Monday 9 May 2022

गाव तेथे चौफेर विकास हेच धोरण- ना.शंभूराज देसाई अर्थसंकल्पातून मंजूर बनपूरी ते नाईकबा रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.



दौलतनगर दि.09(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये गावा-गावातील कार्यकर्त्यांनी चांगले काम केल्याने आपण विधानसभा निवडणूकीत झालो. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या कृपाशिर्वादाने राज्यात सत्तेमध्ये आलेल्या ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करताना महत्त्वांच्या खात्यांची जबाबदारी मिळाली. परंतु दोन वर्ष कोविड कालावधीमध्ये विकास कामांवर मर्यादा आल्या होत्या. आता राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत असून विकास कामे मार्गी लावण्यासाठी निधीची तरतुद होत आहे.राज्याचा वित्तराज्यमंत्री म्हणून मतदारसंघामध्ये आपण गाव तेथे चौफेर विकास हेच धोरण डोळयासमोर ठेऊन चालतोय.आपलं नाणं खणखणीत असताना आम्हाला टिमकी वाजवायची गरजच काय असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज बनपूरी ता.पाटण येथे विरोधकांना लगावला.

               बनपूरी,ता.पाटण येथील राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या पेठ बनपूरी भालेकरवाडी ते नाईकबा रस्त्याच्या सुधारणा करण्याचे रुपये 03 कोटी मंजूर कामाचे भूमिपूजन मंत्री देसाई यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक वसंतराव कदम,रघुनाथ माटेकर,शिवाजीराव शेवाळे,विकास गिरीगोसावी, रणजित पाटील,मनोज मोहिते,नाना साबळे,नारायण कारंडे,जोतिराज काळे,आप्पासाहेब मगरे,एकनाथ जाधव,टी.डी.जाधव,शिवाजी पाटील,महेश पाटील आदींची उपस्थिती होती.

               यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे आम्ही वारसदार आहोत.लोकनेते साहेबांनी राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये वेग-वेगळया महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत असताना सर्व सामान्य जनतेच्या हिताच्याकरीता अनेक धोरणात्मक निर्णय घेतले.ज्याचा फायदा आजही आपल्या सारख्या सर्वसामान्यांसाठी होत आहे.सत्तेची मस्ती लोकप्रतिनिधींनी डोक्यात शिरु देऊ नये,हि त्यांची शिकवण डोळयासमोर ठेऊनच आपली वाटचाल सुरु आहे.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारचे माध्यमातून आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागवण्यासाठी, विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी मंजूर सत्ता,पदांचा सर्वसामान्यांसाठी वापरुन जनतेचे प्रश्न व अडचणींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी प्राधान्य दिले आहे.आपला तालुका हा डोंगरी व दुर्गम तालुका असून तालुक्यामध्ये प्रतिवर्षी मोठया प्रमाणांत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणांत नुकसान होते. राज्याचा वित्तराज्यमंत्री म्हणून तालुक्यातील दळण-वळणाचेदृष्टीने नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त निधी मंजूर केला. तसेच महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार अनेक चांगले निर्णय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखाली घेण्यात येत आहेत.राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या हिताकरीता सर्वांगिण विकास करण्यासाठी जनहिताच्या अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून राज्यात गावा-गावातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाणी पुरवठयाच्या योजना मार्गी लागत असून गावांत घरो-घरी नळ जोडण्याकरीता जलजिवन मिशन योजनेअंतर्गत भरिव असा निधी मंजूर करण्यात येत आहे. तरीही कुणी कामाचे श्रेय लाटून बॅनरबाजी करत असेल,तर त्याला पुरावा मागा.दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा विषयच येत नाही,कारण आमचे नाणे खणखणीत आहे.त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपण मंजूर केलेल्या विकास कामांबाबत जागरुक राहिले पाहिजे, विकास कामे कोणी मंजूर केली,कुणी पाठपुरावा केला हे वेळीच सांगीतले पाहिजे. नाहीतर विकास कामांत शंभूराज देसाई आणि निवडणूकांना भलतेच असे होऊ देऊ नका असे सांगत विकास कामांमुळे गावा-गावातील कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण होत असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही आपली ताकद दिसायलाच पाहिजे,असेही शेवटी त्यांनी शेवटी सांगीतले. यावेळी महेश पाटील,जयवंतराव शेलार,राजेंद्र हणबर यांची भाषणे झाली.अशोकराव पाटील यांनी प्रास्ताविक केले,तर शिवाजीराव जगदाळे,संपतराव पाटील,कमलाकर पाटील आदींनी स्वागत केले.

चौकट :ना.शंभूराज देसाई यांनी कडवे सोसायटीमध्ये सत्तांतर केलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा केला जाहिर सत्कार.

तारळे विभागातील कडवे बुद्रूक सोसायटीमध्ये सत्तांतर केलेल्या नवनिर्वाचित संचालक,पदाधिकारी व कार्यकर्ते भेटण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर आले.परंतु कार्यक्रमानिमित्त ना.शंभूराज देसाई हे बनपूरी या ठिकाणी निघून आल्याने कार्यकर्त्यांची भेट झाली नाही.दरम्यान ना.देसाई यांची भेट घेण्यासाठी कडवे बुद्रूक गावचे कार्यकर्ते थेट भूमिपूजन कार्यक्रम असलेल्या ढेबेवाडी विभागातील बनपूरी याठिकाणी पोहोचले.कार्यक्रमस्थळी ना.शंभूराज देसाई यांचे निदर्शनास येताच त्यांनी मध्येच कार्यक्रम थांबवत कडवे बुद्रूक सोसायटीमध्ये सत्तातर केलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा जाहिर सत्कार करत त्यांचे अभिनंदन केले.तर ढेबेवाडी विभागातील मोठया कार्यक्रमामध्ये जाहिर सत्कार झाल्याने कडवे बुद्रूक गावचे कार्यकर्ते आनंदित झाले. 

No comments:

Post a Comment