Saturday 25 December 2021

नेरळे गावाचा सर्वांगीण विकास करुन घेण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट हवी-युवा नेते मा.यशराज देसाई. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मंजूर नेरळे येथे कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंत व नदीघाट कामाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 


दौलतनगर दि.25(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- कोविड सारख्या महामारीशी सामना केल्यानंतर सध्या जनजीवन पुर्वपदावर येत असल्याने विकास कामे मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मंजूर झालेल्या नेरळे येथील कोयना नदीकाठी संरक्षक  भिंत व नदीघाटाचे आजच आपण भूमिपूजन करत असून येणाऱ्या काळात नेरळे गावासाठी  जनहिताच्या दृष्टीने आवश्यक असलेली विकास कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लागतील.नेरळे गावाचा सर्वांगीण विकास करुन घेण्यासाठी सर्व ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते यांनी आपली एकटूज कायम ठेवावी असे प्रतिपादन युवा नेते मा.यशराज देसाई यांनी केले.

               नेरळे,ता.पाटण येथील कोयना नदीकाठी पूरसंरक्षक भिंत व नदीघाट बांधणे या 85 लक्ष रुपयांचे कामाचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू,पांडूरंग शिरवाडकर,गोविंद बोर्गे,जयसिंग बोर्गे,आनंदा शिर्के,लक्ष्मण बोर्गे,वसंत रोमण,संदिप कांबळे,निवास शिर्के,संजय डोंगळे यांचे सह नेरळे ग्रामस्थ उपस्थित होते.

              याप्रसंगी ते पुढे म्हणाले की,सन 2014 साली पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांना निवडूण दिल्यानंतर त्यांनी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाच्या विविध योजनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील जनहिताच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या विकास कामांना मोठया प्रमाणांत निधी मंजूर करुन आणत या मंजूर निधीमधून विविध‍ विकास कामे मार्गीही लागली आहेत.आपल्या पाटण तालुक्यामध्ये प्रतिवर्षी मोठया प्रमाणांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे व कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीला वारंवार पूर येऊन या कोयना नदीकाठी वसलेल्या गावांचे पूराच्या पाण्यामुळे नुकसान होत होते.त्यामुळे ना.शंभूराज देसाई यांनी कोयना नदीकाठी वसलेल्या व पूराच्या पाण्यामुळे नुकसान होणाऱ्या पाटण विधानसभा मतदारसंघातील सांगवड,बनपेठवाडी (येराड),नेरळे,गुंजाळी,मंद्रुळ हवेली, गिरेवाडी तसेच सुपने मंडलातील तांबवे,केसे,पश्चिम सुपने व साजूर या गावांलगत कोयना नदीकाठी संरक्षक भिंत व नदीघाट बांधण्याच्या कामांना भरघोस असा निधी मंजूर करुन आणत ही कामे मार्गी लावली.सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याबरोबर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ना.शंभूराज देसाई यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा मतदारसंघातील जनतेने ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वावर विश्वास दाखविला.तालुक्यातील सर्व सामान्य मतदार बंधू भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केल्याने त्यांना राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाच्या अशा पाच विविध खात्यांची जबाबदारीही मिळाली आहे.तसेच वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री म्हणूनही काम पहात आहेत.गत देान वर्षामध्ये आपण सर्व कोरेाना सारख्या महा भयंकर महामारीला सामोरे जात होतो.कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाच्या महसूलावर परिणाम झाला.परिणामी विकास कामांवर काही प्रमाणांत निर्बंध येऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले.सध्या जनजिवन पुर्वपदावर येत असताना मंजूर असलेली विकास कामे मार्गी लागत असून ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून यापुढील काळामध्ये उर्वरित विकास कामांसाठी मोठया प्रमाणांत निधी मंजूर होईल असे सांगत नेरळे गावाचा सर्वांगीण विकास करुन घेण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ व युवकांनी आपली एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन मा.यशराज देसाई यांनी शेवटी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  व आभार शंकर सुतार यांनी मानले.

चौकट:-सर्व शेतकरी व सभासद यांनी पिकविलेला ऊस आपल्या कारखान्यास गळीतास घालून सहकार्य करा.

               गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे गावांमधील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी कटीबध्द असून त्यांचे मार्गदर्शनाखाली आपण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम चांगल्या पध्दतीने सुरु आहे. परंतू या अगोदर ऊस तोडणी यंत्रणेमुळे काही अंशी नेरळे गावातील ऊस हा बाहेरच्या कारखान्यांना गळीतास जात होता.चालू गळीत हंगामामध्ये आवश्यक तेवढी तोडणी यंत्रणा उपलब्ध असल्याने गावातील शेतकरी व सभासद यांनी आपला पिकविलेला ऊस लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याला घालून सहकार्य करण्याचे आवाहनही मा.यशराज देसाई यांनी कार्यक्रमा दरम्यान नेरळे गावातील शेतकरी,सभासद व ग्रामस्थ यांना केले.

No comments:

Post a Comment