Friday 17 June 2022

मोरणा शिक्षण संस्थेतील माध्यमिक विद्यालयांचा 100 टक्के निकाल,यशस्वी निकालाची परंपरा कायम. यशस्वी विद्यार्थ्यांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले अभिनंदन.

दौलतनगर दि. 17:- दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूलातील मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वत्सलादेवी  इंग्लिश मिडीयम स्कूल,दौलतनगर, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे,न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ धावडे,न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी, या माध्यमिक विद्यालयांचा माध्यमिक शालांत परिक्षेचा इयत्ता 10 वीचा सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील निकाल जाहिर झाला असून दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूलाने याही वर्षी माध्यमिक शालांत परिक्षेच्या निकालाची आपली यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.  या सर्व माध्यमिक विद्यालयांचा 100 टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातील सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे  गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई यांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना हार्दीक शुभेच्छा दिल्या.

                लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुल दौलतनगर,ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर ,शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे, न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे, न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या माध्यमिक विद्यालयांमध्ये सुसज्ज इमारतींसह उच्चशिक्षित शिक्षक वर्ग असून या विद्यालयांमध्ये विभागातील अनेक गावांतील विद्यार्थी विद्यार्थीनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत आहेत.तसेच या विद्यालयांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात असल्याने विद्यालयांनी शैक्षणिक दर्जा चांगला राखला असल्याने, सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10 वीचा निकाल नुकताच जाहिर झाला असून वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे, न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ धावडे, न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी या माध्यमिक विद्यालयातील सर्व विध्यार्थी उतीर्ण झाल्याने या सर्व विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.यामध्ये वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर या विद्यालयात प्रथम क्रमांक हर्षदा कृष्णा शेजवळ 88.40 टक्के, व्दितीय क्रमांक अथर्व  सचिन गुरव 79.80 टक्के,तृतीय क्रमांक शुभम जालिंदर चव्हाण 78.40 टक्के तर शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे, प्रथम क्रमांक अपेक्षा दिनेश शेजवळ 86.40 टक्के, व्दितीय क्रमांक प्राची प्रकाश चव्हाण, आर्या गोरखनाथ जामदार, अदित्य प्रताप पाटील 85.80 टक्के,तृतीय क्रमांक उदय लालासो शेजवळ 84.20 टक्के न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे,  प्रथम क्रमांक सनी संतोष पवार 95.40 टक्के, व्दितीय क्रमांक अजय संजय गालवे 95.20 टक्के,तृतीय क्रमांक अनिकेत वसंत सुर्यवंशी 87.40 टक्के. न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी ,  प्रथम क्रमांक शामल रामचंद्र पवार 79.43 टक्के, व्दितीय क्रमांक विशाल दत्तात्रय भिसे 75.26 टक्के,तृतीय क्रमांक सायली विलास पवार 72.00 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.इयत्ता 10 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Sunday 12 June 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाचे पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 14 जून रोजी दौलतनगर येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.

दौलतनगर दि. 12:- महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री व कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल प्रमुख ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे होऊ घातलेल्या सन 2022 ते 2027 संचालक मंडळाचे पंचवार्षिक निवडणुकीचे पार्श्वभूमीवर ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलमधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार दि.14 जून 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 04 या वेळेत ना.शंभूराज देसाई यांचे निवासस्थान दौलतनगर, ता.पाटण येथे घेण्यात येणार असल्याची माहिती कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाचे पंचवार्षिक निवडणुकीचे पार्श्वभूमीवर कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल मधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री व कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल प्रमुख ना.शंभूराज देसाई यांनी कार्यकारी समिती स्थापन केली आहे. या कार्यकारी समितीमध्ये युवा नेते यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, मा.चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, चेअरमन अशोकराव पाटील ॲङडी.पी.जाधव यांचा समावेश असून या कार्यकारी समितीसमोर कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल मधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार दि.14 जून 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 04 या वेळेत ना.शंभूराज देसाई यांचे निवासस्थान दौलतनगर,ता.पाटण येथे ठिकाणी घेण्यात येणार आहेत.तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर या मुलाखतींचा एकत्रित अहवाल कार्यकारी समितीमार्फत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. तरी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाचे पंचवार्षिक निवडणुकीत कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल मधून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखातीकरीता उपस्थित रहावे,असे आवाहन कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

Friday 10 June 2022

केंद्राच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत वाशिम जिल्ह्याचा गौरव पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन

मुंबई, दि. 10 : केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा 2020-21’ मध्ये वाशिम जिल्ह्याला उल्लेखनीय कार्यासाठी दिल्ली येथे ‘उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आल्याने वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाचे, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अभिनंदन केले आहे. वाशिम जिल्हा कौशल्य नियोजन आराखड्यात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या पुढच्या काळात वाशिम जिल्हा अव्वल दर्जाची कामगिरी करेल, असा विश्वासही पालकमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

वाशिम हा आकांक्षीत जिल्हा आहे. जिल्ह्याचा मुख्य घटक शेती आहे. जिल्ह्यातून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ जात असल्याने बांधकाम क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. केंद्रशासनाच्या ‘संकल्प’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिलांसाठी बेकरी, पाककला आणि शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री म्हणून वेळोवेळी आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यामुळे वाशिम जिल्ह्याचा झालेला सन्मान जिल्हा प्रशासनाला प्रोत्साहन देणारा आहे, असे पालकमंत्री श्री.देसाई यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीयस्तरावर सन्मान झालेल्या सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाचेही अभिनंदन केले.

दिल्ली येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात  मंत्रालयाचे सचिव  राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’ (२०२०-२१) पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्ह्यांतून  विजयी  ठरलेल्या ३० जिह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये यावेळी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना तीन श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील ४६७ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी  दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती.

००००

केंद्राच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत सातारा जिल्ह्याचा गौरव राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन

मुंबई, दि. 10 : केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा 2020-21’ मध्ये सातारा जिल्ह्याला उल्लेखनीय कार्यासाठी दिल्ली येथे ‘उत्कृष्टता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आल्याने कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाचे, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अभिनंदन केले आहे. सातारा जिल्हा कौशल्य नियोजन आराखड्यात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या पुढच्या काळात सातारा जिल्हा अव्वल दर्जाची कामगिरी करेल, असा विश्वासही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

उत्कृष्टता पुरस्कार श्रेणीत निवड झालेल्या देशातील ८ जिल्ह्यांमध्ये सातारा पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आहे. कोविड महामारीच्या काळात केंद्र आणि राज्यशासनाच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जवळपास १ हजार कोविड फ्रंटलाईन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. साहसी खेळ, ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री म्हणून वेळोवेळी आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. कोविडमुळे विधवा झालेल्या भगिनी आणि कातकरी समाजातील लोकांना येत्या काळात कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण व कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या या कामांना गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.  सातारा जिल्ह्याचा झालेला सन्मान जिल्हा प्रशासनाला प्रोत्साहन देणार आहे, असे राज्यमंत्री श्री.देसाई यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीयस्तरावर सन्मान झालेल्या वाशिम, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाचेही त्यांनी अभिनंदन केले.

दिल्ली येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात  मंत्रालयाचे सचिव  राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’ (२०२०-२१) पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्ह्यांतून  विजयी  ठरलेल्या ३० जिह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये यावेळी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना तीन श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील ४६७ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता  मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी  दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती.

००००

Thursday 9 June 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलातील यशस्वी निकालाची परंपरा कायम. यशस्वी विद्यार्थ्यांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले अभिनंदन.

दौलतनगर दि. 09:- दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूलातील मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्यूनिअर कॉलेज दौलतनगर या ज्यूनिअर कॉलेजचा इयत्ता 12 वीचा सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील निकाल नुकताच जाहिर झाला. दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूलाने याही वर्षी आपली निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली असून शास्त्र शाखेचा 94.23 टक्के तर वाणिज्य शाखेचा 89.28 टक्के निकाल लागला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई यांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना हार्दीक शुभेच्छा दिल्या.

                लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकुलामध्ये दौलतनगर,ता.पाटण येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली  मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्यूनिअर कॉलेज दौलतनगर या ज्यूनिअर कॉलेजमध्ये सुसज्ज इमारतींसह उच्चशिक्षित वर्ग असून या कॉलेजमध्ये विभागातील अनेक गावांतील विद्यार्थी विद्यार्थीनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत आहेत.तसेच या कॉलेजमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात असल्याने कॉलेजने शैक्षणिक दर्जा चांगला राखला असल्याने श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्यूनिअर ज्यूनिअर कॉलेजचा सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 12 वीचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये शास्त्र शाखेचा 94.23 टक्के तर वाणिज्य शाखेचा 89.28 टक्के निकाल लागला असून शास्त्र व वाणिज्य शाखेचा एकत्रित मिळून 91.17 टक्के कॉलेजचा निकाल लागला आहे. श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्यूनिअर कॉलेजमधील शास्त्र शाखेमध्ये प्रथम क्रमांक प्रथमेश राजू मोरे  64.47 टक्के, व्दितीय क्रमांक ऋतुजा रमेश सत्रे 59.17 टक्के,तृतीय क्रमांक अंजली सर्जेराव कुंभार व रचना कृष्णत थोरात 58.83 टक्के तर वाणिज्य शाखेमध्ये  प्रथम क्रमांक सोनल शिवाजी पोतदार,साक्षी बापूराव शेजवळ 85.50 टक्के,व्दितीय क्रमांक 75.17 टक्के, तृतीय क्रमांक 73.17 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे. 

शिवशाही सरपंच संघाकडून स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श ग्राम व आदर्श सरपंच पुरस्काराचे आयोजन. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते स्व.शिवाजीराव देसाई यांचे दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथी व शिवशाही सरपंच संघाचा वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी होणार वितरण.

दौलतनगर दि.03 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे दि. 12 जुलै,2021 रोजीचे पुण्यतिथी दिवशी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवशाही सरंपच संघ पाटण विधानसभा या सरपंच संघाची स्थापना करण्यात आली.यंदा दि. 12 जुलै,2022 रोजी शिवशाही सरपंच संघाचा प्रथम वर्धापन दिन असून या वर्धापन दिनानिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते यशराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व पातळीवर चांगले काम करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श ग्राम पुरस्कार व पहिल्या तीन सरपंचांना "स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श सरपंच पुरस्कार"  स्व.शिवजीराव देसाई (आबासाहेब) यांचे दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथी व शिवशाही सरपंच संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते देण्यात येणार असल्याची माहिती शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                   प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली गतवर्षी  दि. 12 जुलै रोजी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा या सरपंच संघाची स्थापना करण्यात येऊन या संघाचे कार्यकारीणीची निवड करत संघाच्या कामकाजाची रुपरेषा ठरविण्यात आली होती.पाटण विधानसभा मतदार संघात नव्याने स्थापन झालेल्या या सरपंच संघाचे माध्यमातून राज्य शासनाच्या विविध चांगल्या योजना राबविण्यासाठी सर्व सरपंच यांनी एका छता खाली येऊन गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न एक वर्षाच्या कालावधीत करण्यात आला. दरम्यान गत आठवडयामध्ये ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाही सरपंच संघाचे पदाधिकारी व नवीन नेमणूक झालेल्या शिवशाही सरपंच संघाचे संपर्क प्रमूखांचा मेळावा यूवा नेते यशराज देसाई (दादा) यांच्या उपस्थितीमध्ये दौलतनगर याठिकाणी पार पडला. यावेळी शिवशाही सरपंच संघाने अल्पावधीच संपूर्ण तालूक्यामध्ये आपल्या कामांचा ठसा उमटवला असून शिवशाहीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काम वाखाणन्या जोगे असल्याचे मत युवा नेते यशराज देसाई यांनी व्यक्त केले.तर शिवशाही सरपंच संघाच्या चांगल्या कामाकरीता कायमच सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे दि. 12 जूलै रोजीचे पुण्यतिथीचे औचित्यसाधून शिवशाही सरपंच संघाचे पहिल्या वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी ना.शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनांखाली युवा नेते यशराज देसाई (दादा) यांच्या संकल्पनेतून त्यादिवशी पाटण विधानसभा क्षेत्रातील सर्व पातळीवर चांगले काम करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना "स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श ग्राम पुरस्कार" व सर्व पातळीवर चांगले काम करणाऱ्या पहिल्या तीन सरपंचांना "स्व.शिवाजीराव देसाई शिवशाही आदर्श सरपंच पुरस्कार" देणेचे जाहिर केले असून आदर्श ग्रामपंचायतींना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून गावातील आवश्यक अशा मुलभूत विकास कामासाठी  प्रथम क्रमांक 20 लाख, द्वितीय क्रमांक15 लाख व तृतीय क्रमांक 10 लाख याप्रमाणे निधी देण्यात येणार असल्याचे जाहिर केले.तसेच आदर्श ग्रामस्पर्धेकरीता आदर्श ग्रामपंचायत व सरपंच यांचे निवडीकरीता अधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त करण्यात येऊन या निवड समितीकडून या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत व सरपंच यांची निवड करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य व शिक्षण व्यवस्था,स्वच्छ सुंदर गावं,घरगुती व सार्वजनिक शौचालयाचा वापर,शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी,गावामध्ये पायाभूत सुविधांचा विकास,ग्रामपंचायतीची करवसूली,ग्रामसभा,महिला व बाल ग्रामसभा यांची अंमलबजावणी,वृक्ष लागवड व संवर्धन,ग्रामपंचायत व गावामध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सुविधा,सामाजिक दायित्व, समाज उपयोगी उपक्रम,सामाजिक शांतता,एकता,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी 100 गुण देण्यात येणार असून पाटण विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत व सरपंच यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन शिवशाही सरपंच संघाच्या तालुका कार्यकारीणीकडे दिनांक 20 जुन 2022 अखेर आपले नावाची नोंद करावी,असे आवाहनही शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी शेवटी केले आहे.

Friday 3 June 2022

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती अंतर्गत पाटण तालुक्यातील 28 विकास कामांना 03 कोटी 45 लक्ष निधी मंजूरी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून 28 गावांतील विविध विकास कामे लागणार मार्गी.

दौलतनगर दि.03 :-पाटण विधानसभा मतदारसंघातील भूकंप प्रवण क्षेत्रातील विविध गावांतील सभामंडप,पोहोच रस्ते,आर.सी.सी.बंदीस्त गटर,शाळा इमारत दुरुस्ती  व साठवण टाकी इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०21-22  या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून निधी मंजूर होण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे अध्यक्ष ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे विनंती केलेली होती.त्यानुसार पाटण तालुक्यातील 28 गावांतील विविध विकास कामांना 03 कोटी 44 लक्ष 98 हजार निधी मंजूर केला असल्याची माहिती नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने  प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

