Saturday 4 December 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक आराखडयातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 10 कोटी 26 लक्ष निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.04 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांकरीता सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक आराखडयातून 3054 ग्रामीण रस्ते दुरुस्ती, 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालय इमारत,जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी सुधारणा, वळण बंधारे व शेतीच्या पाण्यासाठी आडवे पाट बांधणे, अंगणवाडी इमारती, शाळा खोल्या इमारती बांधणे अशा विविध कामांसाठी सुमारे 10 कोटी 35 लक्ष निधी मंजूर झाला असल्याची माहिती नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                 प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारसशीनुसार सन 2021-22 या आर्थिक वर्षातील सातारा जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा समावेश करण्यात आला होता. या आराखडयामध्ये समावेश असलेल्या विकास कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून यामध्ये 3054 ग्रामीण रस्ते दुरुस्ती अंतर्गत जांभेकरवाडी (मरळोशी) पोहोच रस्ता खडीकरण, डांबरीकरण 12.00 लाख,चव्हाणवाडी नाणेगाव रस्ता ते वरची जाळगेवाडी पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 12.00 लाख,येरफळे ते लुगडेवाडी रस्ता ग्रामा 113 खडीकरण डांबरीकरण 20.00 लाख,दुधडेवाडी (काळगाव), रस्ता  खडीकरण,डांबरीकरण 15.00 लाख,कदमवाडी (मल्हारपेठ) पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 20.00 लाख, कोळेकरवाडी(डेरवण) पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 35.00 लाख,मोरेवाडी (कुठरे) ता.पाटण पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 16.50 लाख,मान्याचीवाडी (मालदन) पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 35.00 लाख, कारळे विठ्ठलाई मंदिर ते सुतारवस्ती ते जि.प्र.प्राथमिक शाळा रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख,5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती अंतर्गत मोरगिरी आडदेव आंब्रुळे बेलवडे खुर्द सांगवड रस्ता इजिमा 135 रस्त्याची सुधारणा करणे भाग आडदेव ते आंब्रुळे रस्ता 38.00 लाख, मोरगिरी आडदेव आंब्रुळे बेलवडे खुर्द सांगवड रस्ता इजिमा 135 रस्त्याची सुधारणा करणे भाग बेलवडे ते नाडे ढेबेवाडी रस्ता 38.00 लाख, आवर्डे ते मुरुड रस्ता इजिमा 152 रस्त्याची सुधारणा करणे भाग आवर्डे ते मुरुड रस्ता 38.00 लाख, त्रिपुडी ते रामा 136 मुळगाव  नेरळे धावडे गोकूळ गुरेघर पाचगणी रस्ता इजिमा 136 भाग कवरवाडी ते नेरळे रस्ता सुधारणा 38.00 लाख, जनसुविधा योजनेतून नविन ग्रामपंचायत इमारत बांधणे अंतर्गत बनपेठवाडी  येथे  ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12.00 लाख, मुळगाव  येथे  ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12.00 लाख, भिलारवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12.00 लाख, ऊरुल येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12.00 लाख, सांगवड येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12.00 लाख,जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी सुधारणा कामांमध्ये आंबेवाडी (घोट) येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03.00 लाख, कातवडी स्मशानभूमी शेड 04.00लाख, बांबवडे येथे बौध्दवस्ती ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 04.00 लाख, हारुगडेवाडी (नाडोली) स्मशानभूमी रस्ता सुधारणा 04.00 लाख, दुटाळवाडी (नुने) स्मशानभूमी रस्ता सुधारणा 04.00 लाख, पांढरवाडी (तारळे) येथे स्मशानभूमी निवारा शेड 04.00 लाख, आडूळपेठ स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03.00 लाख, मान्याचीवाडी येथे स्मशानभूमी सुशोभिकरण 03.00 लाख, सोनवडे येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03.00 लाख, आवर्डे बौध्दवस्ती स्मशानभूमी शेड 04.00 लाख, जंगलवाडी (चाफळ) येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, टेळेवाडी येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, मणेरी येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, रिसवड येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, चाहूरवाडी (नाणेगाव) येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, पाचुपतेवाडी येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03.00 लाख, रोमनवाडी (येराड)येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, गव्हाणवाडी येथे स्मशानभूमी निवारा शेड व संरक्षक भिंत 04.00 लाख, बेलदरे येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत व परिसर सुधारणा  03.00 लाख, आरेवाडी येथे स्मशानभूमी शेड 03.00 लाख, क वर्ग तिर्थक्षेत्र व यात्रास्थळ विकास योजनेअंतर्गत दौलतनगर येथील श्री गणेश मंदिर परिसरातील रस्ता सुधारणा 18.00 लाख,लघु पाट बंधारे विभागांतर्गत मरळोशी येथे शेतीसाठी आडवे पाट 11.83 लाख, पाडळोशी येथे वळण बंधारा दुरुस्ती व पाट  11.49 लाख, कडवे खुर्द येथे शेतीसाठी पाण्याचे आडवे पाट 10.32 लाख, गायमुखवाडी बांबवडे येथे शेतीसाठी पाण्याचे आडवा पाट 9.91 लाख, मसुगडेवाडी (पाडळोशी),ता.पाटण येथे साठवण हौद व पाण्याचा आडवा पाटाची दुरुस्ती 15.63 लाख, करपेवाडी  (काळगाव ),ता.पाटण येथे वळण बंधारा दुरुस्ती 9.67 लाख, येराड,ता.पाटण येथे फळबावी शेतीसाठी वितरण व्यवस्थेची  दुरुस्ती 9.98 लाख, मुरुड देवाचा माळ 110 येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, गणेवाडी ठोमसे 330 येथे अंगणवाडी इमारत 8.50लाख, काढणे 206 येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, धडामवाडी धजगाव येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, ऊरुल बौध्दवस्ती 335 येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, वेताळवाडी मातंगवस्ती 362येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, नावडी टाकी वस्ती 413 येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, विहे नंदिवाले समाज 343 येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, काहिर येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख,अंगणवाडी इमारती दुरुस्ती अंतर्गत टेळेवाडी, मानेगाव, गोकूळ तर्फ पाटण, जुंगठी, बांबवडे, घोट, कुसवडे, वाजेगाव, शिरळ व काढोली येथील अंगणवाडी इमारती दुरुस्तीसाठी 07 लाख 92 हजार,नविन शाळा खोल्या इमारती बांधकामामध्ये बोर्गेवाडी (घोट) येथे दोन शाळा खोलींचे बांधकाम 17.92, हेळवाक शाळा खोलीचे बांधकाम 8.96 लाख, मरळोशी येथे शाळा खोलीचे बांधकाम 8.96 लाख, भरेवाडी (काळगाव) येथे शाळा खोलीचे बांधकाम 8.96 लाख, वस्ती साकुर्डी येथे शाळा खोलींचे बांधकाम 8.96 लाख, विशेष  घटक  साकव योजनेअंतर्गत येरफळे जोतिबा मंदिर ते स्मशानभूमी बौध्दवस्ती रस्त्यावर साकव 35.81 लाख, म्होप्रे येथे दलितवस्ती बेघरवसाहत येथील रस्त्यावरील ओढयावर साकव 50.00 लाख, तांबेवाडी(ठोमसे) ते मागासवर्गीयवस्ती रस्त्यावरील ओढयावर साकव 42.28 लाख, तामकडे येथे बौध्दवस्ती रस्त्यावर साकव 30.33 लाख तसेच नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत नाडे येथे मरळी येथे शेतकरी अद्यावत कृषी प्रशिक्षण केंद्रउभारण्याकरीता 100.00 लाख, नाडे येथे बहूउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्र, कृषी मॉल उभारणे 75.00 लाख असा एकूण 10 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.लवकरच या कामांच्या निवीदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने ही कामे सुरु करणेसंदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी यांना ना.शंभूराज देसाई यांनी सूचना केल्या असल्याचे कार्यालयाचेवतीने शेवटी प्रसिध्दी पत्रकांत सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment