Saturday 28 May 2022

आमदार अनिभाऊ बाबर यांच्या सारख नेतृत्व जोपासले पाहिजे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन. देवघर बिबी येथील केरा नदीवरील पूलाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 


दौलतनगर दि. 29 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-लोकप्रतिनिधी कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे  आमदार अनिलभाऊ बाबर आहेत. सातत्याने मतदारसंघातील आपल्या लोकांच्या सार्वजनिक कामांसाठी मग पिण्याच्या पाण्याचा,शाळेचा रस्ते,पूलाचा प्रश्न असेल त्यासाठी सातत्याने त्याचा पाठपुरावा करणे आणि लोकांना दिलेला शब्द पूर्ण करणे यासाठी काम करणारं लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, या सर्व लोकप्रतिनिधींमध्ये अनिल भाऊंच स्थान अग्रक्रमामध्ये आहेत.आपल्या समाजासाठी,आपल्या लोकांसाठी भाऊंनी जे प्रयत्न केले ते प्रयत्न आज या पूलाचे भूमिपूजन केल्यांनतर प्रत्यक्षात साकार झाले आहेत. भाऊंसारख्या लोकप्रतिनिधींच नेतृत्व जोपासले पाहिजे,अशा नेतृत्वाला पाठबळ दिले पाहिजे असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

ते नाबार्ड योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या देवघर बिबी येथील केरा नदीवरील पुलाचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी खानापूर विटा मतदार संघाचे आमदार अनिलभाऊ बाबर, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,सुखदेव शितोळे,नगरसेवक दहावीर शितोळे,अमर शितोळे,माजी उपनगराध्यक्ष रमेश‍ शितोळे,विटा बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी,माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील,उत्तम चोथे,विनय भंडारे,शिवाजी हारुगडे,दाजी शितोळे,शंकर शितोळे,यशवंत शितोळे,शिवसेना शहराध्यक्ष राजू जाधव,माजी पंचायत समिती सभापती सौ.मुक्ताबाई माळी,माजी पंचायत समिती सदस्य सुरेश जाधव,विद्या शिंदे,विलास कुराडे,बबनराव माळी व विटा खानापूर मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

           यावेळी ते बोलताना पुढ म्हणाले की, ज्या ज्या वेळी  विटयाच्या दौऱ्यावर गेलो त्यावेळी अनिल भाऊंची सातत्याने देवघर पूलाच्या कामाची मागणी केली.सातत्याच्या मागणीमुळे भाऊंना या केरा नदीवरील नवीन पूलाच्या कामाचा शब्द दिला होता. मी मागच्या पंचवार्षिक पासून या कामाचा पाठपुरावा करत होतो. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे पुल मंजूर होण्यासाठी उशीर झाला. सातत्याने त्यांच्या डोक्यात विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच असतो.मतदारसंघातील लोकांना जे शब्द दिलेले आहेत ते कसे पूर्ण करायचे याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा असतो. देवघर पुलाच्या कामासाठी त्यांनी प्रचंड पाठपुरावा केला.मी राज्यमंत्री झाल्यानंतर अधिकाऱ्यांना देवघरचा पूल मंजूर करण्याच्या सातत्यने सुचना केल्या कारण भाऊंना दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी होती. शितोळे परिवाराची श्रध्दा या श्री भैराबाचे देवावर आहे. कदाचित देवाच्याही मनात अस असेल की मी मंत्री असताना या पूलाच भूमिपूजन व्हाव.आज खऱ्या अर्थाने देवघर पुलाचे भूमिपूजन केल्यानंतर एका गोष्टीचे समाधान आहे की आमदार अनिलभाऊ बाबर व शितोळे परिवार यांनी केलेली मागणी पूर्ण झाली.तसेच यापुढेही सर्वांना सर्वोत्परी सहकार्य राहील असेही त्यांनी सांगीतले.

 आमदार अनिलभाऊ बाबर म्हणाले की,देवघर येथील श्री भैरोबा देवाला दर्शनाकरीता ये-जा करताना केरा नदीमध्ये पूल नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती.त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल व्हावा अशी शितोळे परिवाराने मागणी केली. भावनेच्या भारामध्ये या पूलाचे काम करणार अशा शब्द शितोळे परिवाराला दिल्यानंतर ना.शंभूराज देसाई यांचेकडे पुलाचे काम मंजूर होण्याकरीता विनंती केल्यानंतर ना.देसाई यांनी नाबार्ड योजनेअंतर्गत प्राधान्याने या देवघर पूलाचे काम प्रस्तावित करत कामाचा पाठपुरावा करण्यासाठी एका अधिकाऱ्याला जबाबदारी दिली.पाटण मतदार संघातील इतर कामांबरोबर या कामाला प्राधान्य देत शितोळे परिवाराच्या प्रेमाखातर या पूलाचे कामाला निधी मंजूर केला. आज त्याचे भूमिपूजन होत आहे.या गोष्टीचे निश्चित समाधान असून ना. शंभूराज देसाई यांनी फार मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळे विटा खानापूर मतदारसंघातील तमाम जनतेच्यावतीने त्यांनी ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले. तसेच जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे श्री भैरोबा मंदिर परिसरामध्ये मोठे नुकसान झाले असून त्याचे पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर करावा अशी विनंती त्यांनी यावेळी ना.शंभूराज देसाई यांचेकडे केली.

चौकट: देवघर पूल हा पूल नसून भावनेचा पूल---आमदार अनिलभाऊ बाबर.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात अनेक पूल बांधले असतील नजीकच्या काळात अनेक पूल बांधतील. पण या पूलाला एक वैशिष्ट आहे.कारण शितोळे परिवाराच्या प्रेमाखातर या पूलाचे काम मंजूर केल्याने हा पुल नसून  एक भावनेचा पूल आहे.शितोळे परिवाराचे कुलदैवत श्री भैरोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भावनेचा पूल बांधत असल्याने ना.शंभूराज देसाई यांनी सामाजिक कार्यात अनेक कामे केली असतील,परंतु त्यातील हे एक मोठ काम असून हा भावनेचा पूल बांधत असताना त्यांनी शितोळे परिवाराची मने जिंकली असल्याचे आमदार अनिलभाऊ यांनी यावेळी स्पष्ट केले.

Friday 20 May 2022

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेमुळे शिक्षण घेऊन मुली स्वावलंबी होण्यास मदत. गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६3 वी पुण्यतिथी व शिष्यवृत्ती वितरण असा संयुक्त कार्यक्रम संपन्न.

 



दौलतनगर दि.20:- पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील गरजू मुली शिक्षणापासून वंचित राहून नये म्हणून सन २०१२ पासून पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाला आपला हातभार लागावा याकरीता स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने शिष्यवृत्ती योजना सुरु केली. ही शिष्यवृत्ती योजना एक आदर्शवत व गरीब कुटुंबातील मुलींना प्रेरणादायी ठरत आहे. पाटण मतदारसंघातील एकूण १४६ गरजू मुलींना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला आहे.कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना गरजू मुलींकरीता एक आधार म्हणून काम करीत असून या शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेऊन मुली स्वावलंबी होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन नामदार शंभूराज देसाईंनी असल्याचे प्रतिपादन कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे ६3 व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात केले.

 महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६3 वी पुण्यतिथी कार्यक्रम व पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजीत कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रमात गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमास सहा.पोलीस अधिक्षक मा.आंचल दलाल, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,ॲङडी.पी.जाधव,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,सुरेश पानस्कर,शिवदौलत बँक चेअरमन संजय देशमुख, मा.चेअरमन मिलींद पाटील,शशिकांत निकम,पांडूरंग नलवडे,भरत साळूंखे,अभिजित पाटील,पांडूरंग शिरवाडकर,विजय शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यासंह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा परीषद,पंचायत समिती सदस्य,संचालक,शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीनी व पालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना नामदार शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे आर्शिवाद आपल्या पाठीशी आहेत. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींच्या शिक्षणाकरीता एक शिष्यवृत्ती योजना सुरु करावी आणि या शिष्यवृत्ती योजनेचे वितरण कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यस्मरण कार्यक्रमात करावे अशी कल्पना सन २०१२ मध्ये मांडली. स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आपण ही शिष्यवृत्ती सुरु करण्याचा निर्णय घेतला. कै.सौ.ताईसाहेब यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अडचणीच्या काळात मोलाची साथ केली. हलाकीच्या परिस्थितीत कष्टातून दिवस काढून मुलांना घडविण्याचे त्यांनी कार्य केले. आज त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवणे गरजेचे असून बिकट परिस्थितीमध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण घेतल्याशिवाय आपण आपल कर्तृत्व सिध्द करु शकत नाही. त्यामुळे समाजातील गरीब कुटुंबातील मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आल्याने या गरीब कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहून नये हा या शिष्यवृत्ती देण्या मागचा उद्देश आहे. आतापर्यंत मतदारसंघातील १४६ गरजू मुंलीना आपण ही शिष्यवृत्ती दिली आहे.या योजनेमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे.गत दोन वर्षामध्ये कोविडचा संसर्ग असल्याने शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम झाला नाही. आज आपण या शिष्यवृत्तीचे वितरणाबरोबर विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वाटप करत आहे.तालुक्यामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देत असून शैक्षणिक सुविधांचा चांगला लाभ घेणे गरजेचे आहे.त्यामुळे मुलींनीही या चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे.त्यामुळे या कै.सौ.ताईसाहेब यांचे शिष्यवृत्तीचे माध्यमातून भविष्यामध्ये चांगले शिक्षण घेऊन मुली स्वावलंबी होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल म्हणाल्या की, गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी तालुक्यातील गरीब मुलींसाठी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना सुरु केल्याचा मनस्वी आनंद असून या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून चांगले शिक्षण घेऊन मुलींनी स्वावलंबी झाल्या पाहिजेत.आर्थिकदृष्टया सक्षम झाल्या पाहिजेत. या शिष्यवृत्तीमुळे मुलींसाठी एक प्रेरणा मिळाल्याने शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून हेच यशाच पहिल पाऊल आहे.त्यामुळे ध्येय निश्चित केले तर यश मिळते हे लक्षात ठेऊन तालुक्यातील मुलींना या शिष्यवृत्तीचा फायदा होईल.तसेच भविष्यात मुली स्वावलंबी झाल्याने पाटण तालुक्याचा नावलौकीक वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रास्ताविक चेअरमन अशोकराव पाटील तर आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले.

Wednesday 18 May 2022

दौलतनगर,ता. पाटण येथे दि.२० मे रोजी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६3 वा पुण्यतिथी सोहळा. गरीब कुटुंबातील विद्यार्थीनींना कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन.

 



दौलतनगर दि. १८:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६3 वा पुण्यतिथी सोहळा व या पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम शुक्रवार दि.२० मे, २०२२ रोजी सकाळी १०.3० वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व सहा.पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल(आय.पी.एस.),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो.राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू विद्यार्थीनींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.यंदाचे हे तेरावे वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील १५० हुन अधिक विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील विद्यार्थीनींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय साहित्याचे वितरणही करण्यात येते. सध्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनींना वार्षिक ५५०० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येत असून गत दोन वर्षातील कोरोनाच्या संकटामुळे शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले नव्हते.सध्या कोरोनाचे संकट कमी झाले असून शासनाने सर्व निर्बंध शिथील झाले असल्याने यंदाच्या वर्षी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)  शिष्यवृत्ती वितरणाचे  नियोजन करण्यात आले आहे. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा ६3 वा पुण्यतिथी सोहळा व या पुण्यतिथी सोहळया निमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण कार्यक्रम शुक्रवार दि.२० मे, २०२२ रोजी सकाळी १०.3० वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व सहा.पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल(आय.पी.एस.),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Saturday 14 May 2022

छोकरी सोबत मिळाली नोकरी..! लेंढोरीच्या जगन्नाथला स्वतःच्या लग्नातच मिळाली नोकरीची ऑर्डर..! पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील नवरदेवाला मंत्रीपुत्र यशराज देसाई यांनी दिला सुखद धक्का.






दौलतनगर दि.14(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज देसाई यांनी नुकतीच एका लग्न सोहळ्यास शुभेच्छा भेट दिली. मात्र या भेटी दरम्यान देसाई यांनी नवरदेवाला चक्क नोकरीची ऑर्डरच भेट म्हणून दिल्याची सुखद घटना पाटण तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम भागातील लेंढोरी या छोट्याशा गावात घडली. दरम्यान मंत्री पुत्रांच्या या अनोख्या  भेटी मुळे नवरदेवाला छोकरी बरोबर नोकरी ही मिळाल्याची खुमासदार चर्चा सध्या पाटण तालुक्यात सर्वत्र सुरू आहे.

             कोयना विभागातील दुर्गम भागात पाटण पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर लेंढोरी हे छोटेसे गाव असून या गावांतील झोरे कुटुंबातील  जगन्नाथ झोरे या युवकाने काही दिवसांपूर्वी  शिवदौलत सहकारी बँकेच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. वास्तविक शिवदौलत बँक बँकिंग क्षेत्रातील अग्रेसर आणि  सातारा जिल्हयातील नावाजलेली मोठी बँक म्हणून ओळखली जाते. या बँके मध्ये नोकरी करण्यासाठी  विशेषतः शहर व परिसरातील उमेदवारांची मोठी मागणी असते.शिवदौलत सहकारी बँकेमध्ये विविध पदांच्या नोकर भरतीकरीता यशराज देसाई यांनी काही दिवसांपूर्वी मुलाखती घेतल्या होत्या.या मुलाखती दरम्यान जगन्नाथ झोरे याने मुलाखत झाल्यानंतर यशराज देसाई यांना आपल्या लग्नाची लग्न पत्रिका देऊन लग्न सोहळयास अगत्याने उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. युवा नेते यशराज देसाई यांनी कोयना विभागातील लेंढोरी येथील जगन्नाथ झोरेची या युवकाची काम करण्याची प्रामाणिक जिद्द आणि उमेद आणि उच्चशिक्षितपणा यांची दखल घेऊन याबाबत गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचेशी चर्चा करुन त्याला शिवदौलत बँकेमध्ये  क्लार्क या  जागेसाठी  त्याची निवड केली. आज जगन्नाथ झोरे याचे विनंतीवरुन लग्न सोहळयाला उपस्थित राहत त्याला पुढील वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्याच, या शुभेच्छांसह त्याला शिवदौलत बँकेतील क्लार्क या पदावरील नोकरी बाबतचे नियुक्ती पत्र थेट त्याच्याच लग्न सोहळ्यात जाऊन ही अनोखी भेट दिली. या घटनेमुळे यशराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारांचा खऱ्या अर्थाने वसा जपला असून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य दिल्याचे दिसून आले.          

       वास्तविक थेट मंत्री पुत्र यांनीच  प्रत्यक्ष येऊन अशी कायमच्या नोकरीचे पत्र देणे असे उदाहरण  आज  राज्यात अत्यंत दुर्मिळ असताना मंत्री शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज देसाई  यांनी मात्र हे दुर्मिळ उदाहरण सत्यात उतरवून दाखविले त्यामुळे  दुर्गम भागातील एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा कायमचा मार्ग मोकळा झाल्याचे समाधान उपस्थितांच्या डोळ्यातील आनंदाश्रू वरून स्पष्ट झाले.

चौकट :- शनिवारी  लेंढोरी येथील जगन्नाथ झोरे यांचा कोकिसरे येथील कविता वरक नावाच्या मुलीबरोबर लग्न सोहळा होता.या लग्न सोहळयास यशराज देसाई यांनी नेहमीप्रमाणे नियोजित भेट दिली. या प्रसंगी जनगन्नाथ झोरे व कविता वरक या नवदाम्पत्यांच्या हातावर नोकरीचे थेट अपॉइंटमेंट लेटरच दिल्याने दोन्हीही कुटुंबियांसह उपस्थित आनंदाने भारावल्याचे दिसून आले.

चौकट:- आणि क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.

शनिवारी मतदार संघातील विविध लग्न सोहळयांना भेटी देण्याचा व्यस्त कार्यक्रम असतानाही जगन्नाथ झोरे याच्या विवाह सोहळयास भेट दिल्यानंतर विवाह स्थळापासून काही अंतरावर मुले ही क्रिकेट खेळत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. मुलांना क्रिकेट खेळताना पाहून यशराज देसाई यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.ते तडक क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे गेले, त्यांचे सोबत क्रिकेट खेळून त्यांनी आनंद लुटला. 

Monday 9 May 2022

गाव तेथे चौफेर विकास हेच धोरण- ना.शंभूराज देसाई अर्थसंकल्पातून मंजूर बनपूरी ते नाईकबा रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.



दौलतनगर दि.09(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये गावा-गावातील कार्यकर्त्यांनी चांगले काम केल्याने आपण विधानसभा निवडणूकीत झालो. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या कृपाशिर्वादाने राज्यात सत्तेमध्ये आलेल्या ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करताना महत्त्वांच्या खात्यांची जबाबदारी मिळाली. परंतु दोन वर्ष कोविड कालावधीमध्ये विकास कामांवर मर्यादा आल्या होत्या. आता राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत असून विकास कामे मार्गी लावण्यासाठी निधीची तरतुद होत आहे.राज्याचा वित्तराज्यमंत्री म्हणून मतदारसंघामध्ये आपण गाव तेथे चौफेर विकास हेच धोरण डोळयासमोर ठेऊन चालतोय.आपलं नाणं खणखणीत असताना आम्हाला टिमकी वाजवायची गरजच काय असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज बनपूरी ता.पाटण येथे विरोधकांना लगावला.

