दौलतनगर दि.22(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यातील 89 ग्रामपंचायतीमधील 140 रिक्त जागांसाठी पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला होता. त्यानुसार या पोट निवडणूकांमध्ये 32 ठिकाणी एकही अर्ज न दाखल झाल्याने या जागा रिक्त राहिल्या असून 38 ठिकाणी 39 बिनविरोध सदस्य झाले तर प्रत्यक्ष 16 ठिकाणी ग्रामपंचायतींच्या 17 रिक्त जागांसाठी दि. 21 डिसेंबर रोजी मतदान होऊन या निवडणूका पार पडल्या. ग्रामपंचायतींच्या या पोट निवडणुकीमध्ये बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या 09 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. दरम्यान बिनविरोध व पोट निवडणूक झालेल्या 47 ग्रामपंचायतींमध्ये बोडकेवाडी,नहिंबे चिरंबे,भूडकेवाडी,जमदाडवाडी,टेळेवाडी, जरेवाडी,कोदळ पुनर्वसन, कळकेवाडी, रामिष्टेवाडी, शितपवाडी, सातर, पाळशी, पाणेरी, तामिणे, पाचगणी, मस्करवाडी, सुतारवाडी, डोंगळेवाडी, खोणोली, जाधववाडी, मान्याचीवाडी, माथणेवाडी, चाळकेवाडी, कळंबे, नाणेल,गाडखोप, खिवशी, वेखंडवाडी, काळोली, दुसाळे,मोरेवाडी (कुठरे) या 31 ग्रामपंचायतीमध्ये 32 ग्रामपंचायत सदस्य हे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानणारे आहेत.पाटण तालुक्यात गत सहा महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना पक्षाने बहुमत सिध्द केले होते.नंतर नुकत्याच पार पडलेल्या पोट निवडणुकींमध्ये शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानणारे जास्त सदस्य निवडूण आले. ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीमध्ये बिनविरोध व निवडूण आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते मा.यशराज देसाई,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङमिंलिंद पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,सुग्रा बशीर खोंदू,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सुरेश पानस्कर,संतोष गिरी,सीमा मोरे,निर्मला देसाई,सुभद्रा शिरवाडकर बबनराव शिंदे,भरत साळूंखे,अभिजित पाटील यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment