवाजवळ लहान पुलाचे बांधकाम
02 कोटी, नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी
रस्ता प्रजिमा- 58 कि.मी. 19/880 मध्ये वांग नदीवर मंद्रुळकोळे येथे मोठया पुलाचे बांधकाम
06 कोटी 50 लाख, त्रिपुडी मुळगांव कवंरवाडी नेरळे
गुंजाळी लेढोंरी मणेरी चिंरबे काढोली चाफेर रिसवड ढोकावळे प्रजिमा 123 कि.मी.0/00 ते
26/00(भाग कि.मी.5/00 ते 6/500- कवरवाडी ते चेवलेवाडी) चे बांधकाम 02 कोटी 50 लाख या
कामांचा समावेश आहे.राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या विकास
कामांची लवकरच निविदा कार्यवाही करण्यात येऊन दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या
या रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.