               बनपूरी,ता.पाटण येथील राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या पेठ बनपूरी भालेकरवाडी ते नाईकबा रस्त्याच्या सुधारणा करण्याचे रुपये 03 कोटी मंजूर कामाचे भूमिपूजन मंत्री देसाई यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक वसंतराव कदम,रघुनाथ माटेकर,शिवाजीराव शेवाळे,विकास गिरीगोसावी, रणजित पाटील,मनोज मोहिते,नाना साबळे,नारायण कारंडे,जोतिराज काळे,आप्पासाहेब मगरे,एकनाथ जाधव,टी.डी.जाधव,शिवाजी पाटील,महेश पाटील आदींची उपस्थिती होती.

               यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे आम्ही वारसदार आहोत.लोकनेते साहेबांनी राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये वेग-वेगळया महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत असताना सर्व सामान्य जनतेच्या हिताच्याकरीता अनेक धोरणात्मक निर्णय घेतले.ज्याचा फायदा आजही आपल्या सारख्या सर्वसामान्यांसाठी होत आहे.सत्तेची मस्ती लोकप्रतिनिधींनी डोक्यात शिरु देऊ नये,हि त्यांची शिकवण डोळयासमोर ठेऊनच आपली वाटचाल सुरु आहे.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारचे माध्यमातून आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागवण्यासाठी, विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी मंजूर सत्ता,पदांचा सर्वसामान्यांसाठी वापरुन जनतेचे प्रश्न व अडचणींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी प्राधान्य दिले आहे.आपला तालुका हा डोंगरी व दुर्गम तालुका असून तालुक्यामध्ये प्रतिवर्षी मोठया प्रमाणांत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणांत नुकसान होते. राज्याचा वित्तराज्यमंत्री म्हणून तालुक्यातील दळण-वळणाचेदृष्टीने नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त निधी मंजूर केला. तसेच महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार अनेक चांगले निर्णय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखाली घेण्यात येत आहेत.राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या हिताकरीता सर्वांगिण विकास करण्यासाठी जनहिताच्या अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून राज्यात गावा-गावातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाणी पुरवठयाच्या योजना मार्गी लागत असून गावांत घरो-घरी नळ जोडण्याकरीता जलजिवन मिशन योजनेअंतर्गत भरिव असा निधी मंजूर करण्यात येत आहे. तरीही कुणी कामाचे श्रेय लाटून बॅनरबाजी करत असेल,तर त्याला पुरावा मागा.दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा विषयच येत नाही,कारण आमचे नाणे खणखणीत आहे.त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपण मंजूर केलेल्या विकास कामांबाबत जागरुक राहिले पाहिजे, विकास कामे कोणी मंजूर केली,कुणी पाठपुरावा केला हे वेळीच सांगीतले पाहिजे. नाहीतर विकास कामांत शंभूराज देसाई आणि निवडणूकांना भलतेच असे होऊ देऊ नका असे सांगत विकास कामांमुळे गावा-गावातील कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण होत असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही आपली ताकद दिसायलाच पाहिजे,असेही शेवटी त्यांनी शेवटी सांगीतले. यावेळी महेश पाटील,जयवंतराव शेलार,राजेंद्र हणबर यांची भाषणे झाली.अशोकराव पाटील यांनी प्रास्ताविक केले,तर शिवाजीराव जगदाळे,संपतराव पाटील,कमलाकर पाटील आदींनी स्वागत केले.

चौकट :ना.शंभूराज देसाई यांनी कडवे सोसायटीमध्ये सत्तांतर केलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा केला जाहिर सत्कार.

तारळे विभागातील कडवे बुद्रूक सोसायटीमध्ये सत्तांतर केलेल्या नवनिर्वाचित संचालक,पदाधिकारी व कार्यकर्ते भेटण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर आले.परंतु कार्यक्रमानिमित्त ना.शंभूराज देसाई हे बनपूरी या ठिकाणी निघून आल्याने कार्यकर्त्यांची भेट झाली नाही.दरम्यान ना.देसाई यांची भेट घेण्यासाठी कडवे बुद्रूक गावचे कार्यकर्ते थेट भूमिपूजन कार्यक्रम असलेल्या ढेबेवाडी विभागातील बनपूरी याठिकाणी पोहोचले.कार्यक्रमस्थळी ना.शंभूराज देसाई यांचे निदर्शनास येताच त्यांनी मध्येच कार्यक्रम थांबवत कडवे बुद्रूक सोसायटीमध्ये सत्तातर केलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा जाहिर सत्कार करत त्यांचे अभिनंदन केले.तर ढेबेवाडी विभागातील मोठया कार्यक्रमामध्ये जाहिर सत्कार झाल्याने कडवे बुद्रूक गावचे कार्यकर्ते आनंदित झाले.