          प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील 28 गावांतील अंतर्गत सभामंडप,पोहोच रस्ते,शाळा इमारत दुरुस्ती  व साठवण टाकी इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०21-22  या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मंजूर होणेकरीता दि.11 नोव्हेंबर २०२१ रोजीचे पत्रानुसार राज्याचे मुख्यमंत्री तथा कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे अध्यक्ष ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे विनंती  केलेली होती. त्यानुसार सन २०21-22 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे अध्यक्ष असणाऱ्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण 28 गावांतील विविध विकास कामांना 03 कोटी 44 लक्ष 98 हजार निधी मंजूर करण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार मंजूर झालेल्या विकासकामामध्ये आवसरी(काठी) येथे सभामंडप  8.50 लाख,टोळेवाडी पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख,घाणबी येथे पवारवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,वाटोळे जोडरस्ता मैदान ते शंकर पवार यांचे घरा रस्ता खडीकरण,डांबरीकरण 10 लाख,मणदुरे बौध्दवस्ती ते कातकरीवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,डफळवाडी (मणदुरे) उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,माथणेवाडी(चाफळ) खालचे गावठाण रस्ता खडी. डांबरीकरण 7 लाख,माळवस्ती (माजगाव) येथे सभास्टेज 6.50 लाख,मल्हारपेठ येथे सभामंडप 10 लाख,जमदाडवाडी अंतर्गत मळावस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,आबदारवाडी येथे बहुउद्देशीय सभागृह 6 लाख,नाडे येथे बहुउद्देशी सभागृह 25 लाख,नवसरी चव्हाणवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, घाटेवाडी (मालोशी) येथे सालादेवी ते जुने गावठाण रस्ता खडीकरण,डांबरीकरण 20 लाख,धनगरवाडी (तारळे) अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,वाघणे(गोवारे) येथे सभामंडप 8.50 लाख,पिंपळगाव(कवरवाडी) येथे सुतारवस्तीमध्ये सभामंडप 8.50 लाख,शिवाजीराव देसाई विद्यालय,सोनवडे येथील इमारत दुरुस्ती 15 लाख,कोरिवळे माळवस्ती मराठीशाळा रस्ता खडीकरण, डांबरीकरण 10  लाख,मरळी येथे गावांतर्गत आर. सी. सी. बंदीस्त गटर बांधकाम 20  लाख,न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी येथे वर्ग खोल्या बांधकाम 25 लाख,मोरगिरी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,हुंबरणे (गोकूळ तर्फ पाटण) अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,बनपूरी (जोतिर्लिंग)अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख,पाणेरी येथे सभामंडप 10 लाख,सणबूर अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख, कोळगेवाडी(काळगाव) भूरभूशी मेन रोड ते कोळगेवाडी समाजमंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख, निवकणे येथे साठवण टाकी 5 लाख या कामांचा समावेश असून या मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांची अंदाजपत्रक,निविदा कार्यवाही करण्याच्या सूचना ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या असून लवकरच या कामांना सुरवात होणार असल्याने ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून या 28 गावांतील विविध विकास कामे मार्गी लागणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

Thursday 2 June 2022

आपत्ती काळात व्यवस्थापनेकरीता तालुका प्रशासनाने अगोदरच जागृत रहावे. हलगर्जीपणा करु नये. नामदार शंभूराज देसाईंच्या तालुका प्रशासनाला सुचना.

  दौलतनगर दि. 02:  सातारा जिल्हयात सर्वात जास्त  पाटण तालुक्यासह कराड तालुक्यीतल सुपने मंडलाला प्रतिवर्षी अतिवृष्टीच्या काळात आपत्तीचा सामना करावा लागतो.आपले तालुका प्रशासनाला तालुक्यातील आपत्ती परिस्थितीची कल्पना आहे.आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपण प्रतिवर्षी आपत्ती व्यवस्थापन व नियोजनाची बैठक घेत असतो.आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करु नये,जागृत रहावे अशा सुचना गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी तालुका प्रशासनाला दिल्या. नामदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.पाटणचे प्रातांधिकारी  सुनिल गाडे,कराडचे उतम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड,तहसिलदार रमेश पाटील, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता  एन.टी.पोतदार, कार्यकारी अभियंता बुंदिले कराडचे गटविकास अधिकारी यु.व्ही. साळुंखे, पाटणचे शेलार, पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन.चौखंडे उंब्रजचे अजय गोरड, मल्हारपेठचे उत्तम भापकर ढेबेवाडीचे संतोष पवार, कृषि अधिकारी सुनिल ताकटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.प्रमोद खराडे पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, नायब तहसिलदार प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.

             याप्रसंगी प्रारंभी नामदार शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिका-यांकडून मान्सुन काळात पडणा-या पावसामुळे कोयना धरणात होणा-या पाणीसाठयासंदर्भात व पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेनंतर पाणी विर्सगासंदर्भातील सविस्तर माहिती घेवून कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे असे सांगत उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणाखाली तहसिल कार्यालय याठिकाणी २४ तास आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात यावा. आपत्ती काळात तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षामध्ये माहिती देण्याचे काम अधिकारी यांनी करुन यावर तात्काळ तोडगा काढून आपतकालीन परिस्थिती दुर करावी. तसेच प्रत्येक तालुका स्तरीय अधिकारी यांनी आपले विभागात 1 जुन पासूनच आपत्तकालीन कामासाठी अधिकारी,कर्मचारी यांची नेमणूक आपआपल्या कार्यालयामध्ये करुन संबधित अधिकारी व कर्मचारी यांचे दुरध्वनी क्रमांक तहसिलदार यांचेकडे देवून ते तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रसिध्द करावेत. तहसिलदार यांनी मंडलाधिकारी,तलाठी यांचेमार्फत कोयना नदीकाठच्या गावांना या काळात सतर्क राहण्याच्या सुचना कराव्यात तसेच गटविकास अधिकारी यांनी ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामसेवक यांना आपलेकडील गावांत सतर्क राहणेबाबत सुचित करुन त्या त्या विभागातील वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून मान्सुन काळात साथीचे रोग पसरणार नाहीत याकरीताच्या उपाययोजना कराव्यात,पावसाळयामध्ये ग्रामीण आणि डोंगरी भागामध्ये साथीच्या रोगाबरोबर सर्पदंशाचे प्रमाण मोठया प्रमाणात पहावयास मिळत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,ग्रामीण रुग्णालय याठिकाणी यावरचा औषधसाठा आताच करुन ठेवावा.प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य नियोजन करुन 24 तास अलर्ट राहवे. आपत्तकाळात रुग्णवाहिकेची व्यवस्था तात्काळ कशी होईल याची दक्षता घ्यावी,असे सांगत नामदार शंभूराज देसाई यांनी वीज वितरण विभागाचा आढावा घेतला, हा आढावा घेताना या विभागाने प्रामुख्याने आपतकालीन टिम तयार करुन दक्ष आणि जागृत राहून वि्द्युत पुरवठा सुरळीत कसा राहिल याची दक्षता घ्यावी. प्राथमिक शाळेंचे विज जोडण्या चालू आहेत का ते पहावे, नसतील तर त्या जोडण्या चालू कराव्यात.सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी अतिवृष्टीच्या काळात रस्ता बंद होऊन दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. जेसीबी मशीन व पोकलॅन मशीन उपलब्ध कराव्यात व आपली यंत्रणा सतर्क ठेवावी. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अतिवृष्टीच्या दरम्यान  नदीकाठचे व डोंगरभागातील पिण्याच्या पाण्याचे उदभव  व विहीरी पाण्याखाली गेल्यास टॅकरची व्यवस्था करुन पाणी पुरवठा करावा. गट शिक्षण अधिकारी यांनी प्राथमिक शाळांचे पाहणी करुन आपत्तीकाळात तात्पुरता निवा-याकरीता शाळा सुस्थित आहेत का ते पहावे. धोकादायक मोडकळीस  आलेल्या शाळामध्ये अतिवृष्टीच्या कालावधीत मुलांना बसवू नये अशा सुचना केल्या. पाटणमधील अतिक्रमणामुळे उदभवणा-या पुरस्थितीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना करुन, कराड चिपळुण या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम अपुर्ण असून त्याठिकाणी दक्षता म्हणून दक्षता फलक लावण्याचे काम करावे. असेही नामदार शंभूराज देसाई यांनी सांगून आपत्ती काळात तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी योग्य ते नियोजन करावे विनाकारण कारवाई करण्याची वेळ कुणी आणू नये असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.